तो जवळ आला आणि माझा चेहरा ओंजळीत घेतला.. "हे बघ हनी-बी..., मी अस नाही म्हणत की जिंकायचं आहेच पण निदान तु प्रॅक्टिसवर लक्ष तरी दे.. जिंकन आपल्या हातात नाहीये. पण मेहनत तर आपण केलीच पाहिजे ना.." छान समजावत होता निशांत..
"सॉरी निशांत..., मी देईन आता नीट लक्ष.." मी लगेच त्याला सॉरी म्हटलं... तो हसला. आणि जे नको व्हायचं तेच झालं. शेवटी त्याची नजर पडलीच... माझ्या गालावर.. "काय ग.., हे काय झालं तुझ्या गालावर काय आहे.." हे ऐकताच मी स्वतःचा चेहरा बाजूला केला.
"काही नाही निशांत..." मी काही तरी लपवते आहे हे निशांतला कळलं तस त्याने माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला... "शपथ घे माझी आणि सांग काही नाहीये." त्याच्या अशा बोलण्याने मी गप्प झाले. आणि मला जे काही आज घडलं ते सांगावं लागलं.
"काय...? तिची हिम्मत काशी झाली असा मूर्खपणा करण्याची... मी आताच तिला कॉल करून बघतो." निशांत चांगलाच चिडला होता.
"तु शांत हो आधी निशांत.. अरे जास्त काही नाहीये. रागात झालं आहे. मी असते तर माझ्याकडून ही कदाचित हेच झालं असत." मी निशांत ला समजावत होते. पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
"उद्या बघतोच त्या हर्षल ला.. खूप प्रेम आहे ना माझ्यावर चांगलाच जाब विचारतो.. नाही तर एक काम करतो सरांना सांगतो मग बरोबर येईल लाईनवर" तो एवढा चिडला होता आणि चांगलाच लाल झालेला.
"निशांत तु अस काही ही करणार नाही आहेस.. तुला माझी शपथ आहे." मी जरा नाराजीनेच बोलले. कारण मला हे प्रकरण वाढवायचं नव्हतं. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि रागाने जमिनीवर हात मारला... मी तर डोळेच मिठुन घेतले स्वतःचे.. "किती तो राग येतो.." नंतर घाबरतच त्याचा हात हातात घेतला आणि समजावलं...
" मला माहीत आहे निशांत तुला आता खुप राग आला आहे. पण प्रेमात नाही हे कळत.. माणूस हा प्रेमाचा भुकेला असतो.... आणि जेव्हा कळत आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्यापासुन दूर जातेय ही भावनाच अंतर्मन हलवणारी आहे. आपली आवडती व्यक्ती आपल्या आयुष्यात येणारच नाहीये हे समजल्यावर कोणी ही अस वागू शकत.. कारण माणसाचा स्वभावच तसा असतो." मी त्याला समजावत होते.
"किती समजुदार आहेस तू हनी-बी नाही तर मंद हर्षल.. तिला काय कळणार प्रेमाची भाषा... प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा. पण हे तिला कधीच कळणार नाही" निशांत शांतपणे बोलला. यावर मी फक्त मान हलवुन त्याच्या हाताला पाहिलं..
"जास्त दुखतंय का.???" मी त्याचा हात हातात घेत विचारले.. "नाही ग आता तू घेतलंस ना हातात..., आता तर दुखणं पण गायब झाला बघ.." निशांत छान हसुन बोलला.. हे बघून मी मुद्दाम त्याचा हात जोरात दबला तसा तो ओरडला...
"आई ग.., अग दुखतोय ना..." स्वतःचा हात हवेत झटकन त्याने उत्तर दिलं.
"अरे, आताच तर बोललास ना... मी हातात घेतला तर बरं वाटलं.." मी हसुन त्याच्याकडे पाहिलं असता. तो ही हसला... "हो का... माझी शाळा घेतेस का तु...," आणि उठला.. तशी मी पळाली बेडजवळ निशांत माझ्यामागे.... गोल गोल आम्ही एकमेकांच्या मागे फिरत होतो आणि निशांतने मला पकडलं...
