lazyism Four pieces and One Joint Hand - 1 in Marathi Moral Stories by Lekhanwala books and stories PDF | आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 1

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 1

आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा)

आळसवाद

“You want everything without doing anything, and may anything can happen, even everything”- shisha varug, Japnees Pholiospher.

“तुम्ही काही न करता सगळ्यांची अपेक्षा करता आणि कदाचित काहीही होवू शकतं, सगळं सुदधा.”- जापनीज तत्वज्ञ शीशआ वारुग. (शुदध प्रामाणिक भांषातर).

आहे ते, आहे तसं चालयं ते ठीक आहे. कुठं काय-काय, कोण-कोण, जे चालयं ते बदलू पाहतायात, त्यासाठी प्रयत्न करत चालयेत, ते उगाच जाणून घेत, तसं आपणहून करण्याच्या वाटयाला स्वतःहून जाऊ नये, जमलसं तर जास्तीच जास्त त्यावर आपली मत मांडायची, इथंपर्यंत ठीक आहे, आणि या आणि अश्या वागण्यातूनच जन्म होतो आळसवादाचा, तो आपली तत्व मांडतो, लोकांमध्ये भिनतो आणि लोक कळत नकळत तो स्वीकारतात. असं म्हणतात जेव्हा या विधाताने जग माणसांच्या राहण्यालायक बनावयला घेतलं असेल तेव्हा सुरवातीला त्यानं काळ बनवला असेल, पण तसं नाहीयं, त्याने सगळ्यात पहिल्यादा आळस बनवला असेल, येणारी प्रत्येक जांभई आपलीशी करत, उदयावर सगळं ढकलून देत, होणा-या सगळ्या घटना एका दमात उत्साहात न होता हळूहळू सावकाश त्यांच्यानुसार योग्य रीतीने होण्यासाठी त्याने जाणूनबुझून आळसाची पेरणी केली असणार, सुरवातीला तुम्ही कुजबूजाल असं कस शक्य आहे, लोक इथं मर मर मरतायात, धडपडतायत, काहीतरी मिळवण्यासाठी, ते जे काही करतात ते तरं आळस झटकून करत असतील तर, ते तसं नाहीय. बघा आता तुम्ही ठरवा जे काय आहे ते.

पहिला तुकडा – निवडणुका

प्रभागाची आचारसंहिता ७ डिसेंबरपासून लागू झाली होती. नामनिर्देशनपत्र १७ डिसेंबरपर्यंत दाखल करायचं, १९ डिसेंबरला नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार, २१ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, २२ डिसेंबरला निवडणूक चिन्ह नेमून देणार आणि अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार. मतदान ३ जानेवारीला तर मतमोजणीसह निकाल ४ जानेवारी रोजी जाहीर होणार. या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षाने या प्रभागात ४ डमीसाठी आणि इतर ३ अशी एकूण ७ नामनिर्देशनपत्रे घेतलीत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण बाहेर जात आणि कोण राहत हे येत्या २१ तारखेलाच स्पष्ट होणार होतं. एका महानगरपालिकेच्या निवडणुकीसंबधीच्या सर्व प्रभागासाठीच्या या तारखा. त्यात महत्तवाची तारीख एकवीस डिसेंबर, सत्ताधारी पक्षाचें त्या प्रभागातले बाकी अपेक्षित अर्ज मागे घेतले गेले, पण एका अपक्षांचा अर्ज मागे घेतला गेला नव्हता.

तारीख एकवीस डिसेंबर (दिवसभर) : पक्ष कार्यालयात चर्चा सुरु झाल्या. त्याने अर्ज मागेच घेतला नाही, आता मोठा लफडा होणार बहुतेक.

तारीख एकवीस डिसेंबर (रात्र) :

भाऊ फुल जोशातच बोलले, “एकदम करेक्ट टपकव त्याला, ना रहेगी बासं ना रहेगी बासरी, गेम वाजवायचा, आणि भर दिवसाचं करायचं, बनू दे ब्रेकिंग न्यूज, कळू देत दहशत काय असते ती, अर्ज मागे घेत नाय काय, त्यांच्या बरोबरचे जे लुचे लफंगे आहेत ना ते…….. दोनशे-तीनशे कार्यकर्ते त्यांना पण कळू देत, बघ याला मारल्यावर, मिडीयावाले येतील बघ, गेम झाल्यावर मजा बघा तू”.

भाऊ आता एका वेगळ्या स्टानसमध्ये गेले, ते स्वप्न बघत होते, “महानगरपालिका जरी आमची असली तरी होम मिनिस्टरची जबाबदारी, हे कायदा सुव्यवस्थेचे काम वरती राज्यात सत्तेत असण्या-चं आहे की नाही?…… कायदा-सुव्यवस्थता या राज्यात? आम्ही लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करतो, निवडणुका येत-जात असतात, आम्ही लोकशाही मानणारी आणि लोकांनी दिलेला कौल मानारी लोक आहोत, त्यामुळे हे असलं काही कधी ही आपण केलेलं नाही, आणि करणार नाही, हे सगळं पाप त्या विरोधी पक्षाचं असून अपक्षाच्यां उमेदवारीचा त्रास हा त्यांनाच झाला असणार, म्हणून त्यांनी तसं केलं असण्याची शक्यता नाकारता येतं नाही, मी स्वतः मान्य करतो की सुमेधला पक्षाचं तिकीट मिळवून देण्यात आम्ही अपयशी ठरलो, त्यांने बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला, आमचंच चुकलं आम्ही त्याला समजवण्यात आणि समजूत काढण्यात कमी पडलो, जरी तो अपक्ष उमेदवार असला तरी तो आमचाच कार्यकर्ता होता त्यामुळे सुमेधच्या मुला-बाळांच्या शिक्षणाची जबाबदारी आमचा पक्ष उचलेलं, या खुनाचा शोध घेतल्याशिवाय आपण आणि आपला पक्ष गप्प बसणार नाही, आम्ही या खूनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या सोमवारी मोर्चां काढू, निवडणुका येत-जात असतात पण अश्या घटना या लोकशाहीस काळीमा फासतात” भाऊंनी त्या अपक्ष उभे राहत अर्ज मागे न घेतलेल्या सुमेधचा खून केल्यावर काय बोलायचं यांची उजळणी करत तसं मिडियाशीं बोलतोय असा भास होत होता, हो हा भासच होता, सुमेध अजून तरी जिवंत आहे.