Runjir in Marathi Love Stories by Nikhilkumar books and stories PDF | रुंजीर

Featured Books
Categories
Share

रुंजीर

मी तसा कोकणातला

लहानपणापासून कोकणाच्या निसर्गात वाढलेलो खेळलेलो

बागडलेलो,

निसर्गच्या सगळ्या रूपाचा मला अनुभव आहे अन जाणीव पण आहे.

आम्हाला निसर्गाने सगळे काही भरपूर दिले असून त्याच्या

आम्ही मनमुराद आनंद घेतो,

सतत चा पाऊस कधी रिपरिप तर कधी कधी हत्तीच्या सोंडेसारखा

मुसळधार पाऊस सगळे हिरवेगार आंबे, फणस, काजू,

नारळ,सुपारी यांच्या समृद्ध बागा,

माझी पण कोकणात सुंदर वाडी आंबा,फणस, नारळाणे लगडलेली.

टुमदार कौलारू घर छान असा निसर्ग सौंदर्य असताना

आम्ही मात्र एवढा सुंदर निसर्ग सोडून पुण्यात

नोकरीला तिच धावपळ तेच काम सगळ्या गोष्टीत तीच यांत्रिक

पद्धत शनिवार व रविवारच्या सुट्टी साठी आठवड्यातले पाच

दिवस रात्रंदिवस काम.

तेच तेच टु पंच वन लंच जीव अगदी नकोसा होतो,

पण ह्या आठवड्यात घरी जावे म्हणून दोन सुट्ट्या आधीच मंजूर

करून घेतल्या होत्या आता फक्त शुक्रवार ची वाट पाहत होतो,

कसे तरी हे चार पाच दिवस ढकलायचा होते म्हणजे मी घरी

जायला अन माझ स्वतंत्र आयुष्य जगायला मोकळा होतो,

अन तो शुक्रवार चा दिवस उजाडला मी खूप उत्साहित होतो घरी
जाण्या साठी,
ऑफिस ला जातानाच मी बॅग भरून सोबत घेतली होती , परत

येऊन बॅग घेऊन जाणे म्हणजे वेळ दवडने झाले असते, एक तर

इतक्या दिवसांनी घरी जात आहे यातच मला खूप आनंद होत
होता,

कसेबसे काम करून ऑफिस सुटल्यावर निघालो ,

माझ्या गावापर्यंत जाणारी बस नव्हती पण तालुक्या पर्यंत जाणारी

बस मला आता होती तिने प्रवास करून तालुक्यावरून जावा पर्यंत

जाणारी बस मला पुढे मिळणार होती,

धावतपळत स्वारगेट बस स्थानकापर्यंत आलो बस निघनारच होती

तितक्यात मी पटकन बस मध्ये चढलो,

एका ठिकाणी जागा उपलब्ध आहे पाहून मी स्थानापन्न झालो,

अन बस कंडक्टर ने बेल दिल्यावर बस निघाली तिकीट काढून

झाल्यावर डबल बेल

मारून बस मधले लाईट बंद करण्याचा इशारा ड्राइवर असता

त्याने ते दिवे बंद केले,

मी आपला खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याचा आनंद घेता घेता झोपून गेलो,

साधारण रात्रीच्या 11 च्या सुमारास बस तालुक्याच्या ठिकाणी येऊन पोहचली ,

कंडक्टरने आवाज देताच मला जाग आली,

घड्याळात पहिले ते 11 वाजले होते आज मला पोहचायला उशीर

झाला होता कारण माझ्या गावची बस आतापर्यंत कधीच निघून

गेली असणार, फार फार तर रात्री 10:30 पर्यंत बस असते

त्यानंतर सकाळीच बस मिळणार.

पण मी खूप दिवसांनी घरी जात असल्याने मला धीर धरवत नव्हता

कसे हि करून मला घरी जायचे होते,

तालुक्याला माझे काही मित्र राहत होते त्यांना जर सोडायला

सांगितले असते पण तेच मला जाऊ देणार नाहीत असे वाटले,त्यांनी मला खूप दिवसांनी आला म्हणून ठेऊन घेतले असते,

काय करावे हा विचार चालू असताना मला बसस्थानका एक बस दिसली,

ती बस मला गावापासून आठ ते दहा किलोमीटर दूर सोडणार होती

मी काहीस विचार केला की सकाळी जाण्यापेक्षा ह्या बस ने गेले

तर पुढे नशिबाने साथ दिली तर एखादी गाडी मिळेल अन लवकर जाणे होईल घरी

हा विचार करून मी त्या बस मध्ये आलो,

तिकीट काढून मी सीट वर बसलो खूप पाऊस होऊन गेला

होता, सगळी कडे खळखळ पाणी वाहत होते,

तासभराच्या प्रवासाने बस मला जिथे थांबायचे होते तिथे

थांबली मी उतरताच बस पुढे निघून गेली.

