Julale premache naate - 45 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-४५

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४५

"मी सांगितल ना आता तू सांग बर..." आईने लगेच प्रश्न केला. हो नाही.. करत मी बोलु लागले..


"अग आई.. ते म्हणजे... मला निशांत आवडतो. खरतर खूप आधीपासुन तो आवडू लागला होता. त्याने माझी काळजी घेणं.. त्याला माझ्या बद्दल सगळं नाहीत आहे .., मला काय आवडत.., काय नाही ते.. अग आई त्याने माझ्यासाठी सोडलेली, पाणीपुरी खायला सुरुवात केली.."

"त्यात हर्षल ला ही तो आवडायचा.." आणि मी तिच्या बर्थडे ला झालेला प्रकार सांगितला. हे ऐकून तर आई थोडी शॉकमध्ये होती..

"त्यात आमच्या डान्स नंतर त्याने मला प्रपोज केलं. त्यात माझं ऍकसिडेंट झालं.. त्यानंतर त्याने माझ्यासाठी मंगळवारचे उपवास सुरू केले.. कधीही देवासमोर पाया न पडणारा आता रोज त्याची भक्ती भावाने पूजा करतो..."


"अग आई खुप प्रेम आहे ग निशांतच माझ्यावर आणि...."
मी मान खाली घालुन बोलु लागले... "आणि माझं ही त्याच्यावर खुप प्रेम आहे.. आई मी त्याला विसरू नाही शकत आता.. मला माझं प्रेम विसरायच नाहीये."


हे ऐकून तर आई जोरजोरात हसातलाच लागली... मला तर काहीच कळलं नाही की आई का हसत आहे.. मग मीच तिला जरा रागाने विचारल....

" काय ग आई यात हण्यासारखं काय आहे..??" माझ्या चिडक्या चेहऱ्याला बघून आई अजुनच हसत होती..

"मग हसु नको तर काय करू.. म्हणे मी विसरू शकत नाही.. अग प्राजु बाळा कोण विसरायला सांगत आहे.." तिच्या या वाक्यावर तर मी उडालेच.....


"म्हणजे ग..????"

"अग बाबा आणि मला आधीपासूनच माहीत आहे की निशांतला तु आवडतेस ते.. आणि आज तुझ्याकडुन कळलं की तुला तो.. म्हणजे आता आम्ही लग्नाचा विचार करायला मोकळे.." तिच्या या वाक्याला तर मी लाजलेच...

"काही ही हा तुझं आई..." बोलून मी स्वतःच्या रूमधे पळालेच..

स्वतःला बेडवर झोकुन दिल आणि उशीला मिठीत घेत उशीचा एक गालगुच्छा घेतला... आता फक्त निशांतच्या घरी होकार मिळवायचा होता.. खरतर तो ही मिळणार होताच.. पण आमचं शिक्षण झाल्याशिवाय काहीच करायचं नव्हतं..

या सर्वाचा विचार करत मी कधी झोपले हे मला कळलं नाही... अचानक जाग आली ती मोबाईलच्या आवाजाने..

"काय मॅडम झोपलात की काय..??" तिकडून निशांतचा गोड आवाज ऐकून मी परत लाजले...

"हॅलो... कोणी आहे का..? की मला एकट्यालाच बोलावं लागेल..??"
निशांत मस्ती करत होता..

"हो हो आहे ना.. बोला सर. काय काम काढलं..?" मग मी देखील मस्ती सुरु केली.

"काम आहे त्यासाठीच कॉल केला आहे. चल उठ आणि तय्यार हो. आपल्याला जायचं आहे शॉपिंगला. आणि मी निघालो आहे.. सो लवकर तय्यार व्हा." एवढं बोलून त्याने कॉल ठेवला.. मी बेडवर उठुन बसले मोबाईलमध्ये चार वाजलेली स्क्रीन दिसत होती.. धावत जाऊन फेश झाले आणि तय्यार होऊन बाहेर आले.


"झाली का झोप...?? काही खाणार का.???" आई सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेली होती.. तिथूनच तिने विचारलं..

"नको ग आई आता काही खायला नको.. बाहेर जात आहोत तर खाईन काही तरी..." तिच्या बाजूला बसत मी बोलले..

"ओके ठीक आहे. नीट जा आणि तुझी पण शॉपिंग करून ये. बाबांनी पैसे ट्रान्सफर केले असतील बघ." स्वतःच डोकं पुस्तकात घालत आईने सांगितलं.. मी पण मानेनेच होकार दिला.


