lazyism Four pieces and One Joint Hand - 6 in English Moral Stories by Lekhanwala books and stories PDF | आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 6

Featured Books
  • You Are My Choice - 35

    "सर..."  राखी ने रॉनित को रोका। "ही इस माई ब्रदर।""ओह।" रॉनि...

  • सनातन - 3

    ...मैं दिखने में प्रौढ़ और वेशभूषा से पंडित किस्म का आदमी हूँ...

  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

Categories
Share

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 6

मतदार एका विचारात गढून गेलाय, तो विचार करतोय की, आता काय नवीन आमच्यावर लादू नका, ते आम्हाला पेलवत पण नाय आणि रुचत पण नाय, जे चालयं ते आमच्या डोक्याच्यावरुन चालयं, शिवाजी महाराज ऐकायला मजा येते पण शिवाजी आपल्या घरात जन्माला नको, आजकाल खूप प्राम्बेल आहेत, कशाला असल्या लफडयात पडायचं, पोरांना मस्त इग्लीश मिडियम मध्ये घालायचं, मोठा झाला की परदेशात दयायचं धाडून आणि त्या निमित्ताने आपल्या पोराच्या घरी जात परदेशवारी करता येईल, हीच स्वप्न बघायला सांगायची, उगाचच त्याला त्याचं त्याचं काहीतरी नवीन शोधायला नाही सांगायचं, त्याला बजावायचं “जरा कुठं काय वेगळं केलसं ना तर तू असा सडशील, तुला माहिती नाहीय? दुनिया कशी आहे ते?, तू काय चुतिया आहेस का आवाज उठावयला?, ती लोक तुला माहितं आहेत ना किती पर्यंत पोचलेली आहेत ती”, आणि तुमच्या अवाक्यात आहे म्हणून जास्तीच जास्त तुम्ही सरकार बदलाल, त्यांने काय आपआपसातले हितसंबध थोडी बदलतात, देवाणघेवाणीला विश्वास लागतो, आणि त्यांचे लागेंबाधे दूर दूर पर्यंत आहेत, आणि पार गुंतागुतांचे आहेत, तेव्हा पत्रकार खरं कधीच तुमच्या समोर आणत नाहीत, आपली सत्तेत असलेली नेतेमंडळी संगळ नियंत्रित करतात मग ते जिवंतपणी दंतकथा बनून जातात आणि विरोधकाला पण तशाच सत्तेची आस असते, ते मग त्यांच्या वाईटाच्या कहाण्या लोकांत पसरवतात त्यांना काही सत्ताधारी पक्षांच्य स्वकीयांची साथ असते, पाठीमागून “असं” लोक बोलतात सांगून एक इमेज बनवतात, मग ती व्यक्ती म्हणते मी तसा नाहीय, विरोधकाचं कारस्थान आहे, आणि विरोधक मनातल्या मनात त्यालाच भजत असतात, आज ना उदया सत्तेत आल्यावर त्यांना देखील हेच करायचं असतं, तोच सत्तेचा माज…. तिचं पिळवणुक…. करायची असते, त्याचें आदर्श हेच सत्ताधारी असतात फक्त स्वतःच्या सत्तेवर येण्याची निपचित वाट बघत बसतात, सत्तेत असलेल्याचं म्हणणं असतं की असं संगळ्यावर नियंत्रण ठेवण्याशिवाय गंत्यतर नाहीय, आणि कोणी जरी असेल तरी त्याला तेच करावे लागेल, अगदी तुम्ही जरी त्यांच्या जागी असता तरी हेच केलं असतं, आदर्शवाद वैगेरे काही नसतो, आळसवाद मात्र नक्की असतो, जे जसं चालयं तसं चालू ठेवण्याची खुमखुमी बदलू देत नाही….. तो सहजासहजी क्रांती होऊ देत नाही…..

**********

तारीख तीन डिसेंबर

तुम्ही वोटिगं करणार का, तुम्हाला भाऊने सुमेधला टपकवायला सांगितलं होतं आणि तुम्ही गायब. आणि आता अचानक वोंटिग करायला शाळेजवळ आलात, आता जर का सुमेध निवडून आला तर मग तुम्हची काय खैर नाय, भाऊंचा मार खाणार बहुतेक.

पण तुम्हाला काय खाज आहे काय माहितं तुम्हाला वोट करायचयं, एरियातला एक जण येवून तुम्हाला हात दाखवतो. तुम्ही कळत नकळत तिथूंन दुसरीकडे वळत न बघितल्यासारखं करता, तुम्ही वोंटिग कार्ड घेवून आलेले असता, निळी शाई लागते, तुम्ही वोट केलंय, गुप्त मतदान असलं म्हणून काय झालं तुम्ही सांगू शकताच ना…. सुमेध लाटकरला वोट केला ना… सुमेधच ना…. हो की नाही तेवढं तरी सांगा….

**********

संपल एकदाच वोटींग, आता माहौल कळून येणं कठीण असतं, लोक वोट करुन घरी परतलेली असतात, एकूण अंदाज घ्यायला सुरवात होते, टी. व्ही. असेल, आजूबाजूची लोक असतील, मिडिया मागच्या वेळेच्या निवडणुकीची यावेळच्या निवडणुकीशी तुलना होते, एक्झिट पोल सुरु होतात, इकडं ज्या ज्या शाळेतून हे सगळं चालयं तिथं आता पसारा आवरण्याची लगबग असते, या सगळ्यात भाऊंचा देखील एक अंदाज असतो. इतक्या वर्षाच्या अनुभवावरुन आणि कानावर जे ऐकू येत होतं त्यातून काही चित्र स्पष्ट होतं, इथलां या वार्डचा निकाल उन्नीस बीसच्या फरकाने लागणार एकदम काटे की टक्कर, भाऊं आपल्या मनातल्या मनात आराखडे बांधत होते “जर का सुमेध लाटकर जिकंला तर नक्की पक्ष विचार करेल, याला वापस पक्षात घेतील, आपला दबादबा असणं गरजेचं आहे, जरा ही ढींल राहता कामा नये, छे माझचं चुकलं सकाळीच सटिगं लावयाला पाहिजे होती, ईव्हीएम मशीनचा झोल करत सिटिगं चेजं करणं सोपं गेलं असतं, एवढी पण पोलिस सुक्युरिटी टाईट नव्हती, एका तरी शाळेतल्या रुमवरच्या मशीनमध्ये झोल झाला असता तर आपला इथल्या इलेक्शनचा वार्ड सेफ झाला असता”.

तसं बघायला गेलं तर एवढा मोठया महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालासमोर एका प्रभागाचं काय एवढं महत्तव भाऊंना लागून राहायला होतं देव जाणे, पण महत्तव होतं ते हेचं की पोपटचा जीव पिंजरात होता, जर का इथं भाऊंचा सपोर्टवाला उमेदवार सोडून दुस-या कुणी निवडुन आला की मग इथल्या लोकांना सवयच आहे घगल्या मुतल्यालां यांना नगरसेवक लागतो मग त्यांच्या म्हणजे सुमेधच्या नावाचा बोलबाला होईल, पुढे आमदारकीची पण निवडणुक आहेच, काय काय कितंपर्यंत ताणायचं हयाची पण लिमिट असते. जास्त सूट नाय दायची, डोक्यावर मूतू नाय दयायचं, सगळं काही करायचं ते येणारं इलेकशन डोक्यात ठेवूनचं आणि तेवढयासाठीच भाऊ अजून पण डोकं लावत होता.

**********