Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 2 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २

Featured Books
  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

  • ખજાનો - 76

    બધા એક સાથે જ બોલી ઉઠ્યા. દરેકના ચહેરા પર ગજબ નો આનંદ જોઈ, ડ...

  • જીવનની ખાલી જગ્યાઓ કોણ પુરશે ?

    આધ્યા અને એના મમ્મી લગભગ પંદર મિનિટથી મારી સામે બેઠેલા હતાં,...

  • ક્રોધ

    क्रोधो मूलमनर्थानां  क्रोधः संसारबन्धनम्। धर्मक्षयकरः क्रोधः...

Categories
Share

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २

"बघ ..... कसं होते ते बघ ... " संजना म्हणाली. सुप्री आणि आकाशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह...

" काय बोलते आहेस तू नक्की " ,

" म्हणजे तुमच्या लग्नाचे बोलते आहे रे.... त्यात फोटोग्राफी तूच करणार असशील ना... " संजना हसत म्हणाली. तसे सुप्री, आकाश दोघेही हसू लागले.

" तू पण ना संजना... म्हणून सांगतो, जास्त राहत जाऊ नकोस या येडी बरोबर... लागली ना सवय... " ,

" ओ मिस्टर A ..... लहानपणापासूनच एकत्र आहोत आम्ही... या संजू मुळेच माझ्यात वेडेपणा आला आहे.." ,


" हो का .... " ,

" हो ... ".... आकाश.

" मग काय ... हिच्यामुळे मला माझ्या घरी सुद्धा अर्ध्या डोक्याची समजतात. " संजनाच्या या वाक्यावर आकाश किती जोराने हसला.


" हो का ... तुझाच जय महाराष्ट्र... " सुप्री बोलली. आकाशला हा डायलॉग नवीन होता.

" हे काय नवीन ... ' जय महाराष्ट्र ' वगैरे... " ,

" जुना डायलॉग आहे आकाश बाबू ... कधी कधीच वापरायचा असतो तो ..." सुप्री आकाशच्या पाठीवर चापट मारत बोलली. तिघे कॉफी शॉप मध्ये बसले होते. आकाशचं आवडतं ठिकाण. अचानक त्याचे लक्ष आभाळाकडे गेलं. तुरळक अश्या काळ्या - पांढऱ्या ढगांच्या रांगा, कुठे कुठे मागे सुटलेले ढगांचे पुंजके, आकाश त्याच्याच विचारात ते बघत नकळत उभा राहिला. त्या ढगांना बघतच या दोघींपासुन चालत पुढे आला.


सुप्री - संजना त्याकडेच पाहत होत्या. संजनाला माहित होते, २ वर्षांपासून सुप्रीने त्याला कुठेच जाऊ दिले नव्हते. आधीच इतक्या मोठ्या अपघातातून आलेला आकाश, त्यामुळे सुप्री ची काळजी बरोबरच होती. तरी तीही किती वेळा त्याच्या सोबत भटकंती करायला जाणार ना... तिचाही जॉब होता. शनिवार - रविवार किंवा जोडून २-३ दिवस सुट्ट्या आल्या कि ते दोघे जायचे कुठेतरी बाहेर, आकाशच्या फोटोग्राफी साठी. नाहीतर नाहीच. आकाश नक्कीच मिस करत असणार त्याचे जुने दिवस. संजना - सुप्री कधी एकमेकींकडे बघत तर कधी समोर आभाळाकडे टक लावून बघणाऱ्या आकाश कडे.


आकाश सुद्धा कधीचा बघत होता. शांत वारा वाहत होता. त्यावर स्वार होऊन आलेल्या काळ्या ढगांनी त्याचे लक्ष वेधलं होते. दुसरीकडे नजर टाकली असता. पक्षांचा एक लहानशा थवा नजरेस पडला. " निघाले वाटते हे सुद्धा पावसाला भेटायला... एव्हाना गावात पाऊस सुरु झाला असेल ना... " स्वतःच्या मनाशीच बोलला आकाश. " जमिनीतून गवताचे इवलेसे कोंब डोकावू लागले असतील... झऱ्याना नवीन पाणी येऊन मिळत असेल. धुक्याची चादर पडत असेल तिथे पहाटे...किंवा पावसाची वाट बघत असतील सर्व सुकलेली झाडे... मी मात्र इथे..." जरासं वाईट वाटलं त्याला.


============================== ============================== ==


सकाळी आजीला जाग आली तेव्हा ८ वाजले होते. पूजाच्या खोलीत गेली तेव्हा नव्हतीच ती तिथे. गेली असावी पूजा... असा मनाचा समज करत आजी अंगणात देवासाठी फुले आणायला आली. बघते तर अंगणात पूजाची फोटोग्राफी सुरु होती. एका कोपऱ्यात तिची सॅक ठेवली होती.


" कसले गं फोटो काढतेस... " , पूजाने आजीकडे वळून पाहिलं.

" किती सुंदर फुले आहेत तुझ्या बागेत... इतके वेळा आली तुझ्याकडे... आज पहिल्यांदाच पाहिली.. " पूजाने आणखी एक फोटो क्लीक केला. आजी तिच्या मागेच येऊन उभी राहिली.


