Julale premache naate - 47 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-४७

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४७

"मॅडम आता पूर्ण दिवाळी तुमच्याकडेच आहे मी..." त्याने स्वतःच्या हातांची घडी घालून स्वतःचे डोळे बंद करत मोठी स्माईल दिली..


हे ऐकून तर मी उडालेच.. किती हसु आणि काय करु हे कळत नव्हतं.. निशांत एकच दिवस नाही तर चक्क तीन ते चार दिवस आपल्या डोळ्या समोर असणार आहे. अजून काय गिफ्ट पाहिजे माणसाला. डोळे लगेच पाणावले हे अचुक निशांतने ओळखलं आणि माझ्या डोक्यावर एक टपली मारली..


"रडकी हनी-बी.."

"अरे एक ना तु काही पाहिलं नाहीस वाटत...

"काय ग.???"

"नीट बघ कळेल..." मी हसत बोलले.

"सांग ना काय बघू नक्की कळत नाहीये."

मी कानाजवळची इज बत बाजूला करत दाखवलं तेव्हा त्याला दिसले....

"हे तेच कानातले आहेत ना मी दिलेले .???" निशांत जरा विचारा बघून मी मानेनेच होकार दिला.

"खुप गोड दिसते आहेस.. आणि हे कानातले तर.... वाह...!!" एवढं बोलत निशांत हसला आणि एक सेल्फी घेतला.. पण त्यात मी लाजत होते आणि त्याचा लक्ष माझ्याकडे होता। अगदी कॅण्डीड वाटावा असा तो सेल्फी आलेला.


मग थोडं बोलून आम्ही आत गेलो. आज मी तर हवेतच होते.. मग आईला मदत केली आई आम्ही जेवायला बसलो. आज आमचं घर भरून गेलं होतं. आज घर पूर्ण झाल्याची फिलिंग येत होती.


जेवताना ही माझं लक्ष निशांतकडेच होत. तो मात्र बाबांशी गप्पा मारत होता. आईशी बोलत होता. छान वाटत होतं. हॅपी फॅमिली.

आई-बाबांच्या रूममधे निशांत आणि बाबा झोपणार होते. एक्ट्रा रूममधे आजी-आजोबा. आणि माझ्या रूमध्ये आई..

"आई.. ही साडी नसायची आहे ग उद्या. पण यावर ब्लाउजच नाहीये. माझं रडक तोंड बघून आई हसली.. आणि तिने मला हातानेच...,"मी आहे ना...!" सांगितलं... "सकाळी करू काही तरी", अस बोलून आई झोपली. कारण आज ती बरीच थकली होती.

लवकर सगळं आटपून आम्ही आज लवकरच झोपणार होतो. कारण उद्या पहिला दिवस होता. आम्हाला लवकर उठायचं होत. उठण्याने अंघोळ.., नवीन कपडे.., फटाके आणि फराळ. आणि या सोबत आनंद होत तो आपली आवडती व्यक्ती सोबत असणार याचा.

या सर्वाचा विचार करतच मी निद्रेच्या स्वाधीन झाले. आता वाट बघायची होती ती सकाळ होण्याची. डोळे मिठले तेव्हा ही निशांतचा हसरा गोड चेहरा डोळ्यासमोर आला.. आणि माझ्या गालावर हसु उमटलं.

***


सकाळी भल्या पहाटे आईने उठवलं... बाहेर हॉलमध्ये निशांत, बाबा आणि आजोबा बसले होते. अक्षरशः पेंगत होते ते तिघेही.. हे बघून मला तर हसु आवरत नव्हतं. बाहेर आले आणि गुड मॉर्निंग विश करून किचनमध्ये गेले. आत आई आणि आजी काही तरी करत होत्या..

"ये प्राजु बाळा तुला ही शिकवते पारंपारिक पद्धतीने उठण कस बनवायचं ते.." आजी आम्हाला उठण करायला शिकवत होत्या.

"आधी खोबऱ्याच दूध काढून घ्यायचं.. मग त्यात चंदन पावडर, गुलाब पाणी, आंबे हळद.., गुलाबाच्या पाकळ्या., थोडंस बेसन, कापूर, मुलतानी माती.. हे सगळं एकत्र करायचं आणि त्यात हे खोबऱ्याचे दूध घालून घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची. झालं आपल्या पद्धतीच उठण." आजींनी उठण्याची वाटी दाखवत सांगितलं. तसे आम्ही ते घेऊन बाहेर आलो.


