Toch chandrama - 11 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | तोच चंद्रमा.. - 11

Featured Books
  • ભીતરમન - 58

    અમારો આખો પરિવાર પોતપોતાના રૂમમાં ઊંઘવા માટે જતો રહ્યો હતો....

  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

Categories
Share

तोच चंद्रमा.. - 11

११

एलियन!

पार्टी खूपच छान झाली. ब्रुनीशी बऱ्यापैकी ओळख झाली त्या निमित्ताने. रात्री निघायला उशीर झाला पार्टीतून. रघुवीर आणि वर्षाचा निरोप घेऊन निघालो. त्या आधी ब्रुनीशी बोलणे झाले. तिला म्युझिकची आवड फार. त्यात गिटार प्रिय तिला. माझ्या गिटारवादनावर खूश झाली ती खूपच. म्हणाली, "तुझ्या बोटांत जादू आहे. इकडे जास्त कोणी वाजवत नाहीत गिटार."

वर्षा त्यात म्हणाली, "अगं ही वाॅज फेमस फाॅर हिज गिटार इन काॅलेज. आणि ते चुरा लिया है गाणं.. इट्स अ व्हेरी ओल्ड साँग.. बट ही युज्ड टू प्ले दॅट.."

"ही इज टू गुड अॅट दॅट.. पण अामच्याकडे नाहीच हे वाद्य!" ब्रुनी निघता निघता म्हणाली.

आमच्याकडे म्हणजे? मी म्हणालो होतो ना की इथे आलेले सारे पृथ्वीवरूनच तर येतात नि मून इंडियामधले सारे आपल्याच देशातून. मग ही 'आमच्या इकडे' का म्हणाली असावी? काहीतरी ऐकण्यात चूक असावी म्हणून मी सोडून दिले ते.. पण त्याचे उत्तर दुसऱ्या दिवशी मिळाले मला..

घरी यायला निघालो तर यानामध्ये राॅबिन शांत होता अगदी. मला वाटले दमला की कंटाळला असेल. पण रोबोज् कसले दमतात.. की कंटाळतात? पण घरी येईतोवर नि घरी अाल्यावरही.. राॅबिन गप्पच होता.

मी म्हणालो ही त्याला, "छान झाली ना पार्टी .."

त्यावर "हुं" हे एवढेच उत्तर त्याचे! आई नि बाबा वाट पाहून झोपी गेलेले. राॅबिनही गुड नाइट म्हणून निघून गेला. राॅबिन असा विचित्र का वागत असावा? ब्रेन मॅपिंग करत बसला असेल तर त्याला वर्षाबद्दल काहीच दिसले नसणार .. पण ब्रुनीबद्दल? ते तर दिसलेच असणार. पण त्यामुळे राॅबिन अपसेट का होईल? असल्या विचारात झोप लागली मला. सकाळी परत आॅफिसात निघून गेलो मी.

संध्याकाळी निघायच्या वेळी राॅबिन आला आॅफिसात भेटायला.

"तू इथे?"

"चल.."

"कुठे?"

"जस्ट कम अलाँग.."

यानातून आम्ही निघालो.. वाटेतही राॅबिन गप्पच. आम्ही त्या कृत्रिम बागेत जाऊन बसलो.. बाग तशीच होती. मी काही म्हणणार तोच राॅबिनच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले ..

"व्हाॅट्स द मॅटर राॅबिन?"

"सांगतो.."

"हे बघ समज मी वर्षाला वर्षापूर्वीच विसरून गेलोय.. तू कन्फर्म केलेच असशील .."

"हुं. तेवढेच नाही.. आणखीही दोन गोष्टी केल्यात मी कन्फर्म.. "

"आणखी दोन..?"

"यस. ऐक. एकतर ती ब्रुनी.."

"तिचे काय?"

"उगाच वेड पांघरून पेडगावी जाऊ नकोस.."

"मराठी सुधारतेय तुझं राॅबिन .."

"ते असू देत.. ऐक.. ती ब्रुनी तुला आवडलीय. मी कन्फर्म केलेय.. तू नाकबूल करू नाही शकत.."

"होय राॅबिन. शी इज टू गुड यार.."

"ते असेल. पण दुसरी गोष्ट मी कन्फर्म केलीय. ती जास्त महत्त्वाची आहे याहून.. तुझ्या फ्युचरकरता.."

"नाऊ डोन्ट टेल मी.. शी इज आॅल्सो बुक्ड?"

"आॅल्सो? एनी वे.. नेव्हर माइंड. पण ते तसे नि तितके सोपे नाहीये ब्रदर. मी त्या ब्रुनीची साग्रंसगीत माहिती काढलीय."

"हुं.. इथे चकलास नि चुकलास तू डिअर.. राँग युज अाॅफ साग्रंसगीत .."

"तेही जाऊ देत. तुला ठाऊक आहे व्हाॅट यू अार अप टू?"

