A deal in my life - 3 in Marathi Fiction Stories by PrevailArtist books and stories PDF | माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ३

Featured Books
Categories
Share

माझ्या आयुष्यातलं एक डील भाग ३

आता मंजिरीच फर्स्ट इयर संपलं म्हणून तिच्या बाबांनी तिच्या लग्नाची तारीख ठरवायला शुभम च्या मंडळींना घरी बोलावलं पण शुभम आला नाही काही कारणाने त्याला म्हणजेच ऑफिस वर्कमुळे येता आलं नाही मंजिरी थोडी निराश होती पण खुश होती की आता आपण कायमचे एकत्र येणार, तारीख ठरवली ह्या महिन्याच्या शेवटच्या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे नंतर एक पण मुहूर्त मिळणे कठीण होते म्हणून मग त्यांनी लागेचचीच मुहूर्त ठरावला , हे सगळं मंजिरीच्या समोर होत होत तिला खूप आनंद झालेला,
सगळे गेल्यावर मंजिरी आपल्या खोलीत गेली तीला खूप धक्का बसला,तिने जे समोर पाहिलं ते ती बघत बसली होती, तिला लगेच त्याने उचलून घेतलं आणि मध्ये आणून ठेवलं ती अजून शॉक मध्येच होती त्याने एक गाणं लावलं तेव्हा ती भानावर आली , ती बघते तर आपली रूम पूर्ण गुलाबाच्या पाकळ्याने, लाल फुगे ने सजवले होते , तिच्या समोर शुभम गुढ्याघ्यावर बसून होता त्याने एक रिंग आणली तिच्या समोर ठेवली आणि विचारलं," will you marry me..?"

मंजिरी इतकी खूश होती की तिला खूप रडायला आलं, हे तिच्यासाठी surprise नवीन होत आणि आपलं प्रेम आपल्या समोर उभे होते,
मंजिरीने हळूच त्याच्या हातात हात दिला शुभम ने रिंग घातली तीने लग्न करण्याची कबुली दिली,
मग शुभम उठून तिला आपल्या जवळ ओढतो, तिच्या कमरेत हात घालतो, तिच्या डोळ्यातलं पाणी पुसतो तिच्या कपाळावर किस करतो,मंजिरीला तेव्हा शहारा आलेला असतो मग ते दोघे खूप जवळ येतात अलगद ओठाचे किस घेतात, मंजिरिसाठी चा तो दिवस खूप अविस्मरणीय असतो ती तो कधी न विसरणार....


आता खूप कमी वेळ होता लग्नला फक्त 21 दिवस उरलेले त्यात सगळ्यांना सांगायचं, शॉपिंग,पार्लर आणि इतर काही खूप करायचं होत. मंजिरीच्या आईचा खूप उत्साह वाढला होता. त्यात अचानक आई आजारी पडली तेव्हा खूप काम मंजिरीच्या अंगावर पडली होती आणि हॉस्पिटलमद्ये ऍडमिट करावं लागलं
आईच अचानक आजारी पडल्याने तिला काही सुचत नव्हतं कारण तिला तिच्यासाठी वेळ देता येत नव्हतं, खूप चिडचिड झाली
अशीच एक दिवस संध्याकाळी घरी आली थोडा वेळ सोफ्यावर पडली आणि आईचा विचार करत होती कि माझं लग्न झाल कि हीच कसं होईल ह्या विचाराने तिला रडू आलं, आणि तिला जाणवलं की आपल्या बाजूला कोणीतरी बसलेय, तोंडावर हात ठेवून डोळ्या समोरचे बोट बाजूला करून पाहिलं तर शुभम बाजूला बसला होता हातात चहाचा कप होता, तिला आचर्य वाटलं, मग तिने त्याला गच्च मिठीच मारली, शुभम ने पण तिला एकदम लहान मुलासारख कुरवाळल , तिचे डोळे पुसले आणि तिला चहा दिला,
तीच रडणं थांबत नव्हतं कारण आज तिला खरंच खूप आईची काळजी वाटात होती , शुभम तिच्या हातात हात घालून तिला समजावलं कि ," आई लवकर होईल बरी तू जास्त विचार नको करू मी तुला कधीच आईपासून दूर नेणार नाही जेव्हा कधी तुझं मन झालं तर तू बिंदास आईकडे ये" तिच्या कपाळाला किस करून तो तिला आपल्या मिठीत घेतो
ह्या बोलण्याने तिला खूप बरं वाटत,
तिला शुभम बद्दल अजून अभिमान वाटतो.


असेच दिवस जातात लग्नाला आता फक्त दोन दिवस राहिले असतात, त्यातच मंजिरीची आई बरी होऊन येते, आपल्या मुलीला बघून मंजिरीच्या आईला बर वाटत, आई पूर्ण रिकव्हर झालेली बघून मंजिरीला पण बर वाटत
आज त्यांच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो, मंजिरी आपल्या भाऊला म्हणजे पियुषला थंड पाण्याच्या बॉटल आणायला सांगते
पियुष जरी लहान असला तरी तो खूप समजूतदार तर होता,