Prem he - 14 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 14

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

प्रेम हे..! - 14

............. ती सर्वांसोबत बोलत होती पण तिची नजर मात्र विहान ला शोधत होती.. आणि तिला हॉटेल च्या पायर्‍यांवर उभा असलेला विहान दिसला...😍 दोघांची नजरानजर झाली.. विहान तर पुरता घायाळ झाला होता तिला बघून...!

निहिरा ही विहान ला बघून हरवून गेली... विहान ने ग्रे t-shirt त्यावर ब्लॅक लेदर जॅकेट आणि डार्क ग्रे जीन्स घातली होती...! इतक्यात मागून अदिती आली आणि हळूच निहिरा च्या कानात बोलली... " काय दिसतो हा यार 😍.. लवकर हो बोल त्याला नाहीतर आम्ही सर्व लाईन मध्ये आहोतच 😜😂😂"

"काहीही काय तुझं... चूप!!"

"अगं मी मस्करी करतेय... 😅😅 आमचं सोड... पण लवकर officially हो बोलली नाहीस तर भलतीच कोणीतरी पळवून नेईल त्याला...😬😬"

"काहीतरीच तुझं... 🙄" म्हणत निहिरा विहान च्या दिशेने पुढे गेली..

विहान ही तिच्याचकडे बघत बघत तिच्या जवळ आला... दोन क्षण असेच गेले.. दोघांमधून कुणीच काही बोलले नाही.. इतक्यात पूर्ण ग्रुप त्यांच्याजवळ आला.. आणि कुणीतरी बोललं "चला जाऊया का?"... तसे सर्वचजण बाहेरच्या जिन्याने हॉटेलच्या वरच्या बाजूला गेले... नुकतीच थंडी पडायला सुरुवात झाली होती.. त्यामुळे दुपार असूनही वातावरणात बर्‍यापैकी गारवा जाणवत होता.... समुद्र जवळ असल्याने छान वारा ही सुटला होता... खूपच फ्रेश वाटत होतं तिथे...!!

निहिरा सर्व अरेंजमेंट बघून थोडी चकित झाली😮.... तिला सर्वांनी त्या स्पेशल chair वर बसायला सांगितलं...ग्रुप ने सोबत आणलेला केक टेबल वर ठेवला... आणि निहिरा ला केक कट करायला सांगितलं... फोटोज्, व्हिडिओज् चालूच होते 😅.... निहिरा ने केक कट केला... सर्वांनी टाळ्या वाजवल्या... 👏👏👏👏 सर्व मैत्रिणींनी तिला केक भरवला... तिनेही थोडा थोडा करून त्यांना केक भरवला... अवनी ने केक चे pieces केले... आणि सर्वांनी एक एक piece उचलत केक फस्त केला!! विहान ने मात्र केक खाल्ला नाही... निहिरा ने त्याला डोळ्यांनीच 'काय झालं' म्हणून विचारलं.. त्याने मानेनेच 'काही नाही' म्हटलं... तीही त्यावर काही बोलली नाही... सोनियाच्याही ते लक्षात आलं पण तीही काही बोलली नाही.... सर्वांनाच आता भूक लागली होती.... मेनु कार्ड हातात घेऊन सर्वजण काय हवं नको ते बघत होते... लगेचच वेटर स्टार्टर घेऊन आला...सर्वांनाच आश्चर्य वाटलं... आपण तर अजून काही ऑर्डर केलं नाही.. स्टार्टर कसं काय आलं... इतक्यात कुणीतरी विहान चं नाव घेतलं... तसं निहिरा सोबत सर्वांनीच त्याच्याकडे बघितलं... तो फक्त हसला... 😄 सर्वांनी त्याला थँक्स म्हणत खायला सुरुवात केली😃... बराच वेळ गप्पा वगैरे मारत सर्वांनी जेवण उरकलं.... विहान चं पोट तर निहिरा ला बघूनच भरलं होतं...! 😅 पण तिला राग येईल म्हणून त्याने थोडसं खाल्लं होतं...
वरुन आजूबाजूची झाडे आणि त्यापलीकडे थोड्याच अंतरावर असलेला समुद्रकिनाराही दिसत होता... 🌊सर्वांनी निहिरा ला गिफ्ट्स दिले.. फोटो वगैरे काढून घेतले...📷 मजा मस्ती करत साडे चार कधी वाजले कुणालाच कळलं नाही....! तसंही त्यांची पार्टी असल्यावर त्यांना लेट होणार हे ठरलेलंच असायचं😁.. त्यांच्या घरीही माहीत असायचं.... त्यामुळे कितीही लेट झाला तरी त्यांना टेंशन नसायचं!!

विहान चा फोन वाजला म्हणून तो एका बाजूला जाऊन फोन वर बोलायला लागला... सर्वजण गप्पा आणि फोटोसेशन मध्ये दंग होते.... निहिरा चं लक्ष मात्र त्याच्याचकडे होतं... फोन वर बोलून झाल्यावर तो जरा घाईघाईतच निहिरा जवळ आला.. आणि म्हणाला...
"निहिरा... सॉरी.... But डॅडींचा फोन आला होता...अर्जंट काम आलंय ऑफिस मध्ये.... मला जावं लागेल... तुही लवकर निघणार आहेस ना...."

