Matrutva - 4 in Marathi Fiction Stories by Vanita Bhogil books and stories PDF | मातृत्व - 4

Featured Books
Categories
Share

मातृत्व - 4

# @ मातृत्व@#(4)
सौ. वनिता स. भोगील*

काकुना प्रियाचा खुप राग यायचा, मनातून तिरस्कार वाटायचा,,,, पण काहीच उपयोग नव्हता....
.... प्रिया ने थोड घर आवरल आणि आराम करायला गेली,
तेवढ्यात आठवल अरे आईला सांगायची राहिलीच की गोड बातमी..
तिने मोबाइल घेतला ,आईला कॉल केला,,
.......
आई तु आजी होणार आहेस,,,
प्रियाच्या आईला पण खुप आनंद झाला..
आई ने तबेतीची चौकशी केली, अण म्हणाली 'प्रिया लग्न झाल्यापासुन तू एक दोन वेळच माहेरी आलीस, तर मला वाटत आता तू जावई बापुना वीचारुन चार दिवसासाठी ये'
...... प्रिया म्हणाली बर पारस आला की बोलते मी,, अस थोड आईशी बोलून फ़ोन ठेवला,
नंतर प्रिया पण विचार करु लागली खरच की आईकडे गेलेली बरेच दिवस झाले, जावूनच येते,,
तस मलाही थोडा चेंज मिळेल,, पारस आईकडे जायला नाही म्हणार नाही,,
संध्याकाळी प्रियाने पारस च्या आवडीचा शीरा केला,,,,
,,, पारस आज जरा लवकरच आला होता,
फ्रेश होवून दोघे जेवायला बसले,
बोलता बोलता प्रिया म्हणाली मी आईकडे गेलेली खुप दिवस झाले,
चार दिवसासाठी मी जावुन येऊ का?
पारस म्हणाला अग पन तुला स्वताची काळजी घ्यायची आहे, तिकडे जावुन उगिच आईना त्रास,,
,, त्यावर प्रिया म्हणाली मी दुपारी आईला कॉल केला होता, ति पण म्हणाली चार दिवसासाठी येवून जा, म्हणजे तुझी परवानगी घेवून ये अस आई म्हणाली....
... आग माझ्या परवानगी च काय आल, तुला तुझ्या आईकडे जायला मी नाही म्हणेल का?
.. त्यावर प्रिया म्हणाली ,मला माहित होत तू नाही म्हणनारच नाही.दुसऱ्या दिवशी प्रियाने घरातील काम लवकर आवरली,, ऑफिस ला तर पारस ने कालच सांगितले होते,
आज परत प्रिया ने कॉल करून चार दिवसाची सुट्टी घेतली..
.... पारस आणी प्रिया सोबतच निघाले,
तेवढ्यात काकु दारात भेटल्या...
अग बाई प्रिया ....
लगेच कुठे ऑफिस ला निघालिस?
चार दिवस आराम कर जरा...
त्यावर प्रिया म्हणाली ,काकु नाही ओ ,ऑफिस ला नाही चालले, आईकडे जावुन येते, खुप दिवस झाले गेले नाही न म्हणून.
.......
हो का! बर झाल बाई ये जावुन तेवढच आईला पन बर वाटेल.
आणी हो पारस ची काळजी नकोस करु, मी आहे, जेवना खाण्याच बघू आम्ही..
तू निवांत जावुन ये..
हो काकु.......
म्हणून पारस अण प्रिया दोघेही निघाले,
काकु खुश होत्या..
देव जाने काय चाले होते त्यांच्या मनात..
प्रिया तिच्या आईकडे पोहचली,
पारस ला कॉल करून कळवल पण तिने,,
रात्रि पारस घरी आला,
प्रियाची सवय झालेली,ति नाही तर घर नुसत खायला उठलेल,
.... मोबाइल घेवून कॉल करावा प्रियाला म्हणून विंचार करु लागला..
नको कॉल करायचा, एकतर खुप दिवसांनी आईकडे गेली आहे आणी मी उगिच कॉल करून सारख विचारन बर नाही....
पारस स्वताशिच बोलत होता.....
.... उठून फ़्रेश होण्याकरिता निघनार ,तेवढ्यात मोबाइल वाजला..
..
बघितल तर प्रियाचा कॉल.....
पटकन फ़ोन उचलला,, बोला रानीसाहेब आताच तुझी आठवण आली ,कॉल करणार होतो तेवढ्यात तुझाच आला........
....... हो का?
पण आठवण आली असली तरी कॉल मीच केला न..
अग हो न,,, तुला माझ्या मनातल कळत प्रिया सगळ,,
प्रिया...
मग काय तर,, दो दिल एक जान है हम.........
दोघेही हसू लागतात.
बर पारस आता जेवणाच काय करणार?
मी बनवेन काहीतरी,सवय आहे ग मला, तू काळजी नको करु,तू आरामात रहा
.. तू पन तुझी काळजी घे,, म्हणून फ़ोन ठेवला...
तेवढ्यात दार वाजल,
पारस ने दरवाजा उघडला,, समोर स्वाती हातात जेवणाच ताट घेवून उभी होती....
तिला बघून पारस ला आश्चर्य वाटल,,,
का नाही वाटनार?
प्रिया आणी पारस च्या लग्नापासुन स्वाती जेमतेम बोलायची, आणी घरी येन तर क्वचितच असायच.
...... पारस हसत म्हणाला ,,अरे स्वाती मॅडम आज इकडे कश्या वाट चुकल्या,,,,,,,,
,,,तस स्वाती लटकेच रागवल्यासारख म्हणाली, तुला तरी बायको आल्यापासून आमच्याकडे यायला कुठे जमते,,,,,
अग तस काहीच नाही,,
तेवढ्यात स्वाती म्हणाली, मला घरात येऊ देणार आहेस की त्याला पण बायकोची परमिशन घेणार आहेस???....
त्यावर पारस म्हणाला ये न आत, तूच दारात बोलत उभी राहीलिस,,
.....
स्वाती घरामधे गेली...
.. जेवनाच ताट टेबल वर ठेवल,आणी म्हणाली चल पारस लगेच जेवून घे...
रात्रि बाराच्या दरम्यान पारस ला जाग आली ति पण कसल्यातरी आवजामुळे,,,
,,,कुणाच्या तरी रडन्याचा आवाज येत होता,,,
पारस घाबरून उठून बसला,, बघतो तर तो बेड रूम मधे बेड वर असतो,, लाइट लावून पाहतो तर स्वाती बेड जवळ कोपरयात बसून रडत होती....
... तिच्या अंगावरचे कपड़े अस्ताव्यस्त होते,केस विस्कटलेले,,,,
,,,, ओढ़नी बेड वर पारस च्या हाताजवळ पडलेली.....
....... पारस ला काय झाले काहीच कळेना,,
घड़ी कडे लक्ष्य गेल,, बारा वाजुन गेल्या होत्या,,,
पारस खुप घाबरला होता,,,अग स्वाती तू इथे माझ्या बेड रूम मधे काय करतेस,,, म्हणजे तू इथ कशी????

ते पण एवढ्या रात्रि???
स्वाती फक्त रडत होती,,,
काही कळायच्या आत दार वाजले.......
आता मात्र पारस ला काय होतय काहीच समजेना,,,
बेडरूम मधे स्वाति कशी?
आणी एवढ्या रात्रि दार कोन वाजवत असेल?

बाहेरुन काकुचा आवाज आला,, अरे पारस.........
दार उघड़,,,,
पारस च्या जीवात जीव आला..
पारस ने धावत जावुन दार उघडले.........
काकु बड़बड करु लागल्या,,
जेवेन दयायला म्हणून आली आणी इकडेच थांबली,,,, घरात बाईं माणूस नसल्यावर बर दिसत का स्वाती?
तेवढ्यात पारस म्हणाला, हो न काकु,,मि पण कधिपासुन विचारतो आहे पण नुसत रडते,काहीच बोलत नाही,,,
,,,, स्वाती काकु ना बघून काकुजवळ आली, काकु च्या गळ्यात पडून बोलू लागली.......