Prem he - 2 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 2

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

प्रेम हे..! - 2

प्रेम हे.. भाग 2


................. खरं तर निहिरा पेक्षा कितीतरी सुंदर मुलींनी त्याला प्रपोज केलं होतं....पण त्याला त्यांच्याबद्दल तसं काही वाटलं नव्हतं... जसं आज निहिरा ला बघून वाटलं.... 😍

दोन दिवसांनी admissions होते... कदाचित त्यादिवशी ची ती मुलगी परत दिसेल म्हणून तो सोनिया सोबत गेला...
सोनिया ला अ‍ॅडमिशन प्रोसेस साठी ऑफिस मध्ये पाठवून तो बाहेरच एका बेंच वर बसला...! त्याचं लक्ष गेट कडेच होतं.. म्हणजे ती येणार असेल तरी दिसेल किंवा इथून जाणार असेल तरी दिसेल.... थोड्याच वेळात निहिरा चा ग्रुप तिथे आला.. कॉलेज कॅम्पस मधील पार्किंग मध्ये त्यांनी आपल्या गाड्या पार्क केल्या.. आणि त्या ऑफिस च्या दिशेने जाऊ लागल्या... अ‍ॅडमिशन साठी भली मोठी रांग लागली होती..!! ऑफिस मधून ती रांग थेट बाहेर कॅम्पस पर्यंत आली होती.. पण नशीब.. तिथे शेड असल्याने ऊन जाणवत नव्हते... तसेही पावसाळ्याचे दिवस होते पण अजून हवा तसा पाऊस पडलाच नव्हता... थोडीशी झलक दाखवून तो कुठेतरी गुडूप झाला होता....😃

विहान निहिरालाच पहात होता...😮😍 ती तिच्या फ्रेंड्स सोबत लाइन मध्ये उभी होती....आज तिने व्हाइट टॉप आणि ग्रे कलर ची जीन्स घातली होती.. मॅचिंग व्हाइट इयर रिंग्स.. केस मोकळेच सोडले होते... तिच्या केसांच्या बटा जणू खळाळून हसत वार्‍यासोबत खेळत होत्या...डोक्यावर गॉगल अडकवला होता.. मैत्रिणींसोबत बोलता बोलता मध्येच ती त्या बटांसारखीच खळाळून हसत होती.. हसताना तिच्या गालावर पडणारी खळी बघून विहान भान हरपला होता...😍 त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते... आज पुन्हा एकदा तिला बघून तो क्लीन बोल्ड झाला होता...!! ❤️ 😄 तो कितीवेळ तिच्याकडे बघत होता त्यालाच नाही समजलं..
तितक्यात सोनिया तिथे आली...

"हुश्श्श.. झालं अ‍ॅडमिशन!!... किती गर्दी आहे ना रे😑.. मला तर खूप कंटाळा आलाय.. पाय पण दुखायला लागले उभं राहून राहून... 😖".. सोनिया जरा वैतागूनच म्हणाली..

"............."

"विहान.... मी तुझ्याशी बोलतेय... कुठे हरवलायस?? 🤔" सोनिया ने विहान च्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवत म्हटलं..
तसा विहान भानावर आला...

" अं... झालं पण अ‍ॅडमिशन?... एवढ्या लवकर??😦 " विहान ने तिला विचारलं..

" लवकर??? हेलो मिस्टर.... दिड तास झाला मी त्या लाइन मध्ये उभी होते.. 😣.. तू काय इथे सावलीत बसून हवा खात होतास... तुला कसं कळणार माझं तिथे काय झालं असेल ते 😏🙄" ती फुरंगटून म्हणाली..