"चला तर मग लावून घ्या.. सुनबाई तु आधी प्रसाद ला लाव. मी आमच्या यांना लावते." आजी हातातल्या वाटीतील उठण दुसऱ्या वाटीमध्ये घेत बोलल्या.

"आणि मला कोण उठण लावेल ग आजी..??" निशांत पेंगतच विचार होता.

"अरेच्चा हे तर विसरलेच मी.." आजी हसल्या.

तशी आईमधेच बोलली.., "आपली प्राजु लावेल.." हे वाक्य आईने माझ्याकडे बघत पूर्ण केलं आणि मी काय व्यक्त व्हावं हेच मला कळत नव्हतं.. हे ऐकून तर निशांतची झोपच गायब झालेली.. ताडकन उठुन तो सोफ्यावर बसला. शेवटी एक आई अशी बोलली.. "कोणाची आई अशी बोलत नाही...!!.." मनात देवाचे आभार मी मनात होतेच. एवढी छान आई मला भेटली जी होती..

मग तिघांना पाटावर बसवलं गेलं.. आजी आजोबांना उठण लावत होत्या.. तर आई- बाबांना. आणि मी निशांत ला. आयुष्यात अजून काय हवं. जेव्हा देव तुम्हाला काही न मागता सर्व काही देऊन टाकतो ना तेव्हा त्याचे आभार मानायला विसरू नयेत.

उठण लावून एक एक जण आंघोलीला गेले.. निशांत माझ्या रूम मधल्या बाथरूमसाठी निघाला.. मी त्याच्या मागे गेले काही मदत लागली तर अस आईच म्हणणं होतं..

आम्ही गेलो आत.. रूमध्ये त्याला गिझर लावून गरम पाणी काढुन दिलं. टॉवेल दिला. घालायचे कपडे इस्त्री करून द्यायचे होते. आज तो आम्ही घेतलेला कुर्ता जो घालणार होता.

बाथरूम मध्ये जाताना निशांत थांबला.., मागे वळून त्याने माझा हात धरून मला जवळ खेचलं...

"अरे निशांत...!! काय हे लहान मुलासारखं वागणं तुझं..???" मी जरा ओरडलेच.

"मॅडम तुम्ही उठण लावल आता मी लावतो.." एवढं बोलून त्याने त्याचा गाल माझ्या गाला जवळ आणला आणि माझ्या गालांवर टेकवला.. त्याच तो स्पर्श निशब्द करू टाकणारा होता. हळूहळू त्याचा गाल वळला आणि जवळ येणारच होता की मी त्याला ढकलून दिल..

"आज काल खुप वाईट वागतो आहेस हा निशांत.. दुष्ट मुला.." एवढं बोलून मी बाहेर पळाले. तो ही हसत बाथरूमध्ये गेला. मी त्याचे कपडे रूममधे इस्त्री करत होते.. तो बाहेर आला.

फक्त टॉवेल लावल होत. अशी तर मलाच लाज वाटली. पण त्याच ते आकर्षक शरीर बघुन डोळे त्याच्यावरून हटत नव्हते.. रोज व्यायाम करून कमावलेलं शरीर.. त्यात नुकतीच अंघोळ केली असल्याने पाण्याचे थेंब खाली ओघळत होते. केस धुतले असल्याने तो अजूनच हॅन्डसम दिसत होता. मी तर पुन्हा नव्याने प्रेमात पडत होते..

मी त्याला बघण्यात एवढी गुंतली होती की तो कधी समोर आला हे देखील कळलं नाही... समोर येऊन टिचकी वाजवली तेव्हा मी भावणार आले ..

"अरे तुझे ते कपडे.. , म्हणजे माझे..., म्हणजे मी.. इस्त्री करून ठेवले आहेत..." मी तोंडात येतील ते शब्द जुवळण्याचा प्रयत्न करत होते.. हे बघून त्याला ही हसु आवरल नाही..


"इट्स ओके ग हनी-बी..." खूप दिवसांनी त्याने मला या नावाने हाक मारली होती. आनंद झाला. त्याच्या हातात इस्त्रीचे कपडे देत मी बाहेर आले. कारण माझी तय्यारी अजून बाकी होती. मी माझ्या काही वस्तू घेऊन.., जसे की मेकअपसाठी लागणाऱ्या वस्तु.., परफ्युम.., साडी वैगेरे आधीच आई-बाबांच्या रूममधे ठेवल होत.


आता वेळ होती ती वुमेन्स ची.. आता आम्ही तिघी तय्यार होणार होतो.. त्या तिघांना परत परत प्रेमात पाडायला लावणार होतो.. नक्की कस ते कळेलच...




to be continued.....