"हो..." ती एवढंच म्हणाली.. तिला मनातून खूप राग आला होता त्याचा... एकतर अजूनही त्याने तिला बर्थडे विश केलं नव्हतं.. 😐 काल रात्री तिने स्वतःहून फोन केला होता त्याला... पण तेव्हाही तो विश करायला विसरला... आत्ता आल्यावरही सर्वांनी विश केलं... पण हा आत्ताही विसरला...

"सॉरी डिअर... नंतर बोलू.. 😓.. बाय" विहान निहिरा चा निरोप घेत म्हणाला... सोनिया ला ही त्याने बाय केलं... आणि तो जायला निघाला... सर्वांनी नाराजी व्यक्त केली... पण तो निघाला... निहिरा ला असं सोडून जायला त्याचंही मन होत नव्हतं..... जिना उतरेपर्यंत तो वळून वळून निहिरा कडे बघत होता... निहिरा चे पाण्याने भरलेले डोळे त्याच्या नजरेतून सुटले नाहीत...!😢 काही क्षण ती हरवल्यागत बसून राहिली.. आणि मग chair वरुन उठली आणि धावत समोरच्या बाल्कनी कडे गेली.. बाईक वर बसून विहानला तिथून जाताना तिने बघितलं... ती खूप अपसेट झाली.. 😑.. परत आपल्या जागेवर येऊन बसली.. खरं तर आता एक क्षणही तिथे थांबायची तिची इच्छा नव्हती... पण वाढदिवस तिचाच होता त्यामुळे ती असं निघून जाऊ शकत नव्हती... 😒.. निहिरा ने स्वतःला सावरलं..

इतक्यात दोन वेटर्स आले आणि टेबल वरचं सर्व आवरू लागले... निहिरा ने बिल मागवलं... तसा वेटर म्हणाला.. "मॅडम तुमचं बिल ऑलरेडी पेड आहे... 😊"

"कायss... पण मी तर बिल नाही दिलं अजून 😮"

"ते आत्ता सर गेले ना खाली... त्यांनी पे केलंय..." एवढं म्हणून ते दोघे सर्व आवरून खाली निघून गेले...

"म्हणजे.. विहान? ...... असा काय हा😕...माझा बर्थडे आहे ना... मी ट्रीट देणार होते सर्वांना... ह्याने का बिल पे केलं☹️☹️" निहिरा नाराजीच्या सुरात स्वतःशीच म्हणाली.. आणि मग तिला आठवलं.. तो म्हणाला होता.. 'तुझा बर्थडे मी प्लान करणार'.... अरे!....खरंच की!! ..सर्व त्याच्या मनासारखंच तर झालं होतं...! हॉटेल ही त्यानेच निवडलं... सर्व अरेंजमेंट ही त्याचीच होती.. स्टार्टर त्याने ऑर्डर केलं आणि आता बिल ही त्यानेच पे केलं...🙆... "जिद्दी....☺️" ती स्वतःशीच हसली!!

तेवढ्यात पियुष, अमित, रिया, वर्षा तिथे आले आणि "चला ना आपण थोडावेळ बीच वर जाऊया😬" म्हणून मागे लागले..

निहिरा ची तर अज्जिबात इच्छा नव्हती... पण सर्वांनीच आग्रह केल्यावर तिला नाही म्हणता आलं नाही...

हॉटेल च्या मागच्या बाजूलाच समुद्रकिनारा होता.. त्यामुळे सर्वजण चालतच निघाले.... झाडांच्या पलीकडचा समुद्रकिनारा आता नजरेस पडत होता...सूर्याची परतीच्या प्रवासाला निघण्याची तयारी सुरू होती 🌤️...त्याच्या पिवळसर किरणांनी ते जलबिंदू जणू रत्नांप्रमाणे चमकत होते...!!! 💎✨ निहिरा ला तर खूप बरं वाटलं इकडे येऊन... पण तरीही तिला सारखं वाटत होतं.. विहान आता असता तर...! सर्व किनाऱ्यावरून वाऱ्याची झुळूक अंगावर घेत हळू हळू चालत होते...आताशी पाच वाजून गेले होते.. त्यामुळे तिथे फारशी वर्दळ नव्हती...फक्त निहिरा च्याच ग्रुप चा आवाज जास्त गुंजत होता... 😅😅 पण निहिरा मात्र तिच्याच विचारांत हरवली होती... खाली मान घालून ग्रुप मध्ये असूनही एकटीच चालत होती....बोलता बोलता निहिरा चा ग्रुप एकदम गप्प बसला... निहिरा अजून तिच्याच विचारांत होती... अचानक एवढी शांतता कशी झाली म्हणून तिने मागे वळून सर्वांकडे बघितले... तसे सर्वजण एकदम ओरडले.... "Surprise!!!!!!"😄😄😂😂.... ती गोंधळली... Surprise? कुठे आहे?? म्हणून ती इकडे तिकडे बघू लागली... एवढ्यात तिला थोड्याच अंतरावर काहीतरी वेगळं वाटत असल्याचं जाणवलं... वाळू मध्ये एक छोटी पण उंच अशी कमान रोवलेली होती... त्याला वरच्या बाजूला रंगीबेरंगी बलून्स लावले होते... 🎈🎈🎈🎈 खाली वाळूवर एक थोडा उंच असा टेबल ठेवला होता.. आणि त्यावर एक केक ठेवला होता... समुद्राच्या लाटा हलकेच येऊन त्या टेबलला स्पर्शून जात होत्या.... 😍 😍 आणि कमानीच्या पलीकडे......... "विहाssssन😮" निहिरा अस्फुटशी किंचाळली... हो... पलीकडे पाण्यामध्ये जीन्स फोल्ड करून विहान उभा होता.. तिच्याचकडे बघत!!! 😍 तिच्याकडे बघून तो हसत होता... 😄 त्याला बघून तिच्या रोमारोमात वीज संचारली!!! ओठांवर हसू उमटले!! तिच्या डोळ्यांतील दुःखाश्रुंची जागा आता आनंदाश्रूंनी घेतली..!!!!

