धारावाहिक कादंबरी -
जिवलगा ...
भाग -७ वा .
ले - अरुण वि.देशपांडे
-------------------------------------------------------------
सुधामावशीच्या घरासमोर गाडी थांबली .मधुरिमा म्हणाली.अहो, नेहाकाकू , मावशीचे घर आली बरे का ..आपण उतरावे ..
मी डिकीमधले समान घेते , तो पर्यंत तुम्ही थांबा हं ! नेहकाकू ..!
हे नेहाकाकू -नेहाकाकू ऐकून नेहा चांगलीच वैतागून गेली होती .
या मधुरिमाला आता घरात गेल की चांगलेच बजावून विचारलेच पाहिजे की-
हे नेहाकाकू -नेहाकाकू काय लावलाय सारख ? मी ऐकून घेते आहे.म्हणून पुन्हा पुन्हा तेच म्हणते आहे .
गाडीतून उतरल्यावर नेहाने आजूबाजूला पाहिले .. फक्त बंगल्यांचीच अशी ही छोटीशी कॉलनी असावी,गेटच्या बाहेर मोकळ्या जागेत मोठा बोर्ड दिसत होता
..त्यावर ठळक अक्षरात सोसायटीचे नाव दिसले .." सहकारी नगर, गृह.नि.सह.सोसायटी म. " ठाणे ".सहकार नगर " हे नेहमीचे परिचित नाव होते,
हे वेगळे वाटणारे नाव ..सहकारी -नगर ",काय अर्थ आहे या नावाचा ? याचे उत्तर कळेलच यथावकाश.
मधुरिमाने डिकी उघडली ,नेहाने तिचे समान हातात घेतले ,आणि दोघी घराच्या पायर्यावर उभ्या,राहिल्या .
मधूने पर्स मधून घराच्या चाव्या काढल्या, आणि दरवाजा उघडून घेत त्या हॉलमध्ये आल्या , कोपर्यात नेहाने आपले समान ठेवले ,
आणि सोफ्यावर बसत म्हणाली ..आले बाई एकदाची ... जीवात जीव आल्या सारखे वाटत आहे.
समोर बसलेल्या मधुरीमाने टेबलावर पाण्याचा भरलेला जग ठेवीत म्हटले ..
अहो - नेहाकाकू ..अगोदर चहा घेणार की कॉफी ? मग आपण मिळून जेवण करू या , चालेल ना आपणास ?
आता मात्र नेहाला राहवले नाही ..ते म्हणाली ..
काय ग - मधुरिमा ..तू मला सारखे - अहो नेहाकाकू , असे अहो-जाहो का बरे करते आहेस सारखी ?
मी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे , हे पाहूनच कळते, तरी तू भेटल्यापासून एकच एक लावलाय ..नेहाकाकू -नेहाकाकू ..
हे थांबव बरे अगोदर .आणि तू हे का म्हणतेस हे पण सांग.. मला कळू तरी दे ..
तू माझी अशी फिरकी का घेते आहेस , अशी का खेचती आहेस ?
नेहाच्या या प्रश्नावर ..मधुरिमा खळखळून हसली ..म्हणाली ..अग , नेहा ..तुझ्या याच प्रश्नाची तर वाट मी पाहत होते ..
बरे झाले लगेच विचारलेस ..तू वैतागून गेली आहेस हे तुझ्याचेहऱ्यावरून मला दिसत होते. असो.
मी तुला असे का म्हणते आहे , हेनीट लक्षात घे .
नेहा - तू इंजिनियर झालेली आहेस , छान आकर्षक व्यक्तिमत्व आहे तुझे ..आणि राहतेस मात्र अगदी "काकूबाई छाप "..
चापून चोपून घातलेली वेणी ,तेलाने माखलेले डोके ..त्यामुळे गोरारंग सुद्धा तेलकट गोरा झालाय तुझा , कपाळावर टिकली . गोल रुपया वाटावा अशी..
आणि घातलेला ड्रेस ..जरा तरी शोभेल असा हवा..हे तुला माहितीच नाहीये की काय ? तुझ्याकडे बघणाऱ्याला नक्कीच असे वाटेल.
मग तूच सांग ..तुझ्या सारख्या ." गबाळ-सुंदरीला .. "अहो नेहाकाकू " म्हटले तर माझे काही चुकले का ?
नेहाला स्वतःला हसू आवरले नाही ..ती म्हणाली ..हे कारण असेल तर , ते मला पूर्ण मान्य आहे..
मी दिसते गबाळी , राहते गबाळी .. पण, हे असेच राहावे लागते ग रीमा छोट्याश्या गावात .चटपटीत राहून नाही चालत .