त्याने जोरात खेचल.. मी भीतीला पाठ लावून उभी तर हा माझ्या एकदम जवळ आला.. स्वतःचे दोन्ही हात माझ्या बाजूच्या भिंतीवर ठेवले.... "मग काय बोलत होतीस....??" त्याने माझ्याकडे बघत विचारले.
"मी कधी काय बोलले निशांत..??" मी सटकायचा हलका प्रयत्न केला पण तो काही सफल झाला नाही.. त्याच्या तावडीतुन सुटन माझ्याने काही होत नव्हत.... खरतर मलाच ते नको होतं.... तो जवळ आला... एकदा जवळ आणि.....
माझ्या डोक्यावर त्याने स्वतःचे ओठ टेकवले... छान वाटलं. नेहमीच किस फक्त ओठावरच का... कधी कधी डोक्यावर केलीली किस जास्त आनंद देते...
मग त्याला स्वतःपासुन दूर ढकललं... "हॅलो मिस्टर, आपल्या डान्स ची प्रॅक्टिस बाकीचे आहे. नाही तर परत काही लोकं ओरडतील." मी स्वतःच तोंड वाकड करत बोलले. हे बघून तर तो हसला आणि आम्ही परत आमच्या डान्सची प्रॅक्टिस करत राहिलो.....
"अग, तुला दाखवायचं राहिलं." त्याने त्या मघातच्या समानातून एक बॅग माझ्या हातात दिली... "हे काय.???" मी प्रश्नार्थक चेहरा करून बघत होते.
"अग तो आपल्या डान्सचा ड्रेस आहे. बघ दोन्ही साइड ला आहे. आधी पहिल्या साइड चा घालायचा आणि नंतर दुसऱ्या." त्याचा ट्रायल ही झाला. परफेक्ट साईजचा होता.
त्यानंतर आम्ही खाली आलो तर आजी-आजोबा ही आलेले. त्यांना भेटुन आम्ही घरी जायला निघालो. निशांत मला सोडायला येणार होता. निरोप घेऊन आम्ही निघालो. निशांत बाईक चालवत होता तर मी शांत मागे बसून होते स्वतःच्या विचारात.. मधेच गाडीच्या ब्रेकने मी विचारातुन बाहेर आले.
"अरे पोहोचलो आपण..??" मी खाली उतरत विचारल. "मॅडम, घर नाही आल. पण तू कसला एवढा विचार करत आहेस..??" त्याने हेल्मेट काढवत विचारल.
"कुठे काय...?? कसला नाही.." मी स्वतःची नजर दुसरीकडे करत बोलले असता त्याने माझ्या डोक्यात टपली मारली.
"माहीत आहे उद्याच विचार करत आहेस ना.. कॉलेजमध्ये काय बोलतील याचा." त्याने बरोबर हेरलं होत माझ्या मनातल. मी मानेनेच होकार दिला.
"कस तरी वाटत आहे मला... सगळे कसा विचार करत आहेत बघ ना... मी नाही केलं काही यार निशांत..." मी आता रडकुंडीला येऊन बोलले.. हे बघून तर त्याने मला मिठितच घेतलं आणि मी भोकाड पसरल.
काही वेळ रडून शांत झाले. "बर वाटतंय का आता... मी मानेनेच हो म्हटलं. "चल समोर जाऊया.." त्याने स्वतःचा हात समोरच्या दुकानात हात दाखवत सांगितलं. पण मी काही हलायला बघत नाही बघून त्यानेच खेचत नेलं मला... ते एक आईसक्रिम पार्लर होत. मग जाऊन आम्ही छान आईस्क्रिम झाली... तेव्हा कुठे बर वाटल मला.
किती छान कळतो नाही आपण.. निशांतला. गणुचे लगेच आभार मानले. छान पार्टनर दिला गणुने. बस आता अजून काही जास्त नको.
To be continued....