Apurn - 7 in Marathi Horror Stories by Harshad Molishree books and stories PDF | अपूर्ण... - भाग ७

Featured Books
Categories
Share

अपूर्ण... - भाग ७


हरी डोक्यावर हाथ ठेवून तितच बसला, घरून सारखा फोन येत होता, ईशा पण त्याला सारखं कॉल करत होती म्हणून त्यांनी मोबाईल ऑफ करून टाकला....

रात्र झाली पण हरी काय त्या जाग्यावरून हल्ला नाही, रात्र झाली २.३० वाजून गेले होते, आणि अचानक हरी बसल्या बसल्या खाली पडला....

पडल्या नंतर जेव्हा हरी ने मान वर करून पाहिलं, समोर त्याला एक वेगाचा प्रकाश दिसू लागलं, तो प्रकाश हळू हळू त्याचा जवळ येत होतं.... हरी ला स्पस्ट काही दिसत नव्हतं

त्याच प्रकाशातून संध्या हळू हळू चालत हरी च्या जवळ आली... तिने त्याला हाथ देऊन उभं केलं

"Promise केलं होतंस ना तू की नाही येणार परत, मग का आलास, आणि हे काय वेळेपणा आहे इथं का बसला आहेस रक्त येतंय कळत नाही तुला, घरचे वाट पाहताय, ईशा पण कॉल करतेय ना"...

हरी बस संध्याला एक टक बघत होता, त्याच्या त्याचे डोळे भरून आले आणि तो हळूच बोलला

"संध्या".....

"हां हरी"....

"माझ्यामुळे तुझा जीव गेला ना, माझ्यामुळे तू आज"....

"हरी तुझी काय चूक यात आता"....

"नाही संध्या सगळी चूक माझी आहे, ईशा सोबत break up नंतर मी खूप शांत रहायला लागलो, घरून काम आणि कामावरून घर बस्स हीच life होती माझी, पण अचानक एक दिवस"....

"आलास, चल हाथ पाय धुऊन ये मी जेवण वाढते".... आई

"नको आई मी जेऊन आलोय आज".... हरी

"अच्छा बर ऐक तुझा रूम मध्ये बघ तो एक कव्हर ठेवला आहे बघून घे आणि काय उत्तर आहे ते सावकाश सांग मला".... बाबा

"ठीक आहे बाबा".... हरी

हरी त्याच्या रूम मध्ये गेला बेड वर समोरच तो कव्हर होता पण त्याने तो उघडून बघितलेच नाही, त्यात संध्या चा फोटो होता.... हरी ने कव्हर उचला, आणि रंगात तो कव्हर dust bin मध्ये फेकून तसाच झोपला....

सकाळ झाली, हरी जसा बेडरूम मधून बाहेर आला....

"काय मग हो म्हणायचं की नाही".... बाबा

"कसलं बाबा काय"...??? हरी

"अरे तू फोटो बघितलं नाही त्या मुलीचं".... बाबा

"हां बघितलं ना बाबा".... हरी

"मग काय हो म्हणू ना".... बाबा

हरी शांत झाला, आणि मग रागात त्याने हो म्हटलं, त्याने विचार केला की ईशाला आता माझी value कळेल

"बरं मग.... मुलीला बघून घे तसं पुढच्या महिन्याला आपण साकारपुढा करून टाकूया... काय बरोबर" ना बाबांनी आईला विचारलं...

"हो मग काय अगदी बरोबर"... आई

"बाबा मला ऑफिस च खूप काम आहे, मी जरा मी नंतर भेटेन पोरीला हवं तर, आता नको".... हरी

"अच्छा ठीक आहे पण लवकर बघून घे हो बाबा, तसं मुलीच्या कडून हो आहे, बरं का.... तसं मला माहीतच होतं की तू पण हो म्हणशील, म्हणून मी पण आधीच सगळं नक्की करून आलोय कालच, तास संध्याला नंबर दिला आहे तुझा बघ फोन येईलच तुला"...

"बाबा नंबर का दिला तुम्ही".... हरी

"अरे हो चालतं की आज काल"... बाबा

हरी जेव्हा ऑफिस ला आला, तो शांत बसून विचार करत होता तेव्हाच... त्याचा फोन वाजला

अनोळखी नंबर बघून त्याला खात्री झाली की ते त्या मुलीचा फोन असणार तरी हरी ने फोन उचला

"Hello.... कोण"

"हॅलो... हरी"..... संध्या हळूच बोलली तिच्या बोलण्यावरून तिची भीती स्पस्ट कळत होती हरी ला

"हां बोला"...

"मी संध्या बोलते"...

"हां बोला."...

"काय नाय ते काल काका मांगनं घेऊन आले होते घरी"....

"हां"...

"तुम्ही busy आहात का.. ?? हवं तर नंतर बोलूया"....

"नाही तसं काही नाहीये"...

"अच्छा ठीक आहे"....

"संध्याकाळी फ्री आहेस तू... हां"

"ठीक आहे भेटूया मग"...

"हो चालेल"...

हरी ने फोन ठेवला आणि तो विचार करतच होता की त्याला ईशा चा कॉल आला

"Hello"....

"हरी please भेट ना एकदा संध्याकाळी ऑफिस नंतर"....

"ठीक आहे"... हरी ने एवढं सांगून फोन ठेवला....

संध्याकाळ झाली इथं संध्या हरी ची वाट पाहत होती, तिथं हरी ईशाला भेटायला गेला....

हरी येऊन शांत बसला होता , ईशा सारखं हरी कडे बघत होती

"बस्स ना आता, किती तो राग.... sorry ना शोना".....ईशा

"माझं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्याला लग्न आहे माझं".... हरी

ईशा हे ऐकून shock झाली, पुढे काय बोलावं नेमकं तिला काय कळतंच नव्हतं, हरी उठून निघून गेला, आणि ईशा तिथंच बसून रडू लागली....

हरी तिथून घरी जाण्यासाठी निघाला, तो विसरूनच गेला की संध्या त्याची वाट पाहत होती तेव्हाच संध्या चा फोन आला हरी ला....

हरी फोन उचलताच बोलला.... "सो sorry ते कामात लक्षात नाही रहायलं"

"Ooook"... संध्या

"एक तुला एक सांगायचं होतं"...

"काय सांग ना"...

हरी ने संध्याला तिच्या आणि ईशा बद्दल सगळं काही सांगितलं आणि मग शेवटी बोलला...... "बघ मला थोडं वेळ हवं आहे मी थोडं relax झालो की आपण भेटूया".... हरी

"ठीक आहे, काही हरकत नाही, तुला वाटेल तेव्हा भेटूया".... संध्या

संध्या घरी आली....

"मग काय हरी ला भेटलीस".... बाबा

"हो बाबा"...
"बरं आहे आज कालचं मुलगा मुलगीच सगळं ठरवून घेतात".... बाबा

संध्या लाजून बेडरूम मध्ये गेली....

"ताई कसा आहे मुलगा,काय बोलला भेटल्यावर फोटो मध्ये तर हिरो दिसतो पण असं समोरा समोर कसा दिसतो"...

"माहीत नाही भेटली नाही मी त्याला"... संध्या

"पण आता तर तू बोललीस ताई की भेटून आलीस"......

"हो तसं तो माझ्यासोबत फोनवर बोलला पण मला असं वाटलं की तो माझ्यासमोर उभा राहवून बोलतोय, खूप काय सांगितलं त्याने , त्याच्या life बदल लपवू पण शकला असता पण नाही आणि तेच मला खूप आवडलं".... संध्या

दिवस असेच जात होते.... त्यात संध्या ने भेटण्याचा विषय काळला की हरी सारखं टाळायचा....

हरी एक दिवस जेव्हा संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला बाबांनी पत्रिका दाखवली, पत्रिका बघूनच हरीचे होश उडाले,पुढे काय बोलावं त्याला कळत नव्हतं....

"बाबा पण अचानक"....

"अचानक कुठे , आता काय तू तुमचं चांगलं जुडलं पण आहे, आता बघ पुढच्या महिन्या नंतर पुढचे ६ महिनेकुठलाच चांगलं मुर्हत नाहीये.... १० दिवस नंतर सकरपुढा आणि मग लग्न".....

"बाबा पण तिच्या घरच्याने तर मला बघितलं पण नाहीये"....

"तर काय झालं त्यांनी मला बघितलं आहे, संध्या जे बाबा आणि मी लहान पणासपासून चे मित्र आहेत, हे सगळं तर तुमच्या साठी बाकी आम्ही तर आधीच ठरवलं होतं की तुझं आणि संध्याचं जुळवायचं"....

हरी या पुढे काहीच बोलला नाही... आणि बेडरूम मध्ये जाऊन बसला, हरी ला स्वतः वर खूप राग येत होतं, त्याची चूक त्याला कळली होती पण नेमकं करायचं काय आता...

दुसऱ्या दिवशी हरी ने ईशा ला फोन केलं पण ती सारखं त्याचं कॉल कट करत होती....

"पण शेवटी मी ठरवलं, मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्या आधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो, लग्न ची वेळ जवळ आली होती, त्या दिवशी घरी पावणे आले होते, आणि मी दुपारी घरी पोचलो"....

"अरे हरी आलास तू".... आई

"बघा बघा नवरदेव आला".... घरात पाहुणे आले होते त्यातून काही बायका हसत म्हणाले

"बाळा आता थोडे दिवस बाहेर फिरणं बंद कर, लग्न ची वेळ जवळ आलीय".… पाहुण्यातून एक बाई बोलली

"कुठे होतास चल पटकन"... आई

"आई बाबा कुठेय".... हरी

"बाबा आत बसले आहेत, हे बघ हे तुझे बाबा ची आत्या आहे पाया पळ".... आई

"आई बाबा कुठेय, मला भेटायचं आहे त्यांना"....हरी

"काय झालं असं का वागतोय तू"..... आई

"इथं आहे मी काय झालं".... बाबा आतून बाहेर आले

बाबांना बघून मी थोडं घाबरलो पण, मग हिम्मत करून पुढे जाऊन मी बाबांना सांगून दिलं...

