Prem he - 13 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 13

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

प्रेम हे..! - 13

...........एके दिवशी तो त्याच्या केबिन मध्ये chair वर बसून टेबल वर त्याची गोल्ड रिंग फिरवत कसला तरी विचार करत होता... इतक्यात त्याला काहीतरी आठवलं...😁 आणि तो खुष होत chair वरुन उठला...... 😄😄



त्याने डॅड ना कॉल करून तो लवकर घरी जात असल्याचं सांगितलं... विहान पहिल्यांदाच असा लवकर घरी निघाला होता त्यामुळे त्यांनीही त्याला हसत हसत परमिशन दिली... 😊

त्याने पार्किंग ला जाऊन कार काढली... आणि थेट 'The Gold Lodge' शॉप समोर जाऊन थांबला.. कार पार्क केली आणि तो आतमध्ये गेला.... काही दिवसांपूर्वीच तो इथे त्याच्या मॉम सोबत तिच्यासाठी bangles घ्यायला आला होता...! मघाशी गोल्ड रिंग फिरवता फिरवता त्याला याची आठवण झाली.. म्हणून तो थेट इकडेच निघून आला... ☺️

शॉप चा मालक त्याच्या ओळखीचा होता.. त्याने हसून त्याचं स्वागत केलं... विहान त्याला म्हणाला

"अंकल... त्यादिवशी जे ब्रेसलेट मला आवडलं होतं ते दाखवा प्लीज... 😊"

"हो नक्की बेटा...😄" म्हणत त्याने शॉप मधल्या एका मुलाला ते ब्रेसलेट आणायला सांगितलं...

थोड्याच वेळात तो मुलगा विहान ने सांगितलेलं ब्रेसलेट घेऊन आला... विहान ने परत एकदा त्या ब्रेसलेट कडे बघितलं... तो स्वतःशीच खुश होत हसला ☺️ आणि त्याने ते आपण विकत घेत असल्याचं सांगितलं... त्या मुलाने एका छानशा पेटीत ते ब्रेसलेट ठेवलं आणि ती पेटी आणि बिल विहान च्या स्वाधीन केलं.....विहान ने कार्ड ने बिल पे केलं आणि तो घरी निघून आला... त्याने ती पेटी जपून आपल्या कपाटात ठेवली...

काही दिवसांपूर्वीच जेव्हा विहान त्याच्या मॉम सोबत त्या शॉप मध्ये गेला होता..तेव्हा मॉम bangles बघत असताना त्याने सहज म्हणून ते काचेत ठेवलेलं ब्रेसलेट काढून दाखवायला सांगितलं होतं...मध्ये किंचित मोठा हार्ट शेप आणि त्याच्या दोन्ही बाजूला लहान होत गेलेले चार चार हार्टस् आणि प्रत्येक हार्ट मध्ये रेड कलर चे crystals!! 💗त्याला गोल्ड चेन आणि लॉक.... खूपच सुंदर ब्रेसलेट होतं ते!! त्याला ते ब्रेसलेट बघितल्याबरोबर निहिरा ची आठवण आली होती... निहिरा च्या नाजूक हातात हया नाजूक ब्रेसलेट ची शोभा आणखी वाढेल! - असा विचार करून तो स्वतःशीच हसला होता.. 😄 पण मॉम सोबत होती त्यामुळे नंतर कधीतरी आपण ते ब्रेसलेट घेऊ असं त्याने ठरवलं होतं.......

- - - - - - - XOX - - - - - - -

उद्या निहिरा चा वाढदिवस! रात्री विहान आपल्या बेड वर पडला होता... बारा वाजल्याचे घड्याळाच्या टोलाने ओरडून सांगितले!! विहान ची चलबिचल सुरू झाली... तो सारखं मोबाईल हातात घेत होता... बाजूला ठेवत होता...! त्याला निहिरा ला विश करायचं होतं... पण त्याने कॉल करणार नाही असं प्रॉमीस केलं होतं तिला ... दोघांची ओळख झाल्यानंतरचा हा तिचा पहिलाच वाढदिवस होता...!

काय करावं त्याला सुचत नव्हतं... ग्रुप वर सर्वांचे मेसेजेस येऊ लागले... सर्वजण तिला विश करत होते... सोनिया ने ही तिला ग्रुप वर विश केलं... पण विहान ला मेसेज वर विश करायचं नव्हतं... 😐 थोड्या वेळाने तिचेही रिप्लाय चालू झाले... म्हणजे ती जागी आहे....! ☺️ कॉल करू की नको.. विहान द्विधा मनस्थितीत होता... 🙁त्याने मोबाईल हातात घेतला... निहिरा चा नंबर काढला.......पण डायल न करता परत बाजूला ठेवून दिला... क्षणाक्षणाला त्याची बेचैनी वाढतच होती... 😑 त्याला तिची खूपच आठवण यायला लागली... त्याच्याही नकळत त्याचे डोळे भरून आले😑....इतक्यात त्याच्या फोन ची रिंग वाजली...📲.....त्याने डोळे पुसतच बाजूला ठेवलेला मोबाईल हातात घेतला.. आणि तो धाडकन् उठून बसला...
निहिरा चा फोन होता!! 😍

त्याने फोन रिसीव्ह केला...

"Hii.. कसा आहेस?... चिडलायस का अजून?🙁..." निहिरा ने विचारलं..

"..............."... विहान गप्पच..

"काय झालं... नाहीच बोलायचं का तुला??"

खरं तर विहान ला खूप खूप बोलायचं होतं तिच्यासोबत.. पण त्याला एवढं भरून आलं होतं की तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हता... 😑😑

" विहान ठेऊ का फोन? " निहिरा बोलली..