" हो गं बाई... सॉरी..🙏 😬" विहान हात जोडत म्हणाला 😄

"ह्म्म्म चल आता लवकर ... I need cold drink now!!! किती दमलेय मी 😖त्यात हे पावसाळ्यातलं ऊन 🙄🙄😔"

" सोनिया.. फक्त स्वत:चंच अ‍ॅडमिशन करून आलीयेस..🙄 उगीच सर्वांचं अ‍ॅडमिशन तूच करून आल्यासारखी बोलू नको 🤣🤣🤣🤣" विहान जोरजोरात हसत म्हणाला..

" यू..... विहाssन... तुला तर काहीच कळत नाही.. 😏😒 तू मला आत्ताच्या आत्ता कोल्ड ड्रिंक प्यायला नेतोयस म्हणजे नेतोयस😡".. ती लटक्या रागात म्हणाली...

" हो गं बाई... एक काम करूया.. आईस्क्रीम पार्लर मध्ये जाऊया... मस्तपैकी आईस्क्रीम खाऊ.... 😊"

"OK चल..." म्हणत ती त्याच्या मागे बाइक वर बसली..

दोघेही जवळच्याच एका आईस्क्रीम पार्लर मध्ये गेले.. दोघांनी हवे ते आईस्क्रीम घेतले आणि बाहेर लावलेल्या टेबलस् पैकी एका टेबल वर जाऊन बसले... समोरून कुणाच्या तरी खिदळण्याचा आवाज येतोय म्हणून विहान ने तिकडे बघितले.... त्याला आश्चर्यच वाटले 😮.. निहिरा आणि तिचा ग्रुप तिथे आईस्क्रीम खात बसल्या होत्या!! एक क्षण त्याला वाटलं की खरच जग एवढं छोटं आहे का?!! 🤔😍.. तो काही सेकंद बघतच राहिला..ऑफिस मध्ये लंच ब्रेक झाल्याने त्या तोपर्यंत आईस्क्रीम खायला आल्या होत्या.. सोनिया च्या आवाजाने तो भानावर आला...

"विहान... आर यू ओके?? काय झालंय तुला... मघापासून बघतेय.. कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोयस !?? 🤔"

विहान काही बोलला नाही पण त्याची नजर सारखी निहिरा वर जाऊन थांबत होती...! सोनिया ने मागे वळून पाहिलं पण तो निहिरा कडे बघतोय हे तिच्या लक्षात नाही आलं.. आणि आत्तापर्यंत त्याने कधीच कुठल्या मुलीकडे त्या नजरेने बघितलं नव्हतं हे तिलाही माहीत होतं... त्यामुळे तिने इग्नोर केलं.... निहिरा तिच्या ग्रुप सोबत बाहेर पडल्यावर विहान ही सोनिया ला घेऊन तिथून निघून गेला... पण डोळ्यांसमोरून तिचा चेहरा काही केल्या जात नव्हता... 😄

- - - - - - - - XOX - - - - - - - -

कॉलेज सुरू झालं... विहान अधून मधून सोनिया ला सोडायला जात असे... निहिरा दिसावी म्हणून!! खरं तर त्याला रोजच तिथे जाऊन बसावसं वाटत असे😊... पण निहिरा च्या लक्षात आलं तर..😕 म्हणून तो कंट्रोल करत होता... शिवाय त्याचंही कॉलेज होतंच... सोनिया मात्र या सर्वांपासून अनभिज्ञ होती.. विहान चं काहीतरी बिनसलंय हे तिच्या लक्षात येत होतं.. पण तो कुणा मुलीच्या प्रेमात पडेल हे मानायला तीचं मन तयार नव्हतं...

