lazyism Four pieces and One Joint Hand - 5 in Marathi Moral Stories by Lekhanwala books and stories PDF | आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 5

Featured Books
Categories
Share

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 5

**********

पुन्हा तारीख बावीस डिसेबर (सकाळ): घडयाळात साडेसातच्या पुढे वाजलेत

पण आपला साडेसातचा टाईम ठरला होता, “हा भाडखाव कुठे राहलायं” भाऊचा माणूस साईमंदिरासमोर चायच्या टपरीवर बसून मनातल्या मनात बोलत होता, तो भाडखाव म्हणजें तुम्ही, न राहवून त्यांने तुम्ही तिकडे राहत असलेल्या हाटेलला राखण करणा-याला फोन केला आणि त्याला म्हणाला डायरेक्ट रुमवर जाऊन चेक कर,

**********

पुन्हा तारीख बावीस डिसेबर (मध्यरात्री):

इकडं तुमचं आता भलतचं सुरु झालं होतं, तुम्हच्या डोक्यातून ते जांईट किलरचं प्रकरण जातचं नव्हतं, खरचं होईल का जांईट किलर, लोकांमध्ये असते का ताकद एवढया पावरफुल माणसांला हरवायची, पैसे तर मजबूत चारतोय भाऊं, माणशी हजारचा रेट चालाय, लोकांना बिर्याणी काय…. दारुच्या बाटल्या काय…. संगळ तर भेटतयं…. तरी लोक हरवतील काय, जो हे संगळ पुरवतोय त्यालाच त्याचं खाऊन हरवतील, लोकांच कुणी काही सांगू शकत नाही, आणि ही तर लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य, लोक कधी कुणाला घरी बसवतील सांगता यायंच नाय…..

**********

दुसरा तुकडा – निवडणुकप्रचार

ताराखा ३ जानेवारीच्या अगोदरच्या

तिकडून काही पॉश गाडया येताना दिसल्या, नाक्या-नाक्यावर निवडणुकीचा माहौल असताना, हे पॉश गाडीतले बिझिनेसमॅन बिझी लोक, यांना आपल्या गाडया या ट्राफिक मधून काढत विमानतळ गाठायची घाई लागलेली, यांना वोट करायची खाज नाय, विचारायचा यांना असं का करता म्हणून?, माहिती आहे तुमच्याकडे अब्जांनी पैसा आहे, एक कटाक्ष टाकला, उत्तर मिळालं “………. आणि आम्हाला हे संगळ करायची गरज नाय लागत, आम्हाला जो माणूस योग्य वाटतो तो तुम्ही निवडून आणता, तुम्हाला निवडणुका सुदधा मस्त पॅक करुन गिफट सारख्या देतो, बघताना टीव्ही?, येते ना मध्ये ब्रेकमध्ये अडव्हरटाईज?, वाटतो ना विकास झालाय असा ?……. तुम्ही सरप्राईजसारखं फील करता, तुम्हाला काहीतरी नवीन घडत असल्याचा भास होतो, आजूबाजूला उमेदवार तुम्हाला पॅम्पलेट वाटत असतात, लॉर्डस्पीकर लावून उमेदवाराचा प्रचार करणा-या रिक्षाची खैरात होते, ते सगळं करण्यासाठी पैसा कोण पुरवतो? आम्ही लोक उदयोगपती, इतके दिवस निवडणुकप्रचारामध्ये “पाटलाच्या शेतात बाजराची कणसं, आम्ही नाय आणली भाडयाची माणसं” च्या घोषणा पार घसा दुखेपर्यंत दिल्यावर संध्याकाळी पक्षाच्या कार्यालयात जमा झाल्यावर पैसे वाटतात ते कुठून येतात? ”. रस्ता साफ होतो, तुमची उत्तर तुम्हाला भेटतात, ट्राफिक विरुन जातं, पॉश गाडया एका दमात निघून जातात.

तिसरा तुकडा – मतदान

तारीख तीन जानेवारी (सकाळी साडेसातची वेळ) :

लोकशाहीतला सगळयात पवित्र सोहळा सुरु झाला, बाया-बापडया घराबाहेर पडू लागल्या, नुकतीच मिसरुडी फुटलेल्या पोरांना बोटाला लागलेली शाई ही सेल्फीसाठी उपयोगी पडते, काही जणं हा मौका सलग सुटटीतली वाढीव सुटटी म्हणून वापरायचा म्हणून आपल्या सेकंड होमकडे जायला निघतात, त्यांना काही विचारलं की बोलतात “काय दिवे लावणार आहात वोट करुन, कुणी पण निवडून आलं तर आपलं काय भलं होणार? की हे नगरसेवक, आमदार, खासदार ई एम आय फेडणार आमच्या होम लोनचे”, या अशा लोकांना हा देश फकत पासपोर्टसाठीचं लागतो. पण पाच वर्षानंतर त्यांच्या घराचे निम्मे हफ्ते भरत आलेले असतात आणि इतर वोट करणारे अजून भाडयाच्याचं घरात खितपत पडलेले असतात.

निवडणुकीचा उत्साह बघायचं तर मग तुम्हाला नाक्यावर यावं लागेल, नाक्यानाक्यावर लॅपटॉप घेवून मतदार यादयातली नाव शोधून देणारे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, त्यांना भेटणारं बिर्याणीवालं जेवणं, एक जास्तीचा पार्सल आपल्याला भेटावं म्हणून निव्वळ टेबलाला चिकटून बसलेले अजून तीन-चार जण, बिर्याणीचं पार्सल आल्या-आल्या हात साफ करत कुणाची उरलेली बिर्याणी संपवण्यासाठी पुढाकार घेत “सारखा सारखा चान्स नाय भेटतं” सागणारें अजून काही हावरे, आणि याउलट सकाळी सात वाजल्यापासून शेवटचा माणूस वोट देई पर्यंत, प्रत्येकी चार माणसं वोट करुन झाल्यावर समोरच्या कागदावर चौथी सरळ रेष ओढत…… पाचव्या व्यक्तीने वोट केलं की त्या चार उभ्या रेष्यावर आडवी रेघ ओढणारा एखादा एरियातलाच पोरगा, तो खूष त्याला हजार रुपये भेटणार असतात तो दिवसभर उपाशीच असतो

….असं सगळं एकदम जोरात चालू असतं…..लोकाचं वोट करणं चालू होतं…..वर्षानुवर्ष तीच माणसं निवडून आणायची की करायचा बदल, कशाला या लफडयात पडायचं आणि हे साले कोणी निवडून आले तरी आपला काय भलं करणार आहेत, आपण आपलं मत तर रेग्युलर पार्टीलाच देणार….. नाहीतरी आपण वेगळा विचार केला तरी बाकीचे थोडीच करणार आहेत, बघ मी सांगतो तोच निवडून येईल बघ आणि दुस-याला वोट केला तर उगाच आपला मत फुकट जायचा.