काही वेळाने निशांत आला आणि आम्ही निघालो... लिफ्ट ने खाली आलो आणि मार्केटच्या दिशेने निघालो. त्याच्या आवडीच्या ब्रॅंडच्या शॉपमध्ये गेलो...

"मग कोणत्या कलर चा हवा आहे कुर्ता...???" मी आजूबाजूला बघत निशांतला विचारले..

"तोच तर प्रॉब्लेम आहे म्हणून तुला आणल मदतीला.. आता करा मदत.." एवढं बोलून आम्ही एका ठिकाणी गेलो.. दोन- तीन कुर्ते बघितले पण काही पसंद पडत नव्हतं. मग तिथून निघुन आम्ही एका मॉलमध्ये गेलो.. तिकडे छान सेल आणि नवीन पॅटर्न असलेले कुर्ते होते.. मला त्यातला अबोली रंगाचा कुर्ला आवडला.


त्या कुर्त्या वर हलकी निळ्या रंगाची प्रिंट होती. सोबत तिरपा गळा असलेली फॅशन तर चालू होतीच.. मग आम्ही ट्रायल घेऊन तो कुर्ता विकत घेतला.. तिथुन एका साडीच्या शॉपमध्ये गेलो.


"निशांत मला माझ्यासाठी साडी घ्यायची आहे. तिकडे साडीच शॉप आहे आपण घेऊया." एवढं बोलून आम्ही निघालो. त्या शॉपमध्ये जाताच समोर ठेवलेली डार्क ब्लू कलरची पैठणी साडी मला आणि निशांतला एकत्रच आवडली...


"निशांत ही कशी वाटते साडी..???" मी समोर त्या साडीकडे हात दाखवत विचारले. तस त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं...


"अग सेम मला ही हीच साडी आवडली.. तुला खुप गोड वाटेल. चल आपण ट्रायल घेऊया."

एवढं बोलून आम्ही छान ट्रायल घेतला. अजून एक दोन साड्या बघुन आम्ही तीच विकत घेतली. योगायोगाने निशांतच्या कुर्त्याला ती साडी मॅच होत होती...



थोडं फिरून आम्ही खायला गेलो कारण मी जेवले नव्हते आणि का ते देखील मी निशांतला सांगितलं.. आता आईला माहीत आहे आपल्या बद्दल हे ऐकून तर आतापासूनच निशांतला दडपण यायला लागलं होतं.. हे बघुन मी गालातल्या गालात हसत होते.. थोडं खाऊन आम्ही निघालो..


येताना निशांतने मला आमच्या बिल्डिंगखाली सोडले आणि तो गेला.. कारण त्याला आजींचा कॉल आलेला त्यामुळे त्याला जावं लागलं होतं. मी घरी आले आणि आईला साडी दाखवली.. तिला ही साडी खुप आवडली...

"काय ग प्राजु साडी का घेतलीस...?? म्हणजे तुमच्या वयातल्या मुली ड्रेस, नाही तर अजून काही बाकी घेतात.. आणि तु साडी.???" आई आश्चर्याने माझ्याकडे बघत विचार होती...


"अग आई मला यावेळी साडी घ्यावीशी वाटली सो घेतली.." थोडं बोलून मी माझ्या रूममधे निघुन गेले. रात्री बाबांना ही साडी दाखवली त्यांना ही कलर प्रचंड आवडला...


रात्रीच जेवण आटपून आई-बाबांशी थोडं बोलून मी माझ्या रूमध्ये आले. रूममधे येताच मोबाईल पाहिला तर त्यात निशांतचे मॅसेज होते.. ते बघून मी लगेच त्याला मॅसेज केला.. थोडं बोलण झालं... माझी इच्छा तर होती बोलण्याची पण तो जास्त ठकल्याने आम्हाला झोपावं लागलं...


परवा दिवाळीचा पहिला दिवस होता.. बेडवर पडल्या पडल्या माझ्या डोक्यात विचार आले.. त्या दिवशी मी ती साडी नेसेन.. पण त्याचा ब्लाउजचा प्रॉब्लेम आहे...बघु करू काहीतरी ऍडजस्ट...


तो दिवस मला निशांतसोबत घालवायचा आहे. ही दिवाळी मला माझ्या आवडल्या व्यक्ती सोबत घालवायची आहे... स्वतःशीच बडबडत मी झोपी गेले स्वप्नांच्या दुनियेत...


To be continued