Ashtavinayak - 8 (Last part) in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | अष्टविनायक - भाग ८ (अंतिम भाग)

Featured Books
Categories
Share

अष्टविनायक - भाग ८ (अंतिम भाग)

अष्टविनायक भाग ८

विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.

येथील दर्शनाची वेळ सकाळी ५ ते रात्री ११. अंगारकी चतुर्थीला सकाळी ४ पासून रात्री ११ पर्यंत. महाआरती सकाळी ७.३०, मध्यान्ह आरती दुपारी १२ आणि शेजारती रात्री १० वाजता असते. महाप्रसाद सकाळी १०, दुपारी १ आणि संध्याकाळी ७.३० ते १०.३० असतो .

भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती यादिवशी उत्सव साजरे केले जातात. कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते.

अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते.

आठवा गणपती

अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते. असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती.

श्री क्षेत्र महागणपतीची कथा आख्यायिका अशी सांगतात

ऋषी ग्रीत्समद यांचा मुलगा त्रिपुरासुर हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निस्सीम भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुराइतका मौल्यवान धातू दिला. हे केवळ शंकरच नष्ट करू शकत होते. अहंकाराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्रम्हदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले. तेंव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी. गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले.

गणपतीने ब्राम्हणाचा वेश धारण केला आणि त्याने त्रिपुरासुराला तीन उडणारी विमाने बनवून देण्याची सबब देत त्याला कैलाश पर्वतावरून चिंतामणीची मूर्ती आणावयास सांगितली. लोभाने आंधळ्या झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले. शंकर त्याला हरवू शकत नव्हते. शंकराच्या लक्षात आले की त्यांनी गणेश वंदन केले नाही. शंकराने षडाक्षर मंत्र म्हणत गणपतीला आवाहन केले तेंव्हा तेथे गणपती प्रकट झाला आणि त्याने शंकराला त्रिपुरासुराला हरविण्याच्या सूचना सांगितल्या. त्या सूचनांचे पालन करून शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले.

हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी-सिद्धी त्याच्या सोबत आहेत.ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याची सोंड डावीकडे आहे. भक्तांचे असे मानणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला १० सोंडा आणि २० हात आहेत. या मूर्तीला 'महोत्कट' म्हणतात. पण ती मूर्ती अस्तित्वात आहे कां याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही.
हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेशउत्सवात रांजणगांवचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत. तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात.
पूजा आणि उत्सव

मंदिर सकाळी ५.३० ते रात्री १० पर्यंत उघडे असते. भाद्रपद महिन्यात या मंदिराच्या पूजेमध्ये सहभागी होतात.

भाद्रपद महिन्यात सहा दिवसांचा विशेष उत्सव साजरा केल्या जातो. यामध्ये गणपतीला पाचव्या दिवशी महानैवेद्य दाखविला जातो. या दिवसात फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते.

याच दिवसांत कुस्तीचे सामने आयोजित केल्या जातात. ते पाहायला अफाट गर्दी होते. सहाव्या दिवशी भाविक महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोटांगण घालीत जातात.


माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं इतिहासात आढळतं. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील मंदिराचं नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असंही म्हटलं जातं.
या मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे . देवळाचा मुख्य गाभारा आणि मंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे . मराठे शाहीतील अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली होती . या मंदिरातील दोनही गाभारे थोरले माधवराव पेशवे यांनी बांधल्याची नोंद आहे . छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराला व्यवस्थेसाठी पहिली सनद दिली आणि थोरले माधवराव पेशवे यांनी हा गाव व्यवस्थेसाठी इनाम दिला .
१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी वसई जिंकून परत येत असताना या गणेशाचे दर्शन घेतले आणि येथील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता व त्यावर सोनेरी कळस चढवला होता

अष्टविनायक महात्म्य संपूर्ण

समाप्त ..