मी तर एकटाच होतो अंधार खूप होता पावसामुळे सगळीकडे

चिडचीड झाली होती , रस्ता सामसूम होता अधून मधून

चमकणाऱ्या वीजा निसर्गाचे सौंदर्य दाखवीत होत्या, पाऊस पण येतच होता अन आता गावापर्यंत जय पर्यंत भिजावेच लागणार होते,

जसा मी गावाकडे पाऊल उचलले तसा मला मागून स्त्री चा

आवाज आला अहो जरा मदत करता का मला थोडी

मी थोडा धाबरलो तसा कोकण म्हणजे भुताखेता च्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे,

मी थांबून मागे पहिले तर एक माझ्या वयाची मुलगी असेल ती

चालत येत होती माझ्या जवळ आली,

मी जरा घाबरलो असे तिच्या लक्षात आले असता ती बोलली कि

घाबरू नका मी काय भूत नाहीये अन माझे पाय पण सरळ आहेत

तुम्ही पाहू शकता, अस बोलून हसायला लागली

मी एकवार तिच्या पायाकडे पाहून घेतले सरळ आहेत कि वाकडे

अन खात्री करून घेतली कि ती भूत नाहीये, अन मग थोडा निवांत

झाल्यावर बोलायला लागलो,

अहो तस नाहीये मी पण तर आताच बस मधून उतरलो अन माझ्या

मागे पुढे काहीच वाहन नव्हते ना अन मग तुम्ही अश्या कुठून

आल्या अचानक म्हणून आपले थोडे,

ती परत हसायला लागली तिचा ते हसणे अन तिचा तो गोड मधूर

आवाज मला सुखावून जात होता अन महत्वाचे म्हणजे कोणाची

तरीसोबत होणार होती. तिचा ते मोहक बोलणे ऐकून मला सारखा

तिचा बोलणे ऐकत राहावे असे वाटत होते, पाऊस चालूच होता तो काय थांबणार नव्हता म्हणून नाईलाजाने आम्ही पावसात चालत राहण्याचा निर्णय घेतला.

अधून मधून चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात तिचे निळेशार डोळे,

लांबसडक केस तो गोल चेहरा असा वाटत होते मी त्या निळ्या

डोळ्यात हरवून जाईल मला तर काही क्षण भान हरपला सारखे

फक्त तिच्या डोळ्यात पाहत होतो, काही वेळाने तिचे मला हाताला

हलवून अहो कुठे हरवले मी तुमच्या शी बोलते आहे,

त्या नंतर मी भानावर आलो अन थोडा ओशाळलो अन बोललो अन आम्ही गावाच्या रस्त्याने चालू लागलो

मी- सॉरी सॉरी मलाच कळले नाही कि मी कुठे हरवलो

तिने परत एक गोड स्मित केले अन इकडे पुन्हा माझ्या हृदयाचा ठोका चुकला.

एव्हाना तिलाही कळून चुकले असेल की मी तिच्या प्रेमात पडलो

आहे. खरंच मी प्रेमात पडलो मलाच विश्वास होत नव्हता खरंच

असेल झाले कि काय असे,

म्हणजे बस न मिळणे अन तालुक्याला ना थांबता घरी येण्याचा

निर्णय चांगला झाला असे म्हणण्यात काही गैर नाही

मी काही बोलत नाही हे पाहून तिने तिचे नाव सांगितले माझ नाव पूर्वा मी मुंबई असते पेशाने एक डॉक्टर असून

बस सुटली म्हणून मला उशीर झाला अन मग एक

बस ने मला इथपर्यंत सोडले पण पुढे खूप लांब गाव आहे अन

मला भीती वाटत होती मोबाइल बंद झाला त्यामुळे मला घरी

संपर्क साधता आला नाही, घरी न कळवता आले म्हणून नाहीतर

कोणीतरी घ्यायला आले असते तिचे अन माझे गाव एकच आहे हे ऐकून मनाला समाधान झाले,

मी बोललो कि तुम्हाला कधी पहिले नाही ह्या गावात कधी।

पूर्वा- ह्या गावात माझे आई वडील राहता मी तर खूप दिवसापासून

मुंबईत होते तिकडे शिक्षण झाले अन तिकडेच नोकरी म्हणून

इकडे येनेजाणे खूप कमी होते,

मी मनातल्या मनात खुश झालो बर झाले तिचा फोन बंद

झाला नाहीतर कदाचित आपली भेट झाली नसती,

ती बोलली मी एकटीच बोलू का तुम्ही काही नाही बोलणार काय?

