तो दिवस मात्र निशांत सोबत छान गेला.. त्या दिवसाच्या बरोबर दोन दिवसांनी मी हॉलमध्ये बुक वाचत बसले असता दरवाजावरील बेल वाजली. मी जाऊन उघडले तर समोर एक कुरिअर वाला मुलगा हातात एक मोठं कुरिअर घेऊन उभा होता..
"मिस प्रांजल प्रधान..??" त्याने माझ्याकडे बघत विचारले.
"येस.. मीच आहे. बोला." मी ही त्याच्याकडे बघत बोलले.
"मॅडम तुमचं पार्सल आलं आहे. हे घ्या आणि इथे सही करा." एवढं बोलून त्याने ते भल मोठं पार्सल माझ्यासमोर ठेवलं आणि पाठीमागच्या बॅगमधुन अजून एक पार्सल कडुन माझ्या हातात ठेवलं.
"हे अजुम एक आहे घ्या. आणि इथे सही करा." एवढं बोलून त्याने सही घेतली आणि तो निघून गेला.
मी त्या भल्यामोठ्या पार्सलकडे आणि हातात ठेवलेल्या पार्सल ला बघितल आणि दरवाजातूनच आई ला हाक मारली.. यावेळी आई ही जरा घाबरी होती. बाबांना कॉल केला पण त्यांना येणं शक्य नव्हतं. शेवटी निशांतला आम्ही बोलावून घेतलं.
"बघ ना सकाळी सकाळी एक कुरिअरवाला घेऊन आलेला. आम्ही तसच ठेवून दिल." मी निशांतला सगळं सांगत होते.
"बर केलं तुम्ही ते उघडून पाहिलं नाही ते. आता मी आलो आहे ना. थांबा मी बघतो." एवढं बोलून निशांतने सर्वांत मोठा वाला पार्सल उघडलं... मी तर घाबरतच सगळं बघत होते..
तो जस जसा उघडत होता ते पार्सल तस तसा त्या आतील वस्तूचा आकार आम्हाला कळत होता.. शेवटी सगळं उघडल्यावर एका भलामोठा टेडीबीअर आमच्या समोर होता.. गुलाबी रंगाचा तो भला मोठा टेडीबीअर दिसायला सुंदर होताच सोबत मऊ उशीसारखा होता..
त्या टेडीबीअर ला बघून आम्ही सगळेच हैराण झालो होतो. नंतर छोटं पार्सल उघडण्यात आलं तर त्यात चॉकलेट होती. ते ही आम्ही खाल्ले नाही. जर कोणी पाठवेल आहेत हेच माहीत नसेल तर ती खान्या योग्य आहेत की नाही ते तरी कशावरून ठरवायच ना...!!
"मला वाटत कोणी तरी मुद्दाम करत आहे हे.." निशांत सोफ्यावर बसत बोलला.
"अरे अस अचानक कोण का करत असेल...??" मी ही जरा घाबरत बोलले.
"तुझ्या शाळेतील किव्हा अजून जवळच्या फ्रेंड्स पैकी कोणी नसेल ना.??" निशांतने माझ्याकडे बघून विचारले तस मी उडालेच..
"नाही नाही... मला तरी कोणी आठवत नाहीये सध्या."
"एक काम कर... काही जवळच्या मैत्रिणींना फोन करून सांग की गिफ्ट मिळालं आहे.. आणि मला खूप आवडल. बघू कोणी असेल तर रियाक्त होईल..." निशांतच्या या आयडियेवर मी आणि आई भारी खुश झालो आणि ठरल्या प्रमाणे आम्ही कॉल केला...
"अच्छा तर म्हणुन तु कॉल केला होतास तु प्राजु...?!" प्रिया मधेच बोलली. यावर मी फक्त मान डोलावून होकार दिला.
"तसाच कॉल मी अभि, वृंदा आणि माझ्या कॉलेजमधल्या एका फ्रेंड ला केला. राज ला ही विचारून घेतलं. पण यातल्या कोणीही तो टेडीबीअर आणि चॉकलेट पाठवले नव्हते.. शेवटी कंटाळुन आम्ही बसलो असता आई ने आम्हाला गरमा गरम चहा आणून दिला.. तेव्हा कुठे बर वाटल.
"अरे यार त्या कुरिअर वाल्याला विचारायला हवं. त्यांच्याकडे असेल ना त्यांचा पत्ता.." मधेच निशांत ओरडला. आणि आम्हाला ही ते पटलं.
मग मी आणि निशांत लागेसाग निघालो. जवळच्या सगळ्या कुरिअर कंपन्यांना भेट दिली. पण हवी असलेली माहिती काही केल्या मिळाली नाही.. थकलेले चेहरे घेऊन आम्ही परत आलो..
"अरे यार एवढं फिरलो पण काही कळलं नाही.." निशांत सोफ्यावर स्वतःला झोकून देत बोलला. मी ही त्याच्या बाजूला बसले.. तशी
"मिळाली का काही माहिती..??" आईने किचनमधून बाहेर येत विचारलं.
