Julale premache naate - 46 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-४६

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४६

आईच्या गोड आवाजाने माझी सकाळी झाली.... किलकिले डोळे उघडवत मी उठले.. आज दिवाळीचा पहिला दिवस होता.. "धनत्रयोदशी"...
फ्रेश होऊन मी बाहेर आले.. बाबांना तर चक्क पाच दिवस सुट्टीचे मिळाली होती.. म्हणजे यावर्षीची दिवाळी छान होणार होती. सोबत अजून एक गोड गोष्ट म्हणजे निशांत येणार होता...
वाह...!! अजून काय पाहिजे माणसाला...


"गुड मॉर्निंग बाबा..." मी टेबलावर बसत बोलले. त्यांनी ही मला हसत विश केलं.

"अग ऐकतेस का ग...! दिवाळी आहे तर निशांत आणि आई-बाबांना ही बोलवू असा माझा विचार आहे.." बाबा न्युजपेपर बाजुला करत आईला विचारत होते.

"हो चालेल मी पण आता तेच सांगणार होते..." हात पुसत आई किचनमधून बाहेर येत बोलली.

यासर्वात सर्वांत जास्त आनंद होत होता तो मला. कारण आज मला मी निशांतला बघायला मिळणार होते... स्वतःशीच हसत मी समोर ठेवलेला चहाचा कप ओठांना लावला.

बाबांनी तर लगेच आजोबांना कॉल लावला ही... त्यांचा खुळलेला चेहरा बघून मला जे समजायचं होत ते मी समजले.
स्वतःच्या रूममधे जाऊन निशांतला कॉल लावला...

"बोला मॅडम...!" निशांत हसत बोलला..
"मग किती वाजता निघणार आहेस खडूस..???" मी लाजतच त्याला विचारले.

"अग हे काय निघालो....गाडी बुक करतो आहे.. बाय द वे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडे.." तिकडून निशांत बोलला तसा माझा चेहरा चांगला खुलला...

"काय सरप्राईज आहे निशांत सांग ना..???"

"अस कस लगेच... आल्यावर सांगेल. चल आता ठेवतो. समोर भेटुन बोलु... चलो बाय.... आणि हो... लव्ह यु."
एवढं बोलून त्याने कॉल ठेवला..

मी पण काही न बोलता ठेवला.. "काय बर असेल सरप्राईज.." स्वतःशीच बोलत मी आज काय घालू हे कपाटात शोधत होते आणि माझ्या हाताला एक बॉक्स लागला.
"अरे हे तर आपण विसरलोच..." स्वतःशीच हसत मी ते हातात घेतल. काही ठवुन मी तो बॉक्स बाजुला काढून ठेवला. कपाटातील एक छानसा ड्रेस बाजूला काढून ठेवला.

टाईमपास चालूच होता.. कधी किचनमध्ये.. तर कधी स्वतःच्या रूममधे.., माझ तर लक्ष दरवाजाकडे लागुणच होते.. कधी निशांत येतो आणि मी त्याला बघते अस झालं होतं.

"या या..." मी किचनमध्ये असताना बाहेरून बाबांचा आवाज आला. मी बाहेर आले तर सगळे आले होते.. निशांतने मला पाहिलं आणि एक डोळा मारला.. मी लाजतच किचनमध्ये गेले आणि सर्वानासाठी पाणी घेऊन गेले..

"आजी-आजोबा... कसे आहात..??" मी पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत त्यांच्या पाय पडले. आजीने तर मला मिठितच घेतलं..

"काय ग प्राजु बाळा आता येत नाहीस आम्हाला भेटायला म्हणून बघ आम्हीच आलो."आजोबा माझी मस्करी करत बोलले.

"आजोबा अस काही नाही हा.." मी लाटक्या रागात आजीला बिलगले.

"हो ग प्राजु बाळा.. आम्हाला ही तुझी आठवण येत होती म्हणून बघ आलो आम्ही भेटायला. म्हटलं तु रोज येतेस आज आपण भेटुया." हे ऐकून मात्र माझा चेहरा चांगलाच खुलला.

नंतर चहा- नाश्ता करून मी आई ला जेवणात मदत करत होते. तर बाबा आणि निशांत कुठे तरी गेलेले. मग मी दारात रांगोळी काढत बसले होते की मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी हसुन मागे वळून पाहिलं पण तो निशांत नसून राज होता...

"तु..???!" माझ्या अशा अचानक रिप्लाय ने राज जरा गोधळलाच...
"अग इथून जात होतो तर म्हटलं तुला ही भेटुन जाऊ." एक स्माईल देत राज बोलला. मी कसनुसं हसत त्याला आत बोलावल..

"आई ग.., बघ कोण आलय.
"ये राज... हे निशांत आणि माझे ही आजी-आजोबा."
मी आजी-आजोबांची ओळख करून देत बोलले. राज ही जाऊन त्यांच्या पाया पडला.

"आजी-आजोबा हा राज सरनाईक.. माझा आणि निशांतचा कॉलेज फ्रेंड आहे." हे सगळं होताना आई ही बाहेर आली.

"अरे राज तु कधी आलास..??"
"आताच आलो.. कशा आहात आई तुम्ही.??" राज आईला भेटला. हे सगळं चालू असताना बाबा आणि निशांत ही आले. त्यांच्या हातात पिशव्या होत्या.
राजला बघून आधी निशांतचा चेहरा पडला. पण काही झालं नाही अस दाखवत त्याला भेटला ही...

"कसे असतात हे मुलं.. लगेच जेलस होतात." मी स्वतःशीच बडबडत होते. कारण मी त्याचा चेहरा पाहिला होता. आणि हसु ही येत होत.

राजची बाबांशी ओळख करून दिली. आईने तर त्याला थांबण्याचा आग्रह केला होता. आणि दिवाळीत यायचा ही आग्रह झाला. पण त्याला दुसरीकडे जायचं असल्याने तो काही थांबला नाही आणि निघून गेला.

राज जाताच मी निशांतला बाहेर घेऊन गेले.. त्याला मी काढलेली रांगोळी दाखवली. नंतर चांगले कपडे घालून आई-बाबांनी लक्ष्मीदेवीची पुजा केली.. एक एक करून आम्ही सर्वजण पाया पडलो.

बाबांनी एका पिशवीतून मिठाई काढली आणि सोन्याची एक देवीची मूर्ती आणि तिला ठेवून पूजा केली. आम्ही सर्वानी त्याच्या पाया पडुन आशीर्वाद घेतले.


मग बाहेर जाऊन मी आणि निशांतच फोटोशूट चालू झालेलं. आत आजी-आजोबा आणि आई-बाबा गप्पा मारत होते.

"छान आहे हा रांगोळी.... अगदी तुझ्यासारखीच.." निशांत माझ्याकडे बघत बोलला..
"हो का.. थँक्स हा..." मी स्वतःची कॉलर नसुन ही वर असल्याची स्टाईल मारत बोलले.

"अरे तु मला काही तरी सरप्राईज देणार होतास ना..??" मी मधेच त्याला विचारले तसा त्याचा चेहरा चांगला खुलला.. मी प्रश्नार्थक चेहरा करून त्याच्याकडे पाहत होते.


To be continued