मी- अरे सॉरी मी समर्थ पुण्याला असतो एक कंपनी मध्ये जॉब ला

आहे वीकएंड अन दोन दिवस सुट्टी टाकून घरी आलो आहे

कोकणाचे सौंदर्य अनुभवायला,

पूर्वा- वा मजा आहे मग तुमची हक्काची सुट्टी असते तुम्हाला

आम्हाला तर चोवीस तास काम असते डॉक्टर ची लाईफ फक्त

रुग्णासाठी असते

मी- रुग्णसेवा हि पण खूप मोठी सेवा आहे सगळ्याला नाही मिळत अशी सेवेची संधी

पूर्वा- हो पण खूप जबाबदारी पण असते जीवणमरणाच्या दारातून

रुग्ण आम्हाला परत आणावा लागतो प्रयत्नांची पराकाष्ठा करावी

लागली नेहमीच

मी- हम्म

पूर्वा- बाकी तुम्ही का काही बोलत नाहीत

मी - मला फक्त तुमच बोलणे ऐकत राहावे वाटत आहे

पूर्वा- फ्लर्ट करण्यात तरबेज दिसत तुम्ही जास्त वेळ हि नाही झाला आपली भेट होऊन

मी - सॉरी माझ्या बोलण्याचा तास उद्देश नव्हता फक्त तुम्ही छान बोलता

पूर्वा हसायला लागली मला कळाले नाही ती का हसत आहे ते पण

मी थोडा ओशाळलो होतो पहिल्याच भेटीत असा काय पचका
झाला माझा थोडा गंभीर झालेला चेहरा पाहून

पूर्वा- काही नाही हो मज्जा करत होते तुम्ही तर लगेच सिरीयस झाले

मी- नाही मी आपले सहज बोललो माझा तसा काही अर्थ नव्हता

पूर्वा- जाऊद्या हो मी पण मज्जा करत होते तुमची

तिची ती निरागस बडबड मी फक्त ऐकत होतो, तिच्या बोलण्यातला

शब्दानशब्द कानातुन हृदयात साठवून घेत होतो, सोबत असणारा

निसर्ग अन मधेच येणार रिमझिम पाऊस ह्यालाच का काय ते स्वर्ग

सुख बोलता असे वाटत होते, ती फक्त बोलत होती अन मी फक्त

ऐकत होतो, अन तिच्या सोबत सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होतो,

तिचे हे वाऱ्यावर उडणारे केस अन तिच्या बोलण्याची लकब मी

तर तिच्या प्रेमात डुबुन गेलो होतो.

मी तर तल्लीन होऊन तिचा बोलणे

ऐकत होतो. हा प्रवास कधी संपू नये असे मला वाटत होते, अस

वाटत होत की साताजन्माचे आमचे नाते असून ह्या जन्मी पण ते नाते होईल असे वाटत होते

माझ्या हृदयात तर प्रेम उफाळून येत होते कधी जास्त मुलीसोबत न बोलणारा मी आज मला काय होत होते समजत नव्हते,

माझ्या मनात तर कधी नव्हे त्या कविता उमलायला लागल्या होत्या

" देऊन हात तुझा प्रिये करील सोबतसाथ

प्रेम जडली मज तुझ्यावरी देशील का मज सातजन्माची साथ

घटके पूर्वीचे प्रेम मजचे घेशील ना तू पदरी

का देशील लाथाडून मज प्रेममाप

जर नाकारले मजसी होईल व्यर्थ विलाप

भुलु नको बाह्य अंगी मनाचा मी शरीफ

देऊन हात तुझा प्रिये करशील का सोबत साथ करशील का सोबतसाथ"

