म्हणायला रोशनीच्या महालात माणसांचा राबता होता परंतु रोशनीवर माया करणारे कोणीच नव्हते. आपल्या लाडक्या मालकीणीच्या मृत्युस ही सावळी, लंगडी महामायाच कारणीभुत आहे अश्या काहीश्या बुरसटलेल्या विचारांनी नोकरवर्गाने सुध्दा तिच्यावर आपला जिव ओवाळुन टाकला नाही. मेहतांसमोर सर्वजण रोशनीच्या मागे-पुढे करत. परंतु त्यांच्या मागे मात्र रोशनी त्यांच्या लेखी अस्तीत्वातच नव्हती.
रोशनी मोठी होत गेली आणि तिचे जग संकुचीत गेले. आपल्या बेढब रुपाला बुजुन ती बाहेर पडेनाशी झाली. तिचा स्वभाव एकलकोंडा होत गेला. मेहता आपल्याच कामात मग्न होते. त्यांच्याकडे रोशनीसाठीच काय, स्वतःसाठीसुध्दा वेळ नव्हता.
लहानपणापासुनच प्रेमाला पारखी झालेली रोशनी मनोमन प्रेम काय आहे हे माहीत नसतानाही खर्याप्रेमासाठी तरसत राहीली.
परीकथांमध्ये असलेला राजकुमार एकदिवशी खरंच येईल आणि मलासुध्दा ह्या मोहमयी, खोट्या जगापासुन दुर घेऊन जाईल असा दृढ विश्वास तिला वाटत होता. उंच, गोराप्पान, देखणा, ज्याच्या मनात प्रत्येक गोष्टीसाठी प्रेम भरलेले असेल. तो श्रीमंत नक्कीच नसेल. कुठलाही श्रीमंत माणसाच्या मनात प्रेम अस्सुच शकत नाही. त्यांच्या मनात फक्त लोभ, लालसा आणि संपत्ती एवढेच असते. .. पण तो येईल, एक दिवस नक्कीच येइल. रोशनी मनोमन विचार करायची आणि स्वतःच लाजुन हसायची.
दिवसांवर दिवस, महीने आणि वर्ष होत गेली आणि रोशनीचा ’राजकुमार’ गोष्टींवरील विश्वास उडत गेला. तिच्या आयुष्यात समोर फक्त सेल्स-लोक, बिझनेस पार्टनर्स, चॅरीटीसाठी हात पसरवणारेच आले. रोशनीला पाहील्यावर त्यांच्या चेहर्यावरील बदलेले भाव रोशनीने ओळखले होते. घृणा, तिरस्कार किंवा दया/माया. आणि ह्यातील कुठल्याही गोष्टीचा रोशनीला प्रचंड राग होता.
रोशनी सज्ञान होत गेली आणि तिला एका गोष्टीची जाणीव झाली की आपला कडे रुप नसले तरी आपल्याकडे पैसा आहे आणि ह्या पैश्याच्या तालावर आपण जगाला नाचवु शकतो.
**********************************
“तिन आठवडे झाले जोसेफ, काहीच प्रोग्रेस नाहीये. काय ठरवले आहेस तु? काय प्लॅन आहे तुझा?” नैना हताशपणे हवेत हात फिरवत जोसेफशी बोलत होती.
“मी तरी काय करु नैना? मी एक सुपरवायझर आहे. काही कारण नसताना रोशनीला भेटणे केवळ अशक्य आहे मला. जॉईन झाल्यानंतर मी तिचे तोंड सुध्दा पाहीले नाहीये..”, जोसेफ म्हणाला..
“तुझाच मुर्खपणा तो!, एवढ्यासाठी मी ड्रायव्हरच्या पोस्टसाठी फेव्हरेबल होते. अगदी रोज नसले तरी तुझी तिची गाठभेट बर्याच वेळा झाली असती. पण आता ह्याच गतीने आपला प्लॅन पुढे सरकत राहीला तर मला काही होप्स दिसत नाही येत..” नैना म्हणाली.
“मग आता काय करायचे?” जोसेफ
“सध्या तरी आपल्या हातात काहीच नाही. केवळ वाट पहाणे आणि योग्य संधीची वाट पहाणे..”, नैना
जोसेफ आणि नैनाला हवी ती संधी नंतर दोन आठवड्यांनी चालुन आली.
जोसेफ काम करत असलेल्या फ्लोअरचा मॅनेजर जेकोबे सुट्टीवर होता आणि त्या दिवशी आलेल्या कन्साइंन्मेंटसाठी काही कागदपत्रांवर रोशनीच्या सह्या आवश्यक होत्या. तसेही रोशनीकडे जायला फारसे कोणी तयार नसायचे, त्यामुळे जोसेफने जेंव्हा ह्या सह्या घेउन येण्याची तयारी दर्शवली त्यावेळेस कोणीच त्याला विरोध केला नाही.
