lazyism Four pieces and One Joint Hand - 12 in Marathi Moral Stories by Lekhanwala books and stories PDF | आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 12

Featured Books
Categories
Share

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 12

सगळीकडे गुलाल उधळणं चालू होतं, जोशात मिरवणूक चालू होती, लोकांनी जल्लोष सुरु केला होता, जो माणूस दिसतं होता त्यांच्या अंगाला गुलाल लागला होता, चेहरानचेहरा पार गुलालात रंगलेला वाटत होता, सुमेधला लोकांनी खांदयावर घेतला होता,

“एक तर तुम्हाला त्याचं अपूर्प वाटू लागतं तुम्हालां जे अशक्यप्राय वाटत असतं ते आता कुणीतरी सहज करुन दाखवलंले असतं…… आता तुम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होणार, आतापर्यंत तो तुमच्यापैकी एक असतो आणि या क्षणापासून तो वेगळा वाटू लागतो, तुम्हाला ही तस व्हायचं असतं पण तुमचे प्रयत्न संपतात, संगळ काही निसटताना दिसतं परिस्थिती आता तुमच्याबाजूनें येईल….. आता येईल…. असं करत एक एक दिवस जमवून ठेवलेला तो आशेचा साठा एका निसटत्या क्षणी नाहीसा होतो, तुम्ही शर्यत हरलात म्हण्यापेक्षा नियतीच्या कसोटयावर ती पूर्ण होतच नाही, तो जो पुढे गेला त्यात आता तुम्ही स्वतःला पाहू लागता तुम्ही तसे प्रत्यक्ष बनने आता दुरापास्त असतं, प्रयत्नांच्या पराकाष्ठेत काही कमी ठेवलं नसताना देखील, तुमच्या पदरात ते यश पडत नाही ज्याचें तुम्ही हक्कदार बनू पाहता, तुम्ही दुर्देवी ठरता आणि कधीतरी तुमचं नशीब नसतं….. हो हे तुम्हाला मान्य करावचं लागेल!” ही भावना एकदा खोलवर मनात रुचली की मग बाकी गोष्टी सोप्या होतात, मग तुम्ही अनुयायी बनायला मोकळे होतात…..

आता तुम्ही ही त्या गर्दीचा भाग बनतात, गुलाल तुमच्यापण अंगावर उधळला जातोय, तुम्ही कमरेखालच्या खिशातली बंदूक काढता, बंदूक हातात येते, कार्यकर्त्यांचा उन्माद सातव्या आसमानावर असतो, तुम्ही ट्रिगर एकदा चेक करुन बघता, ठीक अजून जवळ जाता…… सुमेधच्या अंगावर एक जण आता अख्खी गोणीच ओततो गुलालाची, दुस-या क्षणाला गुलालाचा रंग एकदम लाल दिसतो, तिथं एकाच वेळी किंकाळीचा आणि गोळीचा आवाज ऐकू येतो, आजूबाजूची लोक पळायला सुरवात करतात, सुमेध रक्ताच्या धारोळ्यात पडलेला असतो, दुस-याचं मिनिटाला लोक जमा होतात, सुमेधच्या दिशेने लोक पळतात, काय झालं हे कळायलाच मार्ग नसतो, तुमच्या तोंडावर पडलेला गुलाल तुम्ही अजूनच पसरवता, बंदूक पुन्हा एकदा खिश्यात टाकता, लोक सुमेधच्या दिशेने धावत असता, तुम्ही तिथूनं सहज निसटून निघून जाता, हो तुम्हीच सुमेधला मारता.

मिडिया येते, बातमी बनते, लोक टी.व्ही. लावतात एक बाईट भाऊंचा पण घेतात, भाऊचं तर बोलणं अगोदर पासूनचं ठरलेलं असतं, बाकी जगाला वाटत इथं निवडणुका होतात, सरकार बदलतात, पण तसं वरच्यावर आतून सगळं शांत निरामय आळसवादाला पूरक चालेलं असतं, कोणी बदलू पाहत नाही, बदल होतच नसतो,

********संपली गोष्ट एकदाची***********

टीपः तो एक परिच्छेद खोटा आहे…..तो तुम्ही सुमेधच्या गोळी मारण्याबदलचा समजू शकता…..पण त्यांने रिएलिटी थोडीच बदलणार आहे…..

-लेखनवाला

*******************

ही कथा कुणाची…तर तुमची-आमची, हतबल झालेल्याची, कळण्यापलीकडे गेलेल्या निवडणुकीच्या निवडून येणाच्या त-हेची…. स्वतंञ, समता, बंधूतेची क्रूर चेष्टा केलेल्याची… सत्ता आणि पैसा यांचा मदमस्त खेळ करत सामान्य जनतेला कस्पटासमान मानणा-या सांमतशाहीची…. तिच्या विरोधात उठणा-या आवाजांना दाबून टाकणा-याची, प्रस्थापिताशी दोन हात करत आपल्या हक्काचं मिळवू पाहणा-याची कुचंबणा करणा-याची… त्यांच्या हरलेल्या लढाईची….हो हरलेल्याच लढाईची....

लोकशाही कोळून पित आपली हुकमशाही मान्य करणारी…. मेंढ-यापेक्षा ही एकचालीत जगत…. मुरदाड बनत चालेलल्या…. जनमाणसाची…. त्याला हालाखीचं जिणं माथी मारुन पुन्हा आपल्याच जयजयकारी घोषणा देण्यासाठी पिढाच्या पिढया तयार करणा-याची….

फक्त प्रारुप बदलेल्या शोषणाच्या नव्या रुपाची, जिच्या मूळाशी निव्वळ नियत्रणं आणि दहशत यांच्या वावराची….

प्रश्न उभे करणा-याचं अस्तित्व नाकारणारी आणि तरीदेखील माडलं तर मुळासकट नष्ट करणा-याची… त्यासाठी… आवश्यक… सतत रसद चालू ठेवणा-याची….

अन्न, वस्त्र आणि निवा-याचें मूलभूत प्रश्न तसेच कायम ठेवत….. त्याचें भाग्यविधाते, प्रेषित बनू पाहणा-याची….

सत्तेच्या मोहापायी नैतिकतेची चाड न उरलेले….

खोलवरच्या डोहात….घुसमटणा-या त्या अंतिम श्वासावर आपलं जगणं विसंबवणारी….

अंधारात लोटलं जात असतानादेखील आशेच्या खोटया तेजापायी खाक करुन घेतलेल्या मनाची….