Julale premache naate - 64 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-६४

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६४

"तो क्षण येण्याच्या पाच मिनिटं आधीच अचानक कॅफेची लाईट गेली.. त्यामुळे जरा अंधार पसरलला. परत लाईट आली तेव्हा एक व्यक्ती मेन डोअर जवळ रेड कलरच जॅकेट घातलं होत ती व्यक्ती लपून बघत असायचं जाणवलं निशांतने दरवाजाच्या जवळ धाव घेतली.. ते बघून ती व्यक्ती ही पळु लागली...

यासर्वात मी ही लगेच बाहेर आले.. जेव्हा बाहेर आले तेव्हा समोर रेड जॅकेट मध्ये दुसर तिसरी कोणी नसुन तो राज होता. निशांत आणि राज एकमेकांवर हमला करत होते.. त्यांची मारामारी बघुन मग मीच त्यांना अडवायला गेले आणि त्यांना दूर केलं..



"निशांत मी तुला सोडणार नाही... का.?? का माझ्या बहिणीचा जीव घेतलास तु...? अस करून काय मिळाल तुला. काय केलं होतं तिने तुझं... बस तुझ्यावर जीवापाड प्रेम करायची म्हणून तु ही शिक्षा दिलीस का..??" एवढं बोलून तो धावून आला आणि परत ते भांडायला लागले..

"ते भांडण चांगलच वाढलं होत. एकमेकांचे जीव घ्यायला ही मागे पूढे बघत नव्हते.. शेवटी मी मधे पडले आणि दोघांना दूर केलं...

"हे बघ तोंडाला गेली ते बोलु नकोस.. मी काही केलं नाहीये हर्षलला. आणि तिचा खून करून मला काय मिळणार होत."


पण दोघेही समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते.. शेवटी मी त्यांना दूर केलं..

"गाईज का भांडत आहात तुम्ही... हे बघ राज निशांत का खून करेल हर्षल चा..?? अस करून त्याला काय मिळणार आहे... आणि तुला अस का वाटत आहे की निशांतने खूण केला आहे हर्षलचा.??"

"जर निशांतने खून नाही केला तर तिला पार्किंगमध्ये का भेटायला गेला होता..?? सांग ना निशांत हे खोट आहे का तु तिला भेटायला पार्किंगमध्ये नव्हता गेलास..."

"सांग निशांत... तु गेला होतास का हर्षल ला भेटायला.???" मी विचारताच निशांत शांत झाला.

"याचं न बोलनच खर काय आहे ते सांगतंय प्रांजल.." राज आता चांगलाच भडकला होता.

"हो मी गेलो होतो.., पण तिचा खून करायला नाही, तर तिला तिची चूक समजवायला की तिने केवढी मोठी चुक केली आहे..." त्याच्या या वाक्यावर मी आणि राज त्याच्याकडेच बघत राहिलो..

"म्हणजे..?? नीट सांग." राज जरा रागात बोलला.

"त्या दिवशी ती प्रांजल ला भेटायला आलेली.., पण फक्त भेटली नाही, तर तिने प्रांजलच ऑक्सिजन मास्क काढलं होत. आणि ती घाईत निघून गेली. जाताना तिची माझ्याशी धडक झाली आणि तिचा मोबाईल खाली पडला.."


"तो उचलताना ही तिचा हात थरथरत होता. जसे की तिने चूक केली असावी.. तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब पसरले होते. घाबरलेला चेहरा काही वेगळंच सांगत होत. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला.., पण ती काही न ऐकता निघून गेली. मला जरा संशय आला म्हणुन ती रूममधून बाहेर जाताच मी आता गेलो. तर मी पाहिलं की प्राजु ऑक्सिजणसाठी तडपडत होती."


"मी लगेच डॉक्टर ला बोलावल. आणि तसच हर्षलच्या मागे गेलो. हर्षल पार्किंग मध्ये ठेवलेल्या गाडीमध्ये बसून रडत होती.. मी जाताच तिने स्वतःचे डोळे पुसले आणि निघण्याची तय्यारी करू लागली."

"हर्षल थांब मला काही विचारायचं आहे तुला...!!" माझ्या प्रश्नावर तिने माझ्याकडे न बघताच "मला लवकर जायचं आहे " एवढंच बोलली.

"मी मग तिला गाडीखाली उतरवलं आणि जाब विचारला.. हर्षल का केलंस अस तु.??? अस करून काय मिळालं असत तुला..??"

"मी.., मी काय केल आहे निशांत..??"



"तुला अस वाटतंय का तु काहीच केलं नाही आहेस. पण तुला माहीत नसेल. प्रांजल च्या रूममधे सिसिटीव्ही कॅमेरा लावला आहे. आणि आता तू जे काही करून आली आहेस ना ते रेकॉर्ड झालंय. काय मिळालं तुला अस करून. जर प्रांजल ला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही..."