" दर आठवड्याला येऊन बघ.... रोज आलीस तरी चालेल... जवळपास रोजच फुलतात ती.... तूच नसतेस तिथे. " पूजा काहीच बोलू शकत नव्हती यावर. " तुझे आजोबा सांगायचे.... त्यांचाही एक मोठा वाडा होता. तिथे तर केवढे मोठे अंगण होते त्यांचे. वाडा काही कारणाने गेला , सोबत अंगणही... त्याचीच आठवण म्हणून इथे हे छोटंसं अंगण उभं केलं. तरीही जुन्या आठवणी काढत बसायचे तुझे आजोबा ... " आजीने साडीचा पदर डोळ्यांना लावला. पूजाने आईचे डोळे पुसले. गालावर पट्कन एक kiss केलं आणि बोलली.


" ये हिरोईन .... हसतानाच छान वाटतेस तू... रडली कि आणखी म्हातारी दिसतेस ... " आजीला हसू आलं त्यावर. " चल ... निघताना तरी निदान हसून निरोप द्यावा... चल निघते मी.... " पूजाने सॅक पाठीवर लावली.

" पुन्हा काही दर्शन तुझं ... " आजीच्या या वाक्यावर सुंदर smile दिली पूजाने. आजीला एका सलाम ठोकला . हाताने " Yo " केले. आणि निघाली.


" पूजा " ...कोणत्या शब्दात तिचे वर्णन करता येईल ते माहित नाही. दिसायला नाकी - डोळस नीटसं. हसायची छान. चेहरा हसरा होता ना तिचा. फोटोग्राफीची आवड. अशी ती. कदाचित एवढ्या छान मुलीला नजर लागू नये, म्हणून डाव्या डोळ्याखाली एक मोठा तीळ, असं काही म्हणता येईल अशी जन्मखूण . सडसडीत बांधा, चपळ, काटक... शहरी भाषेत बोलावे तर Fit and Fine.... पण शहरात न राहणारी. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झालं आणि एका मोठ्या कंपनीत software engineer म्हणून जॉबला लागली. दोन वर्ष ' Routine life ' सुरु होतं तीच. अचानक काय झालं, काय माहित. " मी आता शहरात राहू शकत नाही. " असं सणसणीत वाक्य घरच्यांवर टाकून आणि सोबत काही कपडे, काही पैसे आणि सोबतीचा मित्र ... कॅमेरा घेऊन निघून गेली..... वाट मिळेल तिथे.


==================================================================

आकाश खूपच अस्वस्थ असायचा आजकाल. चेहऱ्यावर नाराजी दिसायची त्याच्या. त्यात भरीसभर जून महिना सुरु झालेला. शहरात जरी पाऊस सुरु झालेला नसला तरी संध्याकाळी आभाळ भरून यायचे. चलबिचल व्हायचा आकाश अगदी. सुप्रीला समजत होते ते. तरी काय करणार, तसे हे तिघे ऑफिस सुटलं कि एकत्रच निघायचे. आकाशचे ऑफिस - सुप्रीचे ऑफिस शेजारीच होते ना. त्यामुळे घरी पोहोचेपर्यंत गप्पा- टप्पा सुरूच. संजनालाही आकाश मधला फरक कळू लागला होता.


एक दिवस, संजना सुप्रीच्या घरी आली. " चल ग ..... गच्चीवर गप्पा मारू. " संजनाने घरी गेल्या गेल्या सांगितल.


" इथे बोल कि .... आमच्या घरात काय काटे टोचतात का... कि काही पर्सनल आहे .... उम्म्म्म्म !!!!! " सुप्रीने संजनाचे गाल ओढले.
" येडे .... येतेस कि बोलू मोठ्याने ...... थांबच ... काकी ... " सुप्रीने लगेच संजनाचे तोंड हाताने बंद केलं.
" चल चल ..... तुझाच जय महाराष्ट्र... " दोघी गच्चीवर आल्या. " हा बोल .... संजू.... एवढं काय होते... जे घरात बोलू शकत नव्हती. " संजनाने सुप्रीच्या समोर एक कागद धरला.


" हे काय ... " सुप्री..


" वाचता येते ना ... " संजना . सुप्री लक्षपूर्वक वाचू लागली. नंतर संजना कडे बघू लागली.
" मला काय बोलायचे होते , ते कळलं असेल तुला ... " संजनाने सुप्रीच्या खांदयावर हात ठेवला.
" अगं पण ..." सुप्रीला तिने बोलायला दिलेच नाही.


" हे बघ सुप्री... आकाश कधीच समोर दाखवत नाही त्याच्या feelings , तरी सुद्धा कळतात. खूप मिस करतो आहे तो , त्याचे जुने दिवस.... आणि हि तर त्याची आवड आहे ना ... करू दे मग त्याला.. " सुप्री पुन्हा त्या पेपरकडे पाहत होती. एका photography compition चे पत्रक होते ते . " Wild photography " हा विषय. आकाशचे त्यात प्राविण्य.
" तोच जिंकणार .... यात शंकाच नाही.... पण हे जिंकण्यासाठी नाही , तर त्याचा हरवलेला ' तो ' पुन्हा भेटण्यासाठी .... बघ , तिथे गेला तर तो एकटा नसेलच , बाकीचे हि असतील , म्हणजे त्याच्या सुरक्षितेची काळजी मिटली, शिवाय निसर्गात जायला मिळेल त्याला... जरा फ्रेश होईल तोही... बघ , तिथे लिहिले हि आहे , ग्रुप मध्ये असणार आहेत सर्व स्पर्धक ... विचार कर .... जाऊ दे त्याला ... " संजना सुप्रीचा निरोप घेऊन निघून गेली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: