खूप साऱ्या विनवण्या ... request करून अमोल पुन्हा पलीकडल्या तीरावर पोहोचला. परंतु आता नवीन प्रश्न.. या सर्वाना शोधायचं कुठे.... धावतच तो नदी पासून दूर आला आणि एक थंड हवेच्या झोताने शहारून गेला. मागे वळून पाहिलं त्याने. पाऊस भरून येतं होता. बापरे !! घाई करावी लागेल आता.. समोरच एक पायवाट दिसली... नक्की गावात जाईल हि वाट... अमोल तिचं वाट पकडून धावत गेला.
पलीकडल्या तीरावर, सई सुद्धा आकाशने सांगितलेल्या गावात पोहोचली. एव्हाना वाऱ्याने चाहूल दिलेली... पाऊस येतं असल्याची. आकाशला लवकर शोधलं पाहिजे. गावात पोहोचली तर कोणालातरी विचारता येईल... सईच्या मनात चलबिचल. तरी एकाला विचारलं तिने ..
" भटक्या ना... आज सकाळीच निघून गेला..... पुढल्या गावाला " सईचा चेहरा एवढासा झाला.
" तरी ... तो गावाच्या वेशीवर एक म्हातारी राहते .... तिथे होता.. आता आहे का बघा.. " पुन्हा पळापळ... सकाळचे ११ वाजत होते. तरी काळोख झालेला. जोराचा वारा झेपावला सईच्या ग्रुपकडे. वीज कडाडली मोठयाने. सर्व वर आभाळात बघू लागले.
जोरात येणार वाटते.... २ दिवस आला नाही ना पाऊस... आता येईल असं वाटते.. अचानक तिला आठवलं... आकाश बोलला जाताना.. " पाऊसच सांगेल... मी आलो आहे ते... " तिने आजूबाजूला नजर फिरवली. त्या ठिकाणापासून ... थोड्या अंतरावर .. एका कठड्यावर ... एक जण पाठमोरा उभा होता... आकाश... हो ... आकाशच तो... सई एकटीच त्याच्या दिशेने धावत सुटली. " आकाश !! " सईने जोराने हाक मारली. त्याने मागे वळून बघितलं. सईला बघून तोही आश्यर्यचकित झाला. सई धापा टाकत त्याच्याजवळ पोहोचली. बाकीचे मागून आले.
" तुम्ही इथे ? आणि किती दमला आहात सगळे.. " ,
" तुझी सु ... " सई काही बोलणार इतक्यात मागे जोराचा आवाज झाला. मागे असलेल्या वाटेवर मोठे मोठे दगड येऊन पडले. म्हणजे मागे जाण्याचा रस्ता बंद झाला.
" इथे थांबणे.... सुरक्षित नाही. पुढे चला.. " आकाशने या सर्वाना पुढे आणलं. पुन्हा मागे गेला. काही गावकरी अडकले होते. त्यांना बाहेर काढायला मदत केली. तरी तो रस्ता आता बंदच झालेला
सईकडे पुन्हा परतला. " तुम्ही का आलात इथे... आता मागे जाऊ शकत नाही. ती वाट बंद झाली आता... घरी कसे जाणार तुम्ही.. " ,
" अरे !! तुझ्यासाठी आलो आम्ही.. तू बोलायचा ना ... सुप्री दिसते... सापडली ती.. " सई बोलली आणि आभाळात विजांचा आवाज झाला. आकाशने पुन्हा वर पाहिलं.
" जोराचा पाऊस येणार वाटते... " आकाश पुटपुटला. सईकडे पाहिलं त्याने. " सुप्री... !! खरंच भेटली का ती ... तेही पावसात.. खरं आहे का " सईने अमोलने send केलेला फोटो दाखवला.
" हीच.. ती... मला स्वप्नांत दिसते ती.... तीच हि सुप्री... " आकाशच्या डोळ्यात पाणी आलं. सगळेच भावुक झालेले... थोडावेळ तसाच गेला. इतक्यात पावसाने सुरुवात केली. सारेच आडोशाला आले.
============================== ================================
अमोल पूर्ण भिजलेला , धावून थकलेला. एका गावात वेशीपाशी येऊन थांबला. " ओ... काका , इथे कोणी शहरातली मंडळी आली आहेत का ... ? " एकजण बाजूने चालला होता. त्याला विचारलं त्याने... " अमोलचा तो अवतार बघून घाबरला तो. त्याने अमोलला एका आडोशाला बसवलं.
" पावसात कशाला पळतोस रे बाबा " ,
" काय करू काका ... खूप घाई आहे... " अमोलला दम लागलेला.
" सांगा ना .. कोणी आलेलं का शहरातले.. ",
" होते ते काल... सकाळीच निघून गेले ते.. " अमोल नाराज झाला.
