"पण मला आता टेंशन आला आहे त्या हर्षुच. कारण तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तिने मला आधीच सांगितलं होतं की, तुझ्यापासून दूर रहा. आता हे सगळं होऊन बसले आहे. उद्या काय होईल काय म्हाहित." एवढं बोलून मी जरा काळजीत बसले असता निशांत माझ्या समोर बसला. माझा चेहरा स्वतःच्या ओंजळीत घेत त्याने मला छान समजावलं.
" हे बघ हनी-बी... माझं तुझ्यावर प्रेम आहे. हर्षल काय करेल म्हाहित नाही. पण तू कसलच टेंशन गजेऊ नकोस. आता तिला तुला काही करण्याआधी माझ्याशी डील करावी लागेल. तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही." एवढं बोलून त्याने माझ्या डोक्यावर किस केली.
छान वाटत नाही. आपली कोणी एवढी काळजी घेतं तेव्हा. मला ही तेव्हा तेच वाटलं. त्या गणु चे किती आभार मानू. एवढी छान फॅमिली आणि आता एवढा छान आणि समजदार लाईफ पार्टनर दिला.
"आणि तसही ती हर्षल मला लगेच कंटाळली असती. तिला नसत जमल माझ्या आजी-आजोबांना सांभाळणं. माझ्या सारख्याला सहन करण.".. निशांत बसून बोलत होता.
मी जीभ बाहेर काढून दाखवत बोलले.. "हो म्हाहित आहे. तुझ्यासारख्या खडूसला कोण झेलनार..!" आणि एकटेच हसु लागले. हे ऐकून निशांत एकदम जवळ आला.. एवढया की आता माझ्या हृदयाचे ठोके ही तो ऐकू शकत होता. मी घाबरले बघून जोरात हसला...
"एक मुलगी घाबरली.." मला चिडवत हसत उभा राहिला. हे बघुन मी तोंड वाकड केलं. "चला आता झोपुया." मी लगेच बोलले. "हनी-बी तु बेडवर झोप मी झोपतो त्या सोफ्यावर." स्वतःचा ब्लेझर घेत निशांत बोलला. "अरे कशाला..?? म्हणजे आपण बेडवर ऍडजस्ट करूया. ते सोफ्यावरचे लोड घेऊन ये." मी त्याला खुणेनेच सांगितलं असता तो घेऊन आला. ते मी मधोमध ठेवले आणि दोन पार्टिशन केले. "चला आता एका बाजूला तु झोप आणि एका बाजुला मी " एवढं बोलून मी एका बाजूला झोपले.
तो देखील एका बाजूला झोपला. खूप थकलो असल्याने आम्ही दोघेही निद्रेच्या स्वाधीन झालो. जाग आली ती बाल्कनीतुन येणाऱ्या स्वच्छ सूर्याच्या किरणांनी. समोर उठले बाजुला पाहिलं तर निशांत नव्हता. मी लगेच उठले आणि आजूबाजूला पाहिलं. पण निशांत रूममधे कुठेच नव्हता. मला टेंशन आल म्हणून कॉल करणारच होते की, हिरो दरवाजातून आत आले.
"अरे कुठे गायब झालेलास. मला एकटीला टाकून." माझ्या अशा बोलण्याने त्याला हसु आलं. "मॅडम घरी जायचं आहे ना..?? आपली गाडी ठीक करायला गेलेलो. आणि तुझ्यासाठी नोट लिहून ठेवली होती टेबलावर चेक नाही केलीस." हे ऐकताच माझं लक्ष टेबलावर गेलं. खरच तिथे एक नोट होती. मी स्वतःचे दात दाखवत सॉरी बोलत फ्रेश व्हायला पळाले.
मग आम्ही एकत्र बसुन नाश्ता केला. मी तर त्याच कपड्यांवर घरी जाणार होते.. सगळ आवरून आम्ही चेक आउट केलं आणि गाडीने परतीच्या प्रवासाला लागलो. बाहेर थंड हवा सुटली होती. मी गाडीची काच खाली केल्याने मस्त थंड हवेचे झोत आत येत होते आणि सोबत सूर्यप्रकाश ही.. बाहेरच दृश्य बघुन आम्ही परतीच्या वाटेला लागलो होतो..
माहीत नाही पुढे काय वाढून ठेवलं आहे.., पण कालच्या दिवसात आयुष्यभर लक्षात राहण्यासारख घडून गेलं होत. निशांतने शेवटी सांगितलं होतं की त्याची "ती" दुसरी तिसरी कोणी नसुन मीच होते. ते सारख आठवुन मी निसर्ग न्याहाळत बसले. ते आठवताच गाल गुलाबी आणि ओठांवर हसु मात्र येत होतं... वेडीच मी.. कधी कधी समोरच्याच्या मनातल कळायला ही किती वेळ लागतो नाही..!!. प्रेम हे असच असत. समोर असलं तरीही कळत नाही. ते डोळ्यात बघुनच कळत.
निघालो घरी जायला पण काय म्हाहित पूढे काय वाढून ठेवल आहे......
to be continued.....