"अग आई...! हे काय कोणी पाठवले एवढे बुके..??? बाबांना प्रमोशन मिळालं की काय ग ???" मी आनंदाने धावत रूमधून बाहेर आले आणि आई ला विचारले..
"नाही ग बाळा. बाबांना प्रमोशन वैगेरे काही नाही मिळालं..आई हे बाबांसाठी नाही तर हे सगळे बुके तुझ्यासाठी आहेत. त्यावरच्या सगळ्या ग्रीटिंगकार्ड वर तुझं नाव आहे प्राजु.." आईने जरा हसुन सगळं सांगितलं. मग मी ही धावत जाऊन सगळे ग्रीटिंगकार्ड बघायला सुरुवात केली पण जे मला हवं ते मात्र मला त्यावर दिसलं नाही...
"अग आई हे निशांतने नाही पाठवलेत...?!!!" माझ्या या वाक्यावर आई मात्र उडालीच...
"अग मला वाटलं तुझ्यासाठी निशांतने पाठवले असतील... पण तुला कस कळलं की हे निशांतने नाही पाठवले आहेत हे..??"
"अग ते... म्हणजे आई... तो मला प्राजु नाही बोलत कधी म्हणजे मला तो नेहमी...." मी जरा लाजतच बोलले.
"तो मला "हनी-बी" या नावाने बोलतो आणि हे कोणाला माहीत नाहीये.. आणि या ग्रीटिंगकार्ड वर तर प्राजु आणि प्रांजल हेच नाव आहे. म्हणून मला वाटलं की हा निशांत नाहीये. कदाचित राज असू शकतो. कारण त्याने मला विश केलं नाहीये कदाचित त्याने पाठवली असतील ही फुलं.. थांब कॉल करून विचारते." एवढं बोलून मी माझ्या रूममध्ये गेले आणि त्याला कॉल केला..
रिंग वाजत होती पण राज घेत नव्हता. शेवटी तो मोबाईल ही वाजून वाजून थांबला आणि बंद झाला.
"या राज ला काय झालं. कॉल का घेत नाहीये. हा मुलगा दिवाळी पासुन गायब आहे.. गेला कुठे..??" मी स्वतःशीच बडबडत बाहेर आले.
"अग आई त्याने कॉल नाही घेतला.. बघु आता त्याने कॉल केला की विचारते... एवढं बोलून मी नाश्ता करायला गेले. आई ही जास्त काही न बोलता किचनमध्ये गेली.
असाच टाईमपास चालू असताना राज चा कॉल आला..
"हॅलो... प्रांजल..??!! राज हिअर...!!"
"हा बोल राज.. प्राजु बोलतेय."
"अग मघाशी तु कॉल केलेलास ना..? मी जरा कामात होतो सॉरी उचलला नाही..."
"इट्स ओके राज."
"बोला मग आज कशी आठवण आली.??"
"थँक्स टु यु.. एवढे गोड बुके पाठवलेस माझ्यासाठी... खूप गोड गिफ्ट आहे." मी स्माईल देत बोलले.
"कसले बुके...? आणि मी नाही पाठवले. कशा बद्दल होते ते प्रांजल..??" तो जरा अडथळत बोलत होता.
"म्हणजे ते बुके तु नाही का पाठवलेस..??" माझा गोंधलेला चेहरा बघून समोर बसलेली आई ही हातातलं काम तसच ठेवून माझ्याकडे बघू लागली..
"ठीक आहे राज.. मी नंतर बोलते तुझ्याशी...." एवढं बोलून मी कॉल ठेवला. आता टेंशन याच होत की हे बुके नक्की कोणी पाठवले. कदाचित निशांत असेल म्हणून त्याला ही कॉल झाला. पण ते त्याने ही पाठवले नव्हते. शेवटी त्यालाच बोलावून घेतलं.
"डोन्ट व्हरी हनी-बी मी आलो आहे ना आता. बघू कोणी पाठवले आहेत हे बुके.." हातात एक गुलाबांचा बुके घेत त्याने त्याच निरीक्षण केल. पण काही माहिती मिळाली नाही. शेवटी कंटाळुन आम्ही ते शोधायचं सोडून दिलं..
"फेकून देऊया हे बुके..?? निशांतने काही बुके घेतले..
"नाही नको... म्हणजे कोणी का दिले असतील पण या फुलांचा काय दोष...!! आई ही सगळी फुलं ठेवुन घेऊ." एवढं बोलून मी काही फुलं माझ्या रूम मध्ये. तर काही आई- बाबांच्या रूममधे.. थोडी हॉलमध्ये. तर राहिलेली किचनमध्ये ठेवली. आता तर आमचं तर एखादं फ्लॉवर शॉपपेक्षा कमी वाटत नव्हतं.
"पण शेवटी प्रश्न होता तो बुके पाठवली कोणी..???"
to be continued.....
(कथेचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)
स्टेय ट्युन अँड हॅपी रीडिंग गाईज.