" चला काका .. मला थांबून चालणार नाही.. निघतो मी .. " म्हणत अमोल पुन्हा धावत निघाला.
एव्हाना दुपार झालेली. अमोल तरी किती धावणार... थकला शेवटी. थांबायला पाहिजे आता. हि लोकं काय दिसतं नाहीत. किती जलद चालतात हे.... एकाकडे जरी मोबाईल असता ना... किती काम सोप्प झालं असत. अमोल मनातल्या मनात बोलत होता. आता नाही जाऊ शकत पुढे. ताकदच नाही आता. थांबू इथेच आज.. त्याने पाठीवरती सॅक खाली ठेवली. tent उभा करायला लागला..
============================== ================================
" आता सांगा... तुम्ही परत आलात... आणि सुप्रीचा फोटो कसा तुमच्याकडे... " आकाश आनंदांत होता.
" तुला आठवते का... ते वादळ आलेलं.. तेव्हा एक ब्रिज क्रॉस केलेला... आपल्या बाजूने एक मोठ्ठा ग्रुप गेलेला... " आकाशला आठवण झाली.
" तो .. तुझा ग्रुप होता... आकाश, तुझा ग्रुप ... तुला आठवते ना.. सुप्री सोबत भटकायचा ते... तोच ग्रुप होता तो.. " सई खूप उत्साहात सांगत होती. बाहेर पाऊस सुरूच होता. आकाशला आधीच भरून आलेलं. त्यात सई बोलत होती तर अधिक भारावून गेला. " त्यातला एक... अमोल नावाचा.. तो भेटला होता आम्हाला.. त्यानेच सांगितली माहिती. अरे हो !! ... त्याला कॉल करायचा आहे. " सईच्या लक्षात आले. लगेचच तिने अमोलला कॉल लावला.
" हॅलो अमोल ना.. " ,
" हो .. बोलतोय.. " ,
" सई बोलतेय.. मला आकाश भेटला आहे. तुझं काम झालं ना... सुप्री असेल तर दे ना फोन तिच्याकडे.. " ,
" नाही भेटले... ते पुढे निघून गेले आहेत. त्यात माझ्या अंगात आता त्राण नाहीत.. पुढे जायचे... पाऊसही खूप आहे... म्हणून थांबलो... ",
" घाई करावी लागेल ना आपल्याला... प्लिज " ,
" हो... सगळं कळते आहे मला... पण पाऊस आणि वारा इतका आहे ना... possible नाही पुढे जाणे. " आकाशने आधीच अंदाज लावला होता पावसाचा. तिला समजलं कि नाही शक्य ते, शांत झाली ती.
" OK ... ते भेटले कि नक्की कॉल कर ... बाय " सईने कॉल कट्ट केला.
" पाऊस आज थांबू शकत नाही. " आकाशने अंदाज लावला पुन्हा.
" आपण मागे जाऊ.. अमोलला सांगते, त्यांना घेऊन ये तिथे. ... तुझे सगळे जुने मित्र भेटतील तुला.. " सईलाच किती आनंद झाला होता.
" मागे जाता येणार नाही.. " आकाश ..
" what happens... " त्या ग्रुपमधल्या एकीने विचारलं.
" त्या वाटेवर दरड कोसळली आहे.. त्यामुळे पुढेच जावे लागेल.. ते सुद्धा पुढे गेले आहेत ना.. मागे फिरणं त्यांना किती शक्य होईल सांगू शकत नाही. नदी तीरावर जाऊ शकत नाही. पाणी वाढले असेल.. त्याचा फोन आला तर पुढेच भेटू असं सांगा... " आकाश शांतपणे विचार करून बोलत होता.
आकाशचा अंदाज खरा ठरला. पावसाने जराही आराम केला नाही. रात्रीपर्यंत तरी तसाच पडत होता. दुसऱ्या दिवसाची पहाट झाली तर आकाश नव्हता जागेवर... सई खडबडून जागी झाली. कुठे गेला हा आता... त्याच सामान तर तिथेच होते. सगळेच आकाशला शोधायला बाहेर आले. थोडेच पुढे गेले असता आकाश येताना दिसला.
" कुठे गेला होतास... " सई रागावली.
" या गावातील लोकांचा निरोप घेण्यासाठी गेलो होतो... पुन्हा इथे येईन का माहित नाही.. माझी माणसं तुम्ही शोधून काढलीत ना... यांनी मला सांभाळलं इतके दिवस... त्यांना bye तर करावं लागेल ना... " आकाशचं बोलणं बरोबर होतं.
" चला... निघूया... रात्रभर झोप नाही.. सुप्रीला भेटायचं आहे ना.. चला भरभर.. " सामान घेऊन निघाले सर्व.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश: