Julale premache naate - 37 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-३७

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-३७

आज सकाळीच मला लवकर जाग आली. उठुन बसायचा प्रयत्न केला तर काही जमत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं तर कोणी नव्हतं. मग तशीच पडून राहिले. काही वेळाने एक नर्स आली आणि तिच्या मदतीने तिने मला बेडला टेकून बसवले.... "काही हवं आहे का तुम्हाला.??" एक गोड स्माईल देत तिने माझ्याकडे पाहिलं. "मला जरा आरसा देता का तुम्ही..?? मला स्वतःचा चेहरा बघायचा आहे." माझं बोलण ऐकून ती "आणते हा" एवढं बोलून रूमबाहेर गेली.


सोबत आली तेव्हा एका हातात नाश्ता आणि एका हातात आरसा. तो आरसा त्यांनी माझ्याकडे दिला. मी रोजच्या सारख म्हणून स्वतःला आरशात आणि.........



हातातला आरसा कधीच खाली पडला होता. तोंडातुन शब्द फुटत नव्हते. दरवाजा उघडून प्रसन्न चेहऱ्याने निशांत माझ्यासमोरून आत आला. "गुड मॉर्निंग हनी-बी." एवढं बोलत तो माझ्या दिशेने चालत आला. पण माझा शुन्यात लावून बसलेला चेहरा बघून त्याने चालत येत विचारल.. "काय ग, काय झालं.???" तो जवळ येताच मी त्याला बिलगले आणि जोरात रडु लागले. मला अस रडताना बघुन तर त्याला कळतच नव्हतं की, नक्की काय झालं आहे.




मी फक्त रडत होते... काहीच बोलत नाहीये हे बघून निशांत माझ्या बाजुला बसला.. माझी हनुवटी वर करत त्याने मला विचारले... "इकडे बघ माझ्याकडे..., माझ्या डोळ्यात बघ... काय झालं हनी-बी.??" त्याने मला प्रेमाने विचाले असता माझ्या तर तोंडातुन शब्दच फुटत नव्हते.. मी स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवत अजून रडु लागली.




"बघ ना निशांत काय झालं माझ्या चेहऱ्याच, किती विद्रुप आणि या ठिकठिकाणी भरलेल्या जखमा. बघ ना रे कसा झाला आहे. आता तुझं प्रेम ही कमी होईल ना रे माझ्यावरचं.?!!" मी माझ्या चेहऱ्यावर हात ठेवुन रडत विचारले. हे बघून निशांत माझ्या जवळ बसला.




"ओ मॅडम, इकडे बघ माझ्याकडे..." तो माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलु लागला. "तुझ्या चेहऱ्यावर नाही, तर तुझ्या आत्म्यावर प्रेम केलं आहे. तु जशी आहेस ना, हसरी, नेहमी दुसऱ्यांना आनंद देणारी. अशा चुलबुलीत मुलीवर प्रेम केलय. तुझा चेहरा काही खराब नाही झालाय बाबु, बस त्याला थोडशी दुखापत झाली आहे."




"आणि काही ही झालं ना तरी, माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही. आणि कमीही होणार नाही. कळलं का वेडाबाई." त्याने छान समजावलं मला. "चला आता जास्त विचार करु नका." स्वतःच्या हाताने बाजुला ठेवलेली नाश्त्याची डिश घेतली आणि मला छान भरवलं. मी नको बोलत असताना ही ते खायला लावून मेडिसिन ही घ्यायला लावल्या. हे सगळं तिथे उभी असलेली नर्स बघत होती. गोड हसली ती आणि निघून गेली.



"किती प्रेम करतो हा आपल्यावर.." मनात येऊन गेल. लक्ष दारात गेलं तर आई-बाबा आत येत होते. "काय, कसल्या गप्पा चालू आहेत. आम्ही डिस्टर्ब केली की काय..??" बाबा हसून बोलले. "काही नाही बाबा.., इकडच्या तिकडच्या गप्पा बाकी काही नाही.." निशांतने माझ्याकडे बघुन सगळं सांभाळून घेतलं.




"चला नाश्ता करून घ्या" आई बॅगेतुन आणलेला पोह्यांचा डबा काढत बोलली. "आई, प्राजुचा झाला आहे आताच मी तिला भरवलं.., म्हणजे तिला दिल." स्वतःची जीभ चावतच निशांत बोलला. तस आईने माझ्याकडे पाहिलं. मी तर लाजलेच... हे बघून आईला जे समजायचं ते ती समजली. "बर तु तरी घे करून..," अस बोलत आई ने एका डिशमध्ये पोहे निशांतच्या हातात दिले.




"आई, नको मला..." त्याच्या या वाक्यावर तर मी माझे डोळे मोठे केले.. "अरे तुला आवडतात ना माझ्या हातचे पोहे..??!" आई हातात पोह्यांची डिश घेऊन आश्चर्याने निशांतकडे बघत बोलली. "नंतर खाईन.., मी आलोच हा." एवढं बोलून निशांत रूमबाहेर गेला. आम्ही तिघेही त्यांच्याकडे बघत राहिलो.



