Ghatsfota nantar in Marathi Moral Stories by Dr Vinita Rahurikar books and stories PDF | घटस्फोटा नंतर......

Featured Books
Categories
Share

घटस्फोटा नंतर......

घटस्फोटा नंतर......

तीन दिवसाची लांब सुट्टी सुमिताला तीन युगासारखी वाटत होती। पहिला दिवस घर कामात निघून गेला, दुसरा दिवस आराम करण्यात आणि घरच्या साठी काही जरुरीचे सामान विकत घेण्यात गेला परंतु आज सकाळपासून सुमिताला रिकामेपणा जाणवत होता। तसं पाहिलं असता एकटेपणा तिला कित्येक महिन्यापासूनच वाटत होता परंतु आज सकाळपासूनच तिला कंटाळवाणे वाटत होते।

स्वयंपाक करून कामवाली गेली होती। सकाळची नुकतेच अकरा वाजले होते। तिचे स्नान नाश्ता सर्व आटोपले होते। घराची झाड़झुड आणि कपडे धुणार्‍या बायका येऊन गेल्या होत्या। म्हणजे आता दिवसभरात कोणीही येणार जाणार नव्हता। दूरदर्शनाचा कंटाळा आला म्हणून सुनीताने दूरदर्शन बंद केले। फोन हातात घेतला आणि गोष्टी करण्याच्या हेतूने तिने आपली मैत्रीण आनंदी ला फोन लावला।

'हॅलो' तिकडंन आनंदी चा आवाज ऐकू आला।

'हॅलो आनंदी, मी सुमिता बोलते। तू कशी आहेस काय करतेस?" सुमिताने मोठ्या उत्साहाने विचारले।

'ओह' आनंदी चा थोडा कठोर स्वर ऐकू आला ती म्हणाली 'मी ठीक आहे घर काम चालू आहे। जेवण फराळ आणखी काय। तू बोल।'

'काही नाही गं बोर होत होती म्हणून विचार आला कि तुझ्याशी गोष्टी कराव्या। दुपारी सिनेमाला जाऊन चलतेस?"

'अगं नाही गं आज रिंकू ची तब्येत ठीक वाटत नाही मी नाही येऊ शकणार। बरं फोन ठेवते मी कारण घरातील खूप कामे करायची आहेत। सिनेमा बघण्याची इच्छा तर माझी पण होते परंतु नवऱ्याच्या आणि मुलांच्या खूप सार्‍या गोष्टी करायच्या आहे।' आनंदी ने फोन बंद केला।

सुमिताशी तिने काही बोलणे केले नाही परंतु तिच्या नवऱ्याशी जे बोलत होती ते सुनीताने ऐकले। ती म्हणत होती की 'या सुमिताला घरचे काहीच काम नसते दुसऱ्यालाही आपल्यासारखे रिकामटेकडे आहेत असं ती समजते।' तिच्या बोलण्यातली खोच स्पष्टपणे जाणवत होती।

याचा अर्थ असा की सुमिताशी गोष्टी करण्याची कोणाला ही सवड नाही आणि आवड हि नाही। सगळ्याजणी आजकाल तिला टाळीत असतात। काही काळापूर्वी या सर्व घनिष्ट मैत्रिणी होत्या। एक उसासा टाकून सुनीताने फोन टेबलावर ठेवला। आता आणखी कोणाला फोन करावयाची इच्छा तिला राहिली नाही। मग तेथून उठून ती गॅलरीत आली। खाली बागीच्यात त्या भवनातील मुळे खेळत होती। काय झालं कोण जाणे पण तिचं मन भरून आलं आणि डोळ्यात टचकन पाणी आलं। कोणाचे तरी शब्द कानात घुमू लागले।

'सुमि तू सुद्धा तुझ्या आई-वडिलांची एकुलती एक सन्तान आहेस आणि मी पण। आपण दोघेही एकटेपणाचे दुःख समजतो। म्हणून मी ठरविले आहे की खूप साऱ्या मुलांना जन्माला घालायची म्हणजे आपल्या मुलांना कधी एकटेपणा जाणवणार नाही।' समीर हंसत हंसता असे म्हणून सुमिताला चिडवायचा।

मुलांना एकटेपणा जानावु नये याची चिंता करणार्या समीरला त्यांच्याच जीवनाच्या खाइत लौटून आली होती सुमिता।

तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं होतं की एक दिवस तिच एकटी राहिल।

