माझी ईच्छा नसताना ही ते मला कराव लागणार होतं. कारण कालच निशांतला दुखापत झाली होती. आता त्याला गमावण शक्य नव्हतं.. नाही.., हो करत मी ते गिफ्ट काऊंटर वरून घेतलं..
"घेतलंस ते गिफ्ट..!! गुड गर्ल. आता ते ओपन कर आणि त्यात जे काही आहे ते उद्या घालुन यायच आहे. पत्ता आज रात्री पाठवतो. आणि हो रागात फाडून टाकण्याचा प्रयत्न करू नकोस.. नाही तर मला तुझ्या लाडक्या निशांतला त्रास द्यावा लागेल. तसा ही तो मध्ये मध्ये येत आहेच म्हणा.. पण ठीक आहे काही दिवसच. नंतर आपण जाणारच आहोत सर्वांपासून दूर... जिथे असु फक्त तु आणि मी...." आणि त्याचा तो हसण्याचा आवाज माझ डोकं बधीर करू पाहत होता..
ते गिफ्ट तसच टेबलावर ठेवून मी रडु लागले .. अचानक कोणी तरी मागून खांद्यावर हात ठेवला.. चांगलेच दचकलेच... पण तो निशांत होता..
"हनी-बी काय झालं..?? अशी का रडत आहेस तु..???"
मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती.. मी फक्त त्याला बिलागले आणि रडत होते.. शेवटी त्याने मला समजावल तेव्हा कुठे शांत झाले.
"आता सांगशील काय झालं.?? अशी का रडत आहेस.??" तो माझ्याकडे बघत होता. वाट बघत होता माझ्याकडे उत्तराची...
मी त्याच्या डोळ्यात पाहिल आणि समोर ठेवलेला बॉक्स त्याच्यासमोर सरकवला..
"आज हे गिफ्ट दिल आहे..."
"बघ काय आहे.. नको.., तु नको मीच बघतो." एवढं बोलून त्याने तो बॉक्स ओपन केला. त्यात एक रेड कलरचा वनपीस होता.
"हे काय आहे.. ड्रेस का पाठवला आहे त्या व्यक्तीने..??" निशांत तो ड्रेस काढून बघत होता..
"त्याने तो घालून उद्या बोलावल आहे.. पत्ता आज रात्री मॅसेज वर पाठवणार आहे."मी शांतपणे बघत बोलले.
"अरे वा..!! त्या मूर्खाने चांगलच काम केलं.. म्हणजे बघ तु उद्या जा भेटायला. आणि मी देखील सोबत असेल. पण मी लपून मागून येईल. आणि आपण त्याला पुराव्या सकत पकडून देऊ पोलिसांना..." निशांत आनंदात ओरडलाच..
"पण काही झालं तर..?? मला खूप भीती वाटते आहे निशांत..."
"अग हनी-बी तु नको घाबरुस मी आहे ना सोबत. सर्व काही ठीक होईल. उद्या त्या व्यक्तीचा शोध लागेल आणि कळेल की कोण आहे ती व्यक्ती आणि काय हवंय तिला..." निशांत शांतपणे बोलला. जसकाही सर्वकाही आपल्याच बाजूने होणार आहे असं त्याला वाटत होत..
पण बोलतात ना वेळ चांगली असली पाहिजे.. बघू काय होतंय. हो ., नाही करत. उद्या त्या व्यक्तीने पाठवलेल्या पत्त्यावर जायचं ठरलं..
परत लेक्चर्सला जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. डोकं ही दुखत असल्याने मी लवकरच घरी आले. मी घरी लवकर आलेल बघून आई ही जरा टेंशन मध्ये दिसत होती..
"काय ग प्राजु आज लवकर आलीस...! तब्बेत ठीक आहे ना..???" आईच्या प्रश्नावर मी जास्त रियाक्त न होता फक्त तिला डोकं दुखतंय म्हणून सांगून स्वतःच्या रूममधे गेले.
आज लवकर आले खर, पण मन मात्र कशातच लागत नव्हत. प्रत्येक वेळी असा वाटत होतं जस की आता जाऊन आईला सगळं सांगावं. पण निशांतने कोणालाही काही सांगायच नाही असं सांगितलं होतं.
ती रात्र दडपणाखाली गेली.. पत्ता ही व्हाट्सएपला आला होता जो मी निसगांतला पाठवला होता. लोकेशन ही माझ्या घराच्या जवळच होत. सकाळी उठुन मी कॉलेजसाठी निघणार होते. पण जाताना मॉलमध्ये कपडे बदलून आम्ही त्या पत्यावर जायचं ठरवलं होतं.
तो एक कॅफे होता.. कमी लोकांनी भरलेला. आम्ही गेलो. निशांत माझ्यापासून थोड्या अंतरावर बसला होता. जेणेकरून तो लगेच मला मदत करू शकेल.
काही वेळ गेला आणि मला एक मॅसेज आला...
"खुप सुंदर दिसत आहेस त्या रेड वनपीस मध्ये. एखादी बाहुलीच जणु..."
तो मॅसेज बघताच मी निशांतला इशारा केला..आता ती व्यक्ती कधी ही आणि कोणत्याही क्षणी येऊ शकत होती. आम्हाला रेडी राहायचं होत...
To be continued