lazyism Four pieces and One Joint Hand - 10 in Marathi Moral Stories by Lekhanwala books and stories PDF | आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 10

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 10

पात्र क्रंमाक तीन = सुमेध लाटकर

अपक्ष ताजा तडफदार उमेदवार पक्षासांठी बंडखोर- सुमेध लाटकर

त्यांचा निश्चय होता, मी माझ्या मागच्या पिढीसारखा वाट बघत बसणार नाय, माझ्यात तेवढी सहनशक्ती नाय, सगळं तुमच्या मनासारखं होईल यांची खात्री नसेना पण आता मी डाव मांडणार, एक बॅनर काय दहा बॅनर लागणार, भनचोद इथं संतरज्या उचलायच्या आम्ही, घसा सुकेपर्यंत प्रचार करायचा, रणरणत्या उन्हात एकन एक गल्ली, एक न एक एरिया कव्हर करायचा आम्ही, प्रचार संपला की रात्र-रात्रभर जागं राहत, आचारसंहिता लागली की एरियान एरियात पाळत ठेवायच्या आम्ही, मंडाळा-मंडाळात पोलीसाच्या नजरा चुकवत पैसे वाटायचे आम्ही, आणि ऐन मौकाला आपल्या इथल्या एरियातल्या कार्यकताचं नाव कुठं पुढं गटअध्यक्षपदासाठी गेलं की यांचा विरोध दाखवायचा कुणीतरी मुददमून फक्त आपल्या स्वतःच्या मर्जीतला माणंसाची नेमणूक करायची, आम्हाला काय कळत नाय काय, ऐवढं पण आम्ही दुधखुळे नाय राहलो, आम्हाला पण पॉलिटिक्समधले छक्के पंजे कळतात, इथं आमच्या थोंबाडावर चुतिया लिहलयं का, हाच मौका हाय, ठासून टाकायचं, आपला पक्ष आपला पक्ष लयं बघितलं पण आता नाय. पण त्यांच्या सोबत जमा असलेली काही पोरं होती ती या विचारात नव्हती, “जाऊ दे ना यार, कुठं आता नवीन बॅनर छापायचे, अपक्षाचे बोर्डं बनवायचे, एरिया एरियात जात पुन्हा पब्लिसिटी करायची, लयं हेडएकच काम हाय यार, पुढच्या टाईमिंगला नक्की” एरियातली अपक्षाच्या पांठिब्याला जमलेली काही पोर बोलत होती, मग त्यांने पण पाटी टाकली, “हो जाऊ देत आता हे एवढया कमी दिवसात प्रचार-बिचार करायला लयं धावपळ होईल, यांचा जाम वैताग हाय,” “आणि ही तर नगरसेवकची हाय ना……….. आमदारकीची हाय ना एका वर्षानंतर……….. तोपर्यंत आपण आपला जम बसवू” “आपण आपले बिल्डर शोधू” ”पैसा दाखवू पक्षाला, मागू पक्षाकंडे तिकीट काय बोलतो” एक जण बोलला “नाय दर टाईमाला हे असंच होतयं, म्हणून इथला आपला माणूस तिथं कोण दिसत नाय”, “आपण प्रत्येक टाईमाला वेळ मारत गेलो टाईमपास झाला इतके दिवसं आता नाय”, “तू लढ अपक्ष म्हणून” “आपण तयारी करु” “दिवसाची रात्र करु” “आता नाय तर कधी नाय”, “ठरला तर सुमेध लाटकर निवडणुक अपक्ष म्हणुन लढतोय” एकामागोमाग भेटणा-या पांठिब्यावर बिगुल सुरु झालं.

सुमेध लाटकर थोडक्यात परिचय

सुमेध लाटकर, लग्न संसार सुरळीत, एक मुलगा तो पाचवीला शिकतोय, बाकी आई वडील गावाला महाडला असतात, समाजकामाची आवड, पण काय आहे ना हे राजकारण असतं, जर तुम्ही लाखोचें पोशिदें असाल तर तुम्हाला काही हातावर मोजण्याइतके खून करणं माफ असतात. यांचा हा अपक्ष बळी जाईल का?

भाऊ उर्फ प्रंशात किमरे थोडक्यात परिचय

भाऊ उर्फ प्रंशात किमरे एक वजनदार नाव, सध्या या महानगराचा एकहाती नियंत्रक, सत्ता टिकवण्यात वाकबगार, आणि यांच्या बदल्यात पक्षाकंडून खुलेपणाने वरदहस्त, कमालीचा दांडगा लोकसहभाग, लेट नाईट पार्टी, कल्ब, बार, हाय क्लास सोसायटया वैगेरपासून कोसो दूर, हळदी कंकू, सत्यनारायणाची पूजा , उत्सवाचे कार्यक्रम यांसाठी मात्र एरिया एरिया रात्र-रात्र फिरत लोकांच्या मनात काय चालयं, एकुण खबर बात जाणून घेण्याचं काम अविरतपणे चालू, थोडक्यात या महानगराची सत्ता टिकवणं इतकंच काम दुसरं काही नाही, भाऊच्या अगोदर एक संतोष उर्फ योगी करमेकर नावाचा माणूस होता त्यांचा पण खतरनाक लोकसंपर्क, लोकांची नस ओळखण्यात वाकबगार, त्यांनी या शहरावर खरं प्रेम केलं असं लोक म्हणतात, इथल्यां खूप सा-या रिक्षावर आजही त्यांचे फोटो दिसतात, यांच दिसणं, वागणं, बोलणं यांची कॉपी भाऊ करतो, त्यांने आपली मिशी सुदधा योगीसारखी करुन घेतलीय, त्यामुळे लोकांच्या मनातून योगी गेलाच नाही, भाऊने देखील आपली इमेज मुददामून तशी बनवून घेतली, खूप सारी लोक त्यांना योगीसारखं दिसतात म्हणायचे आणि काही एक विचार न करता वोट करायचे, उमेदवार वैगेरे या क्षुल्लक गोष्टी होत्या, काही लोक खाजगीत बोलतात की भाऊ ज्या दिवशी मिशी उतरवतील त्यावेळी हरतील बघ, भाऊनां भाषण वैगेरे भारी करता नाही येतं पण लोकांना मध्ये असणं खूप होतं, हळूहळू त्यांच्या शब्दाला मान येवू लागला, योगीच्या जाण्याची कमतरता भाऊने भरुन काढली,

भाऊ उर्फ प्रंशात किमरे प्रतिष्ठेच्या बनलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वातावरणात गुतंलेला नेता, आमदार, आणि निवडणुक जिंकून सत्ताधारी पद टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेला सत्ता पिपासू राजकारणी.