हरी ईशा च्या ऑफिस खाली येऊन तिची वाट पाहत होता, तीन तास झाले पण ईशा आलीच नाही, तिचा फोन ही लागत नव्हता, हरी सारखा इकडून तिकडे चकरा मारत बसला होता, तेव्हाच त्याची नजर ईशा वर पडली....
ईशा हरी च्या जवळ येऊन थांबली, दोघेही शांत उभे होते.... कोणचं एक मेका सोबत बोलत नव्हतं
"कशी आहेस"... हरी हळूच बोलला
"अअअअअअ.... किती वेळ झाला तुला येऊन, बराच वेळ झाला असेल ना, actually ते एक meeting होती आणि मी सांगायला विसरली तुला वरून range पण नव्हती सेल मध्ये सो"... ईशा
हरी फक्त ईशा कडे बघत होता तो एका शब्दाने काहीच बोलला नाही...
"कसा आहेस".... ईशा
"ठीक आहे म, तू बोल तू काशी आहेस".... हरी
"मी पण ठीक"... ईशा
"बस्स ठीक"... हरी
"हो ठीक" ... ईशा
"ईशा sorry खरच sorry पण आपण normal आधी सारखं नाही का वागू शकत, म्हणजे गेल्या किती महिन्यापासून आपली भेट नाही झाली वरून, ते सगळं लग्नाचा प्रकरण, ईशा मला काहीही करून तू हवी आहेस, I just love uhh yaar"....
हरी ने एका स्वाशात मनात जे आलं ते ईशा ला बेधडक सांगून टाकलं आणि मग लांब स्वाश घेत तो ईशा कड पाहत होता....
ईशा शांत उभी होती, हरी कड एक टक बघत होती....
"चुकी तर माझी आहे हरी मी समजू नाही शकली तुला, पण तू गेल्या नंतर मला कळलं की".... ईशा
"ईशा सोड ना जाऊदे सगळं".... हरी
"शोना sorry... sorry शोना".... ईशा ने हरी ला तिच्या मितीठ घेतलं
"Love uuhh so much शोना"... ईशा प्रेमाने बोलली
★
सकाळ ची संध्याकाळ झाली, वेळ कसा निघून गेला त्यांना कळलच नाही....
"आता पुढे काय हरी".... ईशा
"पुढे काय, चांगला मूर्त बघून लग्न करूया... काय म्हणतेस करशील ना लग्न".... हरी
"हा पण घरी".... ????? ईशा
"बघूया जे होतं ते चांगल्यासाठी होतं"... हरी
हरी शांत झाला, मग एकदम बोलला... "ईशा चल"
"कुठे"....
"चल सांगतो"....
हरी ईशाला त्याचा घरी घेऊन आला, घरात जायचा आधी इशाने हरी ला विचारलं
"हरी are sure"....
"Yess damn sure".... हरी
हरीने बेल वाजवली व आईने दार उघडला.….
"हरी ... अअअ... या या आत या"... आई
हरी ईशा ला घेऊन आत आला....
"नमस्कार आई"... ईशा
"नमस्कार"... बाळा
"तुम्ही एकत्र काम करता का"... ??? आई
"नाही मी.. अअअ" .... ईशा
"आई बाबा कुठे आहे"..... हरी
"आहेत आत मध्ये, अहो ऐकता का जरा बाहेर या"....
"काय झालं".... बाबा बाहेर आले
ईशा ला बघताच बाबा बोलले.... "अच्छामैत्रीण आली आहे का... हरी ची बर बर बसा बसा"....
"ईशाने बाबांना नमस्कार केला"....
"बाबा मला तुम्हाला काय तरी सांगायचं आहे"... हरी
"बोल ना राजा"... बाबा
"बाबा ही ईशा, माझं हिच्यावर प्रेम आहे, बाबा मला माहित आहे मी खूप चुका केले पण मी या वेळेस माझ्या चुका सुधरवतोय मला एक chance घ्या please बाबा"....
बाबा शांत झाले व आई पण शांत झाली, दोघे एक मेकांकडे पाहू लागले....
"पोरी तुझ्या घरी माहीत आहे का.... हे सगळं"
"हो बाबा माहीत आहे".... ईशा हळूच बोलली
"ठीक आहे मग जशी तुमची ईच्छा".... बाबा
"बाबा thank you so much"..... हरी हे ऐकून खूप खुश झाला....
"बाळा तू खुश आहेस ते चांगलं आहे, तुला असं बघून आज मी पण खुश आहे, बस्स हीच हिम्मत जर तू आधी केली असती तर जे सगळं घडलं ते घडलं नसतं"....
"अहो जाउद्याना... देवा च्या कृपाने आता सगळं नीट होतंय".... आई
"बाबा जे सगळं घडलं त्यात माझी ही चूक आहे, खरं तर सगळं माझ्यामुळेच झालं".... ईशा
"असो... जे होतं ते चागल्यासाठी होतं, हरी जा तिला घरी सोडून ये".... बाबा
"हो बाबा".... हरी
ईशा आई बाबांना भेटून हरी सोबत घरी जाण्यासाठी निघाली.... हरी ने ईशाला घरी ड्रॉप केलं आणि हसत हसत घरी येण्यासाठी फिरला....
येताना हरी फाटक जवळ थांबला... आणि soulmate बद्दल विचार करत तो हळू हळू चालता चालता पट्टरीवर आला तो soulmate बद्दल विचार करतच होता तितक्यात...
"अरे आलास... मला वाटलं आता काय तू येणार नाही".... ती मुलगी
हरी त्या मुलीला बघताच खुश झाला....
"हो मग काय आलो मी, आणि का नाही येनार मी, यार आज मी खूप खुश आहे, तुला माहितीये ईशा आणि माझं लग्न होणार आहे, just imagine यार.... आज मी तिला घरी घेऊन गेलो होतो, ईशा बाबांना आईला भेटली आणि बाबांनी लग्ना साठी मंजुरी पण दिली... yess yesss"....
"वाह ! मस्तच, म्हणजे सगळे problems solve झाले तुझे"... ती मुलगी
"हो सगळे problem solve झाले आणि हे सगळं तुझ्यामुळे झाला.... तू जसं सांगितलं होतं ना सगळं तसच झालं, thank you, thank you so much यार"... हरी
"अरे बस्स बस्स"... ती मुलगी
"नाही यार तुझं जितकं आभार मानू तितकं कमी आहे".... हरी
"अच्छा.. बरं, चल जाऊदे ते सगळं ये बस्स थोडं वेळ दमला आहेस खूप"... ती मुलगी
"हरी त्या मुली सोबत पट्टरीवर जाऊन बसला"...
आज त्या मुलीचा चेहरा काय जास्तच उजडून दिसत होता....
"एक सांगू".... हरी
"बोल ना".... ती मुलगी
"आज तू रोज पेक्षा खूप सुंदर दिसते".... हरी
"अच्छा असं व्हय".... ती मुलगी
"मला एक खरं सांगशील".... हरी
"हा बोल ना".... ती मुलगी
"तू कोण आहेस, माझी येवडी help का केलीस तू".... हरी
"मी पण एक साधारण मुलगी होती, माझी पण फॅमिली आहे बाबा आई बहीण.... सगळं मस्त चालू होतं, एक दिवस रोजच्या गाडीने घरी जात होती, त्या दिवशी खूप गर्दी होती गाडी मध्ये, माझा पाय सरकला आणि मी चालत्या गाडीतून पडली.... आई बाबा खूप रडले होते त्या दिवशी मी बघत होती त्यांना रडताना, म्हटलं पण मी त्यांना की रडू नका पण.... सोड जाऊदे".....
ती मुलगी बोलता बोलता शांत झाली....
"आज जर मी इथं जिवंत उभा आहे तर फक्त तुझ्यामुळे.... आणि मला ही तुझ्यासाठी काय तरी करायचं आहे, मला सांग असं काय करू जेच्याने तुला मुक्ती मिळेन"... हरी
"सांगितलं तरी ते आता शक्य नाही हरी, असो माझ्या गाडी चा वेळ झालाय येते मी"..... ती मुलगी
ती मुलगी उठून जाऊ लागली तेव्हाच अचानक मागे फिरली आणि बोलली....
"जर तुला माझ्यासाठी काय करायचं आहे तर माझं एक काम करशील".... ती मुलगी
हे ऐकून हरी झटकन उठला... "हो मग काय करेन ना, तू सांग फक्त काय ते".... हरी
"पण आधी मला promise कर की ते काम झाल्या नंतर तू मला शोधत इथं परत येणार नाही"..... ती मुलगी
"का असं, म्हणजे तू".... हरी
"हो बघ जर करू शकतो तर".... ती मुलगी
हरी ने थोडा विचार केला आणि मग बोलला.... "ठीक आहे नाही येणार मी, पण तुला कधी विसरणार नाही मी, माझ्या ह्रिड्यात नेहमी तुझी वेगडी जागा रहाणार".... हरी
त्या मुलीने हरी च्या डोळ्यात अगदी प्रेमाने बघितलं आणि मग बोलली
"तू insurance office मध्ये काम करतो ना"....
"हो".....
"मी माझ्या नावावर insurance policy काढली होती पण ती अजून बाबांना भेटली नाहीये, बस्स तेवडी एक मदत कर, बाबा माझे खूप अडचनीत आहेत".... ती मुलगी
"बस्स येवडच, जितकं होईल तितकं लवकर घरी चेक पटवून देणार मी.... काळजी करू नकोस, बर या निमित्ताने तुझं नाव तरी कळेल आज मला"....
"संध्या"..... ती मुलगी
"म्हणजे ही आपली शेवट ची भेट आहे"..... हरी
"हो, पण घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत".... संध्या
"संध्या असं का झालं"..... हरी
संध्या हरी कडे बघून हसली आणि बोलली "उतर लवकर भेटेल".....
इतकं सांगताच संध्या पुढे चालू लागली आणि चालता चालता ती अद्रीश्य झाली....
हरी ला काहीच कळलं नाही की संध्या असं का बोलली... हरी हळू स्वरात प्रेमाने बोलला "संध्या"..........
--------------------------------------------------------- To Be Continued -----------------------------------------------------------------