आम्ही निघालो होतो... निशांत गाडी चालवत होता आणि मी बाहेरचा निसर्ग अनुभवत होते. त्या गोबऱ्या गालाच्या काळ्या ढगांनी त्या सूर्याला आपल्या कवेत लपवुन टाकलं होतं. पण तो सूर्य ही किती शहाणा.., तो पण बरोबर ढगांच्या मागुन स्वतःचं डोकं वर काढु बघत होता... त्याची सोनेरी किरणं त्या ढगांच्या मागुन सर्वत्र पसरली होती... काही पक्षी ग्रुप करून फिरत होते.
दुतर्फा झाड आणि त्यातून नागमोडा निघालेला रस्ता. मी खिडकी अजून ही ओपन ठेवली होती. छान वाटत होतं. आम्ही जात असता मला मधेच एक माळरान दिसलं आणि तस मी निशांतला गाडी थांबवायला सांगितली.
"निशांत.., गाडी थांबव..." माझ्या अचानक आशा बोलण्याने तो जरा गडबडला आणि गाडी बाजुला लावली. "काय ग...? मधेच काय झालं..! गाडी का थांबवायला सांगितलीस.??" य्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं असता मी फक्त माझं बोट बाहेर काढुन दाखवलं. "हो.. पण त्याच काय झालं.??" त्याला अजून ही कळत नव्हतं की, नक्की मला काय बोलायच आहे.
मी काही न बोलता बाहेर आले. आणि समोर पसरलेल्या माळरानात पळत सुटले. निशांत ही माझ्या मागून आला आणि गाडीला टेकून उभा राहिला, मला बघत. ते मोकळं माळरान.. त्यावर उगवलेल हिरव गवत... समोर ढगांच्या मागे लपलेला सूर्य... हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघत आनंद घेत होती.
दूरवर पसरलेल्या त्या माळरानात काही बकऱ्या चरायला घेऊन आलेले काका एका झाडाखाली विश्रांती घेत बसलेले होते. त्या रानात गवत खाणाऱ्या बकऱ्या बघून तर मी त्यांना हात लावायला पुढे आले पण त्यातल्या एकीने माझ्याकडे अस काही पाहिलं जस की, आता त्या मलाच खाऊन टाकतील त्या गवता सारख.
हे बघून मी जरा मागे झाले. पण मला त्या छोट्या बकरीच्या पिल्लाला उचलून घ्यायचं होत. हे निशांतने लांबुन पाहिलं. तसा तो माझ्या मागे येऊन उभा राहिला. "काय मॅडम.., पाहिजे का ते छोटं पिल्लू.???" त्याच्या या प्रश्नावर मी नाराजीने होकार दिला.
हे बघून त्याने माझ्या डोक्यात एक टपली मारली आणि त्या काकांच्या दिशेने निघून गेला. तो गेला बघून मी खाली त्या मऊदार गवतामध्ये मांडी घालून बसले. तोच माझी नजर गेली त्या गवतात असलेल्या छोट्या छोट्या रान फुलांवर. "किती गोड असतात नाही ती फुलं.." म्हणजे त्यांना कोणी सांगत नाही की, बाबांनो या उमला. पण ती स्वतःच फुलत जातात. जस काय त्याचच राज्य आहे.
पण त्यांच्यातील मधांचा उपभोग मात्र मधमाश्या तर काही फुलपाखरे करत असतात.. दुसऱ्यासाठीच जगण. असतात काही जण हे फक्त दुसऱ्या साठी जगत असतात.. त्यांच्या आनंदात आनंद मानत असतात.. असो. एवढया गहन विचार असताना कोणी तरी माझ्या मांडीवर एक छोटुस बकरीच पिल्लू ठेवलं. तो निशांत होता..
"घ्या मॅडम, तुम्हची इच्छा पूर्ण झाली. आता हॅपी का..??" छान हसुन तो बोलला. मी त्या पिल्लाला स्वतःच्या मिठित घेतलं आणि एक गोड मुका ही घेतला. आणि ते किती शहान बघा. माझ्याकडे आल्यावर हलायला काही बघत नव्हत. जस काही त्या पिल्लाला निशांत बोलला असावा की, शांतपणे बसुन राहायचं. असे काही तरी विचार येताच मी खुदकन हसले.
मग निशांतने माझे काही फोटो काढले. मग काही सेल्फी. अस करून आम्ही त्या पिल्लाला त्याच्या आईकडे सोडलं आणि निघालो.. परतीच्या प्रवासाला. काही वेळाने पोहोचलो.. त्या थकाथकीच्या मुंबईमध्ये. गाडी सरळ पार्किंगमध्ये लावून दोघेही घरी आलो.
तेव्हा दुपार झालेली. आईने आधीच आमच्यासाठी जेवण केलं होतं. आम्ही फ्रेश होण्यासाठी गेलो. निशांतचे काही कपडे नसल्याने त्याला आज बाबांचे कपडे घालावे लागणार होते. कारण त्याने आणलेले कपडे आईने धुतले होते जे अजून ही सुकले नव्हते बऱ्यापैकी. मग काय केलं बिचाऱ्याने ऍडजस्ट.
त्यानंतर जेवुन थोडा वेळ झोपण्यासाठी तो आई-बाबांच्या रूममधे गेला. मी माझ्या... मी झोपण्याचा प्रयत्न करत असता.. मला सारख आठवत होत ते हर्षुच बोलण. काय वाटत असेल तिला आपल्या बद्दल.. आता ती आपल्याशी आधी सारखी तर सोड निदान बोलेल तरी का...?? हा प्रश्न मला सारखा पडत होता. हे सगळं चालू असताना कधी झोप लागली हे देखील कळलं नाही... "उठा उठा..." कोणाच्या बोलण्याचा आवाज येत होता.., पण कळत नव्हतं की, स्वप्न आहे की खरच कोणी उठवत आहे. किलकिले डोळे करत मी बघण्याचा प्रयत्न केला. ती आई होती.
"अग उठ ग प्राजु... किती झोपा काढशील. हा निशांत बघ लगेच उठला ते ही मी न उठवता. शिका काही तरी त्याच्याकडून." हे सगळं ती बोलत होती तर निशांत बाजूला उभा राहून स्वतःच्या तोंडावर हात ठेवुन हसत होता. आई गेली तशी मी लगेच निशांतला चिमटी काढली...
"खुप हसायला येत ना, बघू आता कसा हसतोस ते...??" आणि मी माझी पक्कड घट्ट करून जोरात चिमटा घेतला असता निशांत जोरात ओरडत बाहेर पळाला. हे बघुन मला हसु आवरत नव्हत. आणि थोडा राग ही आला. म्हणे निशांत सारख शिका. तोंड वाकड करत मी फ्रेश व्हायला गेले. फ्रेश होऊन बाहेर आले. मग आम्ही तिघांनी मिळून चहा नाश्ता केला.
"प्रांजल..,." त्याने माझ्याकडे पाहिलं... खरतर त्याच्या तोंडातुन स्वतःच नाव आता वेगळं वाटत होतं. त्याचं ते "हनी-बी" च छान वाटत कानांना. मी नजरेनेच विचारल.. "अग उद्या पासून डान्स प्रॅक्टिस फिक्स हा. कारण नेक्स्ट विक मध्ये कॉम्पेटेशन आहे." त्याच्या या वाक्यावर तर मी चांगलेच घाबरलेच.. "काय..?? कधी.? कस... म्हणजे तु मला आता सांगतो आहेस..." मी हायपर झालेले बघुन निशांतनेच शांत केलं मला. " अग हो हो.. शांत हो आधी. कालच फ्रेंड्स चा मॅसेज आलेला. पण आपण फंक्शन मध्ये होतो म्हणून तुला बोललो नाही. सो आता जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे." त्याने स्वतःच वाक्य पूर्ण केलं.
To be continue......