Addiction - 14 in Marathi Fiction Stories by Siddharth books and stories PDF | एडिक्शन - 14

Featured Books
Categories
Share

एडिक्शन - 14




डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी तोंडावरून मास्क काढला ..मी लगेच त्यांच्या जवळ पोहोचलो आणि ते ओरडतच म्हणाले , " प्रेम काय आहे हे ? ..किती ड्रग्स घेतले तिने आणि तुला पाहता पण आलं नाही का तिच्याकडे ? "

" सॉरी सर मी बाहेर होतो.. काही वेळापूर्वीच आलो ..ती अशा अवस्थेत दिसली आणि लगेच तिला इकडे घेऊन आलो ..मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं ..सॉरी सर ..पण तिला काही झालं तर नाही ना ? " , मी म्हणालो ..

आणि डॉक्टर म्हणाले , " यावेळी तर वाचली पण पुढच्या वेळी वाचणार नाही हे लक्षात घे शिवाय पोलिस कंप्लेट पण करावी लागेल ड्रग्सची केस असल्याने .."

सर समोर चालू लागले आणि मी त्यांना तक्रार करू नका म्हणून विनंती करू लागलो ..एकदा तक्रार गेली असती तर पोलिसांनी तिला खूप सतावल असत शिवाय तिचा फायदा घेण्याचीही शक्यता होती म्हणून सरांना तक्रार न करण्याविषयी विनंती करत होतो ..आणि शेवटी सर म्हणाले , " तू मिश्रा सरांचा खास आहे म्हणून आज तुला सोडतो आहे पण लक्षात घे की पुन्हा अशी चूक होणार नाही .."

मी त्यांना विश्वास दिला आणि ते बाहेर गेले ..रात्रीचे 2 वाजले होते आणि श्रेयसीला आय . सी . यु . मध्ये शिफ्ट करण्यात आलं ..ती वाचली होती पण अजूनही तिला होश आला नव्हता ..सर्वच झोपायला निघून गेले ..मीही सकाळपासून खूप थकलो असल्याने बाहेरच्या टेबलवर बसल्या - बसलीच झोप लागली ..सकाळी लोकांच्या आवाजाने झोप उघडली ..श्रेयसी अजूनही बेहोशच होती त्यामुळे मी फ्रेश व्हायला निघालो ..बाहेर कॉफी घेतली आणि परत आलो एव्हाना श्रेयसीला होश आला होता ..एकतर मला तिचा खूपच राग आला होता पण याक्षणी तिला काहीच बोलत योग्य नव्हतं म्हणून स्वताला शांत करून घेत आतमध्ये पोहोचलो ..तिने मला पाहिलं आणि तिचा चेहरा क्षणात खुलला ..तिला आपण इथे कसे याबद्दल काहीच माहिती नव्हतं म्हणून मीच थट्टेत म्हणालो , " काय मॅडम आणखी हवे आहे का ड्रग्स ? ..हवे असेल तर आणून देतो .." तिला माझा रोष कळला आणि ती त्यावर म्हणाली , " सॉरी प्रेम पण या काही दिवसात तू माझ्याशी बोललाच नाहीस ..गेल्या काही दिवसात तुझ्याविना एक क्षण देखील जगणं कठीण झालं होतं ..तुला फोन केला तरी तू उचलत नव्हता आणि अलीकडे तुझा फोन पण बंद होता आणि मला स्वतःला सावरन शक्य झालं नाही म्हणून ड्रग्स घेऊन बसले ..सॉरी माझ्यामुळे पुन्हा तुला त्रास होणार नाही ..सॉरी "

यात माझीही थोडी फार चूक होतीच ..गेले कित्येक दिवस मी तिच्याशी बोललोसुद्धा नव्हतो त्यामुळे ती एकटी पडली आणि तिने अस पाऊल उचलल होत ..त्यामुळे आजपासून तिला कधीच एकट सोडायच नाही अस ठरवून तिला आराम करायला सांगितलं ..तिला हॉस्पिटलमधूनच जेवण अरेंज करून दिल होत ..ती वाचली यातच सर्व काही आलं होतं ..पहिल्यांदा मी तिच्यासाठी इतका बेचैन झालो होतो ..त्यामुळे या क्षणापासून तिला अगदीच जवळ ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो ..ती आराम करत होती आणि मी बाहेर बसलो ...

काल प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने सरानी आज पार्टी ठेवली होती ..सर मला सकाळपासूनच फोन करत होते पण फोन घेणं मी टाळलं होत ..पुन्हा एकदा सरांचा फोन आला आणि त्यांना तब्येत बरी नसल्याचं कारण देऊन येण्यास नकार दिलास शिवाय श्रेयसीसोबत दोन दिवस आणखी राहावं लागणार असल्याने मी दोन दिवसांची सुट्टी काढली होती आणि सरांनी देखील ती मान्य केली ..

