"हे कस काय झालं..??? म्हणजे मी मघाशी इस्त्री करून घडी वैगेरे करून बाहेर गेले होते. कोणी केल असेल..?" एवढं बोलून मी निशांतकडे पाहिलं.. त्याचा चेहरा काही वेगळच सांगत होता..
"प्रांजल का केलंस अस... मला माहीत आहे तुला रिया आवडत नाही. अग आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत आणि नात्याने बहीण-भाऊ.. तु हे चुकीचं केलंस हा.. अस नव्हतं करायला पाहिजे.. आता जर तिने पाहिलं तर तिला किती वाईट वाटेल.." निशांत भरभर बोलत होता..
माझ्या चेहऱ्यावे फक्त एकच भाव होते..., "हे मी केलं नाहीये.." पण आज निशांत काही वाचू नाही शकला ते भाव याचच जास्त दुःख होत होत.
आणि रिया चा ही काय टायमिंग बघा.. आमच्यात भांडण चालू असताना ती आली आणि समोर जळलेला कुर्ता बघून तर रडूच लागली...
"काय हे निशु... मी तुझ्यासाठी आणला होता आणि तु असा जाळलास... माझ्या भावना." आणि ती जोरजोरात रडु लागली.
"नाही ग रिया मी नाही.. म्हणजे मला नाही माहीत कोणी केल हे. म्हणजे मघाशी मी इस्त्री करत होतो तेव्हा प्रांजल आली आणि तिने केली इस्त्री.. ती इस्त्री करताना मला कॉल आलेला आणि मी बाहेर गेलो.. जेव्हा परत आलो तेव्हा हे अस होत.."
निशांत आज पहिल्यांदा माझ्या बद्दल बोलत होता.. माझं काही न ऐकता त्याने सरळ माझ्यावर आळ घेतला होता. शेवटी मी बोललेच...
"हे बघ निशांत मी नाही हे जाळलं.. आणि मला हे अस करून काय मिळणार होत..??"
"अग तुला रिया चा कालपासून राग होता म्हणून केलंस ना हे अस.. मघाशी ही तु काही तरी बोलत होतीस.."
हे ऐकून तर माझ्या तोंडुन शब्द ही फुटत नव्हते.. जे आपण केलच नाहीये त्या बद्दल आपल्याच जवळची व्यक्ती आपल्याला बोलत आहे.. "किती वाईट आणि दुःख देणारा क्षण नाही..!!"
निशांत काही न बोलता रूममधून बाहेर निघुन गेला तशी रियाच्या फेसवर एक खुनशी स्माईल होती...
"मग कसा वाटला माझा प्लॅन." तिने बेडवर बसत विचारलं आणि माझे डोळे बाहेर यायचे बाकी होते..
"म्हणजे हे तु केलंस रिया..??"
"हो.. मघाशी खूप प्रेम उतू जात होतं ना तुमच्यात. आता बस भांडत.. काय बोलत होतीस तु मघाशी.. रिया तुझी सिस्टर आहे.. मी सांगितलं ना निशांत आणि मी फ्रेंड्स आहोत. आणि तसही तुझ्यासाठी आज संध्याकाळी पाडव्यासोबत माझ्याकडून एक गोड गिफ्ट मिळणार आहे.." एवढं बोलून ती उठली आणि उड्या मारत बाहेर निघून गेली.
"हे माझ्याच बाबतीत का व्हावं.. काय रे गणु सगळे त्रास माझ्याच नशिबात आहेत का..??" मी त्या कुर्त्याच्या बाजुला बसून रडत बसले. डोळे पुसायला आज निशांत ही नव्हता..
"आई ही आज विचित्र वागत होती.. आजी-आजोबा तर नव्हतेच सोबत बाबा... ते कुठे होते.." स्वतःशीच बोलत मी डोळे पुसले आणि स्वतःच्या रूममधे गेले..
दार लावुन बेडवर झोपले... "आज निशांतने माझं एकूणच घेतलं नाही आणि सरळ माझ्यावर आळ घेतला. म्हणजे त्याचा माझ्यावरचा विश्वास कमी झाला का त्या रियामुळे.. आणि त्यात कमी म्हणुन की काय रियानेच तो कुर्ता जाळला... अशी काय ही मुलगी." स्वतःशीच बोलताना माझा डोळा कसा लागला हे ही मला कळलं नाही..
जाग आली ते कोणीतरी दार ठोठावण्याच्या आवाजाने... किलकिले डोळे करत मी दार उघडलं.. कारण माहीत होतं की समोर रियाचा चेहरा बघावा लागणार होता. पण नाही ती रिया नव्हती तो निशांत होता.
हातात जेवणाच ताट घेऊन उभा..
"काय मॅडम जेवायचं नाही का तुला.???" त्याने आत येत प्रश्न केला... आणि किती झोपावं माणसाने की बाहेर कोणी दार ठोठावल तरी कळू नये...!!" हातातलं ताट टेबलावर ठेवत त्याने स्वतःच वाक्य पूर्ण केलं... पण या सर्वात माझ्या तोंडातुन एक शब्द बाहेर येत नव्हता..
"का यावा..! ज्यानेच दुखावलं आणि तोच आता काही झालच नसल्या सारखा वागत होता." मी उभ्या उभ्या स्वतःशी बोलत होते.
"काय ग काय झालं...?? ये इकडे बस आज भरवतो तुला.. आणि हो मला भूक नाहीये हे कारण नको आहे हा..." माझ्याकडे बघत एक गोड स्माईल देत निशांत बोलला.
आता तर माझ्याकडे कारण ही द्यायला कारण नव्हतं. मग गप्पपणे फ्रेश झाले नाही त्याच्या समोर येऊन बसले.
"अजुन रागावली आहेस.. अग मी जरा जास्तच बोललो.. सॉरी. मला माफ कर." माझ्या तोंडात एक घास भरवत तो बोलत होता. पण मी काही ही बोलले नाही.
"आता अशी गप्पच बसुन राहणार आहेस का..??"
"मग काय बोलु...?? बघ ना तुला वाटलं मी तो कुर्ता जाळला. पण तस काही केलच नाही मी.. आणि का करू. रियासाठी... एवढं कमजोर आहे का रे माझ प्रेम की कोणी ही आलं तर मी अस काही करेन." माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.. बोलताही येत नव्हतं. तोंडातला घास कसा तरी घशात रेटून मी बोलत होते..
"तस नाही ग.. आणि मी कधी म्हटलं की तुझं प्रेम कमजोर आहे.."
"नाही म्हटलस पण आज जसा वागलास त्यावरून तरी तसच वाटेल बघणाऱ्याला.. माझा आहे तुझ्यावर विश्वास.. आणि माझ्या प्रेमावरही... आणि हो मला राग नाही आला.. माझं मन दुखवलस तु आज निशांत.. आणि बस झालं मला जेवण. तुझ्यासाठी चार घास खाल्ले. आता जास्त आग्रह नको करूस." एवढं बोलून मी उठुन जाऊ लागले.
"हे सगळं मी रिया ने सांगितलं म्हणुन केलं आहे..." निशांत जेवणाच ताट तसच हातात घेऊन मान खाली घालून बोलला.
"काय....?? तिने सांगितलं... आणि तु का केलंस....?? वेडा आहेस का निशांत तु आणि काय गरज होती हे सगळं करायची..???" मी आता खरच रागावले होते.
"गरज होती प्रांजल..." रिया दरवाजामध्ये उभी राहून बोलली...
To be continued