Bandini - 18 in Marathi Fiction Stories by प्रीत books and stories PDF | बंदिनी.. - 18

Featured Books
  • क्या लड़की होना गुनाह है

    आज की कहानी उन सभी लड़कियों के लिए जो अपने परिवार के बीच होत...

  • Black Queen ( A Mysterious Girl )

    Rathore's club ( काल्पनिक नाम )यह एक बहुत बड़ा क्लब था ज...

  • Revenge Love - Part 1

    जय द्वारिकाधिश..जय श्री कृष्ण.. जय भोलेनाथ...... ॐ नमः शिवाय...

  • My Devil Hubby Rebirth Love - 48

    अब आगे थोड़ी देर बाद डॉक्टर का केबिनरूही और रुद्रा डॉक्टर के...

  • जिंदगी

    खुद के एहसासों को कुछ इस तरह बिखेरना चाहती हूमैं रहूं तुझमें...

Categories
Share

बंदिनी.. - 18

.......... "कसं वाटलं surprise??? " माझे दोन्ही हात हातात घेत त्याने विचारलं...

" खूप जास्त सुंदर... 😍.. These moments are really precious for me!!.. अगदी आपल्या नात्यासारखेच...! 💕"

आमचं नातं.... जे कदाचित प्रेमाच्याही पलीकडचं होतं... मुसळधार पाऊस.. तीव्र ऊन.. सोसाट्याचा वारा.. थंडी... सर्व सहन करूनही एखादा वटवृक्ष कसा जमिनीत तग धरून असतो.. तसंच काहीसं आमच्या नात्याचं होतं... खूप काही सहन करूनही आजही तेवढंच घट्ट होतं..! आजही आमचे हृदय एक होऊन धडधडत होते... 💗 आजही आमच्या मनातली एकमेकांची जागा आम्ही इतर कोणालाही देऊ शकलो नव्हतो.. दोन जीव मनाने एकरूप असूनही त्यांच्या नशिबी मात्र विरहच लिहिला होता...😔 आज आम्ही कितीही ओरडून सांगितलं की आमचं एकमेकांवर आजही तेवढंच प्रेम आहे तरी हा समाज त्या प्रेमाचा चुकीचाच अर्थ काढेल... आमच्या हृदयातल्या वेदना त्यांच्या पर्यंत कधीच पोहोचणार नाहीत.... 😑😑

- - - - - - - - XOX - - - - - - - -

अनय मला टेबल जवळ घेऊन आला.. त्यावर ठेवलेला एक बॉक्स त्याने माझ्या हातात दिला.. मी डोळ्यांनीच 'काय आहे ' म्हणून विचारलं... त्याने मला बॉक्स उघडून बघायला सांगितलं... त्यात एक डार्क रेड कलर चा ड्रेस होता.. Long gown असावा... मी चमकून अनय कडे बघितलं... त्याने हॉल च्या एका कोपर्‍याकडे बोट दाखवत सांगितलं... "तिथे changing room आहे... प्लीज माझ्यासाठी घालून ये हा ड्रेस.. 😉"

मला तर काय बोलावं कळत नव्हतं... मी गप्पच बसले.. तोच परत बोलला.. "प्लीज 🙏"

"OK"

"आणि जायच्या आधी जेवणामध्ये काय खाणार तेही सांगून जा.. म्हणजे तोपर्यंत मी ऑर्डर करून ठेवतो.."

मी मेनू कार्ड बघितलं आणि त्याला सांगितलं... आणि मी changing room मध्ये गेले..

मी बॉक्स मधून ड्रेस बाहेर काढला... तो gown च होता.. Deep back.. त्याखाली bow.. Long sleeves.. Khup सुंदर होता... ड्रेस ची घडी open केल्याबरोबर त्यातून एक कागद खाली पडला... त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं.. मी तो कागद उचलला आणि वाचलं.... त्यावर लिहिलं होतं..

'तुम दूर हो मगर दिल में ये एहसास होता है
कोई है जो हर पल दिल के पास होता है
याद तो सब की आती है मगर
तुम्हारी याद का एहसास ही कुछ ख़ास होता है ….'

मी स्वतःशीच हसले... अनय पण ना... ☺️

केस वगैरे ठीक ठाक करून मी बाहेर आले... अनय door कडे नजर लावूनच बसला होता... मला बघितल्याबरोबर तो उठून माझ्याजवळ आला....आणि काही सेकंद बघतच राहिला.. ."Beautiful!!!❤️" म्हणत तो माझ्या मागून आला आणि मला मागून मिठीत घेत माझ्या कानाजवळ पुटपुटला... "तू खूप सुंदर दिसतेयस मीरा!!"

मी दोन्ही हातांनी माझा चेहरा झाकून घेतला.. तसा तो माझ्या समोर येत म्हणाला.. "someone is blushing hmm!! 😄"

"अनय... जा ना...." मी लाजून chair वर येऊन बसले...

तोही येऊन समोरच्या chair वर बसला... आणि माझ्याकडे बघत त्याने आणखी एक बॉक्स माझ्या हातात दिला..

"आता हे काय??" मी चक्रावून विचारलं

तसं त्याने हसून मला बॉक्स open करायला सांगितला..
मी तो बॉक्स open केला.. त्यात cosmetics होते जे त्याने खास दुबई वरुन आणले होते...!

