Addiction - 15 in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | एडिक्शन - 15

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

एडिक्शन - 15

मी 5 दिवसासाठी घरी जानार असल्याने आवश्यक तेवढे कपडे बॅगमध्ये भरले होते ..फ्लाइटला भरपूर वेळ होता त्यामुळे आरामशीर बसून होतो तेवढयात श्रेयसीचा फोन आला आणि म्हणू लागली , " प्रेम आहेस तरी कुठे ? मी केव्हाची तुझी वाट पाहत आहे आणि तू आहेस की आलाच नाहीस .."

मी घड्याळात बघितलं तर फक्त 10 .30 वाजले होते त्यामुळे तिच्यावर हसू लागलो ..मला हसू आवरणच होत नव्हतं तरीही स्वताला आवरत म्हणालो , " काय ग एवढ्या लवकर कुठे गेलीस तिथे ..12 .30 ला आहे न फ्लाइट .." आणि ती रागावत म्हणाली , " शहाण्या आधी हसन बंद कर ..मलाही माहीत आहे की साडे बाराला फ्लाइट आहे पण येताना ट्रॅफिक लागेल म्हणून लवकरच आले आणि तू पण ये लवकर आता .."

मी हसतच म्हणालो , " बर तू घे कॉफी मी येतोय लवकरच .."

तिला म्हटलं असलं तरीही मी 11लाच निघालो ..ऐरपोर्टवर पोहोचेपर्यन्त तीच नाक रागाने लाल झालं होतं .त्यामुळे मी तिच्यापासून पळ काढू लागलो ..नेमकं त्याच वेळी फ्लाइट जाण्याची घोषणा झाली आणि मी वाचलो ..लगेच तिकीट कलेकट केले आणि दोघेही विमानात बसलो ..दोघांच्याही सीट बाजूलाच होत्या ..सामान ठेवलं आणि बोलू लागलो , " काय मॅडम आज सूर्य पश्चिमेकडून उगवला का ? चक्क सलवार लावून आल्या आहात आपण ? की कुणाला इम्प्रेस करायला निघालात ? " आणि ती माझ्यावर चढत म्हणाली , " हो करायचं आहे इम्प्रेस मग ?..शहरात चालतात असे कपडे पण तिकडे चालणार नाही म्हणून घालून आले ..तुला काही प्रॉब्लेम ? "

मी तिला काहीच बोललो नाही ..रागाने तिचा चेहरा थोडा लाल झाला होता ..पण तिला कोण सांगणार की तीच असच रूप मला जास्त आवडत होत ..मी मनातल्या मनात हे सर्व बोलावं आणि ती माझ्याकडे पाहून म्हणाली , " काही बोललास का तू ? " आणि मी त्यावर म्हणालो , " काही एकलस का तू ? " ..तिने नकारार्थी मान हलवली आणि मीही माझी मान खिडकीकडे केली ..काहीच क्षणात विमानाने उडान घेतली ..ए.सी.क्लास च्या तिकीट काढल्या असल्याने थोडी थंडी जाणवत होती आणि तिचा डोळा लागला ..आतापर्यंत दुसरीकडे पाहणारा मी लगेच तिच्याकडे पाहू लागलो ...तिने काळ्या रंगाचा सलवार परिधान केला होता ..ती गोरी पान असल्याने तो रंग तिच्यावर अधिकच उठून दिसत होता ..काहीच वेळात ती माझ्या खांद्यावर येऊन पडली आणि तिला फारच जवळून पाहण्याची संधी मिळाली ..फारच सुंदर क्षण होता तो ..आयुष्यभर तिला तसच पाहता याव अशी मनोमन कामना केली ...क्षणात वाटलं की आज तिच्या गालांवर ओठ टेकवायला मिळाले असते तर फार छान झालं असत पण सध्या तरी तो मला हक्क नव्हता त्यामुळे फक्त तिला पाहण्यातच धन्यता मानत होतो ..फ्लाइट नागपूरला लँड होईपर्यंत मी तिच्याकडेच बघत होतो ..त्यानंतर परत गावी जायला 2 तास लागणार होते ..बसच्या प्रवासामध्ये ती मला बरेच प्रश्न विचारत होती ..ती आज फारच खुश होती शिवाय माझ्या आई- बाबांबद्दल विचारू लागली .मीही तिला सर्व काही सांगत होतो ..शेवटी सायंकाळच्या वेळी आम्ही गावी पोहोचलो ..

श्रेयसी आणि मी जसजसे समोर जाऊ लागलो तसतसे गावातले लोक आमच्याकडे पाहू लागले ..श्रेयसी माझ्यासोबत असल्याने काही मित्र मुद्दामहूनच हात दाखवू लागले पण माझ्या दोन्ही हातात बॅग असल्याने मी त्यांना हसून उत्तर देऊ लागलो ..गावातली अशी पद्धत मला नवीन नव्हती आणि श्रेयसी ते सर्व बघून लाजू लागली ..संपूर्ण गाव पालथा घातल्यानंतर आमचं घर यायचं त्यामुळे गावातून जाण भागच होत ..आम्हाला जाताना काकांच्या मुलाने बघितलं आणि आईला सांगायला निघाला ..घरी गेल्यावर आई मला सोडणार नाही हे नक्कीच होत ..आई स्वभावाने मनमोकळी त्यामुळे ती केव्हा काय बोलनार याबद्दल नेम नसायचा म्हणूनच थोडी भीती वाटत होती ..काहीच क्षणात घरी पोहोचलो ..आईने पाय धुवायला पाणी दिलं आणि म्हणाली , " काय रे आम्हाला न सांगताच सुनेला घेऊन आलास की काय ? " आईच्या अनपेक्षित प्रश्नाने श्रेयसी घाबरली परंतु मी तिला आधीच आईचा स्वभाव सांगितला असल्याने तिने त्यांचं मनावर घेतल नाही ..बहुदा तिलाही आईच सून म्हणणं आवडलं होत .घरात गेलो आणि श्रेयसीची आईबाबांशी ओळख करून दिली ..श्रेयसी अगदी संस्कारी मुलीसारखी वागत होती त्यामुळे मी तिच्याकडे विचित्र नजरेने बघायला लागलो ..फ्रेश होऊन परत येईपर्यंत जेवणाची वेळ झाली होती ..आईने आज साधंच जेवण बनविल होत ..त्यामुळे आम्ही त्याच्यावर मस्त ताव मारला ..नंतर आमच्या सर्वांच्या गप्पा सुरु झाल्या ..श्रेयसिने आपल्या स्वभावाने आईबाबांच मन जिंकून घ्यायला सुरुवात केली ..तर मी आईच्या कुशीत बसून तिच्या गोष्टी ऐकू लागलो ..आई आणि श्रेयसी एका बाजूने झाले आणि माझ्या चुगल्या होऊ लागल्या पण मला काहीच फरक पडत नव्हता ...मी श्रेयसीला डोळे दाखवू लागलो की ती शांत व्हायची पण आईने मला डोळे दाखवले की मग ती पुन्हा बोलू लागायची ..आमच्या गप्पा बऱ्याच रंगल्या होत्या पण सकाळच्या थकव्याने मला झोप येऊ लागली आणि मी झोपायला बेडवर गेलो ..

दुसऱ्या दिवशी आई श्रेयसीला घेऊन आपल्या मैत्रिणीकडे गेली होती ..त्यानाही श्रेयसीला भेटून फार आनंद झाला होता ..तिने काहीच वेळात माझ्या मैत्रिणींना आपलं बनविल होत ..आणि त्याही माझी खिचाई करू लागल्या ..आज आमच्या घरीही बरीच गर्दी होती आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे सर्व श्रेयसीला माझीच बायको समजत होते ..आज जे कुणी येत होते त्या सर्वांमध्ये श्रेयसीबद्दलच चर्चे होते आणि एखादाच माझी विचारपूस करीत होता ..आईचा श्रेयसीला इतरांना दाखविण्याचा प्रोग्रॅम संपला ..बाबा दुपारीच चिकन घेऊन आले होते ..मला आईच्या हातच चिकन खायला फार आवडत होत ..आज श्रेयसी देखील आवडीने आईसोबत स्वयंपाक बनवू लागली होती ..एवढंच काय तर संपूर्ण स्वयंपाक तिनेच बनविला होता ..बाबाही तिच्या हातच खाऊन फार खुश झाले होते ..मी मॅडमचा असा अवतार पाहून अगदी चक्रावून गेलो होतो ..जेवण झाल्यावर आम्ही थोड्या वेळ टीव्ही पाहण्यात घालविला ...

सायंकाळची वेळ असेल ..अलीकडे गावाकडच वातावरण देखील पूर्णतः बदललं होत ..आधी सर्विकडे शेती होत्या पण आता म्हाडाचे रोड झाल्याने सर्व लोक सायंकाळी सैर करायला निघत असत ..मी देखील श्रेयसीला हट्ट करून घेऊन गेलो ..रस्त्यावरून जात असताना राणे काकूंनी आमची विचारपूस करायला सुरुवात केली ..नंतर आम्ही समोर जाऊ लागलो ..काही मित्र अगदीच समोर होते ..त्यांनीही श्रेयसीसोबत पाहून डोळा मारलाच ..मी त्यांना हग करत समोर निघालो ..आम्ही बऱ्याचदूर आलो होतो ..आता फार कुणी दिसत नव्हतं त्यामुळे सिगारेट काढून तिला देऊ लागलो तर तीच म्हणाली , " आपलं ठरलं आहे न की इथे सिगारेट घ्यायची नाही मग कशाला काढतो आहेस फेकून दे सिगारेट .." मी सिगारेट पुन्हा पॉकेटमध्ये टाकली आणि हसू लागलो कारण जीचा एक दिवसदेखील सिगारेटविना जात नव्हता आज ती चक्क सिगारेटला नाही म्हणाली होती ..ती गावाकडच हे वातावरण पाहून फारच खुश झाली होती हे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं ..

एक - एक दिवस जात होता आणि ती माझ्या मैत्रिणींमध्ये रमू लागली ..माझ्या घराबाजूलाच क्रिकेटच मैदान असल्याने आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि श्रेयसी माझी बॅटिंग पाहत होती ..मी बरेच दिवस क्रिकेट खेळलो नसल्याने मला बॉलची भीती वाटत होती त्यामुळे भोपळ्यावरच आउट झालो आणि ती जोराने हसू लागली ..आज चक्क खेळून माझे पाय दुखायला लागले होते ..घरी पोहोचले तेव्हा पाय दुखणं थांबत नव्हते आणि इकडे श्रेयसी चिडवन थांबवत नव्हती ..तिला मारायला जावं तर ती आईच्या मागे जाऊन लपायची आणि मला शांत राहावं लागायचं ..गावाकडचा असा प्रत्येक दिवस आम्ही भरपूर आनंदाने घालविला होता ..श्रेयसिने आई काय असते हे कधीच जाणलं नव्हतं त्यामुळे माझ्या आईशी भेटल्यावर ती आईच्या फारच जवळची झाली होती ..ऑफिसलाही भरपूर काम असल्याने मला पुन्हा परत निघावं लागणार होतं ..शेवटचाही दिवस पूर्ण झाला आणि आम्हाला पुन्हा मुंबईकडे निघावं लागलं ..

जायला निघालो तर आई माझ्यावर नाराज होऊ लागली ..तिला मी आणखी काही दिवस इथे राहायला हव होत पण आता ते शक्य नव्हतं ..श्रेयसीने देखील आईला मिठी मारली आणि आम्ही जाऊ लागलो ..आई - बाबा मात्र आम्हाला बस स्टँडवर सोडायला आले होते ..माझे सर्व मित्र - मैत्रिणी मला आधीच भेटून गेले होते त्यामुळे मलाही परत जाताना त्रास होऊ लागला होता ..पाय गावातून निघत नव्हता तरीही मी आई- बाबांना भेटून मुंबईच्या प्रवासाला निघालो ..या काही दिवसांनी माझ्या आणि विशेषतः श्रेयसीच्या आयुष्यात काही मौल्यवान क्षण आणले होते ..तिने ते सर्व बोलून देखील दाखवलं होत ..मलाही तिला आईची माया लाभू द्यायची होती शिवाय माझ्याशी लग्न करणार का विचारायचं होत त्यामुळे आता पुढचे दिवस माझ्या आयुष्यात खूप खास होते ..कदाचित माझ्या जीवनाची दिशा ठरवणारे हे क्षण होते ..

क्रमशः ...