Julale premache naate - 55 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-५५

Featured Books
  • నిరుపమ - 7

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 20

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 6

                         మనసిచ్చి చూడు -06అప్పుడే సడన్గా కరెంట్...

  • నిరుపమ - 6

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 19

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-५५

"व्वा यार...!! निशांत जीजू किती रोमॅंटिक आहे ग प्राजु...."
वृंदा माझ्याकडे बघत बोलली.. यावर मी फक्त एक डोळा मारला...

"काय ग आई- बाबांनी बर तुम्हांला प्रपोज करू दिल.. म्हणजे तेव्हा तु फक्त सेकाँड इयर ला होतीस ना.???" प्रियाच्या या वाक्यावर मी पाच मिनिटं शांत झाली..

"अरे...!! प्रिया तु पण ना..." अभि जरा रागवत बोलली.

"काय ग काय झालं....??" प्रियाने जरा प्रश्नार्थक चेहऱ्याने अभिकडे पाहिलं...

"अभि असुदे ग.. आता ट्रीटमेंट चालू आहे. आणि बरच झालं ना आम्हाला आधीच कळलं.." हे बोलताना मात्र माझा चेहरा उतरला होता.. कारण ही तसच होत. एक दीर्घ श्वास घेऊन मी बोलु लागले...


"जेव्हा माझं ऍकसिडेंट झालेलं तेव्हा डॉक्टरांना कळलं की माझ्या गर्भाशयाला त्रास झालेला आणि त्याचं ऑपरेशन ही करावं लागेलं. डॉक्टरांनी निदान केलेलं की पुढे जाऊन प्रेग्नेंसी मध्ये प्रॉब्लेम होण्याची शक्यता होती. आणि त्यासाठी माझं एक ऑपरेशन ही झालेलं.. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. जेव्हा हे आई- बाबांना कळलं तेव्हा त्यांना खुप टेंशन आलेलं. कारण कोण अशा मुलीशी लग्न करेल जी आई होईल की नाही यावर शंका असेल..


जेव्हा हे निशांतला कळलं तेव्हा त्यानेच आई-बाबांकडे माझा हात मागितला. त्याला आई-बाबांनी सगळं काही सांगितलं तेव्हा तो बोलला होता...

"आई-बाबा माझं प्रांजल वर मनापासून प्रेम आहे. पुढे जाऊन आम्हाला बाळ होईल की नाही माहीत नाही. पण मी तिला आयुष्याभर जपेल. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. जर तुमची परवानगी असेल तर मी आता तिच्याशी लग्न करायला तय्यार आहे. मला माहित आहे हे खूप होतय पण खरंच आई-बाबा माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे तिच्यावर..."

त्याच्या अशा बोलण्याने आई-बाबा ही नकार देऊ शकले नाही. आणि त्यांना ही माहीत होतं निशांतच माझ्यावरचं प्रेम.., काळजी सगळं काही दिसत होतच. म्हणून त्यांनी होकार दिला. हे मला नंतर आईने सांगितलं. खरतर आधी मला थोडा त्रास झालाच.. आईपण जगातील सर्वात सुंदर क्षण आहे. स्त्रीचा मानच तो.. आणि तोच नाही मिळणार तर काय अर्थ स्त्री म्हणुन जगण्याचा... पण नंतर त्या दिवशी निशांतने मला समजावलं.



"काय मग मॅडम कसा गेला बर्थडे तुझा..??" निशांचा आवाज मागुन आला आणि मी जाऊन बिलगले.

"अरे हे काय.. कोणी बघेल ना वेडाबाई.."

"कोणी नाही येणार... आणि आता आपलं लग्न ही ठरलं आहे हा.. म्हणजे ठरेल ना!! "

"हो ग.. पण तरीही. ते जाऊदे. तुला गिफ्ट कस वाटलं. आणि रिंग आवडली ना...??" त्याच्या या प्रश्नावर मी हसु की रडु हेच कळत नव्हतं मला. नकळत माझे डोळे भरले.

