This is a send-off - 4 in Marathi Fiction Stories by PrevailArtist books and stories PDF | एक पाठवणी अशी ही...भाग ४

Featured Books
Categories
Share

एक पाठवणी अशी ही...भाग ४

लतिका काल आपल्याकडे बोलण्याचा प्रोग्रॅम नव्हता ग , घरभरणी होती , अपेक्षा होती की घराबद्दल बोलायची पण तसं नाही झालं"

लतिका ," ओह अक्षय m sorry अरे मला हे नव्हतं माहिती पण m sorry(लतिका आता पुढे काय बोलणार )

अक्षय ," असुदे आता पण मी फक्त clear केलं ग माझ्या मनात राहील तर चांगलं नाही वाटत मग मला म्हणून खैर बाकी सगळं ठीक आहे ना तुझ्या घरच..?"

लतिका," हो आहेत ठीक "

अक्षय ," चल मग मी निघतो जरा काम आहे आपण नंतर बोलू बाय tc"

लतिका ," हां बाय take care"

लतिका कॉल ठेवते आणि आपले 'पपा असं बोलले त्याचा तिला राग येतो.अरे प्रसंग काय नि आपण काय बोलतोय आपण ह्याच थोडं तरी भान असायला हवं, असो आता समजवायला गेलो की बोलतील आता पासूनच हि त्यांची बाजू घ्यायला लागलीय म्हणून ती काय बोलत नाही. आवरून ती अभ्यासासाठी बसते .

पण सतत अक्षयच बोलणं तिला आठवत असत. काय पापानि केलं असत , माहितीय पपांना काळजी आहे म्हणून दुसऱ्यांची situation तरी बघायची यार (डोक्याला हात लावून लतिका बसलेली असते).

असे काही दिवस जातात सगळ्यांना हळू हळू कळत लतीकाचा लग्न ठरत. सगळीकडे आनंद असतो. जवळचे राहणारे लोक पण तिला शुभच्छ। द्यायला येतात. खूप जणांचं येणं जाण चालू असतं. सगळ्यांना खाण पिणं चालू असत. तेवढ्यात लतीकाचे पप्पा येतात आणि ," तुम्ही हे असं का केलात मला नाही आवडलं तुम्हाला समजतंय काय ,तुम्ही काय करत आहात" हां आवाज ऐकून लातीककडे आलेले पाहुणे लतीकाचा निरोप घेऊन जातात.

काय झालं म्हणून ती आत जाते तर लतीकाचे पप्पा आई ला सांगतात," आपल्या पोरीने जर आपल्या जातीतीतली मुलासोबत लग्न केलं असत तर आता अशी वेळ आली नसती, शेण घातलं आहे"

पप्पांच हे बोलण ऐकून लतीकाचा जीव नकोसा होतो. तिला इतकं वाईट वाटत कि ती त्या दिवशी जेवत नाही. कारण विचारलं तर मला नाही भूक नाही एवढंच कारण तिने सांगितल.

त्या दिवशी लतीका ने ठरवलं की आता आपण कोणाकडून काही जास्त मागायचं नाही, नाही तर त्याचा आयुष्यभर त्रास मला होत राहील आणि आता त्रास नाही करून घ्यायचा मला.

जेव्हा जेव्हा अक्षयचा फोन यायचा तेव्हा ती सगळं विसरून त्याच्या सोबत बोलायची. तिला खूप बर वाटायचं त्याच्या सोबत बोलायला. एकदिवस असं बोलता बोलता , तिचा धक्का तिच्या दादाला लागला तर त्याला इतका राग आला आणि तिच्या कानाखाली दिली कि तिचा हातातला मोबाईल पडला, का तर धक्का लागला म्हणून ," लायकी आहे काय ग तुझी लग्न करायची हान आणि लग्न करायला निघालीय आधी स्वतःला सावर, हुंम्म्म लग्न करतेय , बापासाला खड्ड्यात घालतेय काय म्हणून लग्न करतात , मेली साली, भिख।रडी स्वतः कमवायची अक्कल नाही ,कशांत काही नाही आणि लग्न करतेय"

प्रत्येक शब्द लतीकाच्या भावाने वापरले होते , त्यामुळे तिच्या डोक्यातली एक एक नस फुटत जात होती. आणि हृदयाची एक धडधड वाढत होती. दादा गेला तेव्हा तिची आई आली आणि तिला सावरलं आणि तिला कुशीत घेऊन रडत होती . "माफ कर मला बाळा पण तू गेलीस तर मला मुलाकडेच राहायचं ग. त्यामुळे मी मध्ये नाही बोलू शकत. तुला पण माहितीय ना तो किती पण बोलला तरी तुझ्या वर खूप प्रेम करतो चल डोळे पूस आणि फ्रेश हो".

आईच्या बोलण्यावर लतिका सगळं विसरू तरी शकत नाही पण ते ती कंट्रोल करू शकत होती . ती आत गेली फ्रेश झाली आणि आईसोबत कामाला जायला निघाली.