वा वा मी तर कवी झालो ह्या प्रेमाने तर माझ्या कडून कविता हि करून घेतली,

म्हणजे मी नक्कीच प्रेमात पडलो आहे, अन कदाचित ती हि

माझ्या प्रेमात पडली असेल पण जर असे अचानक काही

विचारून चालणार नाही,

घाईत कामे बिघडण्या ची शक्यता जास्त असते म्हणून मी जरा स्वस्थ झालो,

बोलता बोलता आमचे गाव जवळ आले आमच्या बोलण्यात जरा

खंड पडला तिचे घर माझ्या घरापासून थोडे दूर होते आधी माझे

घर आले मी बोललो माझे घर आले चला मी तुम्हाला तुमच्या

घरापर्यंत सोडून येतो तर ती म्हणाली नको तुम्ही पण दमलेले

आहात अन खूप लांब चालून आलो आहोत तुम्ही जा घरी मी

जाईल दोन मिनिटात जाईल मी घरी,

त्या वेडीला कोण सांगणार कि मला तुला जाऊ द्यावे वाटत नाही

तिच्या डोळ्यात पण मला माझ्या बद्दल थोडे काही जाणवत होते,

पण आता थोडा काळ निरोप घ्यावा लागणार होता,

जाताना ति बोलली भेटू पुन्हा,

मी- हो नक्कीच छान वाटले तुला भेटून अन बोलून 😘

पूर्वा- मलाही😊

जाताना ती थोडी हळवी झाली असे मला जाणवले
माझ्या हि मनाची चलबिचल चालू होती, तिला तिचा नंबर मागू का नको असे झाले होते

ती निघाली होती तितक्यात

थोडा घाबरत घाबरत बोललो

मी- पूर्वा

पूर्वा- हा बोलणा

मी- तुझा एवढे बोलून मी थांबलो

तिला समजले मला काय बोलायचे ते

पूर्वा ने मला तिचा मोबाइल नंबर दिला

मी जाम खुश झालो अर्धा किल्ला तर सर झाला होता

पूर्वा- माझा मोबाईल सध्या बंद आहे तर मला तू नंतर मेसेज करुन तुझा नंबर दे

एवढे बोलून ती निघाली अन समोरचा अंधारात गायब झाली

मी घरी आली इतक्या उशिरा घरी आलेले पाहुन घरी खुश पण

होते अन चिंतेत पण

मी सुखरूप पाहून त्यांना बरे वाटले अन जेवण करून मी पण

झोपून गेलो सकाळी जरा उशिराने उठलो तोपर्यंत दुपार झाली होती सगळे आवरायला मला खूप उशीर झाला,

फोन पहिला तर कधीचा बंद झाला होता अन चार्ज करायला लाइट नव्हती

तोपर्यत मित्र मंडळी जमा झाली मग मजा मस्ती मध्ये बाहेरच रात्र

झाली रात्री उशिरा लाइट आली तेव्हा कुठे फोन चार्ज झाला चार्ज

झाल्यावर पहिला मेसेज मी पूर्वा ला केला, अन तिच्या मेसेज ची

वाट पाहू लागलो पण तिचा उशिरा पर्यंत मेसेज नाही आला मला

वाटले तीने फोन चार्ज केला नाही अन मी झोपून गेलो

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच मला माझ्या कंपनीतून फोन

आला की तुम्हाला यावे लागेल काही महत्त्वाचे काम आले आहे

तर तुम्हाला कशाही परिस्थिती मध्ये यावे लागेल,

मला तर चिंता पडली की आता कसे होणार पूर्वा ची भेट घेता नाही येणार,

थोडा नाराज होऊन घरी सांगून मी लगेच निघालो वाटले एक फोन

करावा पूर्वा ला कि मी निघालो आहे सांगायला पण तिचा फोन
लागला नाही, थोडेसे नाराज होऊन मी निघालो,

संध्याकाळपर्यंत पोहचून मी आराम घेतला
अन सकाळी लवकर

ऑफिस ला आलो मीटिंग झाली,
मीटिंग मध्ये माझे काम पाहून प्रमोशन केले गेले होते.

मला खूप आनंद झाला वाटले हे पूर्वा आपल्या जीवनात आली अन

माझे प्रमोशन झाले मी सगळ्यात आधी तिला फोन लावला पण

तो लागलाच नाही, मग घरी फोन करून मी हि आनंदाची बातमी दिली घरी आईवडील पण खूप खुश झाले,

