Prema tujha rang konta..3 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | प्रेमा तुझा रंग कोणता...-३

Featured Books
Categories
Share

प्रेमा तुझा रंग कोणता...-३

प्रेमा तुझा रंग कोणता...-३

आता खूप दिवस थांबलो आणि आताच योग्य वेळ आहे अस वाटून आणि न राहवून त्यानी गिरिजाला सगळ खर सांगायचं ठरवलं...त्यानी गिरीजा ला भेटायला हॉटेल मध्ये बोलावलं...गिरीजा हि नकार न देता रोहित ला भेटायला आली..

“बोल...आज अचानक का भेटायला बोलावलं?”

"सांगतो.... आधी काय खाणार त्याची ऑर्डर तर देऊ..."

"ठीके... तू दे ऑर्डर!!!"

रोहित नी खायची ऑर्डर दिली आणि तो बोलायला लागला,

“महत्वाच सांगायचय...”

“बोल कि...”

“चिडू नकोस... मी तुला घाबरतो! तू कधीही चिडू शकतेस!! आणि कश्यानी चिडलीस हे कळण अवघड असत!. आणि तुझ लग्न ठरलं बिरल नाहीये ना? आय नो,लग्न ठरलं असतास तर तू मला सांगितलं नक्की असतस.. पण मी खात्री करून घेतोय!!!” इतक बोलून रोहित थांबला आणि त्यानी एक पॉज घेतला..

तितक्यात खायची ऑर्डर आली आणि खाता खाता गिरीजा बोलायला लागली,

"नाही नाही! मला नाही घाई लग्न करायची! तुझ लग्न ठरलं आहे का काय?"

"नाही ग...."

"आणि...मी कधी चिडते? फक्त एकदाच तर चिडले होते...जेह्वा आपण पहिल्यांदी भेटलो होतो.. आणि तुझ्यावर चिडले न्हवते... फक्त त्या दिवशी मूड अतिशय खराब होता... मी तुला सांगितलं होत ना? मी सारखी सारखी थोडीच चिडते? असे आरोप करू नकोस.... तू सांग... काय सांगायचं आहे?"

रोहित च गिरीजा काय बोलती आहे त्याकडे अजिबातच लक्ष न्हवत... तो स्वताच्या विचारात मग्न होता!!! आणि यांनी गिरीजा ला काहीच उत्तर दिल नाही!

गिरीजा रोहित काय सांगणार आहे ते ऐकायच होत..पण रोहित काही बोलत नाहीये हे पाहून ती त्याला बोलली..

“सांग कि...काय सांगायचं? किती वेळ लावणार आहेस? इतक काय महत्वाच आहे?”

गिरीजाच्या बोलण्यानी रोहित भानावर आला... आणि तो अजिबात वेळ न दवडता डायरेक्ट मुद्द्याचच बोलायला लागला..

“आय लव यु..विल यु मॅरी मी?” गिरीजा त्याच्याकडे शांतपणे पाहत होती.. पण जेह्वा रोहित तिला आय लव यु म्हणाला तेव्हा ती जरा उडालीच!!! त्याच बोलण तिच्यासाठी अनपेक्षित होत... पण तरीही तिनी रोहित ला उत्तर दिल, बोलली,

“आर यु सिरिअस?”

“हो ग... बरेच दिवस तुला सांगायचं होत पण मी ते सांगू शकत न्हवतो.. शेवटी आज सांगितल.... आणि मी अशी गम्मत कधीच करणार नाही...यु नो..”

गिरीजा थोडी अस्वस्थ झाली...“पण अचानक अस का वाटल? म्हणजे मी तुला फक्त फ्रेंड म्हणून पाहत होते..बाकी काही मी विचार केला न्हवता...”

“मी मला वाटल ते सांगितलं...पुढे काय तू ठरवायचं.. आय वोन्ट फोर्स यु.. मला तू आवडतेस... पण तुझा निर्णय घ्यायला तू फ्री आहेस!”

“आय नीड सम टाइम.. मी लगेच तुला काही सांगू शकत नाही...” ती म्हणाली..

“मी लगेच उत्तराची अपेक्षा करतही नाहीये... यु टेक युअर टाइम.. आय कॅन वेट!”

“ओके...” गिरीजा इतक बोलली आणि पुढे काहीच न बोलता ती तिथून निघून गेली... तिनी काही खाल्लं पण नाही!

रोहित नी मनातल सगळ सांगितल्यामुळे त्याला मोकळ वाटायला लागल... तोही बिल देऊन हॉटेल मधून निघाला... आणि त्यानी थेट घर गाठल...