जोसेफ कागदपत्रांची ती फाईल घेउन रोशनीच्या केबीन मध्ये गेला. मागच्या वेळेस जेंव्हा शेवटचे पाहीले होते अगदी तस्सेच आजही रोशनी त्याच जागी बसली होती, जसे काही इतक्या दिवसांत ती जागची हालली सुध्दा नसावी.
जोसेफने सर्व कागदपत्रांवर तिच्या सह्या घेतल्या आणि तो जाण्यासाठी वळला. मग काही क्षण विचार करुन तो म्हणाला..
“मॅम, तुमच्याशी काही मिनीटं बोलायचे होते..”
“कश्याबद्दल??”
“आपल्या ऑटो-प्रोजेक्टबद्दल..”
“काही अडचण आहे का?”
“नाही.. एक सजेशन आहे..”
“टॉक टु युअर फ्लोअर मॅनेजर..”
“नाही मॅम.. मला वाटते ते सजेशन तुमच्याशीच बोललेले जास्ती योग्य ठरेल…”
“आय होप, यु वोंट वेस्ट माय प्रेशीयस टाईम..”
“ऍब्स्युलेटली नो मॅम..”
“ठिक आहे, उद्या सकाळी ११.३०”
हीच ती संधी आहे. जोसेफ स्वतःशीच म्हणाला. मेक ऑर ब्रेक..
दुसर्या दिवशी जोसेफ ११.३० ला रोशनीच्या केबीनमध्ये हजर होता. फिक्कट क्रिम कलरचा शर्ट, बारीक स्ट्राईप्सची ब्लॅक पॅंन्ट, स्वच्छ पॉलीश केलेले ब्लॅक लेदर शुज, जेल लावुन व्यवस्थीत बसवलेले केस आणि मंद दरवळणारा परफ्युम
आत्मविश्वासपुर्वक पावलं टाकत तो केबीन मध्ये आला.
जोसेफला पाहुन पहिल्यांदा..पहिल्यांदा रोशनीच्या हृदयामध्ये एक बारीक कळ येऊन गेली..
“राजकुमार..” रोशनी स्वतःशीच म्हणाली.. “उमदा, देखणा तरूण, मितभाषी, गोराप्पान जणु काही एखाद्या गोष्टीच्या पुस्तकातुनच उतरला असावा…”
“गुड मॉर्नींग मॅम!!”, आपल्या चेहर्यावरील हास्य कायम ठेवत जोसेफ म्हणाला.
फार कमी लोकांच्या चेहर्यावर रोशनीशी बोलताना जेन्युइन हास्य असे. एक तर ते हास्य खोटे.. ओढुन-ताणुन आणलेले असायचे, नाही तर त्याला कुत्सीतपणाची लकेर असायची. परंतु जोसेफच्या त्या हास्यामध्ये एक आपुलकेपणा होता, मैत्रीपुर्ण भाव होते, एक सच्चेपणा होता.
“गुड मॉर्नींग”.. रोशनी म्हणाली.. “बोलं.. काय काम आहे..”
“मॅम आपला जो शोअरुमचा दुसरा प्लोअर-प्लॅन आहे जो आपण सर्व प्रकारच्या हाय-टेक ऍक्सेसरीज साठी राखुन ठेवला आहे तो माझ्यामते आपण तिसर्या प्लोअरला शिफ्ट करावा”
“जोसेफ, आपल्या शोअरुमला तिसरा प्लोअर नाहीये..”
“येस मॅम.. आय नो.. आपण वाढवु आणि ऍक्सेसरीज तिसर्या फ्लोअरला शिफ्ट करु”
“बरं.. आणि मग दुसर्या फ्लोअरला आपण काय करावं असं तुम्हाला वाटतं?”
“टेस्ट राईड सेक्शन”..
“टेस्ट राईड? काय डोकं फिरलं आहे का तुमचं जोसेफ?”
“मॅम प्लिज, ऐकुन तर घ्या!. आपल्या शोअरुमचे क्षेत्रफळ इतकं मोठ्ठ आहे की एक आतमधुन गोल चक्कर जरी मारली तरी ती एक-दोन किलोमीटर नक्की होईल.
दुसर्या मजल्यावर आपण एक टेस्ट ट्रॅक बनवु जो पुर्ण गोलाकार फेरी मारेल. हा ट्रॅक संगणकाद्वारे नियंत्रीत असेल. केवळ काही बटनांच्या सहाय्याने आपण ह्या ट्रॅकला कधी चढ तर कधी उतार, कधी खड्डे तर कधी गुळगुळीत, कधी पावुस-पाण्याने घसरडा झालेला तर कधी वेड्यावाकड्या वळणांचा मध्ये परावर्तीत करु शकतो.
