मीनाची ऑफीसची तयारी झाली . आज तिने काहीतरी पक्क मनाशी ठरवल होत . ती आवरून ऑफीसला निघाली . ऑफीस मधे आल्यावर तिचे सगळ्या मैत्रिणीनी स्वागत केले . आणि थोड्यावेळाने कामाला सुरवात झाली . मीनाने ही नवीन जोमाने कामाला सुरवात केली .काम करता करता जेवणाची वेळ कधी आली कळलंच नाही . सगळे हात धुवून जेवणाला बसले . सगळ्यांनी आपापले डबे उघडले . पण सगळ्याना मीनाच्या डब्याची उत्सुकता होती . मीनाने डबा उघडताच खमंग असा वास सुटला . आत वरण , भात , चपाती , कोथिंबीर वडी सगळ्यांनी त्या जेवणाचा फडशा पडला . सगळ्यांनी मीनाला कौतुकाने विचारले .काय ग ? सासूबाईनी बनवला वाटत डबा . हो , मीनाची मान गर्वाने उंचावली . तेव्ढयात निखिल म्हणाला , काय सुरेख जेवण होत . कितीतरी दिवसानी अस जेवलो . रोज अस जेवण मिळाल तर किती मज्जा येयील . त्यासाठी मी पैसे ही द्यायला तयार आहे .....स्नेहा म्हणाली हो मी सुध्दा , त्या रोज मेसच खावून कंटाळा आलाय .आणि पैसे सुध्दा वाया जातात .आणि अन्न पण बेचव मिळत . स्नेहा म्हणाली , ठरले तर मग तू रोज मज्यासठि आणि निखिल साठी डबा आणणार आणि आह्मी तुला त्या बद्लायात तुला पैसे देणार . सगळ्यांचा हशा पिकाला .
मीना घरी आली .तेवढ्यात सुंदराबाई तिच्यासाठी पाणी घेऊन आल्या . ' ' मीना पाणी घे , दमली अशील . थेव्ढ्यात मीना म्हणाली , नाही ओ आई , आज ऑफीसचा पहिला दिवस एवढ काही काम नव्हते . पण एक गोष्ट मात्र खूप छान झाली . तुम्ही डब्यात घालून दिलेल जेवण सगळ्याना फार आवडल . सगळ्यांनी तुमच खूप कौतुक केल . आणि निखिल आणि स्नेहा तर हट्टच धरून बसलेत .ते उद्या पासून तुमच्याच हातचे जेवण जेवणार . आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे देऊ करणार . मीना एवढ बोलून थांबली आणि आशेने सुंदराबाई कडे पाहू लागली . मीनाच बोलण ऐकून त्याही जरा थबक्ल्याच .' ' आज पर्यंत त्यांचा एवढा विचार कोणीच केला नव्हता . त्यानी स्वताहानी सुधा नाही .
पण अग मीना घरातल्याना कळल्यावर आणि हे सगळ मला नाही जमणार , सकाळी किती गडबड असते .पुढच्याच क्षणी सुंदराबाई घाबरत बोलल्या . त्याच्याकडे पुन्हा एकदा आशेने बघत मीना म्हणाली ' ' आई , पैसा महत्वाचा नसतो , पण आपल्या कलेला मिळालेला प्रतिसाद महत्वाचा असतो .' ' मी जगाला दाखवून देणार आहे की , तुमच्या सारख्या ग्रुहीणी ज्या आपल्या घरासाठी , कुटुंबासाठी खस्ता खातात .त्या कधीही शुल्क नसतात .न त्यांच काम शुल्क असत .' ' मीनाच बोलण ऐकून सुंदराबाई खरच आपण ' ' मीनाच्या रूपात हीरा मिळवलाय ह्याची जाणीव झाली .
संध्याकाळची वेळ झाली .मीना आणि सुंदराबाई स्वयंपाक घरात स्वयंपाकाची तयारी करत होत्या . मीना ही त्याच्याकडून नव नवीन गोष्टी शिकत होती .त्याना ऑफीसमधल्या गमतीजमती सांगत होती . त्यावर त्या ही पोट धरून हसत होत्या . थोड्यावेळाने जेवणाची वेळ झाली . सगळे जेवणासाठी जमले .मीना आणि सुंदराबाई ही जेवण करायला बसल्या .पण सुंदराबाईच लक्ष काहीकेल्या जेवणात नव्हते . त्यांच लक्ष मीनाच्या मागचे बोलण्याकडे होते .त्यानी मीनाला होकार तर दिला होता .पण घरतल्याना न सांगता काम करायच म्हणजे . पण त्याना मीनावर विश्वास होता .आणि तिचा त्याना अभिमान सुद्धा वाटत होता . जेवण झाली , घरातील सगळे झोपय्ला गेले . मीना आणि सुंदराबाईही काम उरकून झौपय्ला गेल्या .