एकदा Sunday च्या दिवशी ती सहज म्हणून विहान च्या घरी गेली.. विहान त्याच्या रूम मध्ये असल्याचं त्याच्या आईने सांगितलं.. ती त्याच्या रूम कडे गेली... दरवाजा अर्धवट उघडाच होता... आत विहान चं काय चाललंय ते पाहण्यासाठी ती बाहेरच थांबली🤓.. त्याचे विस्कटलेले ओले केस, गळ्यात अडकवलेला टॉवेल, खाली थ्री फोर्थ पँट..एकंदरीत त्याचा अवतार तो नुकताच शॉवर घेऊन आलाय हे सांगत होते... आणि आरशासमोर हरवलेला तो... आणि बॅकग्राऊंड ला चालू असलेलं गाणं.. 'दिल को तुमसे प्यार हुआ.. पहली बार हुआ.. तुमसे प्यार हुआ 💿'
सोनिया चपापली... आपल्याला वाटतंय ते खरं आहे की काय?? 😱.. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा म्हणून ती आत शिरली... विहान च्या समोर जाऊन दत्त उभी राहिली 😄

"अरे सोनिया... तू कधी आलीस? 😮" विहान गोंधळून म्हणाला..

"जेव्हा आपण कोणाच्यातरी विचारामध्ये हरवला होतात 🙄... कोण आहे ती? 😯" सोनिया ने कसलेही आढेवेढे न घेता सरळच विचारलं...

विहान आधी विचारात पडला.. पण मग एक सुस्कारा सोडत म्हणाला...

"ये.. बैस इथे... तुला सांगणारच होतो.."
दोघेही त्याच्या बेड वर बसले... एक पाॅज घेऊन विहान ने बोलायला सुरुवात केली..." Actually काय होतंय ते मलाच कळत नव्हतं.. तुला तरी काय सांगणार होतो.. पण आज तू विषय काढलाच आहेस तर सांगतो... खरं तर ह्यालाच प्रेम म्हणतात की नाही तेही मला माहीत नाही.. पण फर्स्ट टाइम मी एखाद्या मुलीच्या बाबतीत असं फील करतोय.. उठता बसता.. खाता पिता.. झोपताना मला तिचाच चेहरा डोळ्यांसमोर दिसतो.. ती दिसली की तिच्याकडे बघत रहावंसं वाटतं..! ती सतत डोळ्यांसमोर असावी असं वाटतं.. तीचं बोलणं.. तीचं हसणं........ "

" बस्स बस्स... पुरे!!!! 😁... आपको तो सच में प्रेम रोग हो गया है 😂😂" सोनिया त्याला मध्येच थांबवत हसत हसत म्हणाली..

तिच्या बोलण्यावर विहान लाजला.. 😅

" आय हाय... आपको तो शरमाना भी आता है 😄😄" सोनिया परत त्याला चिडवत म्हणाली..

" सोनिया.. प्लीज.. तू असंच चिडवणार आहेस का मला 😞" विहान लटक्या रागात म्हणाला..

" ओह्ह.. सॉरी सॉरी 🙏..... वैसे कौन है वो खुषनसीब 🤔😉.. नाम क्या है उसका?? "

"माहीत नाही..😒" विहान थोडा हिरमुसला होत म्हणाला ..

" माहीत नाही??? What do you mean?? 😵 अशी कुठली मुलगी खरच अस्तित्वात आहे की तू तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत आहेस? 🙄"

"सोनिया.. प्लीज.. अशी मुलगी आहे आणि ती तुझ्या कॉलेज मध्ये आहे🙈😬 "

" what???.. ओह्ह वॉव!!.. Then I 'll help you.. Don't worry 😁.. तीचं नाव मी शोधून काढेन.. उद्याच तू मला कॉलेज ला सोडायला ये.. आणि मला दाखव ती कोण आहे.... जिसने हमारे विहान का दिल चुराया है 😉😛😝" सोनिया नाटकी सुरात म्हणाली..

विहान ने जवळच असलेली उशी सोनिया च्या डोक्यात मारली... 😄 तशी ती बाहेर पळाली आणि "उद्या मला सोडायला यायचंय.. लवकर आवर😁😁" म्हणून ओरडतच निघून गेली.. विहान मान हलवून गालातल्या गालात हसत होता... 😊

To be continued..
🙏
#प्रीत