"बाबा मला लग्न नाही करायचं".... हरी

"काय बोलतोय पाहुणे आले आहे, चल मस्करी करू नकोस,भेट सगळ्यांना".... बाबा

"बाबा मी मस्करी करत नाहीये खरच बोलतोय मला लग्न नाही करायचे".…. हरी ओरडून बोलला

बाबांनी पाटी पुढे काही विचार न करता जोरात मला काना खाली वाजवली....

घरात एकदम शांतता झाली सगळे माझ्या आणि बाबांन समोर बघत होते.....

"हरी काय बोलतोय हे तू".... आई

"काय बोलतोय, काय बोलतोय, निर्लज कुठला,पिऊन आला आहेस का, थोडे दिवसात लग्न आहे आणि आता हे असल्या फालतू पणा करतोय".... बाबा

"अहो ऐकून तर घ्या के म्हणतोय तो".... आई

"बाबा मी खरं बोलतोय, माझ्या मर्जी च्या विरुद्ध लग्न झालं तर मी नाही जगू शकणार".... हरी

"तुझ्या मर्जी च्या विरुद्ध.... ??? तू स्वतः हा बोललास, तू मुलीला ला पाहिलं सगळं तुझ्या मर्जी ने केलं तरी".... बाबा

"हरी, आपलं सोड त्यांच्या विचार कर लोकांना ते काय जवाब देतील, हे जर त्यामुलीला कळलं तर, बाळा थंड डोक्याने विचार कर"... आई

"काही विचार करायची गरज नाहीये... तुझी मर्जी असो नसो, तुला लग्न करावे लागतील"..... बाबा

"बाबा मी लग्न नाही करणार".... हरी

"मग निघ माझ्या घरातून निघ".... बाबा

"अहो थांबा,कायकरताय तुम्ही".... आई
बाबांनी मला धक्के मारून बाहेर काढलं दोन दिवस मी घरा बाहेर होतो....

"आणि या दोन दिवसात घडलं ते तुला माहीत नव्हतं हरी".... संध्या

"मी खूप खुश होती सगळं खूप लवकर लवकर झालं तुझं अस भेटणं, मग लग्न.... पण कोणाला ठाऊक होती की सगळं Temporary होतं....
त्या दिवशी मी कामावरून घरी जात होती, तेव्हाच बहिणीचा कॉल आला"...

"आणि मग मग मला कळलं की तू लग्नाला नकार दिलंस..... खूप वाईट वाटलं पण तू आधी पण कधी लग्न साठू होकार दिला नव्हतं, पण मला खूप धक्का बसला हे ऐकून"....

"मी हेच विचार करत त्या दिवशी गाडीत चढली सारखा डोक्यात हेच चालू होतं मी दारावर थांबली होती, विचारा मुले डोकं खूप भारी झाला होता तेव्हाच परत बहिनीचा फोन आला की आईला हॉस्पिटल ला घेऊन गेले आहेत, पाहुणे सगळे निघून गेले बाबा पण खूप टेन्शन मध्ये आहेत ताई तू लवकर ये"...

"तेव्हाच अचानक माझा पाय सरकला आणि मी गाडीतुन पडली, इथंच जिथं तू पडलास"....

"मला पण तितच लागला जिथं तुला लागलाय, तुला वाचवण्यासाठी मी होती, पण मला वाचवण्यासाठी कोण नव्हतं"....

"संध्या माफ कर मला"... हरी असं म्हणत तिच्या पायात पडला हाथ जोडून रडू लागला

"चुकी जितकी तुझी आहे तितकीच माझी पण आहे मी पण विचार करायला हवं होतं, थांबायला हवं होतं पण सोड".......
"आता काय फायदा विचार करून हे मला आधी करायला हवं होतं"....

संध्या ने हरीचा हाथ धरलं आणि त्याला पट्टरीवर खाली बसवलं आणि येऊन त्याचा बाजूला बसली.....

"हरी काही वस्तू आपल्या हातात नसतात, ते फक्त होऊन जातात"....

"तू विचारत होतास ना की माझी काय ईच्छा आहे"....

हे ऐकताच हरी संध्याकळे पाहू लागला....

"मला जागे पर्यंत तुझ्यासोबत रहायचं होतं, तुझ्या मिठीत, कारण ज्या दिवशी तू माझ्यासोबत पहिल्यांदा बोललास तेव्हाच मला तुझ्यासोबत प्रेम झालं"....

आणि मी तुझा जीव नाही माझ्या प्रेमाला वाचवलं मी अपूर्ण आहे हरी पण माझं प्रेम पूर्ण आहे.......

--------------------------------------------------------------To Be Continued -------------------------------------------------------------