घरातल्यांच राहू दे , गावातील लोकच नावे ठेवतात ...मनमानी करून नाही चालत .पटले का तुला ..?
यस नेहा ..बिलकुल पटले , तुझ्या बोलण्यात लॉजिक आहे, मीच काय कुणीही ते नाकारू शकत नाही . यापुढे एक लक्षात ठेव..नेहा
,तू आता मोठ्या शहरात आली आहेस, इथल्या सारखे राहायचं ,म्हणजे खूप आधुनिक राहायचं असे काही नाही ..बट,
गावाकडे जसे राहायचीस तसे इथे बरे दिसणार नाही . आणि तुला कुणी बावळट "म्हटलेले मला आवडणार नाही ...
यापुढे ..मी तुझी मैत्रीण असणार आहे, तुला सगळी मदत करेन मी .
मधुरीमाचे हे बोलणे ऐकून नेहाला खूप बरे वाटले, धास्त्वलेले मन स्थिर झाले . या नव्या ठिकाणी सेटल होणे सोपे नाही "
याची वाटणारी भीती एकदमच नाहीशी झाली . खूप मोठे दडपण मनावरून उतरले आहे , इतके छान आणि हलके-हलके वाटत होते .
मधुरिमा - तुझ्या शब्दांनी मला किती आधार दिला आहे, हे मी सांगू शकत नाही . थांक्यू सो मच.
आता तू मला सांग .. तू माझी सिनियर फ्रेंड असणार आहेस हे तर पक्के आहे.. मी तुला काय नावाने हाक मारीत जाऊ ..दीदी ,ताई , की माई ?
नेहा -यातले कोणतेच नाव मला नको आहे . तू मला मधु म्हण, रीमा म्हण किंवा पूर्ण नावाने मधुरिमा " असा आवाज दे ..
मी या तीन हे नावांना "ओ -आले "असे उत्तर देत असते .याच नावांची सवय आहे मला .
मला माझे फ्रेंडस- कुणी मधु म्हणत , कुणी रीमा म्हणते , तर कुणाला माझे पूर्ण नाव आवडते म्हणून तसा आवाज देतात .
नेहा म्हणाली - रीमा -तू माझ्या पेक्षा मोठी आहेस ,आणि मला पण मोठी बहिण नाहीये ,सो,- वाटले की तुला मधुताई , किंवा रीमादी असे म्हणावे ..
छान वाटले असते .ते राहू दे आता , तुझ्या इच्छेप्रमाणे .मी पण तुला या तीनही नावाने आवाज देत जाईन..चालेल ना ?
यस नेहा - तू हुशार आहेसच ,हे तुझ्या डोळ्यात डोकावून पाहिले की लगेच कळते , थोडे दिवस जाउदे ..तुझ्या मनात डोकावेन मी ,
मग कळेल तू आतून कशी आहेस ते .
मधुरीमाच्या या बोलण्यावर नेहा म्हणाली ..रीमा - माझी आज्जी म्हणते.. माणूस समजून घेता येतो, तो सहवासाने ,
कारण सहवास ..हा व्यवहार नसतो, त्यात आपलेपण आणि जिव्हाळा असतो ,आणि जिव्हाळा ..दोन मनातले नाते घट्ट करीत असतो .
. हेच मैत्रीचे नाते ..दोन व्यक्तींना ..एकमेकांचे .."जिवलग मित्र बनवीत असते ..!
रीमा म्हणाली - नेहा - अशा समंजस माणसांच्या सहवासात तुझी जडणघडण झाली आहे , तू खूप लकी आहेस.
तुझ्या या भेटीने मला खूप आनंद झाला आहे.रीमाला झालेला आनंद मनापासूनचा आहे हे नेहाला जाणवत होते '
चांगली व्यक्ती भेटणे , ती उत्तम माणूस असणे " आणि त्यात आपल्याला एक मित्र दिसावा..यापेक्षा जास्त आनंद तो काय असणार ? नेहा मनोमन सुखावली.
रीमा म्हणाली - नेहा बोलून मन भरेल आपले , पण, पोटाचे काय ? आता पोटोबा करूया .पोळी-भाजीवाल्याबाई नेहमीप्रमाणेच येऊन गेल्यात .
आपण फक्त गरम भाताचा कुकर लावू या . आणि झकास जेवण करून ..मस्त दुपारची झोप काढू ..ठीक है ना नेहा ?
मधु-तुसी बराबर हो , मी तो पर्यंत रेडी होते , लंचसाठी ..
आलेच हं...!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढील भागात ...८ वा भाग लवकरच येतो आहे...
.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धारावाहिक कादंबरी -जिवलगा ..
भाग -७ वा
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------