किती लाचार झाला होता समीर। शेवटपर्यंत किती विनवण्या करीत होता तो, 'प्लीज सुमि मला एवढी मोठी शिक्षा नको देऊस। मी मानतो की माझ्या हातून पुष्कळ चुका झाल्या आहेत पण मला एक संधी तर दे शेवटची। मी पूर्ण प्रयत्न करेन आणि तुला तक्रार करण्याची संधी देणार नाही।' समीर पुन्हा पुन्हा आपल्या चुकांची क्षमा मागत होता।

वास्तविकपणे त्याच्या त्या चुका नव्हत्याच। एक पती आपल्या पत्नी कडून करतो अश्या त्या छोट्या-छोट्या अपेक्षा आणि इच्छा होत्या। उदाहरणार्थ त्याच्या शर्टाला बटन लावायची आहे, तापात डोके दुखले तर पत्नीने प्रेमाने चेपून घ्यावे, कधी त्याच्या आवडीचा पदार्थ तिने त्याला करून द्यावा वगैरे।

पण समीरच्या या छोट्या-छोट्या अपेक्षा ऐकून सुद्धा ती संतापायची। या गोष्टी करणे म्हणजे पतीची गुलामी असते तिला वाटायचे। नारी शक्ती, नारी स्वतंत्रता, या शब्दांनी तिची बुद्धी वाईट केली होती। स्वाभिमान, आत्मसन्मान, स्वावलंबन या शब्दाचे किती चुकीचे अर्थ तिच्या मनाने आणि बुद्धीने ग्रहण केले होते।

सुमिताने आपली बुद्धी आणि कुशलतेच्या आधारावर मल्टिनॅशनल कंपनीत यश प्राप्त केले होते। एकामागून एक उंची प्राप्त करून आणि भरपूर पैसा मिळवून तिचे डोळे दिपून गेले होते। तिच्या त्या आंधळेपणाने आत्मसन्मान आणि अहंकार यातील अंतर सुद्धा ती विसरून गेली होती। आत्मसन्मान या नावाखाली तिचा अहंकार दिवसेदिवस वाढत गेला की ती प्रत्येक वेळी समीरला तुच्छ लेखू लागली। त्याच्या लहान लहान इच्छा कडे दुर्लक्ष करून त्याच्या भावनांना ठेच पोहोचवू लागली। त्याच्या अपेक्षांची उपेक्षा करणे ही सुमिताची सवय झाली। समीर हे सारे चुपचाप सहन करायचा। परंतु त्या मुळे सुमिताचा अहंकार व क्रोध वाढतच जायचा। सुमिताला उचकविन्यात तिच्या मैत्रीनिंचा सगळ्यात जास्त हात असायचा। त्या सुमिताच्या अडचणी मन लावून ऐकत आणि समीर बद्दल अद्वैतद्वा बोलून तिला सहानुभूती दाखवत असत। याच मैत्रीनिन्नी तिला घटस्फोट घेण्याकरीता प्रेरित केले। तेव्हा या मैत्रीनी च आपल्या हितचिंतक आहेस अस सुमिताला वाटे। त्या अगदी घाई घाई ने येऊन सुमिताच्या दुखा बद्दल ऐकत आणि तिचे कान भरत असत।

'तूं का म्हणून त्याची कामे करतेस? तू काय त्याची नौकराणी आहेस? कां गुलाम आहेस? तू सरळ नकार देत जा।'

एक दिवस समीर बाजारातून ताजे टिंडे घेऊन आला आणि त्याने सुमिताला मसाले भरून टिंडे शिजवायला सांगितले। पण या गोष्टीचा तिला खूप राग आला व उद्वेगाने तिने समीरला म्हंटले की यापुढे ती त्याची गुलामी करणार नाही। ती नामवर आहे। विकत घेतलेली दासी नाही की जेव्हा तेव्हा आदेशाचे पालन करीत राहील। तिला या गुलामगिरीतून मुक्तता हवी।

समीर स्तब्ध उभा राहिला। एक छोटी अपेक्षा इतके भयंकर रूप धारण करेल हे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते। तो वारंवार तिची क्षमा मागू लागला। परंतु सुमिताला त्याची दया आली नाही। शेवटी सुमिताच्या इच्छेनुसार आपलं दुःख गिलून तिला त्याने घटस्फोट देऊन मुक्त केले।

काय सुमिता खरोखर मुक्त झाली? भविष्यात कळेल। तसे पाहिले तर समीरच्या बंधनात ती अधिक स्वतंत्र, स्वच्छंद होती। आपल्या मनाची मालकीण होती। समीरच्या बंधनात तिला जी सुरक्षा मिळत होती त्यामुळे समाजात ती मस्तक उंच करून गौरवमय जीवन जगत होती। जणू काही समीरच्या नावाचं अद्भुत सुरक्षा कवच तिला प्राप्त होतं त्यामुळे लालची आणि कुत्सित दृष्टीचे तिच्याजवळ पोहोचू शकत नव्हते। परंतु त्याच सुरक्षा कवच ला ती पयाची बेड़ी मानत होती। समीरचा तिने तिरस्कार केला परंतु आज.....

आज सुमिताला वाटू लागले की त्याच बेड़ी ने तिला स्वतंत्रपणे चालणे आणि धावणे शिकविले होते। समीर ला सोडल्याचे कळताच लोकांची तिच्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली। महिला सुद्धा अश्या रीतीने तिच्याकडे बघत जसे एखादे जंगली पशु होय। पुरुष आसपास राहण्यासाठी कारण शोधत असत। दोन-चार लोकांनी तर अवेळी तिच्या घरी येण्याचा प्रयत्न केला। अर्थात सुमिता वेळीच अशा लोकांपासून सावध झाली।

आता तर येता जाता एक प्रकारची असुरक्षा आणि भीती तिच्या मनात घर करून असते। समीर च्या सहवासात असतांना तिला अशी भीती कधीच वाटली नव्हती। ती तर पुरुषांबरोबर सुद्धा हसत हसत गप्पा करायची पण तिला कधी संकोच वाटला नाही। हल्ली परिचित पुरुषांशी बोलतानासुद्धा ती घाबरते। परिचित स्त्रिया तिच्याशी बोलतही नाही आणि आपल्या पतींना तिच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात।

भारती, तिचा नवरा आणि सुमिता व समीर सगळे किती हासत खेळत गोष्टी करीत असत। सोबत चित्रपट बघत आणि फिरायला जात। निरनिराळ्या रेस्टोरेंटात जेवण करीत। पण आता सुनीताच्या घटस्फोटानंतर भारती ने सुमिताला स्पष्टच सांगितले की 'आपले घर मोडले आता तिचे घर मोडण्याचा प्रयत्न करू नकोस'

सुमिता सिमित झाली। यापूर्वी तिने तिला कधी असे म्हणटले नव्हते। आज तिला तिच्या पतीला फसविण्याची भीती का वाटावी? भारतीने सुमिताशी आपले संबंध तोडले। आनंदी, रश्मी, शिल्पी सगळ्यांनीच हळूहळू तिच्याशी संबंध तोडले। मुलांच्या वाढदिवसाला किंवा लग्नकार्यात सुद्धा तिला बोलावणे बंद केले।

सुमिताला कळलेच नाही की केव्हापासून तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले। चार वर्षे झाले तिला घटस्फोट घेऊन। पहिल्या वर्षी तर तिला वाटले की ती तुरूंगातून बाहेर पडली। ती स्वतंत्रपणे आता राहू शकते परंतु अडीच वर्ष होण्यापूर्वीच तिच्या वाट्याला एकाकीपण आले। कोणी हँसणारा, बोलणारा, सोबत देणारा राहिलाच नाही। मैत्रिणी आपल्या कुटुंबात मगन झाल्या। सुमिता एकटी पडली। आज तिला आपली स्वतंत्रता, नोकरी, पैसा वगैरे सर्व काही बेमानी वाटू लागली। एक्त्याने जीवन जगणे किती भीतीदायक व दुखद असते याची तिला जाणीव झाली।

लोकांचे गजबजलेले कुटुंब पाहून सुमिताला एकटेपणा अधिकच जानवायचे। आपल्या ज्ञानाचा तिने दुरुपयोग केला, स्वभाव नम्र करण्या एवजी अहंकार वाधवला। त्या चुकीच्या वाग्णाय ची शिक्षा जणु कांही ती आता भोगत आहे।

विचार करता करता सुमीताला रडू आले। जेवण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही।

दोन वाजता तिच्या मनात आले की एकटे घरी बसण्यापेक्षा आपणच सिनेमा पाहून यावे। ती सिनेमा बघण्यासाठी गेली। चित्रपटाचे मध्यांतरात तिला काही ओळखीच्या लोकांचे आवाज ऐकू आले। तिच्या उजवीकडच्या भागात आनंदी, तिचे पती राज व मुले बसली होती। तिच्या लक्षात आले की आनंदीचा ही सिनेमाला येण्याचा कार्यक्रम ठरला होता पण आपल्याला तिने टाळले। तिला वाईट वाटले। खिन्न मनाने तिने पुढील चित्रपट बघितला।

पुढील काही दिवस ती कार्यालयात सुद्धा गप्पच राहिली। तिची आणि समीर ची जुनी दोस्त कोमल हिच्या ही गोष्ट लक्षात आली। सुमिता उदास झाली होती। कोमल समीरची सहकर्मी होती। घटस्फोट घेऊ नये म्हणून कोमलनी सुमिताला समजाविण्याचा प्रयत्न केला होता। परंतु सुमिताला वाटले की कोमल आपली दुश्मन असून ती समीरची बाजू घेऊन बोलत आहे। तिने कोमलचे म्हणणे ऐकले नाही। तिच्याशी बोलणे बंद केले। परंतु आज सुनीताच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिला राहावले नाही। ती सुमिताच्या जवळ आली।

'काय झालं सुमिता खूप? त्रासलेली दिसतेस?'

सुमिता सहानुभूतीचे शब्द ऐकून तिला रडू कोसळले। कोमलच्या लक्षात आले की समीरला सोडण्याचा पश्चाताप सुमिताला होत आहे। कोमल तिला थोड टोचुनच बोलली

'सुमि मि तुला समजविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू मला आपला शत्रू समजलीस आणि तुझ्या मैत्रिणीला हितचिंतक मानून तू समीरला घटस्फोट दिला। त्या मैत्रिणी तुला एकटीला सोडून दूर गेल्या।'

सुमिताने म्हंटले 'बस कर कोमल आता माझ्या दुखी मनावर आनखी बाण नको सोडूस।'

कोमल ने सुमिता समोर कटु सत्य प्रतिपादिले। ती म्हणाली 'मला माहित होते की त्या सगळ्या मैत्रिणी पैश्या वीन तमाशा पहाणाऱ्या आहेत। तू त्यांना पार्त्या द्यायची, फिरायला घेऊन जायची,होटेलात घेऊन जायची म्हणून त्या तुझ्या हो मध्ये हो मिळवायच्या। तुझ्याशी मैत्री करण्यात त्यांना त्यांचा फायदा दिसायचा। पन आता तुझासारख्या एक्त्या स्त्रिला जवळ करण्याची त्यांना भीती वाटते। त्यांना वाटते की संधि साधुन तू त्यांच्या नवरयांना आपल्या जाळ्यात अडकवशील। आता त्या सावध झाल्या आणि तुझ्यापासून दूर राहणे त्यांना समजदारी चे वाटू लागले।' कोमलच्या बोलण्यात अजूनही कटुता होती।

सुमिता चुपचाप बसून अश्रू वाहत होती।

'आणि तुझ्याबद्दल पुरुषांचा दृष्टिकोन बायकांपेक्षा एकदम वेगळा आहे। पुरुष प्रत्येक वेळी तुझ्याबद्दल खोटी सहानुभूती दाखवून तुझ्यावर डोरे टाकित असतात। या समाजात आपली शान कायम राखणे फारच कठीण असते। आजकाल प्रत्येक व्यक्ती तुझ्या घरी येण्याचा बेत करीत असतो।' सुमिताचा मरगळलेला चेहरा पाहून कोमल चा कठोरआवाज थोड़ा नरमला।

'मला सगळ समजत आहे कोमल। मी कार्यालयातील पुरुष सहकर्मी आणि शोजार्यामुळे जेरीस आली आहे। सुमिताने आपले डोळे पुसले।

कोमल पुढे म्हणाली की 'तू समीरच्या बरोबर तडजोड करण्याचा प्रयत्न केला नाही। थोडं धैर्य राखल नाही। स्वतःचा अहम जपु लागलीस। समीरला समजाविण्याचा थोडासा प्रयत्नही केला नाही। तू पती-पत्नीतील ना त्यांची थट्टा केली।' कोमलने करड्या आवाजात म्हटले.