तिने त्याच्याकडे जायला एक पाऊल पुढे टाकले तोच सोनिया तिच्याजवळ आली आणि तिच्याकडे एक रेड रोज 🌹 आणि एक चिठ्ठी दिली.... तिने गोंधळून सोनिया कडे बघितलं... सोनिया ने डोळ्यांनीच तिला ती चिठ्ठी उघडून बघायला सांगितली... त्यात लिहिलं होतं....

तोहफा-ए-दिल दे दूँ या दे दूँ चाँद तारे..
जन्मदिन पर तुझे क्या दूँ ये पूछे मुझसे सारे..
ज़िन्दगी तेरे नाम कर दूँ तो भी कम है..
दामन में भर दूँ पल ख़ुशी के मैं तुम्हारे......♥️

तिने विहान कडे बघितलं... तो तिच्याकडे बघून हसत होता...! ती ही हसली... आणि त्याच्या दिशेने पुढे गेली... दोन चार पावले चालत नाही तोच... अवनी तिच्याजवळ आली.. तिनेही तिच्याकडे एक रेड रोज 🌹 आणि एक चिठ्ठी दिली....😊 ज्यात लिहिलं होतं...

जन्मदिन के ये बहुत ख़ास लम्हे मुबारक..
आँखों में बसे नए नए ख्वाब मुबारक..
जिंदगी जो लेकर आयी है आपके लिए आज..
वो तमाम खुशियों की हसी सौगात मुबारक..... ♥️♥️

तिने परत विहान कडे बघितलं... तिचे डोळे भरून आले होते.. त्याने तिच्याकडे बघून परत एक स्माईल दिली...😊

ती परत पुढे जायला लागली.. यावेळी तिने तिच्या पावलांचा वेग वाढवला.. पण अदिती आलीच...😅 तिने परत डोळे मोठे करून विहान कडे बघितलं... तो परत हसला... अदितीनेही एक रेड रोज 🌹 आणि एक चिठ्ठी दिली तिच्याकडे! ज्यामध्ये लिहिलं होतं...

Meeting you have set a great number of beautiful things going on in my life...I cherish you and give you all of my heart...Happy birthday, Darling....😘 ♥️♥️♥️

निहिरा च्या अश्रूंचा बांध फुटला... तीने रडत रडतच विहान कडे धाव घेतली... आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली...! तिच्या वागण्याचं विहान ला खूप आश्चर्य वाटलं..सर्वांसमोर तिने पहिल्यांदाच तीचं प्रेम व्यक्त केलं होतं....!!! पण आज तिलाच काही प्रॉब्लेम नव्हता मग काय.... त्यानेही तिच्या भोवती आपल्या हातांचा विळखा घातला...!! 😍❤️

🎵🎵🎵🎵🎵

होश में.. रहूँ क्यूँ आज मैं
तू मेरी बाहों में सिमटी है
मुझमें समायी है यूँ....
जिस तरह.. तू कोई हम नदी
तू मेरे सीने में छुपती है
सागर तुम्हारा मैं हूँ...
पी लूँ.. तेरी धीमी-धीमी लहरों की छमछम..
पी लूँ.. तेरी सौंधी-सौंधी साँसों को हरदम..
पी लूँ है पीने का मौसम...
तेरे संग इश्क तारी है
तेरे संग इक खुमारी है..
तेरे संग चैन भी मुझको
तेरे संग बेकरारी है...
तेरे बिन जी नहीं लगता... तेरे बिन जी नहीं सकता
तुझपे है हारे मैंने वारे दो जहां..
कुरबाँ-महरबाँ, के मैं तो कुरबाँ
सुन ले सदा....♥️♥️

To be continued..
🙏
#प्रीत 🍁