आता माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि क्षण तिचा होता फक्त तिला मनातलं सांगू शकलो नव्हतो ..तिची जी अवस्था होती अगदी तशीच अवस्था माझीही होती पण मी योग्य संधीच्या शोधात होतो ..हे दोन दिवस श्रेयसीची काळजी घेण्यातच गेले ..तिचाही माझ्यावरचा विश्वास आणखी घट्ट होऊ लागला होता ..मी तिची इतकी काळजी घेतोय हे पाहून तिला आनंद होऊ लागला होता ..सर्व कस मस्त सुरू होत ..शेवटी दोन दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळाला ..तिच्या घरी पोहोचलो तेव्हा ड्रग्स , ड्रिंक आधी बाहेर फेकले ..ती मला रागावत होती पण मी आज तीच काहीच ऐकणार नव्हतो ..ती कितीतरी वेळ माझ्या मागे लागून होती पण मी एकदा रागाने तिच्याकडे पाहिलं की मग मात्र ती काहीच बोलत नसे ..मला जमेल तशी तिची काळजी घेत होतो ..ऑफिस सुटलं की सरळ तिच्या घरी जायचो आणि बाकी वेळ फोनवर कनेक्ट असायचो ..आयुष्याने दोघांच्याही आयुष्यात एक अनपेक्षित वळण घेतलं होतं जे दोघानाही हवंहवंसं होत आणि आम्ही त्या क्षणात एकमेकांना झोकुन देत होतो ..

मी पुन्हा ऑफिसला जाऊ लागलो होतो ..प्रोजेक्ट पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावरच होती पण यावेळी ते सर्व डिपार्टमेंट मी माझ्या काही खास लोकांना वाटून दिले त्यामुळे कामाच ओझं थोडं फार कमी झालं आणि मी सर्वाना वेळ देऊ लागलो ..निशालाही भेटून भरपूर दिवस झाले होते त्यामुळे ती देखील नाराज होती तर गेले दीड वर्ष घरी गेलो नसल्याने आई देखील नाराज होती त्यामुळे यावेळी घरी जाण गरजेचं होतं ..आईची तब्येत खराब असल्याचा बहाणा करून मी सरांकडून सुट्ट्या काढून घेतल्या आणि गावी जायची तयारी पूर्ण झाली ..

उद्या दुपारची फ्लाइट होती ..कपड्यांची पॅकिंग करून झाली होती ..मागच्या वेळी श्रेयसीला न सांगताच निघालो होतो तेव्हा ती चुकीच पाऊल उचलून बसली होती त्यामुळे यावेळी तरी तिला सांगून जाण गरजेचं होतं म्हणून मॅडमला फोन केला ..कॉल रिसिव्ह करताच ती म्हणाली , " हाय कसा आहेस ? " आणि मी उत्तर देत म्हणालो , " मी मस्त आहे मला काय झालं..बर एक ना !! तुला सांगायचं होत की मी उद्यापासून माझ्या गावी जाणार आहे सो म्हटलं सांगून जावं ..काळजी घे स्वताची ..काही लागलं तर कॉल कर .."

" हो .. हो आला मोठा शहाणा म्हणे काळजी घे ..पण अस नाही म्हणू शकत की माझ्यासोबत चल ..बरोबर आहे म्हणा एका वैश्येला आपल्या घरच्यांशी भेटवायला कुणालाही आवडणार नाही ..ठीक आहे तू ये जाऊन ..मी घेईल माझी काळजी .." , ती एवढं बोलून शांत झाली ..

समोरून काहीच आवाज येत नव्हता आणि मी देखील काही वेळ शांत झालो ..थोड्या वेळाने चुप्पी तोडत बोलू लागलो , " बर चल मग घे पॅकिंग करायला पण पुन्हा जर अस बोलली तर तुला सोडणार नाही बर का ? आणि कोण वैश्या ? ..मी कधी तुला त्यादृष्टीने बघितलच नाही ..तू माझी मैत्रीण आहेस मग जग काहीही म्हणू दे मला फरक पडत नाही आणि हो बर का माझ्या घरच्यांना तुझ्याशी भेटून फार आनंद होईल सो चल तयारी कर फक्त येण्यासाठी एकच अट या आहे की तिथे स्मोकिंग करता येणार नाही .."

आणि ती ओरडत म्हणाली , " खरच ना प्रेम !! आणि सॉरी मी तुला मानविण्यासाठी तस म्हणाले ..मान्य आहेत बाबा तुझ्या सर्व अटी ..मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी खूप एकसायटेड आहे बर का काकूंना भेटायला ..ए पण शहाण्या किती वाजता निघायचं आहे ते तर सांग ? "

" काही नाही 12 वाजता निघायचं आहे सो तयार रहा आणि उशीर नको करू नाही तर मी तुला इथेच सोडून जाणार बर का ? ", मी खेचत म्हणालो

आणि ती देखील म्हणाली , " तू सोडून गेलास तर जीवच घेईल मी तुझा .."

थोड्या वेळ गप्पा मारून मी फोन ठेवला ..खर सांगू तीच माझ्यासोबत असणं मलाही फार आवडल होत फक्त मी तिला ते सांगू शकत नव्हतो शिवाय ती सोबत असती तर मला तिची काळजी करावी लागली नसती म्हणून त्या दृष्टीने हे छानच झालं होतं ..आता उद्याचा दिवस आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षणांपैकी एक क्षण असणार होता ज्याला आम्ही कधीच विसरु शकणार नव्हतो ..

क्रमशः ..