आलेल्या ग्राहकाला त्याची आवडती गाडी एकाच ठिकाणी सर्व परीस्थीतीमध्ये चालवुन बघता येईल.
इतकेच नव्हे तर काही मॉडेल्ससुध्दा आपण संगणकनियंत्रीत ठेवु शकतो. कित्तेक लोकं नविन, शिकाऊ असतात किंवा काही लोकांच्या गाड्या ड्रायव्हरनियंत्रीत असतात. अश्या लोकांना गाडी न चालवुन सुध्दा गाडीत बसल्याचा फिल मिळु शकतो.
भारतातील ह्या प्रकारचे हे पहीलेच शोअरुम ठरेल, तसेच ह्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे अनेकजणांचा चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय सुध्दा ठरेल. लोकांचा ओघ वाढल्याने अनेक कंपन्यांच्या गाड्या आपल्याबरोबर डिलर-शिप करायला उत्सुक असतील. आपल्याकडे चॉईस आला तर आपण आपल्याला पाहीजे त्याच कंपन्यांबरोबर टाय-अप करु शकतो किंवा इतरांकडुन अधीक पैसासुध्दा आकारु शकतो..”
“मला वाटतं तुम्ही जरा रिऍलिस्टीक व्हावं जोसेफ.. एक तर हा सर्व खर्चीक भाग आहे आणि दुसरे म्हणजे अश्या सुविधा आपल्याला उपलब्ध करुन द्यायला..”
“..आहेत.. जपानमध्ये ’मोशी-कार्स’ नावाची एक कंपनी आहे जी त्यातल्या त्यात स्वस्त दरात अश्याप्रकारचे ट्रॅक्स निर्माण करुन देते.”.. रोशनीचे वाक्य मध्येच तोडत जोसेफ म्हणाला..
“त्यांच्या संगणक-स्थळावरुन मी काही माहीतीच्या, दरांच्या आणि इतर लोकांच्या रिव्ह्युज च्या प्रिंट्स काढल्या आहेत. तुम्ही एकदा ह्यावरुन नजर फिरवु शकता.
खर्चीक म्हणाल तर मला नाही वाटत ’रोशनी ऍन्टरप्राइज’कडे इतका कमी पैसा आहे. आणि कुठलीही बॅक हसत हसत आपल्याला लोन देऊ करेल इतकं नाव तर नक्कीच ’रोशनी ऍन्टरप्राइजचे’ आहे. तुम्ही आपल्या फायनांन्शीअल कन्सलटंट बरोबर बोलुन फायदा/तोटा बघुन घ्यालच. पण मला खात्री आहे, हा ऑप्शन आपल्याला तोट्यात नक्कीच घेउन जाणार नाही”
जोसेफने आपल्याकडील प्रिंट्स रोशनीच्या समोर ठेवल्या आणि तो तेथुन बाहेर पडला.
“ईफ़.. धिस क्लिक्स..” त्याने विचार केला.. “देअर वोंट बी एनी टर्निंग बॅक”
************************************************
पुढचा एक आठवडा रोशनीकडुन काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परंतु दुसर्या आठवड्याचेही काही दिवस असेच गेले आणि जोसेफच्या आशा कमी कमी होऊ लागल्या.
आणि शुक्रवारी दुपारी त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला.
“हॅलो?”
“मि.जोसेफ?, रोशनी हिअर.. आज संध्याकाळी तुम्ही काही करता आहात का?”
“माझा?.. नो!, नॉट ऍट ऑल..”
“गुड. मी तुमचा टेस्ट ट्रॅकचा प्लॅन डॅडशी डिस्कस केला कारण ह्या प्लॅनसाठी बजेटपेक्षा मोठ्या प्रमाणात पैश्याची आवश्यकता आहे आणि चेअरमनच्या नात्याने मला तो त्यांच्याकडुन मंजुर करुन घेणे आवश्यक होते.
डॅडना तुझा प्लॅन खुप आवडला आहे आणि त्यावर अधीक चर्चा करण्यासाठी संध्याकाळी भेटायचे आहे. तेंव्हा ९.३० वाजता ’हॉटेल ग्रिन-वुड्स’ मध्ये डिनरसाठी या”
“दॅट्स ग्रेट, आय विल बी देअर..”
“…..”
“बाय द वे.. हा प्लॅन तुम्हाला कसा….”
परंतु जोसेफचे वाक्य पुर्ण व्ह्यायच्या आतच फोन बंद झाला होता.
*************************************************
[क्रमशः]