"...... I miss you a lot निहिरा... 😩".. विहान कसबसं म्हणाला..

".. Miss you too dear.. 😔..... बारा वाजल्यापासून बघतेय ऑनलाईन आहेस पण विश करावंसं नाही वाटलं ना तुला..😐 " निहिरा जरा रागावूनच बोलली..

"तुला प्रॉमीस केलंय ना कॉल नाही करणार म्हणून...😔"

"आजच्या दिवशी ही नसता केलास का?"

"सोड ना निहिरा.... बोल ना... कशी आहेस.. खूप आठवण येते तुझी 😩😩"

" तुझ्याशिवाय कशी असेन असं वाटतं तुला?? "

" उद्याचा means आजचा दिवस सूट देशील ना मला....प्लीज प्लीज प्लीज.... 🙁"

निहिरा हसली.... 😅😅

" निहिरा प्लीज... तुझा बर्थडे मी प्लान करणार... चालेल ना? "

" विहान... त्यात काय प्लान करायचं... आपण सर्व फ़क्त लंच साठी बाहेर जाणार आहोत... बाकी काही नाही.. संध्याकाळी मला आई बाबांसोबत बाहेर जायचंय.. So मला जास्त वेळ थांबता नाही येणार..."

"OK... ठीक आहे..😐" विहान त्यावर जास्त काही बोलला नाही...

"रागावू नको.. प्लीज... चल.. ठेवते फोन... उद्या भेटू.."

"हो.. बाय.. गुड नाईट.."

"गुड नाईट" म्हणत निहिरा ने फोन ठेवला...

विहान ला निहिरा सोबत बोलून खूप बरं वाटलं... कित्ती दिवसांनी तिचा आवाज ऐकला होता... एवढ्या दिवसात बर्‍याचदा समोरासमोर आलो पण बोललो नाही कधी... आज दिल को सुकून मिला.... 😇.... आणि बर्‍याच
दिवसांनी तो शांतपणे झोपला....

- - - - - - - - XOX - - - - - - - -

दुपारी बारा पर्यंत सर्वांनी विहान ने सुचवल्याप्रमाणे हॉटेल किनारा 🏖 ला जमायचं ठरवलं होतं.. जे बीच च्या अगदी जवळ होतं.. खाली नॉर्मल आणि AC रूम्स आणि वर बांबूचा शेड असलेला open टेरेस असं ते हॉटेल होतं... ठिकठिकाणी बांबूचा वापर करून त्याला एक मस्त लूक दिला होता.. लांबून बघणार्‍याला ते हॉटेल फक्त बांबूचंच बनवलेलं आहे असं वाटायचं..! समुद्राच्या लाटांचा आवाजही तिथे बसल्यावर यायचा...🌊🌊.. हॉटेल ला लागूनच एका बाजूला त्यांनी मोठमोठ्या छत्र्या⛱️ उभ्या करून त्याखाली टेबल्स मांडले होते.. आणि त्या भागात खाली वाळू पसरवलेली होती... अगदी बीच वरच बसून जेवत असल्याचा फील यायचा... समुद्रकिनारा ही निहिराची फेवरेट प्लेस होती... म्हणूनच विहान ने हे हॉटेल निवडलं होतं...!☺️

एक एक करत सगळे जमले... फक्त बर्थडे गर्ल आणि तिच्या तीन फ्रेंड्स म्हणजेच अवनी, रीतू आणि अदिती बाकी होत्या यायच्या.... तोपर्यंत विहान आत गेला आणि मॅनेजर सोबत बोलून वरचा टेरेस बूक केला... सर्वांना एकत्र बसता येईल अशी अरेंजमेंट करायला सांगितली... बर्थडे गर्ल साठी मध्ये एक स्पेशल chair ठेवायला सांगितली... स्टार्टर ऑर्डर करून ठेवलं... आणि तो बाहेर आला.....
निहिरा आली होती...😍 💗 ब्लू थ्री फोर्थ पँट आणि त्यावर रेड कलर चा टॉप... गळ्यात विहान ने दिलेली चेन... कानात मॅचिंग इयररिंग्स... केस मोकळेच सोडले होते... आणि ओठांना लालचुटूक लिपस्टिक...!! आज निहिरा खूप क्यूट आणि अल्लड वाटत होती!!! ❤️ सर्वांनी तिला हॉटेल बाहेरच गराडा घातला ... सर्व तिला विश करत होते... तीही हसून सर्वांच्या शुभेछांचा स्वीकार करत होती... 😄😄 हसताना तिच्या गालावर पडणार्‍या खळीमुळे ती अजूनच सुंदर दिसत होती...

ती सर्वांसोबत बोलत होती पण तिची नजर मात्र विहान ला शोधत होती.. आणि तिला हॉटेल च्या पायर्‍यांवर उभा असलेला विहान दिसला...😍 दोघांची नजरानजर झाली.. विहान तर पुरता घायाळ झाला होता तिला बघून...!

💗🎵💗🎵💗🎵
कैसे कहें क्या है सितम
सोचते हैं अब ये हम..
कोई कैसे कहे वो हैं या नहीं हमारे...
करते तो हैं साथ सफर
फासले हैं फिर भी मगर..
जैसे मिलते नहीं किसी दरिया के दो किनारे...
पास हैं फिर भी पास नहीं
हमको ये गम रास नहीं..
शीशे की इक दीवार है जैसे दरमियाँ...
सारे सहमे नज़ारे हैं
सोये-सोये वक्त के धारे हैं
और दिल में खोई-खोई सी बातें हैं..... ❤️❤️❤️


To be continued..
🙏
#प्रीत 🍁