Aghatit - 2 in Marathi Fiction Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | अघटीत - भाग-२

Featured Books
Categories
Share

अघटीत - भाग-२

अघटीत भाग २

वरदाच्या मनात आले खरेच अगदी धकाधकीचे आयुष्य सुरु होणार आता याचे .

नवीन शहर ,नवे लोक नव्या जबाबदार्या आणि वेगवेगळी कामातली नवनवीन आव्हाने !!!

या सर्वाची कल्पना तिला पद्मनाभने आधीच देऊन ठेवली होती .

आता तो घरासाठी किंवा कुटुंबां साठी फार वेळ देऊ शकणार नव्हता .

सर्व काही आता वरदालाच बघावे लागणार होते .

तसेही नवरा पोलीस असल्याने पूर्वी पण ड्युटी चोवीस तास होतीच .

तरी पण कौटुंबिक आयुष्य चांगले होते .

कोल्हापूर सांगली बदल्या झाल्या तरी त्या तिघी सातार्यातून कुठेच गेल्या नाहीत .
पद्मनाभ बदलीच्या गावी जाऊन येऊन रहात होता .

आता प्रमोशन नंतर त्या सर्वांचे आयुष्यच बदलणार होते .

या सर्व गोष्टींची वरदाला जाणीव होती .

“आई चला आत असे म्हणून सासूच्या हातात हात घालून वरदा आत निघाली .

पद्मनाभच्या आई तर खुपच संतुष्ट होत्या .

त्यांना दोन मुले एक मुलगा आणि एक मुलगी .

मुलीचे लग्न होऊन ती आपल्या पतीसोबत सुखात होती .

आणि पद्मनाभ एकुलता एक मुलगा,त्याची ही प्रगती बघून मनोमन आनंदी होत्या

मुलाची बढती ,नवीन गाव, नवीन घर, सारे काही अगदी मनासारखे होते .

त्यांचे पती पण पोलीस सेवेत होते त्यामुळे अशा आयुष्याला त्या सरावलेल्या होत्या .

फक्त पतींच्या मागे घरच्या जबाबदार्या खुप असल्याने त्यांना इतकी प्रमोशन नाही घेता आली .

पण आता मुलगा वडीलांच्या प्रमाणे पोलिसात गेलाच शिवाय आता खुप मोठा अधिकारी झाला याचा त्यांना अभिमान होता .पद्मनाभ पहील्या पासून प्रामाणिक व कष्टाळू होताच .

त्याच्या वडिलांप्रमाणे त्याचीही प्रतिमा स्वच्छ होती ,याचेही त्यांना फार कौतुक होते.
तसे पुणे त्यांना नवीन नव्हते .

पुण्यात त्यांचे काही जवळचे नातेवाईक म्हणजे त्यांच्या मावस चुलत बहिणी भावंडे होती .

आता इथे आल्यामुळे त्यांची वारंवार भेट होऊ शकणार होती .

शिवाय त्यांच्याकडे कधीही यायला जायला दिमतीला गाडी पण होती .

त्यामुळे त्या अगदी आनंदी होत्या .

नुकतीच त्यांच्या जावयाची बदली पण पुण्यात व्हायची होती अशी बातमी आली होती .

त्यामुळे लेकपण आता जवळ येणार होती .

खरेंच एक नवे आयुष्य घरच्या सर्वांच्या पुढ्यात आले होते .

आत शिरताच बंगल्याची सजावट आणि प्रशस्तपणा पाहून तिघीही चकित झाल्या .

भले मोठे गुबगुबीत कार्पेट घातलेला आणि सोफे दिवाण यांनी सजलेला हॉल

चार पाच खोल्या ,उंची फर्निचर ,हवेशीर मोठ्या खिडक्या ,प्रशस्त भली मोठी दारे ,

बाहेर हिरवागार बगीचा ,वेगवेगळी फुलांची आणि फळांची झाडे ,एका बाजूला नोकर लोकांचे आउटहाउस .

बाबाबा ..बघु तिकडे सगळे छान छान होते .

किचन खुप मोठे प्रशस्त होते शिवाय पार्टीसाठी स्वतंत्र दालन होते .

मोठ्या पोस्टला असल्याने घरात पार्ट्या होत राहणार होत्या न ..!!

पण काम काहीच नव्हते कारण मदतीला नोकर होते .