"हे बघ निशांत.. मला माफ कर रे... म्हणजे माझं इंटेशन प्राजुला मारण्याच नव्हतं. खरतर मलाच कळलं नाही की मी अस का केलं.. प्लीज निशांत मला माफ कर.. हे सगळं मी तु माझा व्हावास म्हणुन केलं. पण नंतर मला कळलं की मी किती मोठी चुक केली आहे..." आणि ती खुप रडायला लागली..


"हे बघ हर्षल, प्रेम हे अस करून मिळवता येत नाही. जर मी वेळेत आत गेलो नसतो तर प्रांजल चा जीव धोक्यात असता. तु खुप मोठी चूक केली आहेस. पण ती तुझ्याकडुन चुकून झाली आहे हे मी समजू शकतो. आणि तुला पच्छताप झाला आहे. आता तू गप्प घरी जा उद्या बोलु आपण याबद्दल. एवढं बोलून मी तिला घरी जायला सांगितलं."


"तिला घरी जायला सांगुन मी परत हॉस्पिटलमध्ये गेलो. देवाच्या कृपेने प्राजूची प्रकृती गंभीर नव्हती. हेच घडलं होत जे फक्त माझ्यात आणि ईनपेक्टर मधेच होत. पण राज तुला तर खोट वाटत असेल तर तु त्यांच्याशी बोलून घे. मीच त्यांना विनंती केली होती की ही गोष्ट बाहेर येऊ देऊ नका."

"आणि मला सांग तुला हे कळलं असत की प्रांजल च्या जीवाला धोका होता तर तुही हेच केलं असत. आणि मला हर्षल ला मारून काय मिळालं असत. तीच वागणं नक्कीच चुकीचं होत. पण तिच्या बाबतीत जे काही झालं त्यात माझा काहीच हात नव्हता."

हे सगळं मी आणि राज ऐकतच राहिलो. म्हणजे हर्षल जिला मी माझी बेस्टफ्रेंड समजत होते तिनेच मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मी तर हे ऐकूनच खाली बसले..
राज ही गोंधळा होता..

"निशांत तु खर बोलतो आहेस ना..???" आज अजूनही गोंधळलेला होता.

"थांब.." निशांतने मोबाईल काढला आणि कोणाला तरी कॉल लावला.

"घे बोलुन मग तुझा विश्वास बसेल." एवढं बोलून निशांतने राज ला मोबाईल दिला.

मोबाईल वर पलीकडून कोणी तरी बोलत होते आणि त्या व्यक्तीच्या बोलण्याने राजच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते.
काही वेळाने राज ने फोन ठेवला... काही क्षण असाच गेला.

"सॉरी निशांत.., मला माफ कर. मला नव्हतं माहीत की हर्षल, प्रांजल सोबत अशी वागेल. पण तुम्ही इथे काय करत होतात...??"

"हा प्रश्न तर मी ही विचारू शकतो राज..?? आम्हाला का फॉलो करत आहेस. आणि का प्रांजल ला त्रास देत आहेस. आधी तुझी बहीण आणि आता तु...!! का तिला छळत आहात...??" आता निशांत चांगलाच रागावला होता..


"मी..., मी का त्रास देऊ आणि तुम्हाला मी फॉलो यासाठी करत होतो की मी तुझ्यावर नजर ठेवुन होतो. मला तुझ्या विरुद्ध पुरावा हवा होता. म्हणुन मी तुमच्या मार्गावर होतो." राज ने ही सगळी सांगितलं.

"पण प्रांजल ला कोण त्रास देत आहे..??" राज च्या प्रश्नावर निशांतने घडलेला प्रकार सांगितला..

"अच्छा म्हणजे आता मला कळतंय की ती व्यक्ती हर्षलच्या खुनात निशांत तुला आणि प्रांजल ला त्रास देणारा मी आहे असं दाखवु पाहत आहे.."

"आता मला ही हाच संवशय आहे..." निशांतने ही राज च्या होकारात होकार मिळवला.

"म्हणजे ती व्यक्ती कोणी तिसरीच आहे. आणि आता आपण तिघांनी मिळून त्याचा शोध घेण महत्त्वाचे आहे." राजच्या वाक्यावर मी आणि निशांतने स्वतःच्या माना डोलावल्या.

राज आणि निशांतने ही एकमेकांची माफी मागितली..
आता सगळं क्लीअर होत.. हर्षल ला मारणारी आणि मला त्रास देणारी व्यक्ती जर एक असेल ना तर ती सापडणे खूप महत्त्वाचे होते..

बघु आता अजून काय वाढुन ठेवलंय नियतीने....

to be continued.....



(कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग..