Prem he - 6 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 6

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

प्रेम हे..! - 6

.............. तिने लगेचच ती चेन गळ्यात घातली आणि स्वतःला त्या आरशात बघितलं.. आणि आरसा बनून विहान च आपल्याला बघतोय असं तिला वाटलं... आणि तिने लाजेने आपली मान खाली घातली.. 😊🙈.....



विहान ने दिलेलं पहिलं गिफ्ट म्हणून तिने त्या वस्तू एकदा हृदयाशी कवटाळून धरल्या.. 😊 खूप छान वाटत होतं तिला! पण तरीही मनात विचार आलाच... आपण त्याच्यासाठी स्पेशल आहोत म्हणून त्याने हे दिलंय आपल्याला की जसा तो म्हणाला होता तसं सहजच दिलंय 🤔.. पैसेवाल्या मुलांसाठी हे सर्व कॉमन असतं खरं तर.. एखाद्या मुलीला असं गिफ्ट्स देणं.. तिच्यासोबत टाईमपास करणंही!!..बर्‍याचदा ही मुले एखाद्या मुलीच्या मागे मागे करतात.. प्रेमाचं नाटक करतात.. आणि त्यांचा स्वार्थ साध्य झाला की सोडूनही देतात 🙄😡.. पण माझं मन म्हणतंय विहान तसा नाहीये... पण कुणास ठाऊक.. अशी कितीशी ओळखते मी त्याला.. काही महिने तर झालेत.. तो ही तसाच असला तर...!? खरं म्हणजे मी इतक्यात त्याच्याबद्दल काही निष्कर्ष काढायला नको.. आणखी वेळ जाऊ द्यायला हवा.. तेच योग्य होईल... 😐

विचार करता करता किती वेळ निघून गेला तिला कळलंच नाही... आईच्या आवाजाने ती भानावर आली...

"निहू... ए निहू... काय करतेयस.. दरवाजा उघड.. आणि नाश्ता कर ये चल...." आई तिच्या रूम चा दरवाजा वाजवत म्हणाली..

"हो आई आलेच".. म्हणत तिने गिफ्ट्स पट्कन बॅग मध्ये भरले.. आणि नाश्ता करण्यासाठी बाहेर गेली..

- - - - - - - - XOX - - - - - - - -

स्पोर्ट्स आणि सर्व डेज आता झाले होते... आता कॉलेज ची गॅदरींग जवळ आली होती.. निहिरा ला डान्स मध्ये खूप इंटरेस्ट होता.. ती duet करणार होती.. तिच्याच क्लास मधल्या एका मुलासोबत... 😊 डान्स improve व्हावा म्हणून तिने आणि तिच्या पार्टनर ने डान्स क्लास ही जॉईन केला होता.. अवनी तिच्यासोबत रोज तिची प्रॅक्टिस बघण्यासाठी जायची.. कधीतरी अदिती आणि रीतू ही जायच्या... आजही निहिरा अवनी ला घेऊन गेली होती.. बिल्डिंग च्या फर्स्ट फ्लोअर वर डान्स क्लासेस असायचे.. निहिरा आणि अवनी वर चढतच होत्या की त्यांना सोनिया भेटली...

"अरे... तुम्ही दोघी इकडे? जिम ला येता का तुम्ही पण ?
पण कधी दिसला नाहीत!" सोनिया आश्चर्याने म्हणाली..

"नाही गं.. मी इथे डान्स क्लास ला येते.. अवनी मला सोबत म्हणून येते..." निहिरा म्हणाली..

" वॉव!... कधीपासून?.. याआधी दिसला नाहीत कधी.."

"झाले थोडे दिवस... अ‍ॅक्च्युअली सुट्टीमध्येच जॉईन करणार होते पण म्हटलं गॅदरींग ही आलीये जवळ तर आत्तापासूनच जॉईन होऊया.. 😄"

"ओह्ह ग्रेट!.. म्हणजे तुझा नंबर नक्की आहे डान्स मध्ये 😅😅"

" ते आत्ताच कसं सांगता येईल.. बघुया.. 😁.. चल प्रॅक्टिस सुरू करायचीय.. नंतर भेटू.. बाय.. ".. म्हणत निहिरा आणि अवनी निघाल्या ..

" OK.. बाय 👋" म्हणत सोनिया धावतच सेकंड फ्लोअर ला गेली ...

मेन्स सेक्शन कडे जाऊन दारातूनच विहान ला हाक मारली..
विहान पण गोंधळला... ही इकडे काय करतेय.. आणि एवढी excited का आहे!!? 😳 तो बाहेर गेला .. तिने ओढतच त्याला बाजूला आणलं.. तिला धावत आल्यामुळे अजूनही दम लागलेला होता ...