मग थोडं बोलून मी आराम करायला बेडवर झोपले. आई-बाबा ही बाहेर गेले. एकटीच विचार गुरफटलेली मी.. स्वतःच्या विश्वात हरवलेली... निशांतची आठवण आली. "किती काळजी घेतो नाही निशांत...!!" स्वतःशीच बोलत मी झोपी गेले.



इकडे हर्षुच्या घरी पोलिस पोहोचले... "मिस्टर सरनाईक..., हॅलो मी इन्स्पेक्टर जोशी. तुमच्या मुलीला बोलवा.. ती एक संशयित आरोपी आहे." एवढं बोलत इन्स्पेक्टर जोशी बाजूच्या चेअरवर बसले.... " तुम्ही कोणाच्या घरात येऊन काय बोलात आहात याच भान आहे का तुम्हाला.???" तिच्या वडिलांनी रागात पाहत विचारले.



"सर, आम्ही पीडित व्यक्तीची जुबानी घेऊन आलो आहोत. त्यावरुन आम्हाला मिस हर्षल ला पोलिस स्टेशनमध्ये न्यावं लागेल. तस आमच्याकडे लेखी पत्र आहे." एवढं बोलून त्यांनी हर्षल च्या वडीलांच्या हातात ते पत्र दिल.


ते बघत त्यांनी काही कॉल केले. पण त्यांना ही तिकडून काही अशी उत्तर मिळाली की, त्यांना हर्षल ला पोलिसांसोबत न्यायला होकार द्यावा लागला.. शेवटी पोलिस, जीप मधून हर्षलला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.




डॉक्टरच्या बोलण्याचूक आवाजाने मला जाग आली. बाजुला आई बसली होती. तर समोर डॉक्टर बाबांशी काही तरी बोलत होते. माझी नजर चौफेर फिरत होती..., ती शोधत होती ती निशांतला.. मग न राहून मी आईला विचारल.


"अग आई, निशांत गेला का घरी..??" माझ्या या प्रश्नावर आधी आई गोड हसली आणि मानेनेच नकार देत बोलली..


"अग गेला नाहीये.., बस बोलला की, बाहेर जातो आहे. येईन लवकर." एवढं बोलून आई परत एकदा हसली. तिच्या हसण्याने मात्र मला अस वाटत होतं की, हिला काही कळलं की काय..??" तोच दरवाजातून राज आला.



हातात फुलांचा मोठा बुके.., चेहऱ्यावर एक स्माईल. "हेय प्रांजल, कस वाटत आहे आता..??" आत येताच त्याने प्रश्न केला. "आता ठीक आहे थोडं." एवढं बोलून मी एक स्माईल दिली. हातातला बुके आणि अजून काही तरी होत. पेठे होते ते. मी शुद्धीत आल्याने सर्वांसाठी त्याने आणले होते. खर तर खूप लेट आणले होते त्याने, पण त्याच्या कामात असल्याने जमल नाही असं बोलून त्याने ते सर्वांना वाटले. तेवढ्यात दारात निशांत.




निशांतला बघू माझी तर कळीच खुलली. आता कोणी नसत तर जाऊन घट्ट मिठी मारली असती मी.. अस ही मनात येऊन गेल. आणि मी लाजले.


"अरे वाह निशांत.! ये टाईम वे आलास. हा घे पेढा." राज पूढे होत त्याने पुड्यातला एक पेढा निशांतच्या तोंडात भरवतच होता की, निशांतने त्याचा हात धरला. "नको मित्रा.. माझा उपवास आहे." त्याच्या या वाक्यावर रूमधले आम्ही सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले... "तु कधीपासुन उपवास करायला लागलास..??" राजने जरा हसतच विचारले. "असाच जरा शरीराला आराम." निशांतने ही काही तरी कारण देऊन टाकले.


माझा तर बिलकुल विश्वास बसत नव्हता की, निशांत कधी उपवास करेल आणि तो ही शरीरासाठी आराम... "काही ही असत या खडूसचं..." मी निशांतकडे बघत मनातल्या मनात बोलले.


"प्रांजल तु पोलिसांना हर्षल बद्दल काही सांगितलंस का.??? कारण आजच सकाळी पोलिस तिला घेऊन गेले होते. जामिनावर घेऊन आलो दुपारी." राज ने माहिती पुरवली. यावर कोणीच काही बोलत नाही... पण निशांत मात्र चांगलाच लाल झालेला. कारण त्याला वाटत होत की, हर्षल ला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळाली पाहीजे. पण तिच्या वडिलांच्या पुढे कोण काय बोलणार.

"प्रांजल, तु काळजी घे स्वतःची." थोडं फार बोलून राज निघून गेला. निशांत आणि मी खोलीत होतो. खरतर आई होती. पण नेमकं तिला आठवलं की, घरी गॅस बंद केला की नाही. म्हणुन ती घरी जाण्यासाठी निघून गेली.


"काय ग हे कधीपासून..???" मी माझे डोळे छोटे करत निशांतकडे पाहत विचारले.. "काय.. कधीपासून.." त्याने ही काही माहीत नसल्यासारखा बघितल. "हेच तुझं उपवास कधीपासून सुरू झाले.???" मी एक भुवई वर करत विचारले... "अग बोललो ना.. शरीराला आराम म्हणून हे सगळं बाकी काही नाही." त्याने एक स्माईल देत आपलं वाक्य पूर्ण केलं.



To be continued