lazyism Four pieces and One Joint Hand - 3 in Marathi Moral Stories by Lekhanwala books and stories PDF | आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 3

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 3

पात्र क्रंमाक दोन = तुम्ही

“सगळं चालयं तसं नाही चालू दयायचं, तुम्हाला चेंज हवाय, कश्यात? एकूण जगण्यात, रोजची बातमी नाय वाचायची तर ती बनायचीय, तुम्ही त्याच तयारीत आहात”

प्लॅन सिंपल होता, तो उदया सकाळी आठ वाजता साईबाबाच्या दर्शनाला येईल, तो म्हणजे सुमेध लाटकर, अपक्ष उमेदवार, ज्याने अर्ज मागे घेतला नाही तो… ओके कळालं… तिथं अगोदर साडेसातपासून उभं राहयचं…. कुणी म्हणजे शूटरने, शूटरने म्हणजे तुम्ही, हो तुम्ही…. तुम्हाला एक खून करायचाय, मला माहितीयं तुम्हाला थोडा त्रास होईल यांचा, कधी केला नसेल खून, तुम्हाला रक्त बघूनच फाटते वैगेरे वैगेरे सगळं सांगाल, किंवा तुम्ही कदाचित एखादा खून अगोदर केला ही असाल तर, तर मग, हे तर, सहज होईल, जरी तुम्ही केलेल्या खूनाबदल आजपर्यंत कुणालाही सांगितलं नसेल तरीही, मग हा अजून एक करुन बघा किंवा जर तुम्ही एका खूनाच्याच गुन्हात शिक्षा भोगलेली असेल तर किंवा आणि एक, जर खोटया खुनाबदल तुम्ही शिक्षा भोगली असेल तरी पण, मग जो केला नाही त्यांची शिक्षा भोगताय मग एक करुनच टाका ना, वैगरेच्या गोष्टी आपोआप मनात येतील ही, केलतं पक्कं तर तुम्ही शूटर आहात तुम्हाला खून करायचाय, ठीकयं….. तिथं भाऊचा माणूस सकाळी सातपासून उभा असेल, अजून एक माणूस….. त्यांच्या मागावर….. त्यांच्या घरापासून असेल….. कुणाच्या अपक्षाच्या ….. हा ज्याने उमेदवारी मागें नाही घेतली तो…. सुमेध लाटकर, तुम्ही सगळे एकमेकांशी मोबाईल वरुन संपर्कात असाल…. इकडे तुम्हाला बंदूक उश्या खाली ठेवून बरोबर सकाळी पाचच्या ठोक्याला उठायचं, आंघोळ करायची, सहा वाजेपर्यंत नाश्ता उरकायचा, हो हॉटेलवाल्याला तसं सांगून ठेवलय अगोदरचं, हो तुमचा राहण्याचा बंदोबस्त एका हॉटेलमध्ये केलाय, आणखी एक….. भाऊचा माणूस या बंदूक उश्याखाली घेवून झोपण्या-यावर म्हणजे तुमच्यावर (तुम्हाला कळलंय ते, एकजण आपल्यावर नजर ठेवून आहे ते), तो रात्रभर हॉटेल बाहेर तिथंच देखरेख करत होता……… शेवटी एका क्षणाला त्याला पण झोप लागली, तो झोपला हॉटेलसमोरच्या रिक्षात, तुम्ही इकडे पहाटे पाचऐवजी रात्री तीनची बेल लावली होती… ती होईल…. आता दोन मिनिटांनी… तुम्ही गाढ झोपेत आहात…. तुमचं काहीतरी वेगळंच शिरलयं डोक्यात….थोडसं विचित्र आहे….काय करणार आपणं… तुमचंच प्लॅनिगं बदलयं….

तारीख एकवीस डिसेंबर (रात्रीचे दहा वाजलेत):

भाऊ निघून गेले, ते हॉटेलमध्ये आले होते, तुम्हाला भेटायला, तुम्हाला टपकवायला सांगितलयं त्या सुमेध लाटकर नावाच्या माणसांला, आता तुम्ही एकटे आहात, सहज म्हणून तुम्ही बाजूला असलेला रिमोट घेवून टी. व्ही लावला, बातम्या बघणं ही तुमची एकमेव आवड, टी. व्ही. वरच्या बातम्या बघितल्या की एकूण जग सुरु असल्याचं, आजूबाजूला हालचाल होत असल्यासारखं वाटतं, आपण काही करत नसलो तरी एकूण जगाच्या रहाटगाडयासोबत जगतोय असं वाटतं, काहीतरी आजूबाजूला सतत होतयं असं वाटत राहतं, तर असो, एक टॉक शो सुरु झाला, लोंकाना त्यांची मत विचारली जात होती, काही लोक न घाबरता तावातावाने बोलत होती, न्यूज एंकर यातून थोडासा थोडासा होऊ घातलेल्या निवडणुक निकालाचा अंदाज घेत होता, (कार्यक्रम लाईव्ह होता, तारीख एकवीस डिसेंबर रात्रीचे आठ वाजताचा जो आता आपण रिपिटेड टेलिकास्ट म्हणून बघताय). ज्या लोकप्रतिनिधीनां बोलवलं होत ते आपआपला मुददा लावून धरत होते, यात तो देखील आला होता, अपक्षवाला सुमेध लाटकर आणि भाऊ पण होते, ते थोडे लेट आले, सुमेधनं तिथं टॉक शो मध्ये उपस्थित असलेल्या सत्ताधारी मान्यवरांची अक्षरशः पिसं काढली, भाऊची पण. गटारं, लादीकरण, एरियातली साफसफाई, महापलिकेतली अनागोंदी सगळं सगळंच उघडं करत चालला होता, त्यांच तिथं असं डिवचणं भाऊंना सहन होत नव्हतं, त्यांला भाऊचे पल्स-मायनस पांईट माहिती होते, त्यामुळे भाऊ हतबल होता, चेह-यावर जास्त काही भाव न आणता भाऊ कार्यक्रम संपण्याची वाट बघत होता, चर्चेचा कार्यक्रम संपत आला, पण त्या एंकरिंग करणा-या पत्रकारानं जाता जाता विश्लेषण करायला घेतलं त्यांन या सुमेध लाटकरचं वर्णन, ”कदाचित तो इथलां जांईन्ट किलर होऊ शकेल” असं केलं, इतक्यात इकडं हॉटेलात मस्त बिछान्यावर टीव्ही बघणारी तुमची नजर समोरच्या बंदूकीकडे गेली, पण तुम्हाला हे कळत नाहीयं जाईन्ट किलर म्हणजे काय, मीच याला मारणार आहे उदया सकाळी नी हाच किलर म्हणजे ?, जांईन्ट किलर म्हणजे एखादया नवख्या उमेदवाराने ताकदवर उमेदवाराला हरवणं, आणि ते ही कोणताही अनुभव आणि कुणाला ही अपेक्षित नसताना, बरं हे संगळ एंकरच सांगत होता, स. का. पाटील, जॉर्ज फर्नांडिसचं यांच्या निवडणुकीची उदाहरण देत.