एवढे सगळे आनंदात असताना मला वाईट ह्या गोष्टीचे वाटत होते

की पूर्वा ला का फोन लागत नाहीये मला वाटले की माझ्या कडून

घेतला नंबर चुकला असेल पण मला नीट आठवत होते तिने जो

नंबर सांगितला होता तो कि बरोबर सेव्ह करून घेतला होता,

प्रमोशन सोबत काम अन जबाबदारी वाढली होती

रोज तिला फोन करणाऱ्या प्रयत्न करायचो पण नेहमी सारखा

तिचा फोन लागत नव्हता,

आता तर हद्द झाली होती , अन माझ्यातले प्रेम आता मला स्वस्थ

बसू देत नव्हते अन तिच्या बद्दल माहिती काढायची ठरवले

गावी मित्रांना फोन करून मी तिचा बद्दल चौकशी करायचा प्रयत्न

केला पण तिच्या बद्दल कोणाला काही माहित नव्हते,

तिच्या बोलन्यातून असे आले होते की ती खूप दिवसापासून मुंबईत

होती म्हणून तिला गावी कोण ओळखत नसेल,

मला कामाच्या व्यापातून सुट्टी मिळत नव्हती अन तिचा फोन पण काही लागत नव्हता,

अन माझे मन काही कामात लागत नव्हते सतत तिच्या आठवणी

माझ्या मनात घर करून बसल्या होत्या, त्यामुळे मला आता असह्य झाले होते,

मी ऑफिस मध्ये सुट्टी चा अर्ज करून निघालो आता काय आहे ते

सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष करायचा होता ,

मी निघालो अन गावी पोहचू पर्यंत अंधार झाला होता अन आता

पूर्वा च्या घरी जाणे मी टाळले

संध्याकाळी घरी मला झोप येत नव्हती असे वाटत होते की कधी सकाळ होईल अन मी कधी तिच्या घरी जाईल,

ह्या विचारात मला कधी झोप लागली समजले नाही

सकाळी जरा उशिराने जाग आली मला पटकन आवरून मी निघालो,

काही वेळात मी तिच्या घरापुढे आलो.

एक मोठा कौलारू घर त्या घरा कडे मी निघालो खरा पण काय

बोलावे काय विचारावे आपली अन त्याची ओळख पण नाही पण

धीर करून तसाच निघालो,

त्याच्या घराचे कुंपण ओलांडून दारात आलो

आवाज देऊन कोणी आहे का घरात असे विचारले काही वेळात

एक वयस्कर व्यक्तीने दार उघडले यात या अन बसा असे सांगितले

मला असे वाटले की हे पूर्वाचे वडील असावे तितक्यात एक स्त्री बाहेर आली ,

मी ओळखले तिची आई असणार चेहरे पट्टी सारखीच होती दोघींची

त्यांनी विचारले बाळ कोण तू अन आमच्या कडे काय काम

मी समर्थ इथेच खालच्या वाडीत राहतो,

समर्थ नाव एकटाच ते एकमेकांकडे पाहू लागले

थोडा चाचरत समर्थ बोलु लागला
की मी पूर्वा चा मित्र आहे अन खूप दिवस झाले तिचा फोन लागत नाही म्हणून आलो होतो,

समर्थ चे बोलणे ऐकून त्याचे चेहरे थोडे गंभीर झाले

त्यांनी मला विचारले तू कसा अन कधी पासून ओळखतो तिला

ती खूप दिवस मुंबई ला होती तेव्हा तिची ओळख इथे जास्त कोणाशी नव्हतीच

मी- त्याचे काय झाले मी मागे सहा महिन्यापूर्वी गावाकडे आलो

होतो तेव्हा ती मला मोठ्या रस्त्यावर भेटली होती अन आम्ही तेव्हा सोबत गावापर्यंत आलो होतो,

मी बोलत असताना ते अचानक रडायला लागले मला समजले

नाही का ते असे अचानक रडायला लागले काही वेळात ते धीर

सावरून बोलायला लागले होते

तिने आल्यावर तुझ्या बद्दल आम्हाला सांगितले होते पहिल्या
भेटीतच तिला तू आवडला पण होतास

तिने तुला भेटून सांगायचे पण ठरवले पण तिच्या कडे तुझा नंबर

नव्हता म्हणून तिने तुझ्या फोन किंवा मेसेज ची वाट पाहायचे

ठरवले, पण तुझा दोन दिवस ना फोन आला ना मेसेज

अन सुट्टी संपत आली होती म्हणून ती जायला निघाली

मुंबईत पोहचून ती फोन करणार होती

पण नियतीला हे मान्य नव्हते , संध्याकाळी एक फोन आला

आम्हाला कि पूर्वा चा ऍक्सिडेंट मध्ये मरण पावली असून

तिची बॉडी ताब्यात घ्यायला तुम्हाला मुंबईला यावे लागेल,

आम्ही तिचे तिकडेच अंत्यसंस्कार केले ना कोणाला काही सांगितले ना काही असे बोलून त्यांनी समर्थ ला पूर्वाचा हार घातलेला फोटो दाखवाला

एवढे ऐकून अन पाहून समर्थ च्या पायाखालची जमीन सरकते कोण तरी

कानात गरमागरम शिशे ओतले आहे असे त्याला वाटू लागले

तो धाडकन जमिनीवर कोसळला असा किती वेळ तो भावनाशून्य

अवस्तेत बसला होता काही वेळाने उठून तो चालू लागतो आता

तो फक्त आपल्याच विश्वात रममाण असतो

समाप्त...….