"हे काय.. रडुबाई रडल्या लगेच..???" त्याने मला जवळ घेत माझे डोळे पुसले..

"मग काय... एवढं छान गिफ्ट देत का कोणी..!! पण मला एक सांग आई- बाबांनी आपल्या नात्याला होकार कसा काय दिला. आणि तु मला प्रपोज केलंस हे कसं काय...

"हनी-बी... म्हणजे बघ एक सांगतो पण त्याचा तुझ्या मनावर आणि आयुष्यावर कधी ही परिणाम होऊ द्यायचा नाही... तस प्रॉमिस कर बघू मला.." स्वतःचा हात पुढे करत निशांतने माझ्याकडे पाहिलं.

मी मानेनेच होकार दिला.. तसा त्याने एक दीर्घश्वास घेतला. आणि बोलु लागला.

"तुझं ऍकसिडेंट झालेलं.. तुला आठवतंय तुझं एक छोटंसं ऑपरेशन झालेलं. तुझं ऍकसिडेंट झालेलं तेव्हा तुझ्या गर्भाशयावर आघात झालेला आणि त्यामुळे त्याच ऑपरेशन करावं लागलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होत की पुढे जाऊन आई होण्याची शक्यता कमी आहे. हे जेव्हा आई-बाबा बोलत होते तेव्हा मी ऐकलं होतं आणि तेव्हाच आई- बाबांकडे मी माझ्या प्रेमाची कबुली दिली.."

"खरतर आधी त्यांनी नकार दिलेला पण नंतर मी त्यांना समजावलं आणि ते ही तय्यार झाले. मग मी तुझ्या बर्थडे च्या दिवशी ऑफिशली तुला प्रपोज करणार हे आई-बाबांना सांगितलं. त्यांना ही काही प्रॉब्लेम नव्हता.. आणि तुला ते सांगणार होते., पण आता मीच सांगितलं सो प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तु.. कारण काही ही झालं तरीही मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन."

हे ऐकून तर मी बेशुद्ध होण्याची बाकी होती.. पण निशांतने छान समजावलं होत.

"खरच सॉरी ग प्राजु मला नव्हतं माहीत हे.." प्रियाने लगेच माझी माफी मागितली.

"अग प्रिया तुला थोडीच माहीत होतं. आणि आता मी ही ते मान्य केलं आहे. आणि डॉक्टरांची ट्रिटमेंट चालू आहेच. होईल सगळं छान." मी हसुन प्रियाकडे बघितल. तिला ही छान वाटलं.
चला आता पुढे काय झालं ते सांगते..

"अग त्या हर्षुच काय झालं.???" मधेच वृंदा बोलली.

"हो सांगते.." आणि मी बोलायला सुरुवात केली..



त्या दिवशी त्याने मला छान समजावुन सांगितलं. मग तो ही आजी- आजोबांना घेऊन गेला. तो दिवस एवढ्या सुंदर आणि कधी ही न विसरता येण्यासारखा होता..

त्यानंतर आई-बाबांनी ही मला समजावलं. ते ही खुश होते निशांत आणि माझ्या नात्याला घेऊन.. खरतर ते समाधानी होते माझ्यासाठी. कारण निशांत खुप समजुदार मुलगा होता. परत एकदा बाबांचे आभार मानून मी स्वतःच्या रूममधे आले.

मोबाईल पाहिला तर निशांतचे मिस कॉल होते.. त्याला कॉल केला. मग गप्पा मारून आम्ही झोपी गेलो.

सकाळी आईच्या आवाजाने जाग आली. जरा कंटाळातच मी उठले कारण ही तसच होत. कारण एकतर कॉलेज ला सुट्या होत्या त्यात आई अशी ओरडत होती..

फ्रेश होऊन मी बाहेर आले.. आणि हॉल पाहिला तर मला चक्कर यायची बाकी होती.. आमचा पूर्ण हॉल गुलाबाच्या फुलांनी भरून गेला होता. जिथे तिथे फुलांचे बुके होते आणि त्या प्रत्येक बुके मध्ये एक ग्रीटिंगकार्ड होतं.


To be continued