"अरे हा काय फालतुपणा आहे. प्राजु कोण होता तो..?? तो नक्कीच राज असणार. मूर्खपणा नुसता. आणि किती हे ट्विट्स तुझ्या आयुष्यात प्राजु !!" वृंदा चांगलीच भडकली होती.
"अग तु शांत हो बघु. तीच बोलं तर पूर्ण ऐक." प्रिया तिला शांत करत बोलली.
"हो.., माहीत आहे खुप ट्विट्स आहेत. पण हे घडलं आहे ग माझ्यासोबत मी तरी काय करणार. तूच सांग मला तुम्हाला अस माझ्या आयुष्याबद्दल खोटं सांगून काय मिळणार आहे ना...??" मी समजुतीच्या भावात बोलत होते.
"अग तु वेडी आहेस का...! आम्हचा विश्वास आहे तुझ्या बोलण्यावर. तु पूढे काय झालं ते सांग." सर्वाना शांत करत अभि मधेच बोलली.
तो दिवस.., म्हणजे आमचं कॉलेज सुरू झालेल. मी त्या बेंचवर एकटेच बसले होते.. खरतर त्या बेंचवर बसण्याचा माझा बिलकुल मुड नव्हता. पण सगळेच बेंच आधीच भरले असल्याने मला नाखुषीनेच त्यावर बसावं लागलं. मी बसले.. पण अभ्यासात मन काही लागत नव्हत. सारखी हर्षल ची आठवण येत होती..
ती कधीही कोणालाच त्या बेंचवर बसायला देत नसे.. तीच ते भांडण. रोख जमावन. सार काही मला आठवत होतं. पण मनात ठरवल की परत त्या बेंचवर बसायचं नाही. त्या दिवसाचे लेक्चर्स कसेतरी संपवुन मी कँटीनमध्ये गेले.
समोरच्या टेबलावर राज बसला होता. मी त्याच्या दिशेने गेले आणि समोरच्या एका खुर्चीवर बसले.
"राज..! कुठे होतास तु..?? मी कॉल केला होता तुला.??"
माझ्या या प्रश्नावर तो फक्त हसला, आणि परत त्याच काम करत बसला होता.
त्याचा चेहरा अगदी रुक्ष वाटावा तसाच. केस विस्कटलेले. गालावरची दाढी न कापल्याने जास्तच वाढली होती. डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळ त्याची न झालेली झोप दर्शवत होती. पॉशमध्ये राहणारा राज आज मात्र साधा दिसत होता.
"राज काय झालं आहे.??? तुझा अवतार बघ कसा करून घेतला आहेस. आणि माझे कॉल का नाही घेतलेस.??" मी बोलत होते त्यावरही त्याचं लक्ष नसावं. मी बोलताना एक कॉल आला आणि माझ्याकडे एक नजर टाकुन राज निघून गेला.
मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो नजरेआड होईपर्यंत बघत होते. "असा काय हा..?? याला काय झालं.??" स्वतःशीच पुटपुटत मी बॅगमधून टिफिन काढुन निशांतला कॉल केला.
"हॅलो..., किती वेळ लागणार आहे तुला.???"
"अग दहाच मिनिटे आलोच.!!" एवढं बोलून त्याने कॉल ठेवला.
मी ही मग काही तरी टाईमपास करावा म्हणुन मोबाईलवर खेळत बसले होते. तोच एक मुलगी माझ्या जवळ आली.
"प्रांजल...! हे तुझ्यासाठी आहे." एवढं बोलून तिने एक लेटर माझ्या समोर ठेवलं आणि काही विचारण्या आधीच ती निघून गेली ही. मी फक्त बघत होते.
"काय हा वैताग आहे. आधी तो बेंच., नंतर हा राज.., आणि आत ही मुलगी.!! सगळे असे विचित्र का वागत आहेत..??" स्वतःशीच बोलता बोलता ते पत्र मी उघडलं.
■■
"हॅलो स्वीटी...,
कशी आहेस..? सॉरी सारख विचारतो तुला. ते ही मला माहित असून... पण काय करणार तु आहेच एवढी गोड की तुला सारखं भेटावस, तुझ्याशी बोलावसं वाटतं. बघत राहावं अस वाटत. म्हणजे बघ ना आज तु या पिवळ्या रंगाच्या टॉप मध्ये किती गोड दिसते आहेस. एखाद्या सुर्यफुलासारखी भासतेस मला.
बर, आता लवकरच भेट होईल म्हणा. आपली भेट मी नक्कीच वेगळी आणि लक्षात राहील अशीच करेन.
तुझाच....
??"
■■
ते पत्र वाचुन मी तर आधी स्वतःची नजर संपूर्ण कॅन्टीनभर फिरवली. पण नजरेला वेगळं अस काही जाणवलं नाही. पण सतत कोणीतरी नजर ठेवून असल्याची नाहक भीती मात्र सतावत होती. हे पत्र आताच कोणीतरी पाठवले आहे. ही वेळ घाबरण्याची नव्हतीच. आता जाऊन घ्यायचं होत की तो आहे कोण..? आणि का मला असा त्रास देतो आहे.
To be continued