Prem he - 1 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 1

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

प्रेम हे..! - 1

प्रेम हे..!! (भाग 1)

"निहू किती वेळ...😕? चल आवर लवकर.. एव्हाना झुंबड उडाली असेल कॉलेज वर..😕 रीतू आणि अदिती पण कधीच्या थांबल्या आहेत कॉलेज जवळच्या स्टॉप वर.. मघाशीच फोन येऊन गेला त्यांचा.... शिव्या पडणार आहेत आता आपल्याला..😵" अवनी जरा वैतागून दारातूनच निहीरा ला म्हणाली..

"chill यार अवनी...अगं नेमकं आजच उठायला उशीर झाला.. म्हणून उशीर होतोय... सॉरी ना! आणि तसही लिस्ट काय कुठे पळून जाणार आहे का.. 🙄.. बघ दहा मिनिटांत तुला पोहोचवते की नाही कॉलेज मध्ये 😎" निहिरा घरातून बाहेर पडता पडता म्हणाली..

"वर नको पोहोचवू म्हणजे झालं🙄🙄" अवनी अजून वैतागलेलीच होती..

"बस क्या यार... चल बस आता लवकर!" निहिरा स्कूटी तिच्या पुढ्यात आणत म्हणाली..
आणि दोघीही चिमण्यांप्रमाणे भुर्रकन उडून गेल्या... 😅

आई दारातूनच निहीरा कडे बघत पुटपुटली, 'कसं होणार या मुलीचं..🤦' आणि आतमध्ये निघून गेली..

- - - - - - - XOX - - - - - - -

निहीरा, अवनी, रीतू आणि अदिती चौघी जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या.. अकरावी आणि बारावी चौघींनी एकाच कॉलेज मधून केलं होतं.... इतकंच काय तर चौघीही एकाच क्लास मध्ये होत्या....!अकरावी च्या सुरुवातीला जी गट्टी जमली चौघींची ती जमलीच...!! 😄 त्या सगळीकडे सोबतच जात असत.. फिरायला.. शॉपिंग ला.. परीक्षेच्या वेळी तर कधी कधी अभ्यासही कुणातरी एकीच्या घरी जमून एकत्रच करत असत...अवनी ही निहिरा च्या घराजवळच राहत असल्याने ती नेहमी कॉलेज मध्ये वगैरे जाताना तिच्या घरी तिला बोलवायला जायची.. मग दोघीही निहू च्या स्कूटी वरुन एकत्रच कॉलेज गाठायच्या...! अदितीही तिच्या घराच्या पुढच्या स्टॉप जवळ रीतू ची वाट बघत थांबत असे मग तिथून त्या दोघी रीतू च्या स्कूटी वर बसून कॉलेज ला येत..

आत्ताही त्यांनी BSCIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकाच कॉलेज चे फॉर्म्स भरले होते.. शहरातील एक नामांकित कॉलेज होते ते.. आणि आज सिलेक्ट झालेल्या मुलांची पहिली लिस्ट लागणार होती... चौघीही मुळातच हुशार!! त्यामुळे पहिल्या लिस्ट मध्ये आपले नाव असणारच याची त्यांना खात्री होती..

निहीरा आणि अवनी कॉलेज जवळच्या स्टॉप पर्यंत आल्या.. रीतू आणि अदिती त्यांचीच वाट बघत थांबल्या होत्या..
आल्या आल्या त्या निहू वर तुटून पडल्या 😅... निहू ने सॉरी म्हणत त्यांना मनवलं... 😀 आणि चौघीही कॉलेज च्या गेट वर गाड्या पार्क करून आतमध्ये गेल्या..

खरंच अवनी म्हणाल्याप्रमाणे लिस्ट लागलेल्या बोर्ड जवळ झुंबड उडाली होती.. अवनी ने खोट्या नाराजीनेच निहू कडे बघितलं... तशी निहू म्हणाली,

"डोन्ट वरी.. मी आहे ना...😎 तुम्ही थांबा इथेच.. मी येते लिस्ट बघून... 😄"

आणि ती त्या गर्दीतून वाट काढत आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागली... एकेक पाऊल पुढे टाकायलाही मुश्किल होत होती.. कशीबशी एकदाची ती बोर्ड च्या पुढ्यात जाऊन पोहोचली!..

