Apurn - 8 in Marathi Horror Stories by Harshad Molishree books and stories PDF | अपूर्ण... - भाग ८

Featured Books
Categories
Share

अपूर्ण... - भाग ८

"हरी.... बस आता पुढे काय विचार करू नकोस आणि काही बोलू
नकोस, बस जे काय आज झालं ते सगळं इथंच सोडून घरी जा"....

संध्याने प्रेमाने हरीच्या चेहऱ्यावर हाथ फिरवला.... आणि दुसऱ्याच क्षणी ती अद्रीश्या झाली

हरी घरी आला.....

"अरे हे काय झालं फोन पण बंद आहे तुझं, अरे हे रक्त कसं, काय झालं.... अहो ऐकता का" आईने बाबांना हाक मारली

"हरी हे काय झालं"...... बाबा

"काही नाही बाबा बस्स ते accident झालं, बस थोडंचलागला आहे जास्त काही नाही"..... हरी

"काय जास्त नाही लागलं.... रक्त बघ तू".... आई

आई बाबा बोलत होते आईने घाव पुसून त्यावर पट्टी बांधली.... पण हरी नुसतं सांध्याच्या विचारात होता त्याला दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं....

हरी उठून बेडरूम मध्ये येऊन झोपला.....

गाडीच्या हॉर्न चा आवाज ऐकू येत होता, तो पट्टरीवर धावत होता आणि गाडी त्याचा मागे वेगाने धावत होती.... हरी घामाघूम झाला होता, अचानक तो खाली पडला आणि गाडी त्याचा वरून निघून गेली...

हरी घाबरून उठला..... स्वप्नं होतं

"हरी... बघ ईशा आली आहे".... आई

"हो आलो आई"....

"हरी बाहेर आला..... हरी काय झालं अचानक कसं सगळं, सकाळी कॉल केला होता मी तू झोपलेला आईने फोन उचलला आणि कळलं की असंझालाय, आता सांगशील नक्की झालं काय".... ईशा

"काय नाय ग ते काल येतांना एक गाडी सोबत टक्कर झाली म्हणून थोडंलागलं बस.... सोड तू बस मी फ्रेश होऊन येतो".….. हरी

दुपार झाली.... "आई मी निघते"... ईशा

"थांब मी येतो सोडायला".... हरी

"काही नको... मी जाते तू आराम कर".... ईशा

"अग ऐक येतो मी"....

"नको म्हंटल ना बस मग"... ईशा

"ईशा घरी निघून आली"....

दिवस असेच जात होते, त्या दिवस नंतर हरी खूप शांत झाला, सारखं तो संध्या च्या विचारात असायचा, रात्र दिवस फक्त हेच विचार करत बसायचं की संध्या साठी काय केलं पाहिजे, पण त्याला काहीच सुचत नव्हतं....

एक दिवस हरी ईशा सोबत बसला होता.... ईशा कधीची बडबड करत होती, मधीच हरी बोलला

"संध्या"....

"हरी काय बोललास तू"....... ईशा, हरी काय बोलेन त्या आधीच ईशा बोलली

"बघ हरी काय आहे ते स्पष्ट सांग गेल्या काही दिवसाने मी बघते की तूझ बोलणं वागणं आधी बदललं आहे, नेहमी तू कसलं तरी विचारत करत असतो.... सांग ना मला काय झालं आहे"....

हरी ईशा ला बघत होता, आणि बघता बघता रडू लागला....

ईशा हरी ला अस रडताना बघून बोलली... "ऐ हरी अरे काय झालं रडतोय का तू , हरी शांत हो".....

हरी ईशाला मिठीत घेऊन खूप रडला.....

"ईशा.... मला काहीच सुचत नाहीये की काय करू"

"हरी सांगशील के झालं आहे".....

"ईशा मला ना अशे वाईट विचार येत असतात, सारखे अशे स्वप्न येतात की मी रेल राडीच्या पुढे धावतोय आणि गाडी ने मला उडवलं"....

"हरी, बघ काय नाय होणार तसं मी आहे ना सोबत.... असं काहीच होणार नाही शांत हो शांत.... शहहहह"

त्या दिवस नंतर हरी ने कधीच तो विषय कोना समोर काढला नाही, पण त्याच्या मनातून ते सुटलं पण नाही....

बघता बघता लग्नाची वेळ आली, आज हरी आणि ईशा चा लगीन होतं, अगदी थाटापाटने लग्न झालं, आणि ईशा हरीच्या घरी आली, रात्री चे २.३० वाजले होते, ईशा झोपली होती हरी ला सारख संध्या च्या विचार येत होता

हरी उठला आणि ईशा च्या कपाळावर चुंबन देऊन तो घरा बाहेर निघून आला.....

हरी संध्याला भेटण्यासाठी पट्टरीजवळ आला.....

संध्या तितच बसली होती....

"आलास, मला वाटलंच होतं की आज येशील तू congratulations हरी, happy married life "......

"संध्या मी तुला घ्याला आलोय, चल माझ्यासोबत"... हरी झटकन बोलला

"हरी, हे शक्य नाही"....

"तर मग काय तू अशीच भटकत राहशील, तुला मुक्ती काशी मिळेल....

"कधी न कधी भेटेन हरी"....

"मग जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, पण तू चल सोबत"....

"हरी, मला नाही माहीत मला मुक्ती काशी मिळणार पण एक क्षण मात्र एक क्षण, एक अशी वस्तू एक अस काम ही पुरेल ज्याचने मला मुक्ती मिळेल"....

"बस्स मग तो एक क्षण आपण सोबत शोधू, पण सध्या तू चल....
हरी"...

"बघ संध्या, तुझ्या प्रेमाला मी अपूर्ण नाही सोडणार आणि तुला आज माझ्यासोबत यावच लागणार".....

"हरी तू खूप मोठी चुकी करतोय"....

"संध्या आयुष्यात मी चूकाच जास्त केल्या आहेत, अजून एक मग पण चल".....

"हरी ऐक"...

हरी ने काही ऐकलं नाही आणि पुढे जाऊन संध्याला उचलून घेतलं आणि खांद्यावर टाकून संध्याला सोबत घेऊन आला.....

------------------------------------------------------- New begining -------------------------------------------------------------------------

इथं हरी च्या जीवनातलं एक भाग पूर्ण झालं, तो संध्याला घरी घेऊन आला, ईशा सोबत त्याचे लग्न झाले.....

पण इथून त्याच्या जिवनात एक नवीन सुरवात झाली,
संध्याला घरी आणून हरी ने चूक तर नाही केली ना....???

संध्याला मुक्ती मिळेल का.... ????

ईशा ला संध्या बदल माहीत पडल्यावर ती काय विचार करणार.... ????
आणि सगळ्यात महत्वाचं, ईशा संध्या सोबत कसं रहाणार.....

ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या कथेच्या पुढील भाग अर्थात एका नवीन स्वरूपात बघायला भेटेल..... "लाडकी सवत"......

कुठला ही निर्णय घेण्याआधी १०० वेळा विचार कर, रागात घेतलेले निर्णय नंतर खूप त्रास देतात....

प्रेम होण्यासाठी बस एक क्षण खूप असतो, पण आधी त्या परिस्थितीती ला नीट समजून घ्या, व्यक्ती च्या मनाला व स्वतःला वेळ द्या...

जीवनात सगळा खेल निर्णय चा असतो एक चुकीचा निर्णय आपला आयुष्य बदलू शकतो....

__ हर्षद मॉलिश्री __