घरी जाऊन गिरीजा नी बराच विचार केला...बराच वेळ ती विचार करत तिच्या खोलीत बसून राहिली... बराच विचार केल्यावर, तिनी मनोमन निर्णय घेतला आणि त्याच दिवशी रोहित ला भेटायला बोलावलं.. पण तिनी हॉटेल मध्ये बोलावण टाळल.. तिनी रोहित ला एका बागेत भेटायला बोलावलं... रोहित लगेच बागेत आला आणि आल्या आल्या त्यानी गिरीजा ला विचारलं,

“बोल...काय ठरवलं आहेस?”

“मी बराच विचार केला.. आणि आय ऑल्सो फेल्ट,आय लव यु... पण मी सांगते,मी काम करेन आणि पैसे मिळवेन ह्याबद्दल खात्री नाही..मला खर तर आर्ट्स ची आवड आहे.. म्हणजे मला लिहिण्याची आवड आहे... पण आई वडिलांच्या आग्रहास्तव मी इंजिनीअरिंग केल... तुला वाटेल इंजिनीअरिंग केलय म्हणजे बरोबरीनी काम करून पैसे मिळवू पण तस नाहीये..मी स्पष्ट सांगतीये! नंतर भांडण होण्यापेक्षा आधीच माहित असलेल चांगल सो सांगितल...”

“तू वेडी आहेस का? तू पैसे कमवावे अस मी म्हणणार पण नाही..मला आवडत म्हणून मी काम करतो आणि मला भरपूर पैसे मिळतात.. बायकोनी घरासाठी पैसे मिळवायला काम कराव अशी माझी अपेक्षाही नाही... माझ ठाम मत आहे,प्रत्येकानी आपल आयुष्य आपल्याला हव तस जगाव.. मनासारखं!!! बाय द वे, तू मला सांगितलं होतस, तू जॉब करणार नाहीयेस! तुला लिहिण्याची आवड आहे.. आणि तू खूप मस्त लिहितेस.. मग मी तुला का म्हणेन कि तू सुद्धा जॉब करून पैसे आणावेस! आणि पैसे मिळतातच ग... कामातल समाधान महत्वाच!! अजून काही शंका कुशंका आहेत? हाहा..”

“नो..हाहा!.. तुला आठवतंय का मी तुला सांगितलं होत कि मी जॉब करणार नाहीये?? मी तुला हे सांगितलं आहे हे मला आठवत न्हवत सो....” इतक बोलून गिरीजा गोड हसली आणि डोळ्यातून तिनी तिचा होकार रोहित ला सांगितला..

“तू खूप गोड हसतेस... आणि हसलीस म्हणजे तुझा होकार आहे ना? हाहा... विचारून घेतलेलं बर.. नाहीतर भांडत बसशील..."

"हो रे... सगळ बोलूनच दाखवायला हव का?"

"मग गुड... हाहा! आपण घरातल्यांना सांगून लवकरच लग्न करू..”

“येस.. मला वाटल न्हवत तू मला कधी प्रपोज करशील.... पण तू प्रपोज केलस, आणि मी हि होकार दिला!! सगळाच अनपेक्षित!! आजचा दिवस मला नेहमी लक्षात राहील...."

"हो ना... मला पण आजचा दिवस नेहमीच लक्षात राहील...."

"आता भूक लागलीये.. खायला घाल..”

“ओह हो..आत्तापासूनच होणाऱ्या नवऱ्याचा खिसा कापायला सुरु करणारेस का?”

“हाहा...हो..तसच समज.. तूच म्हणालस ना,तुला भरपूर पैसे मिळतात.... मग थोडे होणाऱ्या बायकोसाठी वापर.. तुला काही प्रॉब्लेम नाही ना?”

"तू म्हणजे ना...कसला प्रॉब्लेम असेल मला.... मी आनंदानी बायको साठी पैसे खर्च करेन.. कुठे जायचं सांग.. आज तुझा होकार आला म्हणून माझ्याकडून तुला ट्रीट!"

रोहित च्या प्रेमळ आणि समजूतदार वागण्यामुळे गिरीजा खुश झाली.... दोघ हॉटेल मध्ये जाऊन खाऊन आले..नंतर दोघांनी घरच्यांच्या सम्मतिनी लग्न केल...दोघांचा संसार चालू झाला... रोहित चे आई बाबा पण एकदम समजूतदार होते... त्यांनी सुद्धा गिरीजा ला कोणत्याच गोष्टी वरून विरोष केला नाही... लग्न होऊन बरेच दिवस झाले... रोहित नी आधीची कंपनी बदलली आणि एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करायला लागला... साहजिकच त्याच काम आणि जबाबदाऱ्या वाढल्या. गिरीजा सुद्धा प्रसिद्ध लेखिका झाली.. रोहित सारखा कामात बिझी राहायला लागला... आणि गिरीजा पूर्ण वेळ लिखाण करायला लागली.. रोहित च काम खूप वाढल्यामुळे त्याच वागण जरा बदलल.. आधी प्रत्येक लेख आणि गोष्टीच भरभरून कौतूक करणारा रोहित एकदम बदलला...