सकाळी लवकर जाग आली तेव्हा तिला कालचा प्रसंग आठवला, ती तशीच विचारात पडली होती तेवढ्यात रूम मध्ये आई आली आई मंजिरीच्या जवळ गेली तेव्हा मंजिरीने डोळे बंद केले होते आईने मंजिरीच्या केसांवरून हात फिरवले नि तिच्या डोळ्यात पाणी येऊन हुंदके देत होती हे मंजिरीला जाणवलं पण तीच काहीच करायची मनस्थिती नव्हती. आई थोडावेळ थांबली आणि निघून गेली.
मंजिरी उठली आणि कॉलेज ला जायच्या तयारीला लागली,घराच्या बाहेर पडताना तिला बाबांनी थांबवलं," मंजिरी आम्ही लग्नाची बोलणी करायला घेणार आहोत तुझी मनस्थिती असो वा नसो तुला आमचं ऐकायचं नसेल तर वाट मोकळी आहे"
बाबांच्या अश्या बोलण्याने मंजिरीचा धीर सुटत चालला होता कारण तिचे बाबा तीच ऐकायला तयारच होत नव्हते
दोन दिवसांनी मुलाकडाचे माणसं मंजिरीला पाहायला आली, मंजिरीने काटपदराची साडी नेसली होती त्यात ती इतकी सुंदर दिसत होती की तिच्या आईच्या डोळ्यांत पाणी आले आपली पिल्लू इतकी मोठी झाली हे तिला कळलं च नाही.
घरी मुलाकडाचे पाहुणे आले, मंजिरी चहाचा ट्रे घेऊन आली आणि तिने समोर असण्याऱ्या मुलाकडे पाहिलं त्याने तिच्या कडे बघून smile दिली आणि मंजिरीने पण
शुभम(म्हणजेच त्या मुलाचं नाव) त्याचा असा स्वभाव होता की सगळ्यांना तो आवडला होता म्हणेज च त्यांने सगळ्यांना impress केलं होतं, मंजिरीलापण त्याचा स्वभाव आवडला होता,
पहिल्या भेटीत त्याने सगळ्यांना आपलंसं केलं होतं, पहिल्या भेटीचा कार्यक्रम नीट पार पडला शुभम आणि त्याची मंडळी सगळे घरी गेले , जाताना त्याने मंजिरीचा मोबाईल नंबर घेतला होता touch मध्ये राहण्यासाठी,
ती मंडळी गेल्यावर मंजिरीच्या आई आणि बाबानीं तिच्या कटाक्ष टाकला तेव्हा मंजिरी लाजेने आपल्या खोलीमध्ये पळत गेली,
मंजिरी साठी हे अनुभव खूप वेगळं होत कारण तिने कधी असं अनुभवलं नव्हतं आज तीच हृदय धधडतय ह्याची तिला जाणीव होत होती आज ती खूप खुश होती, तिच्या समोर शुभम च दिसत होता हॅन्डसम,उंच,टापटीपपणा आणि मुख्य म्हणजे सगळयांना आपलंसं करणारा ती ह्या विचारात कधी झोप लागली हे तिला कळलंच नाही.
सकाळी झाली 8 वाजले तरी मंजिरी झोपेतच होती अचानक तिचा मोबाईल वाजला नाराजीचा स्वरात फोन उचलला तर पुढून शुभम चा आवाज आला ," हॅलो मंजिरी good morning "
मंजिरी ताडकन उठली आणि बघते तर शुभम चा कॉल
तिचे हार्ट बिट्स वाढत होते, ती इतकी confuse झाली की तिला काय करावं सुचत नव्हतं
"हॅलो मंजिरी अग कसली गडबड कारतेयस मीच आहे
फोन वर गडबड करू नकोस मी जस्ट good morning बोलण्यासाठी कॉल केलेला, थोडी relax होऊन बोलू आपण" शुभम
मंजिरी विचारात होती की ह्याला कसं कळलं की मी गडबड करतेय
शुभम," मला सगळं कळतं ग"
मंजिरी अजूनच शरमेने लाल झाली आता हे पण कसं कळलं
" चल मी ठेवतो कॉल... नंतर बोलू आपण तू कॉल कर मला कॉलेज ला जाताना ओके have a nice day dear" शुभम ने बोलून कॉल ठेवला.
मंजिरी ला अजून विश्वास बसत नव्हता की त्याचा कॉल आला ते तिने लगेच उठली आणि कॉलेजच्या तयारीला लागली जाताना शुभम ला कॉल लावायला विसरली नाही,
आता मंजिरी च हेच दिनक्रम सुरु झाल, रोज ती आणि शुभम न चुकता बोलायचे
आता तर त्याच्या सोबत न बोलल्याशिवाय राहायचं नाही कधी त्याने कॉल नाही केला तर ती नाराज होयची तीच लक्ष लागायचं नाही,
आता मंजिरीच फर्स्ट इयर संपलं म्हणून तिच्या बाबांनी तिच्या लग्नाची तारीख ठरवायला शुभम च्या मंडळींना घरी बोलावलं पण शुभम आला नाही
मंजिरी आतून थोडी नाराज होती