"ते बाकीच्यांसाठी होत, आता खर बोल माझ्याशी. सांग कशासाठी हे उपवास.. निशांत मला माहित आहे तुला भूक सहन होत नाही. मग हे कशाला करतो आहेस." मी काळजीपोटी त्याला विचारले असता. त्याने फक्त एक मोठी स्माईल दिली.. "वेडु तुझ्यासाठी करतो आहे."
स्वतःचे डोळे बंद केले. एक दीर्घ श्वास घेतला आणि तो बोलु लागला.. "तुला माहीत आहे., त्यादिवशी तुला प्रपोज केलं आणि मी सरांनी बोलावल म्हणून गेलो. आणि जेव्हा परत आलो तर तू तिथे नव्हतीस.. मी पूर्ण कॅम्पसमध्ये शोधलं तुला.. पण तू कुठेच दिसत नव्हतीस. तेव्हा एका मित्राने सांगितलं की, कॉलेजसमोर एक ऍकसिडेंट झाला आहे... पळत बाहेर आलो आणि....." स्वतःचे डोळे पुसत तो परत बोलु लागला.
"तु त्या रक्ताच्या थारोळ्यात पडली होतीस... सगळे फक्त बघण्याची भुमिका करत होते. मदत मात्र कोणीच करत नव्हत. मी धावत तुझ्या जवळ आलो. तुझें श्वास चालू होते हे बघून देवाचे आभार मानले ग... तेवढ्यात राज आला आणि आम्ही तुला त्याच्या गाडीमध्ये बसवलं.. तु तर त्यावेळी ही रडत होतीस... मला वाटलं तुला दुखतंय. वेदना होत असतील म्हणुन तुझ्या डोळ्यातुन पाणी येत आहे. पण तुला माहीत आहे तुझ्या तोंडुन फक्त एकच वाक्य बाहेर पडत होतं..." त्याच्या प्रत्येक वाक्यावर मी अवाक होऊन निशांतकडे बघत होते.
"मी नाही माफ करणार तुला हर्षु.., तु माझ्या निशांतला रडवलस..." हे वाक्य तु बोलत होती आणि हळूहळू डोळे बंद केलेस. मला तर काहीच सुचत नव्हतं की काय करू. आम्ही या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तुला... डॉक्टरांनी सांगितलं होतं शुध्द नाही आली तर तू कोमात जाऊ शकतेस.. नाही ग सहन होत होतं मला. मग निघालो तुझ्या लाडक्या बाप्पाकडे जाब विचारायला.." मग त्याने तिकडे घडलेलं सगळं सांगितलं. माझा तर विश्वासच बसत नव्हता की, निशांत आपल्यासाठी चालत सिद्धिविनायक मंदिरात गेलेला. मनात देवाचे किती आभार मानु हेच कळत नव्हतं.
"त्या बाप्पाला जरा रिषवत देऊन आलो आहे की, तु शुद्धीत आलीस तर उपवास करेन आणि घरी त्याची स्थापना." एवढं बोलून तो शांत झाला. मला तर कळतच नव्हतं की, मी कस व्यक्त होऊ. किती प्रेम करतो आपल्यावर निशांत.. एवढं प्रेम करणारा भेटला मला. किती नशीबवान आहे नाही मी.." स्वतःशीच बोलून मी निशांतला नकळत मीठी मारली. त्यालाही त्याची गरज होतीच...
हे चालू असताना अचानक नर्स आली आणि त्यामुळे सगळाच गोंधळ झाला.. निशांत तर चक्क लाजून पळाला रूमबाहेर.. मी गालातल्या गालात हसत होते. नंतर काही मेडिसिन घेऊन झोपले. संध्याकाळी आजी-आजोबा आलेले. त्यांच्याशी गप्पा मारता मारता कधी वेळ गेला ते देखील कळलं नाही.
सर्वांचे निरोप घेऊन मी आराम करत होते. मला झोप येत नव्हती म्हणून निशांत काही ना काही करत होता. जस की, गप्पा मारन, जोक सांगणे.. भले मग ते मला कळत नसतील तरीही त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच मला हसु जास्त येत होतं. स्टोरी वाचून दाखवणं. छान काळजी घेत होता.
आज सकाळी लकरच मला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आलं होतं. कारण माझं एक छोटासा ऑपेशन जे होत. त्यानंतर परत माझ्या रूममधे शिफ्ट झाले. सगळेच माझी चांगली काळजी घेत होते स्पेशिएली निशांत. त्यामुळे आमच्यातील प्रेम अजूनच बहरत चाललं होतं... त्यारात्री सगळे भेटुन गेले. बाहेर बाबा आणि निशांत होतेच. मी शांत झोपले होते कारण ऑपेशन नंतर मला आरामाची जास्त गरज होती. त्यात ऑक्सिजनच मास्क मला लावण्यात आलेलं..
