Sosatyacha Vara in Marathi Short Stories by shabd_premi म श्री books and stories PDF | सोसाट्याचा वारा

Featured Books
Categories
Share

सोसाट्याचा वारा

उन्हाळ संपत आला होता आणि पावसाळा सुरू होणारच होता की मी माझ्या गावाला राम राम ठोकला. मला ठाऊक होतं इथली पाणी टंचाई जून संपेल तरी संपणार नाही आणि त्यात आपल्यासाठी पाण्याची व्यवस्था करताना घरच्यांची आणखी दमछाक होईल म्हणून मी जाण्याची तयारी केली. ज्याण्याचा दिवस ठरवला लांब पल्ला गाठायचा म्हणून प्रवास रात्रीचा करायचा ठरवले जेणे करून इथलाही दिवस हाती मिळतो आणि तिथलाही.
आज संध्याकाळी मी निघणार होतो म्हणून प्रत्येकाचा निरोप घेत होतो, काही नातेवाईक, काही शेजारी ह्यांच्या भेटी घेऊन झाल्या. घरासमोर एक लहान जागा होती त्या जागेवर एक फुलांचं झाड लावलेलं होतं आणि त्या झाडावर नुकतेच माझे नवीन मित्र रहायला आले होते. त्या फुलांचा सुवास आणि त्या मित्राची गोड वाणी माझी प्रत्येक पहाट गोड करायची, मी रोज पहाटे उठून माझ्या खिडकीतुन त्यांना न्याहळत बसायचो. चहा नंतर वर्तमान पत्र वाचून संपायचा पण त्या झाडावरची किलकीलात काही थांबायची नाही ते झाड आता त्यांचं घर बनलं होत आणि त्यांच्या त्यावरचा तो बिछाना, हळू हळू मला त्यांची सवय झाली होती, माझ्या खोलीच्या खिडकीतून मी त्यांना अगदी जवळून पाहू शकत होतो, त्यांच्या हालचाली मला टिपता येत होत्या त्यांना त्रास न होवो म्हणून मी खिडकीचा काच बंदच ठेवायचो. त्या काचेतून मला बाहेरचं दिसायचं पण बाहेरच्यांना आतलं काहीच नाही, त्यामुळे दुपारी काचांवर येऊन कित्येकदा चोच मारायचा, त्याचा तो खेळ खेळत रहायचा, आणि अस रोज चालायचं. जणू मला ती आवाज देतीये अस वाटायचं. मला कळत नव्हतं कि हे सगळं खरंच घडतंय आणि त्याला आपण संबंध जोडतोय की हा नुसता योगायोग आहे म्हणून, त्या किलकीलाटाचा त्या फुलांचा सुगंधाचा आणि काचेच्या आवाजाची मला चांगलीच सवय झाली होती, दिवसात ह्या तिन्ही गोष्टी घडण आवश्यक झालं होतं, पुस्तकांनंतर मला त्यांच्यात करमायचं, पण मला आज त्यांच्या निरोप घ्यायचा होता शक्य आहे का? हा प्रश्न मनात दोनदा विचारून झाला होता पण उत्तर काहीही असले तरीही जाणे अनिवार्य होते, मी त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करून ठेवली होती, एक दोनदा मी त्यांना त्यात खेळताना ओलं चिंब होताना बघितलं होतं. त्यांना पाहून मलाही तितकाच आनंद व्हायचा, रणरणत्या उन्हात त्यांना दिलासा मिळत होता आणि मलाही तितकाच आनंद व्हायचा मी इच्छा नसूनही शेवटी त्यांचा निरोप घेतला, आणि तिथून निघून आलो
जवळ जवळ दोन महिने होत आले होते आणि मनात रोज पक्षांबद्दल, पिल्लांबद्दल, झाडांबद्दल नवी नवी चित्रे तयार होत असत. प्रत्येक चित्रात वेगवेगळी काहीतरी घडताना दिसायचं,लढाई तिची पिल मोठी होताना दिसायची तरी कधी उडत उडत ती पार दूर निघून गेलीये अस दिसायचं...ती चित्र मला कधी आनंददायी तर कधी दुःखवायची.
घरापासून दोन तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस दूर राहिलो म्हणजे मला कामात असताना सुद्धा आपोआप गावाकडच्या काही गोष्टींच्या भास व्हायचा आणि त्यातून मला घरी जावं लागणार की काय अस वाटायचं, आणि प्रत्यक्षात ते घडायचं, काही दिवसांनी थेट मी घरी असायचो.
