अनेक पुस्तक लिहिली गेली , अनेक कविता लिहिल्या गेल्या .आई बद्दल अनेक शब्द बोललेले जातात .तिची थोरवी ही लोक गातात .ते बरोबर ही आहे .आणि तिच्या आईपणाला मिळालेला तो योग्य न्याय ही आहे . पण आई म्हणजे तरी कोण असते ? एक सुंदर कोवळी मुलगी , जी कोणाची बहीण , कोणाची मुलगी , मग लग्न करून सासरी येते .कोणाची बायको होऊन तर कोणाची सून होऊन , कोणाची वाहिनी , कोणाची काकू , कोणाची मामी ..अशी एक नाही तर हजार नाती जोडते .
घरात नुसता आनंद असतो .तीच नवीन घरात जुळवून घेण चालूचअसत .
हे सगळ चालू असतानाच तिच्यावर आणखी एकाअपेक्षांचे ओझे लादले जाते . चार -चौघी तिला अडवून हसत हसत विचारू लागतात ' ' पाळणा कधी हल्नार ग...... आणि ती हसत पुढे निघून जाते . अस करताकरता वर्ष निघून जाते .आणि तिला ही बाळराजा ची चाहूल लागते .घरातील सगळे खुश होतात .कोणी तिचे कौतुक करते तर कोणी तिचे द्रुष्त काढते .आणि तीही ते आईपण घ्यायला सहज तयार होते .
मग कोण म्हणते , हे नको खाऊ , कोण म्हणत ते नको खाऊ .ह्यानी बाळाला त्रास होईल .ह्यानी बाळाला आराम मिळेल . आणि तीही सगळ्यांच्या गोष्टी काटेकोरपणे पाळते .
येणारा एक एक दिवस ती मोजत असते . आपल बाळ कस असेल , ते आपल्या सारख असेल की त्याच्या बाबा सारख . तिला मुलगा मुलीशी काही देन घेण नसत. तिला फक्त माहीत असत येणार मुल फक्त तीच बाळ आहे . तिच्या प्रेमच प्रतीक .तिच्या आयुष्यातला निरागस गोडवा .
कधी कधी तिला काळजी ही वाटते . आपल्याला ही जबाबदारी पेलाय्ला जमेल ना ? आपण एक चांगली आई होऊ ना . आपल्या बाळाचे भविष्य आपण चांगल घडवू ना . ह्या सगळ्यात तिच्या जोडीदराने तिची काळजी घ्यावी .आपल्याला काय हव काय नको ? ते पहावे .आपल्या सोबत राहावे अस तिला वाटत असत .
आपल्याला हे सुंदर आईपण दिल म्हणून ती देवाचे मनोमन आभार ही मानात असते . हळू हळू जस जसे दिवस पुढे जात असतात तसतसे तिच्या शरीरात सुध्दा बदल होत असतात .आणि ते बदल तिला आता आणि तिच्या सोबत ईतर सगळ्याना सुध्दा जाणवू लागतात . तिच्या खाण्या पिण्यात ही बदल ही जाणवू लागले , तिच्या चेह्रायात ही आता हळु हळू बदल जाणवू लागले . पण हे बदल ही तिने आनंदाने स्वीकारले . जी भाजी खाण्यासाठी ती नाक मूरडायची , तीच भाजी ती आता तिच्या बाळासाठी आवडीने खाऊ लागली .
आता हळू हळू दिवस जाऊ लागले , महिने जाऊ लागले . आत होणारी तिच्या बाळाची हालचाल , तिला जाणवू लागली . तिच्या आईपानाची तिला जाणीव करून देऊ लागली . ती त्या बाळाशी गप्पा मारू लागली . ते म्हणतात ना , पोटात उमलत जाणाऱ्या बाळाला बघण्याचे भाग्य फक्त आई लाच असते . परमेश्वरानी तिची रचनाच अशी केली . तिला सगळ सहन करण्याची ताकद दिली . खरच त्या भगवंताचे आभारच मानले .पाहिजे .
पुढे तिला सातवा महिना चालू होतो . आणि मग तिच्याजवळ च्या बायका तिच्या कौतुक सोहळ्याला जमा होतात .त्याला ' ' आपण डोहाळे जेवण ' ' म्हणतो . तिचे कोड्कौतुक करतात .तिला तिच्या आवडीचे पधर्थ खाऊ घालतात . आणि मग नऊ महिने नऊ दिवसानी कळा सोसत तिचे बाळ अलगद तिच्या कुशीत येऊन झोपते . त्याला बघून ती सगळा त्रास विसरून जाते .
आईपण मिरवत असताना तिने अनेक गोष्टीचा त्याग केलेला असतो . अनेक गोष्टीचा तिला विसर ही पडलेला असतो .आणि हे सगळ तिने आनंदानी स्वीकारले असते .