अचानक कोणी तरी माझ्या रूममधे आल. "माझ्या लाईफची माती करून तु कशी ग जगू शकतेस... निशांत तर माझा झाला नाहीच, पण आता तुझा होऊ देणार नाही... तु माझं नाव सांगून तुझ्यामुळे आधीच मी माझ्या पपांच्या नजरेत पडले आहे. त्या पोलीसांना माझ नाव सांगितलंस आणि त्यामुळे माझ्या वडिलांना किती प्रॉब्लेम झाले... त्यांना आमदार पद सोडावं लागणार आहे. पण तू नको टेंशन घेऊस मी तुला चांगली मौत देईल... शांतपणे झोपुन जाशील तु.." एक खुनशी हास्य करत ती व्यक्ती माझ्या चेहऱ्याजवळ आली आणि...
माझ्या चेहऱ्यावर असलेला तो ऑक्सिजनचा मास्क काढला... मी तर एखाद्या माशाला बाहेर काढावे तशी तडफडत होते आणि ती व्यक्ती आनंद घेत हसत माझ्या त्या अवस्थेचा... त्या खुनशी नजरेने, आणि आनंदाने बघत होती. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मला अस बघून ती रूमबाहेर निघाली..
मी तर तडफडत होते की, देवाने माझं ऐकल आणि निशांत आत आला.. मला अस बघून आधी त्याने ते मास्क लावले आणि डॉक्टरांना बोलावून आणाल...डॉक्टरांच्या प्रयत्नाने मला परत जीवनदान मिळत होत.. पण प्रश्न होतो तो हे कोणी केलं असेल.. निशांत तर आता पेटून उठला होता त्याचा शक होता तो हर्षलवर...
बाहेर येऊन त्याने आधी पोलिसांना कळवलं. ते देखील लगेच आले. माझ्याशी तरी बोलण झालं नाही कारण एवढं सगळ्याने मी चांगलेच घाबरले होते... मग बाकीच्यांशी ते बोलले..तपासणी केली आणि मला भेटण्यासाठी सकाळी येऊ अस सांगून निघुन गेले.
सकाळी मी डोळे उघडले.. कालच स्वप्न होत की सत्य हे मला कळत नव्हतं. म्हणून मी निशांतला बोलता बोलता विचारले... "निशांत मला एक सांग, काल काही झालेलं का..?? कारण मी खुप भयानक स्वप्न पाहिले. ज्यात कोणी तरी माझं ऑक्सिजन मास्क काढून मला मारण्याचा प्रयत्न करत होत. आज तु मला वाचवलंस नेहमी प्रेमाने." मी छान हसुन एखादं स्वप्न सांगावं तस सांगून टाकले.
पण निशांतच गंभीर चेहरा बघून मला काहीच कळत नव्हते. "हनी- बी कालच स्वप्न नव्हतं. खरच कोणीतरी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होत. मला तरी वाटते ते हर्षल असेल. आणि खरच जर ती असेल ना तर मी तिला सोडणार नाही..." निशांत चांगलाच तापला होता. "शांत हो तु, काही होणार नाही मला तू आहेस ना माझ्यासोबत नेहमीच." मी त्याच्याकडे बघत गोड स्माईल दिली. तेव्हा कुठे तो शांत झाला.
काही वेळाने पोलिक आणि बाबा एकत्र रूममधे आले. माझ्याशी बोलून तरी त्यांना काहीच मिळाल नाही, कारण मी शुद्धीतच नव्हते. मग त्यांनी हॉस्पिटलमधले सीसीटीव्ही कॅमेरा चेक केलं आणि त्यांना जे हवं होतं ते मिळाल. तसे ते तडक निघून गेले.
निशांतचा डाउट खरा ठरला होता. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन हर्षल होती. पोलीस तिच्याच घराकडे तिला अटक करण्यासाठी निघाले होते. जसे ते तिथे पोहोचले त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... कारण मिस्टर सरणाईकांच्या घरी गर्दी जमली होती. कोणीतरी मरण पावले असावे अशीच ती गर्दी होती. पोलीस कसे तरी आता गेले आणि त्यांना शॉक बसला कारण.. समोर हर्षलची मोठी हार चढवलेली फोटोफ्रेम आणि समोर सफेद कपड्यात गुंडाळलेली हर्षल निपचित पडली होती..
बाजूला उभे असलेल्या पीए ला विचारल असता कळलं की, काल बाहेर गेलेली. आणि येताना तीच ऍकसिडेंट झालेलं. कोणी केलं, की झालं ते माहीत नाही. पण त्यांच्या हातातली चालू केस मात्र बंद करावी लागणार होती. तस त्यांनी निशांतला कॉल केला. आणि घडलेलं सगळं सांगितलं. कशीही असली तरी ती मैत्रीण होती या नात्याने निशांत त्यांच्या घरी पोहोचला.
कारण सध्या राजला गरज होती सपोर्ट ची. हे सगळं मला मात्र कोणी संगीतल नाही. विधी आटपून निशांत हॉस्पिटलमध्ये आला. मी विचारले असता मला मात्र काहीच कळू दिल नाही.
पण या सर्वांत कोणी तरी स्वतःला शाबासकी देत होतं. त्या मिठ्ठ काळोखात चेअरवर झुलत स्वतःच्या प्लॅनवर कोणी तरी हसत होत...
to be continued.....