"नाही ग आई. काहीच माहिती मिळाली नाही. तो नक्की कोणत्या कुरिअर कंपनीचा बॉय होता हेच आम्हाला कळलं नाही. त्यामुळे त्याला शोधणं खूप कठीण झालं." मी सोफ्यावरून उठुन डायनिंग टेबलाजवळ जात बोलले. दोन ग्लासं पाण्यानी भरली आणि घेऊन आले. एक निशांतला तर एक मला.., अस आम्ही मिळून पाणी पील.
दुपारचं जेवण उरकुन निशांत घरी गेला. मी ही मग जास्त विचार करायचा नाही असं ठरवुन बेडरूममध्ये झोपले..
रात्री बाबा आले तस आईने दुपारबद्दलच सगळं त्यांच्या कानावर घातल. त्यांनी तो टेडीबीअर आणि चॉकलेट पाहिले. आणि चॉकलेटचा डब्बा कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला. "उद्याच तो टेडीबीअर ही फेकुन देऊ" अस ठरवून आम्ही रात्रीच जेवण आटपून झोपी गेलो.
पण उद्याची सकाळ मात्र रोजच्या सारखी होणार नव्हती.. टेडीबीअर आणि चॉकलेट कोणी दिली असतील याचा विचार करत झोपले खर.., पण दुसऱ्या दिवशी मात्र नवीनच गोष्ट समोर येणार होती..
सकाळी उठले.. फ्रेश होत आज गणपतीच्या मंदिरात जाऊन आले. मन कस एकदम प्रसन्न झाल. घरी येऊन थोडी आईला मदत केली आणि माझा टीपी चालु होता की, परत कोणी तरी दरवाजावरची बेल वाजवली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी लटपटतच गेले आणि दार उघडलं. आज समोर कुरिअरवाला नव्हता तर पोस्टमन काका होते..
"मिस प्रांजल प्रधान इथेच राहतात का.???" डोळ्यावरचा चष्मा ठीक करत त्यांनी विचारल.
"हो.., मीच आहे.. बोला." मी तोंडात येईल ते बोलले.
"तुमच्या नावाने पत्र आहे." एवढं बोलून त्यानी एक पत्र पूढे केलं. आणि सही घेउन ते निघून गेले.
मी किती तरी वेळ त्या पत्राला दारातच बघत उभी होती. त्या पत्रावर नाही नाव होतं की पाठवणाऱ्याचा पत्ता. मी ते घेऊन बऱ्याच वेळाने आत आले.
"काय ग प्राजु.. काय झालं.?? कोण आला होता.??" किचनमधून आई बाहेर येत बोलली.
मी फक्त हातातलं पत्र दाखवलं आणि सोफ्यावर बसले.
"आई ग.., मला जरा भीती वाटते आहे. म्हणजे बघ ना जेव्हा पासून माझा हा बर्थडे येऊन गेला आहे. तेव्हापासून हे अस चालू झाला आहे. कोण करत असेल हे सगळं..??" मी आईला घट्ट मिठी मारून बोलत होते.
"अग बाळा. तु नको एवढं टेंशन नको घेऊस. तुझ्या आधीच्या फ्रेंड्स पैकी कोणी तरी गम्मत करत असेल." आई माझ्या डोक्यावर हात फिरवत बोलत होती.
"चल ते राहूदे. ते पत्र बाबा आले की वाचूया आपण." एवढं बोलून आई मला घेऊन गेली.
"आज आपण निशांतला बोलावू. तु चिकन बनव. शिकून घ्या आता जरा जेवण वैगेरे. लग्न होणार आहे तुझं." आई माझं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये लागाव म्हणून बोलत होती. पण माझं मन काही केल्या कशात लागत नव्हतं. नाही नाही म्हणत असताना ही आई मला मार्केटमध्ये घेऊन गेली.
पण येताना मात्र मी चा फ्रेश झाले होते. जेव्हा घरी आले तेव्हा मिळून आम्ही आणलेलं पार्सल खाल्लं. नंतर निशांतसोबत बोलत बसले.. बोलता बोलता अचानक नजर समोर गेली आणि मी दचकलेच.. समोर तोच टेडीबीअर होता...
"यार हा टेडीबीअर बाबांनी अजून फेकला नाही..??" हळूच बोलले आणि स्वतःच्या रूममधे गेले.. निशांतला जेवणाच आमंत्रण देऊन आम्ही आमच्या गप्पा संपवल्या..
त्यानंतर मी आईला मदत केली. ते चालू असताना निशांत ही आला.. वेळ भुर्रकन जात होती. अगदी गाडीत बसावं आणि नेक्स्ट स्टेशन यावं.
छान तिघांच्या गप्पा रंगल्या होत्या.. यासर्वात मी ते सर्व काही विसरून गेले होते..
रात्री बाबा आले आणि आम्ही ग्रुप करून गप्पा मारू लागलो.. मी आणि बाबा.., तर आई आणि निशांत असे ग्रुप झाले होते..
चिकन रस्सा.., पुरी, भात., सुक चिकन असा छान बेत होता. सगळे जेवुन आम्ही गप्पा मारत बसलो होती की अचानक निशांतने पत्राचा विषय काढला आणि वातावरण गडुळ व्हावं असदी तसच झालं.
पण काय असेल त्या पत्रात..?? कोणी लिहिलं असावं ते पत्र..?? कळेलच नक्की..
to be continued.....
(कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)
स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.