नर्मदा परिक्रमा भाग ७
परिक्रमा तीन प्रकारे करता येते ,एक म्हणजे पैसे सोबत घेऊन वहानाने ,दुसरी अर्धी पायी आणि अर्धी किनार्यांने आणि तिसरी म्हणजे पूर्ण पायी .
पूर्ण पायी करताना सदाव्रत म्हणजे डाळ ,तांदूळ व शिधा भिक्षा मागून शिजवून खाणे .
हे सदाव्रत नर्मदा किनार्यावरील शेतकरी आदिवासी व नावाडी बांधव देतात,ज्यांना स्वतःला उद्याची भ्रांत असते .
दरवर्षी साधारण एक लाख भर लोक परिक्रमा करतात .
त्यातील वीस ते पंचवीस हजार पायी परिक्रमा करतात .
ही एकच यात्रा अशी आहे जी तुम्ही एक पैसाही सोबत न घेता करता येते .
तुमच्या सर्व खर्चाची तरतूद मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते .
पुन्हा कधी भेटू याची शाश्वती नाही .एकमेकाकडून कसलीही अपेक्षा नाही .
फक्त प्रेमाची देवाण घेवाण केली जाते .
ज्यांनी ही परिक्रमा पुरी केली त्यातील अनेक जण मार्गात थांबून इतर परीक्रमा वासियांना सर्व प्रकारची मदत करतात .हे सुद्धा एक पुण्य कर्म आहे .
पायी परिक्रमा करणाऱ्या श्रद्धाळू ना काही नियम पाळावे लागतात .
या कालावधीत एकंदर तीन चातुर्मास येतात त्यावेळी परिक्रमावासियांना त्या त्या ठिकाणी थांबावे लागते .
नर्मदा मैय्या कुमारी असल्याने प्रथम कुमारिका पुजन केले जाते व योग्य ते दान दिले जाते .
परिक्रमेत अमरकंटक येथे नर्मदेचे बालस्वरूप ..
भेडाघाट येथे शांत व अवखळ रूप
व गरुडेश्वर येथे संयमी रूप पाहायला मिळते .
हुशांगाबाद येथे नर्मदा जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते
असे समजले जाते की आपण जेव्हा परिक्रमेला सुरुवात करतो तेव्हाच आपला सगळा चार्ट तयार झालेला असतो. आपण कुठे जाणार, कुठे राहणार, कुठे जेवणार,कुठे थांबणार ते सगळं मैय्या ठरविते.त्यामुळे आपण कसली चिंता करायची नसते..
तीनहजार किमी ,धरणामुळे आता साडेतीन हजार किमी परिक्रमा आहे.
एकंदरीत चौदाकोटी पावलं चालावी लागतात. तिथे लागतो तुमच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस आणि हो श्रद्धेचाही! हे कोण्या येऱ्यागबाळ्याचे काम नाही .
परिक्रमा नर्मदेचीच का?
तर त्याची कथा अशी - नर्मदा व गंगा तपश्चर्येला बसतात. शिवजी हे पहात असतात.
शिवजी गंगेवर प्रसन्न होतात. गंगा वर मागते, मला तुमच्यात सामावून घ्या.
गंगेला शिवजींच्या जटेत स्थान मिळतं.
कालांतराने नर्मदेवर प्रसन्न होतात. नर्मदा वर मागते, तुमच्या पंचायतनासकट माझ्यात सामावून जा.
शिवजी शेवटचे देव म्हणून तिची परिक्रमा.
अमरकंटक तिचे उगमस्थान.
या परिक्रमेत कितीतरी सिद्धीप्राप्त साधुसंताचे दर्शन होते, सहवास लाभतो.
पण सज्जन कोण, दुर्जन कोण हे ओळखायचं कसं?
त्याची कथा अशी सांगतात ..
एक व्यापारी असतो. त्याचा एक मुलगा असतो. मुलगा वडिलांना रेसरकार मागतो.
वडील पक्के व्यापारी. तू प्रथमश्रेणीत उत्तीर्ण हो मी तुला कार देईन, वडील अट घालतात.
मुलगा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण होऊन घरी येतो.
वडीलांकडे गाडीची किल्ली मागतो.
वडील त्याला एक सोनेरी पाकीट देतात.
मुलगा पाकीट उघडतो त्यात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं भागवत असतं.
वडील रोज एक पान भागवत वाचायचे.
मुलगा चिडतो. मला किल्ली हवीय, भागवत नको, तुम्ही माझ्याशी खोटेपणाने वागला म्हणत रागाने पाकीट भिरकावून देतो.
स्वबळावर कार घेण्याची प्रतिज्ञा करत घराबाहेर पडतो.
कार घेतल्यावर घरी फोन करतो. फोन नोकर उचलतो.
मुलगा म्हणतो 'वडिलांना फोन दे'.
तुझे वडील तर गेले', नोकर उत्तर देतो.
मुलगा घरी येतो. नोकराला विचारतो, माझ्यासाठी वडिलांनी काय ठेवलंय?
नोकर सांगतो तू जे पाकीट फेकून दिलंस, तेवढंच आहे.
मुलगा पाकीट उघडतो. त्यात तीच भागवताची प्रत.
पहीलं पान उघडतो, त्यात कारची किल्ली मिळते !
होश आणि जोश दोन्हीमध्ये राहता आलं तर पाकिटाच्या आतली किल्ली आपोआप गवसते.
असे अनेक कथा-किस्से! अनेक अद्भुत घटना परिक्रमेत अनुभवायला मिळतात.
आयुष्यात एकदा तरी हा परिक्रमेचा अनुभव घ्यायला हवा .
नर्मदे हर! नर्मदे हर!
समाप्त