"निहू... पोचलीस का लिस्ट पर्यंत? आहेत का आपली नावे??😮" तिघी जणी मागून ओरडत होत्या.. एवढया गर्दी आणि गोंगाटात निहू ला काय आवाज जाणार होता त्यांचा.. निहिरा ने लिस्ट चेक केली... चौघींचीही नावे लिस्ट मध्ये होती..!! निहिरा आनंदाने नाचत नाचतच गर्दीतून बाहेर जाऊ लागली.. इतक्यात तिला कुणाचातरी जोरात धक्का लागला.. पण लक्ष जायला ती भानावर कुठे होती.. तिला कधी एकदा बाहेर पडतेय आणि तिघींनाही ही खबर देतेय असं झालं होतं... 😅 पण..... त्याने मात्र तिला बघितलं...! सॉरी ही म्हटलं... पण ऐकायला ती थांबलीच नव्हती.. तो मात्र तिच्याचकडे बघत राहिला 😮.... ती गर्दीतून दिसेनाशी झाली तसा तो भानावर आला.. ती गेली त्या दिशेने तो ही वाट काढत बाहेर आला... पण ती तिथे नव्हती... त्याने आजूबाजूला.. सगळीकडे बघितलं पण ती कुठेच दिसत नव्हती.. तो हिरमुसला झाला.. 😒

"विहाssन................ तू.. इकडे आहेस होय... मी ..त्या.. बाजूला ...शोधत होते... तुला.. कित्ती शोधलं... तू ...इकडे... कशाला आलास??" सोनिया धाप लागल्यात बोलत होती..😮 😓

"काही नाही.. चल निघूया... लिस्ट मध्ये नाव आहे आपलं मॅडम.. पाहीलं मी... 😊" तो चेहर्‍यावरचे मघाशीचे भाव लपवत म्हणाला.. आणि दोघेही विहान च्या R15 वर बसून निघून गेले.. 💨💨

विहान आणि सोनिया.. बालपणीचे फ्रेंड्स... खूप घट्ट मैत्री होती त्यांची.. दोघेही एकाच सोसायटी मध्ये रहायचे... दोघांच्याही वडीलांचा आपापला बिझनेस होता...दोघांचेही वडील एकमेकांचे जूने मित्र होते.. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते...बर्‍याचदा दोघे विहान च्या R15 वर फिरायचेही.. बघणाऱ्यांना वाटायचं की ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत... पण दोघांमध्ये निव्वळ मैत्री होती.. They were best friends.. 😊

- - - - - - - - - - XOX - - - - - - - -

विहान... दिसायला खूप स्मार्ट, टाॅल, गोरापान, करडे डोळे ... व्यायामाने कमावलेली शरीरयष्टी..!! त्यात एका प्रतिष्ठित बिझनेसमन चा मुलगा.. तरीही स्वावलंबी होता.. साहजिकच त्याच्या मागे कितीतरी मुली असायच्या..! पण तो त्या सर्वांपासून लांबच रहायचा... त्याला त्याच्या वडिलांना बिझनेस मध्ये हेल्प करायची होती.. पुढे त्यालाच तो बिझनेस सांभाळायचा होता... म्हणून तो मार्केटिंग मध्ये MBA करत होता.. त्याचं कॉलेज ही निहिरा च्या कॉलेज शेजारीच होतं..आता तो लास्ट इयर ला होता..

आज सोनियाचं नाव लिस्ट मध्ये आलंय की नाही ते पाहण्यासाठी तो तिच्यासोबत आला होता... आणि तिथेच त्याने निहिरा ला पाहिलं होतं... आणि तिला बघताक्षणीच तो हरवला होता.. 😍 त्यादिवशी घरी गेल्यानंतरही त्याला सारखा तिचाच चेहरा डोळ्यांसमोर दिसत होता.. ब्लॅक आणि व्हाइट चेक्स चा शर्ट... ब्लॅक जीन्स.. तिचे ते लांबसडक केस गोल फिरवून वर अंबाडा गुंडाळलेला.. एका क्लिप वर पूर्ण आंबाड्याचा भार सोपवलेला...!
खरं तर निहिरा पेक्षा कितीतरी सुंदर मुलींनी त्याला प्रपोज केलं होतं....पण त्याला त्यांच्याबद्दल तसं काही वाटलं नव्हतं... जसं आज निहिरा ला बघून वाटलं.... 😍

To be continued..
🙏