"काय? ब्रुनी इज गुड. खूप हुशार आहे ती. आणि महत्त्वाचे म्हणजे पहिल्या झटक्यात दिलके तार छेडनेवाली.."

"तेच सांगतोय .. ती सुपर इंटलिजंट आहे.. ती अशी नि तशी आहे.. पण ती आहे कोण ठाऊक आहे तुला?"

"म्हणजे?"

"म्हणजे हेच की शी इज.. पृथ्वीवरची नाही ती.."

"मग? नसणारच.. ते गाणंय ना ते मी काल वाजवले .. ये जहां की नहीं है तुम्हारी आंखें.. आसमांसे ये किसने उतारी आंखें.. तशीच अाहे ती."

"ऐक. तसे नाहीये ते. शी इज अॅन एलियन.. नीट ऐक. मी काल रात्रभर खात्रीलायक माहिती गोळा केलीय. आणि त्या माहितीत चूक नाही होत माझ्याकडून. तुला काल पार्टीत पाहिले नि आय वाॅज वरीड .. हे सगळे कसे पार पडणार. अ ह्युमन मॅरींग अॅन एलियन .."

"एलियन? म्हणजे? व्हेअर फ्राॅम?"

"म्हणजे शी इज फ्राॅम टायटन."

"टायटन?"

"यस्.. दॅट्स द मून आॅफ सॅटर्न. तिकडे प्रचंड हुशार आणि प्रगत संस्कृती आहे. त्या प्रदेशातील आहे ही. टायटॅनियन."

"टायटॅनियन?"

"होय. आणि तुमची जोडी कशी जमेल याची चिंता आहे मला."

"पण इकडे ही एलियन पोहोचलीच कशी? इकडे तर फक्त इंडियन .."

"ब्रो.. तेच. तेच कन्फर्म करेपर्यत थांबलो होतो मी. पण दिस इज फाॅर शुअर. मी सारी हिस्टरी सर्च केली. आणि आता ही माहिती फायनल आहे.."

"काय आहे..?"

"अरे, मून इंडिया सरकार आणि टायटॅनियन सरकार यांच्यात काही वर्षांपूर्वी एक करार झाला. त्यात कल्चरल एक्स्चेंज.. म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणून काही टायटॅनियन इकडे पाठवण्यात आले. आणि इकडून काही तिकडे गेले. त्यात ब्रुनी आणि तिची फॅमिली आली. हर फादर इज अ सायंटिस्ट अँड अ फूड टेक्नॉलॉजिस्ट. ब्रुनी त्यांच्याकडून वारसा घेऊन आल्यासारखी फूड इंडस्ट्रीत आली. शी इज व्हेरी इंटलिजंट. तिला कित्येक भाषा येतात आणि शास्त्रातल्या कित्येक संकल्पना सत्यात आणण्याचे प्रयोग ती लीलया करते. ती चांगली आहे यात वादच नाही पण हे असले संबंध कधी आजवर जुळून आले नाहीत. त्यामुळे आय अॅम अ बीट वरीड .. बीट कसला .. रियली वरीड ब्रो.."

"त्यात काय रे राॅबिन .. तू हिंदी सिनेमा पाहिला असशील जुन्या जमान्यातला.. तर त्यात असते ना.. सच्चा प्यार अगर सच में सच्चा हो तो सचमुच उसे कोई भी रोक नहीं पाता!"

"थांब. जरा डी कोड करू देत.." म्हणत राॅबिन मशीनीत त्या वाक्याचा अर्थ शोधू लागला.

"हुं.. ते असेल पण हिअर थिंग्स विल बी इंटरप्लॅनेटरी अँड डिप्लोमॅटिक डिअर!"

"राॅबिन तू काहीही म्हण, आय हॅव लाइक्ड हर.. पुन्हा जुना सिनेमा आठवून सांगतो.. हम दिल दे चुके सनम!"

"अंदाजाने अर्थ लावेन मी. तशी ब्रुनी चांगलीच आहे रे.. इफ इट मटेरियलायझेस.. टिल इट्स लाॅजिकल एंड "

"मग काय.. सगळ्यांना जेवण घरच्या घरी मिळेल.."

मी हसत म्हणालो ते राॅबिनचे टेन्शन कमी करण्यासाठी. मोहब्बत की राहों में अडथळेच फार असे काहीतरी वाचलेले आठवले मला. एकतर आई बाबा मानतील की नाही .. आणि मग हा राॅबिन म्हणतो तसे काही आंतरग्रहीय संबंध वगैरे काही? पण हे सारे जर तर.. अजून ब्रुनीशी फक्त ओळख झालीय. तिला मी आवडेन याची गॅरंटी काय? परत तिच्या घरचे ह्या पृथ्वीवरच्या मुलासाठी तयार व्हायला हवेत. थोडक्यात अडथळे ही अडथळे हैं सब जगह! पण बघू.. होप फाॅर द बेस्ट!

घरी आलो तर एक मोठे सरप्राईज माझी वाट पाहात होते!