"Wow!!.. Superb!! 😍".. मला ते cosmetics खूप आवडले.. मी eye shadows चा बॉक्स open करून बघितला... त्यात मिरर वर स्केचपेनने काहीतरी लिहिलं होतं..

'न जाने किस तरह का इश्क कर रहे हैं हम,
जिसके हो नहीं सकते उसी के हो रहे हैं हम... '

मी अनय कडे बघितलं.. त्याचे डोळे भरून आले होते.. तो chair वरुन उठला.. Vase मधला एक red rose त्याने घेतला आणि माझ्या समोर धरला... गुडघ्यांवर खाली बसत म्हणाला...
"I Love You Meera.. I still Love You..!! "

"I Love You too अनय".. मी त्याच्या हातातला rose घेत आणि डोळ्यांतले अश्रू आवरत म्हटलं..

तो chair वर बसत म्हणाला..
"I was mad at you Meera... But never dared to say because of that guy.. Paresh!... तुझे ते soft soft गाल.. तुझे टपोरे डोळे .. Your juicy lips.. Your long hair... मी काहीच विसरलो नाहीये मीरा 😑 पण तुला सांगण्याएवढा वेळ पण नाही मिळाला मला... तेव्हा सांगितलं असतं तर कदाचित आज विक्रांत च्या जागी मी असतो... हो ना? "

".............. "

" सोड.. I know आता या सर्वाचा काही उपयोग नाहीये.. "

तितक्यात वेटर ने door वर knock केलं... आणि आम्ही सावरून बसलो.. तो जेवण घेऊन आला होता... त्याने सर्व टेबल वर अरेंज केलं आणि तो निघून गेला... जेवता जेवता विषय बदलण्याच्या हेतूने मी अनय ला विचारलं..
" पण हे सर्व तू कधी अरेंज केलंस?? मी तर काल रात्री तुला मेसेज करून कळवलं मी येत असल्याचं..."

"तुझा मेसेज आल्याबरोबर मी कामाला लागलो.. कुठे भेटायचं ते आपलं काही ठरलं नव्हतं.. खूप विचार केला मग हे हॉटेल डोळ्यांसमोर आलं.. या हॉटेल बद्दल मीही ऐकून होतो..म्हटलं आता तुझ्याच बरोबर जाऊया.. तुलाही इथे आवडेल याची खात्री होती... मग लगेच गूगल वर इन्फॉर्मेशन सर्च केली....नंबर मिळवून मॅनेजर सोबत बोललो.. सकाळी लवकर येऊन कसं काय अरेंज करायचं ते सांगितलं आणि गिफ्ट्स ही नेऊन दिले! "

" कसला आहेस रे तू 😄😄.. Thanks फॉर धिस lovely surprise!! "

मनात आलं विक्रांत का नाही एवढा रोमँटिक होऊ शकत 😔.. मान्य आहे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण कधी कधी कोणीतरी आपल्याला असं स्पेशल फील करून दिलं की किती छान वाटतं.. एवढं सगळं नको.. पण निदान थोडं तरी माझं मन जाणावं त्याने.... पण मी का compare करतेय दोघांना..? विक्रांत विक्रांत च्या जागी आहे आणि अनय अनय च्या... दोघांची तुलना कधीच नाही होऊ शकत... मी स्वतः वरच चिडले.. मी विक्रांत बद्दल असा विचार कसा काय करू शकते 😑.. सॉरी विक्रांत!

मी बोलता बोलता अनय ला म्हणाले.. "अनय तूही आता लग्न कर.. तरच या सर्वातून बाहेर पडू शकशील..😓"

"खरं तर आता इच्छाच नाहीये... पण तुझ्यासारखी भेटलीच कोण तर नक्की करेन..."

यावर मी काहीच बोलले नाही.. एव्हाना आमचं जेवण वगैरे उरकलंच होतं... मी अनय ला म्हणाले.. "मला निघायला हवं.. उशीर होतोय.."

" ह्म्म्म.. 😐" तो एवढंच म्हणाला...

मी काही न बोलता change करायला गेले..परत येऊन सर्व गिफ्ट्स एका पिशवीत भरले... हृदयात कालवाकालव होत होती... मी चेहर्‍यावर काही न दाखवता आणि अनय कडे न बघताच अनय ला म्हणाले..
" चल निघूया.."

आणि मी दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागले.. तसा अनय ने मागून माझा हात पकडला.. मी जागेवरच थांबले.. त्याच्या डोळ्यांत बघायची आता हिम्मत होत नव्हती....
इतक्यात कानांवर गाण्याचे बोल पडले...

💕🎼
लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो...

अनय ने रिमोट ने साऊंड सिस्टीम प्ले केली होती..
मला अश्रू अनावर झाले.. मी बॅग्स वगैरे तिथेच टाकून गर्रकन वळून अनयला घट्ट मिठी मारली... 😫.... तोही त्याच्या हातांचा विळखा घट्ट करत मला बिलगला... दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू बरसत होते.. एखाद्या लहान मुलासारखा तोही रडत होता... 😭😭... गाणं वाजतंच होतं....

💕🎼
हमको मिली हैं आज ये घड़ियाँ नसीब से..
जी भर के देख लीजिये हमको क़रीब से..
फिर आपके नसीब में ये बात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो..
लग जा गले...

पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार..
पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार..
बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार..
आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो..
लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो..
लग जा गले...


To be continued..
🙏