"अगं तुला का एवढा दम लागलाय.. झाली का तुझी एक्सरसाईज?.. एवढ्या लवकर? 🤔 आत्ता थोड्या वेळापूर्वी तर आलोय आपण"

"अरे.... ऐक.. तर.. ते... निहिरा..... निहिरा..." ती आधीच दमलेली होती त्यात एक्सायटेड! ... त्यामुळे तिला नीट बोलायलाही होत नव्हतं...

"निहिरा??.. ती आलीय का जिम मध्ये? 😮😍" आता निहिरा चं नाव ऐकून विहान ही एक्सायटेड झाला होता...!

सोनिया मानेनेच 'नाही' म्हणाली ...
" खाली..... डान्स.. क्लास... चल... लवकर "

विहान एवढं ऐकल्याबरोबर धावतच आत गेला .. टॉवेल ने अंग पुसलं... शर्ट घालून.. बॅग भरून पळतच बाहेर आला ...
सोनिया ही तोपर्यंत तिची बॅग घेऊन आली .. दोघेही डान्स क्लास चालू होते तिथे गेले .. समोर निहिरा चा डान्स चालू होता ... दोघेही तिचा डान्स बघून थक्क झाले.. 'कैलाश खेर' च्या 'तेरी दीवानी ' वर ती आणि तिचा पार्टनर डान्स करत होते ... आजुबाजूला डान्स क्लास चे मेंबर्स आणि इतरही काही ऑडियन्स गोळा झालेली होती..

विहान तर आ वासूनच उभा होता..! तिची ती अदा.. तीचं मुरडणं... तिचे हावभाव.. कमरेची लचक.. सर्व काही मोहून टाकणारं होतं..!! 😍 तिचे पाय प्लॅटफॉर्म वर असे थिरकत होते जणू बिजलीच!!! विहान स्वतःही एक उत्तम डान्सर होता... पण आज तो तिचा फॅन झाला होता!!

डान्स अजून पूर्ण बसला नव्हता.. पण ती जे पण नाचली ते खूप भावलं त्याला... खरं तर तिथे जमलेल्या प्रत्येकाला...! एक क्षण त्याला वाटलं की काश.. मी निहू च्या कॉलेज मध्ये असतो.. तर मी ही तिच्यासोबत डान्स केला असता 😒😊..

निहिरा ची प्रॅक्टिस थांबल्यावर सोनिया पळतच तिच्याकडे गेली.. तिला hug केलं आणि तिची भरभरून तारीफ केली.. विहान ही आपल्यासोबत आला असल्याचं तिने सांगितलं.. तसं निहिरा त्याला शोधू लागली.. तो समोरच्या बाजूलाच उभा होता.. निहिरा ने एक नजर त्याच्या कडे बघितले... तो तिच्याचकडे बघत होता.. तिच्याबद्दलचं कौतुक तिला त्याच्या डोळ्यांत दिसत होतं..... 😊

- - - - - - - - XOX - - - - - - - -

विहान ने आता त्याच्या जिम चं टाइम तिच्या क्लास नंतरचं करून घेतलं होतं.. 😄 तो आधी सोनिया सोबत तिचा डान्स बघायला यायचा मग जिम ला जायचा... Actually सोनिया त्याच्यासोबत तिचा डान्स बघायला यायची असं म्हटलं तर जास्त उत्तम होईल 😁😁😁... सुरुवातीला एक दोन दिवस निहिरा ला त्याच्यासमोर नाचायला थोडं ऑकवर्ड वाटलं.. पण मग तिने मनाची तयारी केली... आता तर तो थोडा जरी लेट झाला यायला तरी ती बेचैन व्हायची!! आता ती- तोच आपल्यासोबत आहे असं समजून डान्स फील करायची...! 💃आठ दिवस झाले विहान न चुकता तिचा डान्स बघायला यायचा.. आणि तिला बघता बघता तिच्यामध्ये हरवून जायचा... तिच्या पार्टनर च्या जागी तो स्वतःला बघायचा 😍

सेमीक्लासिकल प्लस फ्री स्टाइल मध्ये डान्स कोरिओग्राफ केला होता त्यांच्या सरांनी... परफेक्ट कपल डान्स होता तो!! एवढ्या सुंदर मुव्हज् बसवल्या गेल्या होत्या.. निहिरा आणि तिचा पार्टनरही गाण्याला चांगला न्याय देत होते ....😊

आजही तो तिची प्रॅक्टिस बघायला आला होता.. पण आज तिचा पार्टनर काही कारणामुळे आला नव्हता... मग तिने एकटीनेच नाचायला सुरुवात केली... सरांनी सॉन्ग प्ले केलं.......

प्रीत की लत मोहे ऐसी लागी
हो गई मैं मतवारी..
बल-बल जाऊँ अपने पिया को
हे मैं जाऊँ वारी-वारी..
मोहे सुध बुध ना रही तन मन की
ये तो जाने दुनिया सारी..
बेबस और लाचार फिरूँ मैं
हारी मैं दिल हारी......
हारी मैं दिल हारी.......

आणि निहिरा ने ताल धरला...... 💃



To be continued..
🙏
#प्रीत 🍁