इतक्या लवकर परत घरी जाऊन येणे हे ही बरोबर नव्हतेच पण तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या ताईचा कॉल आला, ताईने आईच्या आजारपणाबद्दल सांगितले, ती करत असलेली दुर्लक्ष, दिवसेंदिवस वाढत जाणारा त्रास, बाबांचं घरात कमी आपल्या कामात असलेलं लक्ष एकूण आईला होणारा त्रास तीच सहन करत होती, तिच्याकडे ती स्वतः सुद्धा लक्ष द्यायला तयार नव्हती, मला रडायला आणि बाबांवरचा राग एकाच वेळी उन्मळून येत होता. त्यामुळे आता आपल्याला घरी जाऊन यावच लागेल हे पक्क झालं होत. मी तडका फडकी दिवस ठरवला, मी येणार आहे हे आई बाबा किंवा भाऊ कुणालाच कळू दिले नाही, मला बाबांवर माझा राग काढायचा होता आणि आईच्या तब्बेतीवर तोडगा, दोन दिवसांनी मी निघायचं ठरवलं होत, पुढले दोन दिवस माझ्याच्याने कसे निघतील मला काहीच माहिती नव्हतं, जस जसा निघायचा दिवस जवळ येत होता तस तसा राग माझा वाढत होता. पण तो तिथे गेल्यावरच निघणार होता.
दिवस उजाडला मी संध्याकाळी गाडीत बसलो आणि सकाळी नऊ ला घरी पोहचलो, घराचा मुख्य दरवाजा उघडताच लक्ष झाडावर गेलं. झाड आधी सारखं राहिलं नव्हतं हळू हळू ते सुकायला लागलं होतं. मला वाटलं कुणी पाणी टाकत नसावं, पण माती ओलीच होती, कदाचित थोडावेळ आधीच पाऊस पडून गेला होता असावा. मी आत गेलो तर आई आजारी पडलेली आत मधल्या बिछान्यावर अराम करत होती.आईची ही अवस्था पाहून मी आईवर चिडलो. तिची तब्बेत ताईने फोन संगीतकी होती त्याहून आणखी बिकट झालेली होती. मी जाऊन थोडं पाणी पिलं आणि आईलाही आणलं.. आईने सांगितलेल्या गोळ्याही तिला आणून दिल्या.. आणि थोडा अराम करावा म्हणून मी माझ्या खोलीत गेलो बिछान्याहून ते शांत घरटं मला स्पष्ट दिसत होतं. थोड्यावेळात खोलीत ताई आली. प्रवासाची आणि आईच्या तब्बेतीची विचारपूस झाल्यावर मी ताई ला पिल्लांबद्दल विचारलं तर ताईने सांगितलं तू गेल्यानंतर आई रोज त्यांची काळजी घ्यायची. घर भर त्या पक्षांचा किलकीलाट असायचा. जुलै च्या सुरुवातीला सोसाट्याचे वारे वाहायला लागले. एक दोन वेळा घरटे झाडातून पडण्यापासून बचावले. पण एक दिवस त्या वाऱ्याने त्या घरट्याला झाडावरून खाली पाडले.. त्या दिवशी त्या पक्षांची किंचाळी स्पष्ट जाणवत होती. वाऱ्या मुले आईनेही खिडक्या दारं बंद केली होती त्यामुळे त्यांना आत आणि आईला त्यांचा आवाज येणं बंद झालं होत. घरटं जमिनीवर कोसळलं आणि पंख असूनही उडता न येणाऱ्या दोघापिल्लांचा तिथेच मृत्यू झाला. वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याची झालं आज त्या पिल्लांना बसली होती. आता त्या घरट्यात एकच पिल्लू जिवंत राहिले होते. दुसरीकडे आईची तब्बेतही अति बिकट होत चालली होती.
त्यामुळे तिचेही घरट्याकडे लक्ष कमीच जायचे..पिल्लही आता पोरकी झाली होती. अधून मधून ताई आलीच तर त्यांच्या कडे लक्ष द्यायची. नाहीतर काहीच नाही.
आता त्यांच्यावर लक्ष द्यायला मी होतो आणि ताईशी बोलता बोलता पाहतो तर काय त्या काचांवर येऊन ती परत चोचा मारत उभी होती. जणू तिला कळलं होत मी आलोय म्हणून. दिवस संपला, सगळं शांत झालं, दुसऱ्या दिवशी उठून बागेची साफसफाई करण्याची मी ठरवले होते
सकाळी झाली, आईला चहा दिला आणि मी घरट्याकडे वळलो, पाहतो तर घरटं परत जमिनीवर कोसळलेलं. त्यातलं ते पिल्लू गायब होतं आणि चिमणा-चिमणी दोघेही. रात्री हिंस्र पक्षाने घरट्यावर झडप घातली होती. ते पिल्लू हल्ल्याचा प्रतिकार करू शकले नाही आणि आपला जीव त्याच्या स्वाधीन करून बसले होते. चिमणा चिमणी दोघेही तिथून निघून गेलेले होते त्यांच्यासाठी आता ती सुरक्षित जागा नव्हती,
अंतकरणाने मी ते घरटे उचलून परत झाडावर ठेवतोच की आतून आईची किंचाळी कानावर पडली
शालकू..... शालकू.......
मी आत धावलो आणि पाहतो तर काय
आ.....................ई