मग सुमित्याच्या खांद्यावर हात ठेवून आपल्या नावाप्रमाणे कोमल आवाजात म्हणाली 'समीर तुझ्यावर खरं प्रेम करतो। तो गेली चार वर्षे एकटाच आहे। त्याने दुसरं लग्न केलं नाही। तो आज हि तुझी प्रतीक्षा करीत आहे। काल मी आणि केशव त्याच्या घरी गेलो होतो। हे पाहून माझ्या हृदय भरून आलं की जेवणाच्या टेबलावर त्याने तुझ्याकरता एक ताठ वाढलं होतं। तो आज सुद्धा आपलं कुटुंब म्हणून तुझीच कल्पना करतो आहे आणि आजही तुझीच वाट पाहतो आहे। तुझ्या एण्याबद्दल त्याला विश्वास आहे। त्याने दुसरे लग्न करण्यापूर्वी आणि जो मजबूर होण्यापूर्वी त्याच्याशी तू तड़जोड करून घे। नाही तर जन्मभर तुला पश्यताप करावा लागेल। त्याचे प्रेम जाणून घे आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी विसरून जा। आपण हीच चूक करतो की लहान-सहान चुकांना धरून ठेवतो आणि आपले नाते आपलं घर सोडतो। पण या गोष्टीचा विचार नाही करीत की घराबरोबर आम्ही स्वतःही तुटून जातो।'

एक खोल श्वास घेऊन कोमल चुप झाली आणि सुमिता ची काय प्रतिक्रिया होईल ते जाण्यासाठी तिच्या चेहऱ्याकडे बघू लागली।

कोमलचि प्रतिक्रिया ओळखण्यासाठी सुमिता तिच्या चेहऱ्याकडे पहात विचारू लागली 'समीर तिला क्षमा करील काय?'

कोमलने सुमिताला प्रश्न विचारला कि 'समीरच्या प्रेमाबद्दल शंका घेऊ नकोस। मला खरं सांग की त्याच्या बरोबर गेली तीन वर्षे तूझी सुखात गेली की वेगळे राहात असलेली ही चार वर्षे तुला सुख देऊन गेलीस।'

सुनीताच्या मलूल चेहऱ्याने परस्पर या प्रश्नाचे उत्तर दिले।

'आपल्या घरी परत जा घराचे दार बंद होण्यापूर्वी। चार वर्षे तुम्ही दोघांनी एकटेपणाची शिक्षा भोगली। समीरच्या मनात तुझ्या विषयी काही तक्रार नाही। तू सुद्धा मनांत पूर्वग्रह न ठेवता आजच त्याच्या जवळ जा। त्याची घराची आणि मनाचे दार आजही उघडे आहे।' कोमल म्हणाली।

घरी येऊन सुनीता कोमल च्या गोष्टींचा विचार करू लागली। खरच आपल्या अहम पणाने स्त्रीशक्ती व स्वावलंबनाच्या नावाने हा दुरावा करून दुख भोगन्यात घेण्यात काही अर्थ नाही हे तिला वाटले। जीवनाची सार्थकता नात्यांना जोडण्यात असते तोडण्यात नाही। घटस्फोटानंतर ही गोष्ट सुमिताच्या चांगल्या प्रकारे लक्षांत आली। स्त्रीची लज्जा घर आणि नवरा यांच्या सुरक्षा देणाऱ्या हातांच्या घेरातच असते। मग अचानक सुमि समीरच्या आलिंगनात बद्ध होण्यासाठी सज्ज झाली।

समीरच्या घराचा दरवाजा उघडाच होता। रात्री आलेल्या सुमिताला पाहून समीर आश्चर्यचकित झाला। सुमि काही न बोलताच त्याच्या छतीला चिपकली आणि समीरने पन तिला आपल्या बाहुपाशात घट्ट आवळले। दोघे ही पुष्कळ वेल रडत होते। चार वर्षाचा विरह आणि मनात साठलेला मळ जणूकाही अश्रूंनी धुतल्या गेला।

पुष्कळ वेळा नंतर समीर सुमीला म्हणाला 'माझी तर उद्या सुट्टी आहे पण तुला उद्या ऑफिस मध्ये जायचे असेल ना तर आता झोप'

'मी नोकरी सोडली आहे समीर.' सुमिने सांगितले।

'नोकरी सोडली पन कां?' समीरने आश्चर्याने विचारले।

'तुझ्या खूप साऱ्या मुलांची देखरेख व लालन पालन करण्यासाठी मी नोकरी सोडली।'

सुमिने लाजत म्हंटले।

समीरला हसू आले। मग दोघेही एकमेकांच्या आलिंगनात हारवले आपल्या झोपण्याच्या खोलीत शिरले।