खानसामा स्वयंपाका साठी व..इतर कामासाठी एक नोकर शिवाय गाडी साठी वेगळा शोफर पण होता .
बाग बघायला माळी होता .
एकंदरीत भलताच ऐषोआराम होता म्हणा !!!
अगदी खुशीत तिघी बंगल्यात दाखल झाल्या .
सगळ्यात आधी क्षिप्राची गडबड सुरु झाली आपली खोली निवडायची .
“ अग काय गडबड तुझी ..तुला हवीत ती खोली घे तुला ..
उरलेली आम्ही घेऊ ...आधी नाश्ता करूया न ..वरदा म्हणाली .
मग तिघीजणी स्वयंपाकघरात दाखल झाल्या आणि तयार केलेल्या मस्त नाश्त्याचा आस्वाद घेऊ लागल्या .
दुपारी जेवण वेळ होईपर्यंत तिघीही आपापल्या खोल्यात आपले थोडे थोडे सामान लावत होत्या .
दरम्यान वरदाचे चार फोन झाले पद्मनाभला ..
दोन वेळा रिप्लाय नव्हता ,तिसर्या वेळेस त्याने उचलला .
वरदासोबत जुजबी बोलल्या वर त्याने सांगितले की आता त्याची जेवणासाठी वाट पाहु नये कारण मोठे साहेब येणार होते त्यामुळे एक दोन तत्काळ मिटिंग असणार होत्या .
आणि रात्री पण उशीर होऊ शकतो .
झाले म्हणजे पहिल्या दिवसापासुन खरेच बिझी शेड्युल सुरु झाले म्हणा ..वरदाच्या मनात आले .
मग दोन तीन दिवस असेच इकडे तिकडे गेले आणि मग रविवार आला .
आज मात्र पद्मनाभ रिकामा होता .
नाश्ता टेबलवर गप्पा सुरु झाल्या ..आज कुठे लाडक्या लेकीला पद्मनाभ निवांत भेटत होता .
“काय चिंकी कसे काय वाटत्ते आहे पुणे ...त्याने क्षिप्राला विचारले .
लाडाने तो तिला चिंकी म्हणत असे .
“बाबा खुप भारी आहे रे पुणे ..दोन दिवस शर्मा साहेबांची मीनल घरी येत होती .
आम्ही दोघी खुप फिरलो ..तिच्यामुळे आणखी काही पण मैत्रिणी झाल्या माझ्या “
“हो मीच शर्माना सांगितले होते तुम्हा लोकांना कंपनी द्यायला .
“अरे मिसेस शर्मा पण खुप छान आहेत रे ..आणि आपल्या जवळच राहतात म्हणे
त्यानी लगेच मला त्यांच्या पार्टी ग्रुप मध्ये मेम्बर करून घेतले .
त्यांच्या सोबत आणखी पण एक दोघी होती त्यांच्या पण ओळखी झाल्या माझ्या “
वरदाने पद्मनाभला बातमी पुरवली .
“बाईसाहेब आता तुम्ही मोठ्या साहेबांच्या वाईफ आहात बर का .तुमची ग्रेड वाढली आहे आता .
आता पार्टी क्लब या लाईफ ची सवय करून घ्या “
प्रेमाने वरदाकडे पहात पद्मनाभ म्हणाला .
“अरे बाबा पण स्वयंपाकाचे काही कामच नसल्याने आईला करमत नाहीये रे
क्षिप्राने लाडीक तक्रार केली आणि आईकडे पाहून ती हसली
“हो रे खरेच काही कामच नाहीये इथे ..अशी रिकाम बसायची सवय होणे कठीण आहे “वरदा म्हणाली
“होईल होईल सगळ्याची सवय होईल हळूहळू ..बर तुमच्या साठी दोन छान बातम्या आहेत त्या सांगू का ?”
पद्मनाभ म्हणाला ..आता तिघीही त्याच्याकडे उत्सुकतेने पाहु लागल्या.
“आईसाठी खुशखबर ..प्रतिमा आणि त्यांचे कुटुंब उद्याच पुण्यात येतेय .
.लेकीच्या आगमनाची बातमी दिल्यावर पद्मनाभच्या आईचा चेहेरा खुलला ..
आता दुसर खबर तुझ्यासाठी वरदा ...काल पुण्यात तुझी लाडकी मैत्रीण नीरजा भेटली होती .तिला सांगितले आपले इथे शिफ्टिंग झालेले ..तीनेही पेपरला वाचले होते माझ्या बदली चे ..
येतेय उद्या तुला भेटायला तुझा नंबर पण दिला तिला””
..वाह किती छान वरदा उद्गारली ..
आता तिसरी खबर चिंकी साठी ...
चिंकी ची कॉलेज अडमिशन पक्की झालीय ..उद्या जायचे बेटा तुला सगळे पेपर्स घेऊन .
तुझ्या सोबत मीनल असेलच ती देईल सगळे समजावून तुला
तीही त्याच कोलेजला आहे बारावीला .
“वाव बाबा ...किती भारी रे ..असे म्हणून क्षिप्राने त्याच्या गळ्यात हात टाकले .
क्रमशः